Thursday, October 26, 2017

भाग-:५ व ६ आणि ७ लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्

भाग-:५
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
चौथी प्रतिज्ञा -: ४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
देव ही संकल्पना अस्तित्वात नाही....अस्तित्वात आहे ती सामाजिक एकता....! विषय असा आहे की,या समाजात विविध घटक आहेत...आणि हे घटक आपल्या पारंपारिक प्रशासन व्यावस्थेतून तयार झालेले आहेत...कारण आपल्या गावची प्रशासन व्यवस्था ही अठरा पगड आणि बारा बलुते अशी होती....मातृकसत्ताक पद्धतील जीवन आपले होते......अवतार असा विषय कधीच आपला नव्हता.जन्म आणि मृत्यू हा निसर्ग नियमन आहे....आणि तो एकदाचा होतो...आणि हेच सत्य आहे.त्यामुळे पाप पुण्य हा फेरा आपला नाही.माझ्या जीवनात एकदाच बालपण येत....आणि माझ्या जीवनात एकदाच तरुण वय येते....आणि ते जीवन माझे कसे सार्थक होईल एवढाच माझा विषय असतो.त्यामुळे मी जे माझ्या जीवनात करेल ते खरे....! त्यामुळे देव अवतार घेईन आणि माझे जीवन तो सार्थक करेल याला काहीही अर्थ नाही...त्यामुळे मला स्वयंम प्रकशित व्हायचे आहे.म्हणून देवाने अवतार घेतले आहे यावर मी विश्वास ठेवणार नाही

भाग-:६
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
पाचवी प्रतिज्ञा -: ५) गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो..
गौतम बुद्ध हे अखेरचे सत्य आहे त्यापलीकडे कोणतेही सत्य नाही....त्यांनी दिलेला धम्म (विचार) ही खरी मानवता आहे....आणि या मानवतेने जगाच्या मानव विश्वाचे कल्याण केलेले आहे.विष्णू हे असत्य आहे त्याचे अवतार जे सनातनी धर्माने दाखविले आहे त्यांमध्ये क्रूरता दाखविली आहे....अज्ञानाला मान्यता दिलेली आहे.त्या अज्ञानाने तुमचे आमचे वाटोळे केले आहे.वेदिक धर्माचे आक्रमण हे ऐतिहासिक सत्य आहे ते नाकारण्यासाठी लाखोंनी आपल्या स्वत:चे बलिदान दिलेले आहे...त्यांचे बलिदान विसरता येऊ शकत नाही...त्यामुळे विष्णू हा मानव धर्माच्या रक्ताने माखलेला विषय आहे...त्याला स्विकारणे म्हणजे मानवसंवार (मानव धर्माचा अंत) स्वीकारणे होय.त्यामुळे गौतम बुद्ध सत्य आहे...आणि हे सत्य लपविण्यासाठी त्यांना विष्णूचा अवतार माना असे सनातन धर्म जाचकतेने आपल्यावर लादीत आहे.याला तसे कारणही आहे आणि हे सत्य आहे.बिहार येथे बुद्ध धर्माचे श्रद्धास्थान म्हणजे बौध्द गया म्हणून सर्वत्र प्रसिध्द आहे.या बौध्द विहारवर जी संस्था आहे त्या संस्थेचे रा.सु.गवई ४० वर्ष अध्यक्ष होते.या विहारात गौतम बुद्ध पर्यंत कोणत्याही व्यक्तीला तर सोडा बौध्द भिक्षुकांनाही जाण्याची परवानगी नाही....कारण यावर सनातनी धर्माचे आक्रमण आणि ताबा आहे.जानवे घातलेला धोतर पंडिताचा यावर ताबा आहे...रोज निती नियमाने हा विष्णू अवतार गौतम बुध्द याची आरती म्हणतो......आणि तेथे उपस्थित सर्व बौध्द अनुयायी आणि भिक्षुक यांना टाळ्या वाजवायला लावतो....आणि असा खोटा आणि खोडसळ प्रचार ते करीत आहे.म्हणून मी गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे असे मी मानीत नाही.


भाग – ७
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.....!
सहावी प्रतिज्ञा -: ६) मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
पिंडीचा अर्थ जर समजून घेतला तरच हे सर्व आपल्या लक्षात येईल....पिंड म्हणजे देह आणि या देहावर निसर्गा नंतर माझ्या स्वत:चा अधिकार आहे.....आणि नेमके हे पिंड आपण कोणाला दान करतो हे महत्वाचे आहे.श्राध्दपक्ष हा बामणांचा काळ आहे.....तो वैदिक धर्मीय आहे......ते आपल्यावरील आक्रमण आहे.....त्याचा आणि आपला काही एक संबध नाही.याकाळात त्याला आपण आपले पिंड (देह दान) करणे म्हणजे आपण आपले पूर्वज त्यांना दान करणे होय....आणि या माध्यमातून पाप पुण्य हा फेरा आपल्या बरोबर चालू ठेवणे होय.कर्मकांड आणि पाप पुण्य हे आपले कर्म नाही एवढे जरी आपण लक्षात तरी सत्यता आपल्या लक्षात येईल.मी माझ्या पूर्वजांचे पिंडदान (देहदान) करणार नाही. 

No comments:

Post a Comment