एकंदरीत विधानसभा निवडणुकीचे राजकारण पहाता असे दिसून येते की राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जे ५५ वर्षात पेरले आहे तेच उगवून आता समोर आलेले आहे.परंतु आम्हाला आभिमान आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे शरद पवार यांच्या राजकारणाला पुरून उरले आहेत.ज्या कॉंग्रेसने इथला भूमिपुत्र संपविण्याचा घाट घातला होता आणि हे कॉंग्रेस जळते घर आहे असे बाबासाहेबांनी सांगितलेले होते.अशा कॉंग्रेसच्या विरोधात प्रकाश आंबेडकर गेली ४० वर्ष संघर्ष करीत आलेले आहेत.परंतु त्यांचा संघर्ष बदनाम करण्याचे गेल्या ४० वर्षात बरेच प्रयत्न झाले आहेत आणि होत आहे.त्यांना कधी भाजपाचे हस्तक म्हणून हिनवले गेले तर कधी भाजपाची बी टीम म्हणून हिणवले गेले आहे.परंतु अशा कोणत्याही गोष्टीला त्यांनी गेल्या ४० वर्षाच्या राजकारणात भिक घातलेली नाही.ही फुले शाहू आंबेडकर चळवळ संपविण्यासाठी संभाजी ब्रिगेड उभी केली होती असे सध्या तरी सुरु असलेल्या राजकारणामुळे दिसत आहे.आज या सर्व मराठा संघटना बंद करण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार समोर आलेले आहे.खेडेकर यांचा प्रवास पुन्हा भाजपाच्या दिशेने सुरु झाला असल्याचे दिसत आहे...तर प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करून हे सिद्ध केले आहे...तसे नसते तर प्रवीण गायकवाड यांना जेव्हा कॉंग्रेसने नाकारले तेव्हा ते वंचित बहुजन आघाडी कडून ते उभे राहिले असते. परंतु त्यांनी तसे न करता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यामुळे आता त्यांच्याकडे काही शिल्लक राहिले आहे असे मला वाटत नाही.आता शरद पवार असक्षम नेतृत्व म्हणून समोर आलेले आहे..त्यांच्या सहकारी यांना आता लक्षात आले आहे की आता शरद पवार यांची प्रशासकीय आणि राजकीय ताकद जवळ जवळ संपुष्टात आलेली आहे.त्यामुळे आपण केलेले घोटाळे आज ना उद्या बाहेर आले तर शरद पवार आपले संरक्षण करू शकणार नाहीत.यातच शरद पवार यांनी मोठी अशी घोड चूक केली ती म्हणजे या महाराष्ट्रात अजित पवार यांना त्यानी म्हणावी तशी राजकीय ताकद दिली नाही.नेहमी त्याना दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तेही मजबूतपणे उभे राहू शकले नाहीत.परंतु सध्याचे राजकारण पहाता त्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अमोल कोल्हे यांच्या हातामध्ये देऊन संपूर्ण वरिष्ठ पदाधिकारी यांना त्यांच्या नेतृत्वात येण्याचे आदेश दिले आणि शरद पवार यांनी उभे केलेले जंगल कोल्ह्याने फस्त केले असल्याचे समोर आलेले आहे.शरद पवार यांनी नेहमी तोडा फोडाची राजनिती केली आहे या राजनिती प्रमाणे बौध्द समाजाच्या विरोधात मातंग समाजाला ताकद देण्यासाठी त्यांनी मातंग समाजाला आवाहन केली की तुमचे प्रश्न माझ्याकडे घेऊन या ते मी सोडविन गेल्या ५५ वर्षात त्यांना मातंग समाज बांधवांचे प्रश्न आठविले नाही आणि आता आठवत आहे.त्यात प्रामाणीकपणा असेल तर ठीक आहे परंतु केवळ दोन जातीत ध्रुवीकरण करण्याचा हेतू मुळातच चांगला नाही.त्यांच्या या आवाहनाला काही मातंग समाजाचे कार्यकर्ते बळी पडले आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या भेटी गाटी घेण्यास सुरुवात केली.असाच एक मातंग समाजाचा एक गट शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीला गेला होता.पवार साहेबाच्या बंगल्यात सुप्रियाताई,अजितदादा,रोहित पवार आणि पवार साहेब एकत्रित चर्चा करीत बसले होते.त्यामुळे पवार साहेबांनी भेटण्यास आलेल्या त्या मातंग समाजाच्या गटास रोहित पवार यांनी भेट घेऊन त्यांच्या बरोबर चर्चा करण्यास सांगितले.त्यावेळी सध्याचे राजकारण यावर चर्चा सुरु झाली तेव्हा रोहित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांची स्तुती करून त्या मांतग समाजाच्या गटास सांगितले की आजच्या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीची ताकद आमच्या पेक्षा १० पटीने जास्त वाढली आहे.तो वाढलेला प्रभाव कमी कसा करता येईल असा प्रश्न जेव्हा त्या मातंग गटास केला तेव्हा ते आश्चर्य चकित झाले.तासभर चर्चा झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा बोलाविण्यात येईल असे सांगण्यात आले.त्यामुळे ती चर्चा आटपून तो गट तेथून निघून गेल्यावर आश्चर्यचकित झाला त्यांना त्यांची चूक लक्षात आली असेल असे मला वाटते कारण रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत आणि त्यानी वंचित बहुजन आघाडीची ताकद १० पटीने वाढली असल्याचे कबूल करणे म्हणजेच ते शरद पवार यांनी कबूल केल्यासारखे आहे.यामुळेच एका पत्रकाराने जेव्हा शरद पवार यांना प्रश्न केला की आता तुम्हाला तुमचे नातेवाईकही सोडून चालले आहेत.हा प्रश्न ऐकून शरद पवार यांचा संयम सुटला आणि ते त्या पत्रकारावर भडकले.
समजदार आहेत सत्य विचार सूद्धा मांडलेत
ReplyDelete