Thursday, October 26, 2017

भाग - १ लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!



भाग - १
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
शनिवार वाड्यातील शनीच्या रुपी असणारा पेशवाईचा पाडाव हा सिद्धनाक महार आणि त्याच्या ठोकाळ गड्यांनी केला आहे.आणि हा शौर्याचा इतिहास आजही भीमा कोरेगाव याठिकाणी वीर स्तंभाच्या माध्यमातून आपणा सर्वांना साक्ष देते याचा इतिहास मी पुढील भागात आपल्या सर्व मित्रासाठी देईन.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच वीर स्तंभाला पहिली भेट दिली आणि पहिले सामजिक आंदोलन केले ते महाड येथील चवदार तळ्याचे या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा प्रथम घोषणा देण्याचे कार्य याठिकाणी झाले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
पेशवाईचा पहिला पाडाव हा १८१८ मध्ये झालेला आणि त्याचा दुसरा पाडाव हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले आणि तिसरा पाडाव हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान देऊन केले आहे.आणि ४ था व शेवटचा पाडाव हा मी भारत बौद्धमय करीन अशी शपथ घेऊन आणि तमाम लोकांना बौध्द धम्माची शिकवण १९५६ साली देऊन केली आहे.यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला बावीस प्रतिज्ञा देऊन केली आहे.
सध्याचे वातावरण बघितले....आणि ते वातावरण पाहिले म्हणून मला आज त्या बावीस प्रतिज्ञाची आठवण झाली आहे.म्हणून असे वाटले याठिकाणी त्या वातावरणावर थोडेसे आपले मत व्यक्त करावे....या मतातून कोणाला दु:ख पोहचत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही.

पहिली प्रतिज्ञा -: १) मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
ब्रह्मा -:याचा अर्थ जर समजाऊन घेतला तर आपल्याला असे लक्षात येईल की,ब्रह्माचा अर्थ काय...?...आणि हा ब्रह्मा कोण आहे...आणि याचा शोध घेतला तर कोठेही याचे अस्तित्व सापडत नाही...मात्र एक काल्पनिक कथा तयार केली गेलीली आहे..आणि ती म्हणजे ब्रह्मा म्हणजे विराट पुरुष आणि या विराट पुरुषाच्या मुखातून ज्याने जन्म घेतला आहे तो म्हणजे बामन (श्रेष्ठ) आणि ज्याने काकेतून जन्म घेतला आहे तो म्हणजे वैष्णव आणि ज्याने त्याच्या झांगेतून जन्म घेतला आहे तो म्हणजे क्षत्रिय म्हणजे (योद्धा,लढवय्या,आणि यांचा पूर्ण नायनाट हा परशुरामाने केला होता असे म्हटले जाते..आणि नंतर यानेच क्षत्रिय जन्माला घातले असेही म्हटले जाते.) आणि चौथा म्हणजे ज्याने याच्या तळपायातून जन्म घेतला तो म्हणजे शुद्र (खालच्या स्तरातील छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक याच कारणाने बामनानी नाकारला होता...आणि त्यांना दुसरा राज्यभिषेक शाक्त धर्मानुसार करावा लागला) अशा विराट पुरुषाला म्हणजे ब्रह्माला मी मानणार नाही.
विष्णू -: याचा अर्थ जर समजाऊन घेतला तर आपल्याला असे लक्षात येईल की,विष्णू अर्थ काय...?..आणि याचा शोध घेतला तर कोठेही याचे अस्तित्व सापडत नाही...मात्र एक काल्पनिक कथा तयार केली गेलीली आहे.....आणि ती म्हणजे विष्णू म्हणजे तुमचा आमचा पालनकर्ता होय.हा पाताळात नेहमी निद्रावस्थेत दाखवलेला आहे....त्याचे पाय त्याची पत्नी दाबत असताना दाखविलेले आहे......आणि यानेच संत तुकाराम महाराजांना विमान पाठवून आपल्या वैकुंठात बोलाविलेले आहे.(याठिकाणी संत तुकाराम महाराजांची हत्या केली असून विष्णूच्या नावाखाली लपविलेली गेलेली आहे.) म्हणून मी याला मानणार नाही

No comments:

Post a Comment