हत्येची कारणे खालील
प्रमाणे वाचा...!
ब्रज (भोजपुरी),मराठी,हिंदी,संस्कृत,मोडी,कन्नडी, तमिळ असे बहुभाषिक साहित्य
आपल्या विचार कौशल्यावर संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज यांनी निर्माण केले
आहे.खऱ्या अर्थाने साहित्य,कला व शिक्षण यांच्या
जोरावर माणसाला असाध्य ते साध्य करण्याची शक्ती मिळू शकते हे साडेतीनशे
वर्षापूर्वी शंभूराजे त्यांच्या कृतीतून सिद्ध केले.त्यांच्या बुधभूषण,सातशतक,नखशिकांत,नायिकाभेद अशी उच्च कोटीची मानवी
मुल्य व विचार संपदा निर्माण करून मानवाला विचार बंधनातून मुक्तीचा मार्ग मोकळा
केला आहे.छत्रपती संभाजी राजेंच्या स्वराज्य रक्षण पराक्रम,मुत्सदेगिरी यावर बहुतांश
प्रकाश पडलेला आहे.परंतु साहित्यिक संस्कृत पंडित व रयतेला समतेचा,स्वातंत्र्याचा व न्यायाचा
मार्ग दाखविणारे समाजसुधारक शिक्षक म्हणूनही राज्यांचा गौरव होणे तितकेच महत्वाचे
आहे.त्याकाळात भारतातील बहुतांश राजांना परकीयांशी व इतर राज्यांशी संवाद
साधण्यासाठी भाषेची अडचण येत असेल तर त्यासाठी दुभाषकाची गरज लागत असे मात्र
त्याकाळात भारतातील छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव राजे असे होते की,ज्यांना कधीही दुभाषकाची
गरज भासली नाही.कारण स्वत: राजांनाच त्याकाळातील उपयोगात असणाऱ्या सर्व राजभाषा
अवगत होत्या.
बुधभूषण (संस्कृतमध्ये) –: समाज व्यवस्था आणि त्यातील
प्रत्येक घटक जसे की,राजा,मंत्री
कारकून,प्रजा,सरदार,सैनिक,व्यापारी,आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,भौगोलिक,ऐतिहासिक अशा सर्वच घटकांची
कार्यकार्तेव्ये तत्वे मूल्ये,आचार,विचार,मर्यादा सांगणारा ग्रंथ
आहे.
सातशतक -: हा ग्रंथ सातशे वर्षात काय
काय घडले आणि कसे घडले याचे सत्य सांगणारा ९०० सालापासून कसे बदल झाले याला जबाबदार
कोण....? संत परंपरा काय आहे....! वर्णाश्रम धर्म
म्हणजे काय आणि तो याच
काळात आपल्याकडे कसा प्रस्थापित झाला.इथल्या राजव्यवस्थेने कोणती काळजी घेतली
पाहिजे होती या सर्व बाबींचा खुलासा शंभूराजे यांनी या ग्रंथात केला आहे.त्यामुळे
हा ग्रंथ आपल्याला आज उपलब्ध होत नाही.
नखशिकांत -: पायाच्या नकापासून ते
डोक्याच्या केसापर्यंत शाररीक आरोग्य हीच धनसंपदा हे सांगणारा व नैसर्गिक
आयुर्वेदावर अभ्यासक प्रकाश टाकणारा ग्रंथ आहे.
नायिकाभेद -: समाजाची नायिका म्हणजेच
स्त्री अशी भूमिका मांडून मनूच्या पुरुषप्रधान संस्कृतीला हादरा देणाऱ्या व
स्त्रीचा सन्मान शिकविणारा ग्रंथ आहे.
यामुळे त्याकाळचे प्रकांड
पंडित गागा भट्ट यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना “समनयन” हा ग्रंथ भेट
दिलेला आहे.
राजेश खडके
सकल मराठी समाज
No comments:
Post a Comment