आर्य ब भारतात आले तेव्हा या देशात सिंधू संस्कृती नांदत होती.या सिंधू संस्कृतीवर ताबा मिळविण्यासाठी आर्यांनी सनातन धर्म व्यवस्था उभी केली आणि श्रेष्ठ व कनिष्ट असा भेदभाव निर्माण केला.सिंधू संस्कृती मधील विद्वान लोकांना संपविण्याचा प्रयत्न केला त्यांचे मानवतावादी विचार बुडविण्यासाठीचे काम त्यांचा संघटीतपणा उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या सनातनी धर्म व्यवस्थे विरुध्द गौतमी पुत्र सिध्दार्थ याने भगवे वस्त्र स्वीकारून समतेचा भगवा बौध्द विचाराच्या माध्यमातून याठिकणी रुजविलेला आहे.सिंधू संस्कृती मधील विद्वान यांना शरण जाऊन “बुद्धम शरणं गच्छामी” असे म्हटले आहे.याच सिंधू संस्कृती मधील विद्वानांचे विचाराला शरण जाऊन “धम्म शरणं गच्छामी” म्हटले आह आणि सिंधू संस्कृती मधील संघटीतपणाला म्हणजे तेथील संघाला शरण जाऊन सिंधू संस्कृती मधील मानवतावाद जगाला दिलेला आहे.गौतम बुध्दानंतर जग जिकून सम्राट झालेल्या सम्राट अशीकाने हा बौध्द धम्म स्वीकारून समतेच्या भगव्या निशाणाखाली संपूर्ण भारत बौद्धमय केला होता.बुद्धंचे विचार अनंत काळापासून टिकून राहावेत यासाठी सम्राट अशोक पुत्रांनी संपूर्ण भारतात बुध्द लेण्या,बौध्द स्तूप,बौध्द विहार निर्माण केली आहेत.त्यातील पंढरपूर येथे उभे असलेले विठ्ठल मंदिर हे बौध्द विहार आहे आणि विठ्ठल हे बौध्द आहेत.नंतरच्या काळात वर्णाश्रम धर्माने डोके वर काढले होते.या धर्म व्यवस्थेच्या विरोधात संत नामदेव महराज यांनी गावगाड्यातील बलुतेदार व अलुतेदार यांना बरोबर घेऊन समतेचे भगवे निशाण स्वीकारून पंढरपूर येथील गौतम बुध्दाला केंद्रस्थानी ठेऊन वारकरी पंथ स्थापन केला.त्या बलुतेदार पैकी एक बलुतेदार म्हणजे “कुभार” होय.गावगाड्यातील पाचवा बलुतेदार म्हणजे “कुंभार” होय.आणि त्यातील एक संत “गोरा कुंभार” होय याने समतेचे भगवे निशाण खांद्यावर घेऊन मानवतावादी विचार गावगाड्यात पोहचविण्याचे कार्य केले.
त्यामुळे आज आपण गावगाड्यातील पाचवा बलुतेदार म्हणजे “कुभार” याचे योगदान समजून घेणार आहोत.जंगलातील एकत्र आल्याने लोकांनी पांढरीवर वस्ती बसविली आणि काळीमध्ये “बी” पेरून गाव बसविले आणि ते गावगाडा चालविण्यासाठी तेथील कामे एक एकाने आपल्या हातात घेऊन गावगाडा उभा केला.आपण पहिला बुतेदार “महार” समजून घेतला.आपण दुसरा बलुतेदार “सुतार” समजून घेतला.आपण तिसरा बलुतेदार “लोहार” समजून घेतला.आपण चौथा बलुतेदार “चांभार” समजून घेतला आणि आता आपण पाचवा बलुतेदार “कुंभार” समजून घेत आहोत.गावगाड्यातील लोकांना लागणारी मातीची भांडी बनवून गावगाड्यातील लोकांचा संसार उभा केला.जसे घरासाठी लागणारी कौले बनविण्याचे काम त्याने केले.संसारासाठी लागणाऱ्या चुली निर्माण केल्या.पणत्या बनवून गावात रोशनाई निर्माण केली.परंतु शंभर लोकांचे असणारे कुटुंब एका व्यवसायावर चालणार म्हणून कुंभार समाजातील काही लोक काळी मध्ये “बी” पेरून तो पुढे “कुणबी” झालेला आहे.अशा प्रकारे “कुणबी” उभा राहिलेला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्यात या “कुंभार” समाजाने शस्त्रे हातात घेतून स्वराज्य स्थापनेत मोठे योगदान दिलेले आहे.त्यामुळे पुढे त्याची ओळख छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून झालेली आहे....आणि या मावळ्यांची ओळख नंतर “मराठा” म्हणून झालेली आहे.
नंतरच्या काळात गावगाड्यात हा “कुंभार” समाज ओल्या मातीपासून सूरई,माठ,खुजे,
रांजण,कुंड्या,घट,गाडगी,मडकी,झाकण्या,विटा,कुंड्या इत्यादी वस्तू तयार करून त्या भाजून बनविणारा कारागीर झालेला आहे.आज हां “कुंभार” समाज इतर मागासवर्गीय जातीतील म्हणजे ओबीसी प्रवर्गातील अनुक्रमांक ८२ वर असून तो ओबीसी मध्ये आरक्षित आहे.आज गावगाड्यातून तो विस्थापित झालेला आहे......त्याची लोकसंख्या आज तुरळक असल्यामुळे राजकीय पटलावर त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही.
No comments:
Post a Comment