Sunday, September 12, 2021

स्वराज्यातील दुसरा बलुतेदार सुतार होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


 

पहिल्या भागात आपण गावगाडा कसा उभा राहिला आणि हा गावगाडा उभारण्यासाठी बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांचे महत्व काय होते हे आपण समजून घेतले आहे.हा मानवतावादी गावगाडा उभा राहण्यास सिंधू संस्कृतीचे मोठे योगदान आहे.कारण सिंधू संस्कृतीने कृषी संस्कृती उभारली आहे म्हणजेच शेतीचा शोध लावला आहे.शेतात लागणारे नवनवीन अवजारे उभी केली आहेत.मग लाकडापासून वाकड्या काठीचा नांगर वा ब्रशासारखे ओढायचे अवजार,वखर,डवरा,तिफन.गोफण,औत किंवा अऊत अशा प्रकरची अवजारे विकसित केली.आणि कृषी संस्कृती स्त्रियांनी उभी करून इथल्या मानवजातीला अन्न देण्याची व्यवस्था केली आहे.त्यामुळे या स्त्रीला “नेॠृती” असे म्हणत असे....म्हणूनच “स्त्रीचा” विद्वानवादी महापुरुष नेहमी सन्मान करतात.या सिंधू संस्कृतीने विद्वानांची संस्कृती म्हटले जाते.मानवतावादी विचार या सिंधू संस्कृतीने संघटीतपणाला महत्व देऊन गणराज्य पद्धत अस्तित्वात आणून येथे संघ कायम केलेला आहे.आणि हा संघ उध्वस्त करण्याचे काम सिंधू संस्कृतीवर आक्रमण करणारे आर्यांनी करून ॠषी संस्कृती उभी करून सनातन धर्म व्यवस्था निर्माण केली आहे.परंतु गौतमी पुत्र सिद्धार्थ याने म्हणजे गौतम बुध्दानी ही संस्कृती पुन्हा जागरूक करून या संस्कृती मधील विद्वानांना शरण जाऊन “बुद्धं शरणं गच्छामि” ला महत्व दिले आहे.या सिंधू संस्कृतीच्या मानवतावादी विचारांना शरण जाऊन “धम्मं शरणं गच्छामि” ला महत्व दिले आहे.सिंधू संस्कृतीच्या स्त्री शक्तीच्या एकत्री येणाऱ्या संघटीत होऊन काम करण्याच्या पद्धतीला शरण जाऊन “संघम शरणं गच्छामि” ला महत्व दिले आहे.

      याच सिंधू संस्कृतीवर आक्रमण करून इथली मानवतावादी व्यवस्था उलथून टाकण्यासाठी आर्यांनी सनातन धर्म व्यावस्था उभी केली या व्यवस्थे विरुध्द लढण्यासाठी पहिला धर्म उभा राहिला तो “जैन धर्म” यां धर्माचे संस्थापक महावीर होते.परंतु हा विचार सनातन धर्म व्यवस्था रोखू शकला नाही.त्यानंतर गौतमी पुत्र सिध्दार्थ याने भगवे वस्त्र परिधान करून “बौध्द धम्म” विकसित केला आहे.भगवे वस्त्र परिधान केल्यामुळे त्यांना “भगवान” म्हटले जाऊ लगले.त्यामुळे भगव्या वस्त्रामध्ये “समता” निर्माण होऊन भगव्या वस्त्रा संदर्भात एक आत्मीयता तयार होऊन गावगाड्यातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांनी वारकरी पंथ स्थापन करून येथे “समता” प्रस्थापित केली आहे.त्यामुळे गावगाड्यातील पहिला बलुतेदार म्हणून आपण गेल्या लेखात “महार” समजून घेतला आहे.स्वराज्य उभारणीत त्याचे योगदान काय होते ते आपण समजून घेतले आहे.स्वराज्य उभारणीतील “महार योध्दा” अस्पृश्य कसा झाला हे पुढे येणाऱ्या लेखात आपण समजून घेणार आहोत.

स्वराज्यातील दुसरा बलुतेदार “सुतार” –:

गावगाडा उभारणीत “सुतार” याला खूप महत्व प्राप्त होते.....कारण सुताराने गावगाड्यातील लोकांना राहण्यासाठी पांढरीवर घरे उभारली,इमले उभारली,वाडे उभारली आहेत.शेतात लागणारी अवजारे उभारली.त्यामुळे शेती विकसित होऊ शकली आणि गावगाड्यातील लोकांची निवासाची सोय झाली...म्हणून सुताराचा गावगाड्यात दुसरा क्रमांक येतो.म्हणजेच काय तर गावगाड्यातील लोकांनी एकत्र येऊन ही व्यवस्था उभी केलेली आहे.गावगाड्यातील शंभर ठोकळगड्या मध्ये याचेही योगदान आहे.कारण गावच्या संरक्षण फळीत शंभर ठोकळगड्यामध्ये साठ टक्के लोक हे महारातील असायचे आणि चाळीस टक्के मध्ये इतर बलुतेदार आणि अलुतेदार मधील असायचे त्यामुळे सुतार या सर्क्ष्ण फळीत असायचा त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या सेनेमध्ये सुतार सुध्दा होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे.ज्या ठिकाणी सुतारचे कुटुंब मोठे असायचे त्यातील ज्या व्यक्तीला काम नसायचे तो व्यक्ती काळीमध्ये “बी” पेरून शेती करायचा....तो शेती करीत असल्यामुळे तो “कुणबी” म्हणून संबोधला जायचा.त्यामुळे कुणबी समाजात सुतार सुध्दा विलीन झालेला आपल्याला दिसतो.हीच गावगाड्यातील पद्धतीचा शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांना अभ्यास झालेला होता...त्यामुळे हाच गावगाडा स्वराज्य उभारणीत पुढे केल्याचे दिसून येते म्हणूनच इतिहासकार आणि इतिहास संशोधक आपल्याला स्वराज्यात बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांचे योगदान होते म्हणजे संपूर्ण गावगाड्याचे योगदान होते हे सांगतात.

No comments:

Post a Comment