Saturday, August 24, 2019

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केली आहे असे म्हणता येत नाही…..! राजेश खडके सकल मराठी समाज


                  बरेच दिवसापासून माझ्या पहाण्यात येत आहे की,आपले असो किंवा विरोधक असोत सर्वच्या सर्व प्रकाश आंबेडकर यांना एकटे पाडण्यासाठीच कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या दिड वर्षापासून प्रकाश आंबेडकर यांनी दिवसाची रात्र आणि आणि रात्रीचा दिवस करून इथल्या स्वराज्यातील अलुतेदार यांना न्याय देण्याची भूमिका प्रस्थापित केली आहे.त्यामुळे इथला ओबीसी असणारा वंचित घटक बाळासाहेबांच्या पाठीशी उभा राहिलेला मला पाहिला मिळालेला आहे.त्यामुळे इथले प्रस्थापित असणारे मराठे घराणे अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न रिपब्लिकन जरी होते आणि भविष्यातील राजकीय पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जरी होते तरी त्यांनी ती पार्टी स्थापन केली असल्याचा पुरावा कुठेही उपलब्ध होत नाही.तसेच काही लोकांचे म्हणणे असे आहे की,अशोक चक्रांकित निळा ध्वज बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे याचेही पुरावे कोठेही उपलब्ध होत नाहीत.मात्र यां देशाचा राष्ट्रीय ध्वज भगवा असावा यासाठी त्यांनी संघर्ष केला असल्याचे पुरावे मात्र समोर आलेले आहेत.१९५७ ला समता सैनिक दलाची पुर्नस्थापना होऊन निळा ध्वज प्रस्थापित केल्याचे पुरावे समोर आलेले आहेत.१९५७ ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची इतर नेत्यांनी स्थापना केली असल्याचे आणि त्याचे बरेच गट पडून वेगवेगळ्या प्रकारे निळा ध्वज प्रस्थापित करण्याचे कार्य त्यावेळी झाले असल्याचे पुरावे समोर आलेले आहेत.राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांचा ध्वज वेगळा आहे आणि काशीराम-मायावतींचा यांचा निळा ध्वज वेगळा आहे.
                डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालेनंतर त्यांनी लिहिलेले साहित्य आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्याकाळी कोणत्याही नेत्यांनी केला नाही.त्यांच्या दिल्लीच्या घरातून त्यांचे साहित्य काँग्रेसी गुंडांनी रस्त्यावर फेकून दिले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्याकाळी काही नेत्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करून अशोक चक्रांकित निळा ध्वज दिला असल्याची वल्गना करून वेगवेगळ्या गटात तिचे तुकडे करून निळा ध्वजाच्या माध्यमातून इथली जनता आपल्या ताब्यात ठेऊन त्याचा राजकीय लाभ पुरेपूर पद्धतीत घेतला आहे.बाबासाहेबांचे झालेले महापरिनिर्वाण डोळ्या समोर ठेऊन त्यांच्या मृत्यूचा प्रश्न निर्माण करून त्या आंदोलनाच्या माध्यमातून २० वर्ष ताबा आंबेडकरी जनतेवर ठेवला होता.परंतु जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा हा प्रश्न सोडून देण्यात आलेला होता.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य कुठे आहे…? याकडे कोणीही लक्ष दिले नाही.काही लोकांनी प्रयत्न केला परंतु म्हणावे तेवढे यश त्यांना प्राप्त झालेले नाही.हा मुद्दा संपतो ना संपतो लगेचच मराठवाडा नामांतर मुद्दा पुढे करून आंबेडकरी जनतेची १७ वर्ष त्यात खर्ची करून निळ्या ध्वजा संदर्भात अस्मिता तयार केली गेली आहे.त्यामुळे निळा ध्वज आज संघर्षाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो आणि त्याची अस्मिता टिकविण्याचे कार्य आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे याची आपण जाण ठेवली पाहिजे.
              असे जरी असले तरी समतेच्या विचारांचा असलेले भगवा ध्वज आज प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेला आहे.जो सम्राट अशोका पासून ते आजपर्यंत टिकून राहिलेला आहे. या भगव्या ध्वजाचा आणि आर्य सनातनी हिंदू धर्माचा कोणताही संबध नाही १९७३ ला या भगव्या ध्वजावर त्यांनी ताबा मारलेले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झालेनंतर त्यांचे मृत्यूची माहिती शासनाकडे नाही तसेच त्यांचे अंत्यसंस्कार करतेवेळी त्यांना तिरंगा ध्वज देण्यात आलेला नाही.त्याच्या पार्थिव देहावर शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा ध्वज समर्पित केल्याचा आजही त्यावेळच्या फोटोमध्ये दिसत आहे.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केली आहे असे म्हणता येत नाही आणि त्यांनी निळा ध्वज दिला आहे अये म्हणता येत नाही.

No comments:

Post a Comment