Thursday, October 26, 2017

भाग-:१३ व १४ लाल महालावरील कब्जा शनिवार वाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा....!

भाग-:१३
लाल महालावरील कब्जा शनिवार वाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा....!
सोळावी प्रतिज्ञा -: १६) मी खोटे बोलणार नाही.
खोटे बोलणे वाईट गोष्ट आहे....त्यामुळे एखद्याचे जीवनाचे वाटोळे होऊ शकते.खोटे शब्दाला दुसरे नाव आहे अफवा आणि अफवा पसरविल्याने मुंबई येथील परळ रेल्वे स्टेशनची जी घटना घडली त्यामुळे बावीस जणांना आपला जीव गमवावे लागले आहे.बावीस कुटुंबियांवर शोककळा पसरली होती.वैदिक धर्म पंडित आजपर्यंत आपल्याला खोटे बोलत आलेले आहेत.त्यांनी या सृष्टीची निर्मिती विराट पुरुषामुळे झाली आहे....असे सांगून त्याच्या मुखातून ब्राह्मणाने जन्म घेतला असे सांगून तो कसा श्रेष्ठ आहे असे खोटे सांगून त्याचे श्रेष्ठत्व आपल्यावर लादले आहे.वैश्य काकेतून जन्मला असे सांगून क्षत्रियाने झांगेतून जन्म घेतला आहे....आणि क्षत्रियाचा परशुरामाने नायनाट करून त्याला पूर्ण संपविले होते....आणि नंतर पुन्हा परशुरामाने क्षत्रियाला जन्माला घातले असे खोटे बोलून तसा खोटा इतिहास निर्माण केला आहे.ब्रह्मा-विष्णू-महेश-राम-कृष्ण-गौरी-गणपती हे तुमचे देव आहेत असे खोटे बोलून त्यांचा आपल्या जीवनात शिरकाव करून घेतला आहे.छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्माचा संरक्षक होता असे खोटे बोलून त्यांना हिंदू राजा घोषित करून घेतले आहे.संभाजीराजे धर्मवीर होते आणि त्यांनी हिंदू धर्मासाठी आपले बलिदान दिले असे खोटे बोलून त्यांना धर्मवीर संभाजीराजे असे आपल्या समोर रुजविले आहे.गौतम बुध्द विष्णूचा अवतार आहे असे खोटे बोलून बौध्द गयावर ताबा मारला आहे.लाल महाल हा लाल महाल असून तो पेशव्यांचा शनिवार वाडा असे खोटे बोलून शिवशाही संपविण्याचा घाट घातला आहे.म्हणून मी खोटे बोलणार नाही.

 भाग-:१४
लाल महालावरील कब्जा शनिवार वाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा....!
सतरावी प्रतिज्ञा -: १७) मी दारू पिणार नाही.
दारूडा (मदिरा) याचा अर्थ दारू पिणारा असा आहे.पाली भाषेत दारूला सुरा असे म्हटले जाते....आणि अरबियान भाषेत सूर असे म्हंटले जाते.त्यामुळे दारु पिणाऱ्या व्यक्तीला सूर असे म्हटले जाते.....आणि दारू न पिणारे यांना असुर म्हटले जाते.त्यामुळे रावण आणि बळीराजा हे असुर होते.....आणि शिवलिंग मंदिराचे उपासक होते....म्हणून त्यांना वैदिक धर्म पंडित असुर म्हणायचे....! आणि यांचा बळी वैदिक धर्म पंडितांनी घेतलेला आहे.आता सर्व सामन्यांची दिवाळी हा सन आहे....आणि हा सन साजरी करताना तो सुगंधी उटनाने आंघोळ करतो.तेव्हा त्या घरातील स्त्री त्याला ओवळून दोन वाक्य म्हणत असते.आली वर्षाची दिवाळी...! मोती पवळ्यानी ओवाळी...! इडा पीडा टळो....आणि बळीचे राज्य येवो.याचा अर्थ आजही बळीराजा आपला पूजक आहे....त्यामुळे आपण असुर आहोत...दारू न पिणारे लोक...! म्हणून मी दारू पिणार नाही

No comments:

Post a Comment