Sunday, September 12, 2021

स्वराज्यातील सातवा बलुतेदार सोनार होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


 

गेल्या सहा लेखात आपण सहा बलुतेदार समजून घेऊन त्यांनी उभां केलेला गावगाडा समजून घेतला.समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी वारकरी सांप्रदायच्या माध्यमातून गावगाड्यात काम केले असल्याचे पाहिले आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्यात त्यांचे योगदान आपण समजून घेतले आहे.आज आपण सातवा बलुतेदार म्हणजे सोनारसमजून घेणार आहोत.ज्यावेळेस गावगाडा उभा राहिला त्यावेळेस गावगाडा चालविण्यासाठी प्रत्येकाने वेगेवेगळी कार्य हातात घेतले.त्यांच्या कार्यामुळे गावगाड्यात कुटुंब व्यवस्था उभी राहिली.ह्या कुटुंब व्यवस्थेला संस्काराची जाण झाली....आणि सोन्याचे अलंकार पुढे आले हे अलंकार घडविण्याचे काम करणाऱ्या लोकांना सोनारअसे संबोधले जाऊ लागले.मग हे सोनार गावगाड्यातील लोकांसाठी वेगवेगळे अलंकार बनवू लागले.पुरुषांचे कान टोचणे त्याच प्रमाणे स्त्रियांचे कान टोचणे आणि नाक टोचणे काम करू लागले.पुरुषासाठी वेगवेगळे अलंकार बनवू लागले...जसा हातातील सोन्याचा कडा बोटातील अंगठी,गळ्यातील सोन्याचे लॉकेट इत्यादी वस्तू बनवून स्त्रियांसाठीचे डाग दागिने बनवू लागले.लग्न सभारंभातील नव वधू वरांचे डाग दगिने घडवू लागले.लहान मुलांसाठीचा कंबरपट्टा बनवू लागले....ग्रामदैवत यांच्यासाठी सोन्याचे अलंकार बनवू लागले.....म्हणजेच काय तर हे कार्य करून सोनारगावगाड्यातील संस्कृतीचा एक भाग बनले.हा व्यवसाय त्याच्या कुटुंबातील शंभर लोक करणार नाही...मग इतर लोकांनी काळीमध्ये बीपेरून ते कुणबीझाले...म्हणजे काय तर इतर लोक शेती करू लागले.त्यामुळे शेती करणाऱ्या व्यक्तीला शेतकरी म्हटले जाते....शेतकरी म्हणजे बळीराजाहोय.त्यामुळे कुणबीहा दुसरा तिसरा कोणी नसून बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार हेच होय.त्यामुळे गावगाड्यात समताप्रस्थापित होण्यास कोणतीही अडचण होत नाही.त्यामुळे गावगाड्यात बौध्द विचारच नांदत होते हे लक्षात येते.आजही गावगाड्यात जत्रेच्या माध्यमातून बाहेर असलेले बलुतेदार आणि अलुतेदार हे एकत्र येऊन एकमेकांची भेट घेत असतात.

       गावगाडा समजून घेतला तर असे लक्षात येते की येथे आपले पण मिळते,आपुलकी जपली जाते.परंतु नंतरच्या काळात गावगाड्यात जेव्हा आर्यम्हणजे ब्राह्मण घुसला तेव्हा एकसंघ नांदत असणाऱ्या गावगाड्यातील बलुतेदार व अलुतेदार हा एकमेकांना उच्चजातीय नीचजातीय या नजरेने पाहू लागला...म्हणजेच काय तर वर्णव्यवस्थेचा शिरकाव होऊ लागला.परंतु या गावगाड्यातील बलुतेदार व अलुतेदार तसेच कुणबी यांना तो वैदिक पंडित शुद्र म्हणू लागला.याच शुद्र ठरविलेल्या बलुतेदार आणि अलुतेदार तसेच कुणबी यांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले.या स्वराज्यात सोनारसुध्दां हातात शस्त्रे घेऊन सहभागी झाला.त्यामुळे पुढे सोनाराला मावळाम्हणू लागले...कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर स्वराज्यासाठी जो लढला त्याला मावळाम्हणत असे....नंतर याच मावळ्याला मराठाअसे म्हटले गेले आहे.त्यामुळे कुणबीआणि मराठाहा दुसरा तिसरा कोणी नसून हा बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार पैकीच आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

      आज गावगाडा उभा केलेला सोनारतो त्या गावातून विस्थापित झालेला आहे....राज्यात मुठभर समाज म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे.हा समाज इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) अनुक्रमांक १५४ वर नोंद झालेला असून तो आरक्षित समाज म्हणून ओळखला जातो.... त्याची लोकसंख्या आज तुरळक असल्यामुळे राजकीय पटलावर त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही.

No comments:

Post a Comment