Sunday, September 12, 2021

स्वराज्यातील साहवा बलुतेदार न्हावी होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज

आता पर्यंत आपण गावगाडा कसा उभा राहिला हे समजून घेऊन त्यातील बलुतेदार क्रमांक १ महार समजून घेऊन त्याने गावगाड्यातील प्रशासक म्हणून काय ...? काय...? कामे केली हे आपण समजून घेतले.त्याच प्रमाणे वारकरी पंथात गावगाड्यात “समता” प्रस्थापित करण्यासाठी वारकरी संप्रदायात संत चोखा महार सुध्दा होते.स्वराज्यात महार समाजाची उल्लेखनीय कामगिरी होते.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा या महार योद्ध्यांना जोहार करायचे...त्याच प्रमाणे बलुतेदार क्रमांक २ सुतार आपण समजून घेऊन त्याने गावगाड्यातील वस्ती उभारणीत कार्य करून कुणब्याला शेती करण्यासाठी अवजारे पुरविली.त्याच प्रमाणे वारकारी पंथात “समता” प्रस्थापित करण्यासाठी तो आघाडीवर होता.त्याच प्रमाणे बलुतेदार क्रमांक ३ लोहार आपण समजून घेऊन त्याचे गावगाड्यातील घर,वाडे,इमले उभारणीतील योगदान समजून घेतले....त्याच प्रमाणे स्वराज्यातील त्याचे योगदान समजून घेतले.बलुतेदार क्रमांक ४ चांभार समजून घेऊन त्याचे गावगाड्यात योगदान तर आपण समजून घेतलेच आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्यातील योगदान देखील आपण समजून घेतले आहे.त्याच प्रमाणे बलुतेदार क्रमांक ५ कुंभार याचे गावगाड्यात अतिशय महत्वाचे असलेले कुटुंबातील संसार उभारणीतील योगदान समजून घेतले त्याच प्रमाणे वारकारी पंथातील संत गोरा कुंभार याचेही मोठे योगदान होते....तो गावगाड्यातील आहे ज्याला गावगाडा समजतो त्याला वारकरी यांचे महत्व समजते.त्याच प्रमाणे बलुतेदार क्रमांक ६ म्हणजे “न्हावी” होय.वारकरी पंथात या समाजाने मोलाचे काम केले आहे.संत सेना न्हावी यांनी अंभग रचून मानवजात ही एकच असल्याचे सांगून गावगाड्यात “समता” प्रस्थापित करण्याचे मोठे कार्य केले आहे.

    गावगाड्यातील लोकांचे केस कर्तन करून दाढी कर्तन करून त्यांना स्वच्छ ठेवण्याचे काम हे न्हावी समाजाने केले आहे.परंतु शंभर लोकांचे असलेले कुटुंब फक्त या एकाच व्यावसायावर चालणार नाही.म्हणून त्यातील काही लोकांनी काळीमध्ये “बी” पेरून पुढे ते “कुणबी” झाले आहेत.त्यामुळे गावगाड्यातील लोक हे एकाच गणातील असल्यामुळे ते एकमेकांचे भाऊ आहेत.त्यामुळे त्यांचे कुळदैवत हे एकच आहे.....आणि त्यांना “समता” शिकविणारा एकच पंढरपुरचा विठ्ठल म्हणजे “गौतम बुध्द” आहेत.त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील गावगाड्यातील बलुतेदार आणि अलुतेदार मोठ्या प्रमाणात या वारकरी यांच्या वारीमध्ये सहभागी होऊन “समता” प्रस्थापित करण्याचे कार्य करीत असतात....आणि तमाम महाराष्ट्रातील लोक या वारीचे स्वागत करीत असतात.स्वत: छत्रपती संभाजी महाराज यांनी या वारीचे संरक्षण केले आहे.

      छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्यात हा “न्हावी” सहभागी होता.स्वराज्याच्या विरोधात चालणाऱ्या घडामोडीची माहिती गोळा करण्याचे काम तो करीत असे....कारण केस व दाढी कर्तन करण्यासाठी तो घरोघरो जायचा त्यामुळे चांगल्या वाईट गोष्टी त्याच्या कानावर येत असायच्या त्यामुळे स्वराज्यातील विरोधी षडयंत्राची माहिती तो स्वराज्य पर्यंत पोहचविण्याचे कार्य करायचा.....आणि वेळ प्रसंगी हातात शस्त्रे घेऊन तो स्वराज्यासाठी लढायचा....स्वराज्यासाठी लढणारा असल्यामुळे तो “स्वराज्याचा मावळा” होता....आणि नंतरच्या काळात याच मावळ्यांना “मराठा” म्हटले जाऊ लागले.

     छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतरच्या काळात पेशवाई सुरु झाली....पेशवाईमध्ये या बलुतेदार व अलुतेदार यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीत अन्याय होऊ लागले.नवनवीन चालीरिती या पेशवाईत उदयास आल्या....मग कर्मकांडास सुरुवात झाली.मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलास अंत्यसंस्कारवेळी केस कर्तन करण्याची परंपरा सुरु झाली या परंपरेत केस कर्तन करण्याची जबाबदारी “न्हावी” समाजावर आली....आणि हळू हळू या कर्मकांडात ‘न्हावी” कधी सहभागी झाला.....त्याला कळालेच नाही. न्हावी हे पूर्वी शस्त्रक्रिया करून तुंबड्या लावीत.ही माणसे जावळ काढणे, जखमा साफ करणे, नारू रोगाचे उपचार करणे हेही कामे करत असत.

       आज गावगाडा उभा केलेला “न्हावी” हा एकेकाळी राज घराण्यातील होता...परंतु आज तो गावातून विस्थापित झालेला आहे....राज्यात मुठभर समाज म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे.हा समाज इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) अनुक्रमांक १०८ वर नोंद झालेला असून तो आरक्षित समाज म्हणून ओळखला जातो.... त्याची लोकसंख्या आज तुरळक असल्यामुळे राजकीय पटलावर त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही.


 

No comments:

Post a Comment