Thursday, April 5, 2018

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ११ एप्रिल २०१८ रोजी जयंती उत्सवानिमित्त माझे दोन शब्द -: राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


आपण सर्वांना सन्मानपूर्वक
  जय जिजाऊ
     जय शिवराय
         जय भीम

महात्मा ज्यीतीबा फुले यांचा पूर्ण इतिहास आणि त्यानी केलेले कार्य आपणास माहित आहे.मी कोणी इतिहासकार वा संशोधक नाही मी एक छोटासा अभ्यासक आहे.सध्या महार योद्ध्यांनी इतिहासात कार्य केले त्याचे काय योगदान आहे याचा आभ्यास करीत आहे.शहाजीराजे यांच्या बरोबर असणारा महार योद्धा छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्यात मोलाचे योगदान देणारा प्रमुख घटक आहे.समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या साठी आपल्या प्राणाची आहुती देणारा हा महार योद्धा आहे.शंभूराजे यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे शाक्त धर्मा नुसार अंत्यसंस्कार करून त्यांची महार वाड्यात समाधी बांधून त्याची दिवाबत्ती करणारा स्वराज्यप्रेमी प्रामाणिक असा महार योद्धा आहे.त्याचा इतिहास आणि त्याचेवर झालेला अन्याय याबाबत जो काही आभ्यास मला दुसऱ्या बाजीराव पेश्व्यापासून सापडलेला आहे तो मी आपल्या समोर मांडीत आहे.श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे २७ आक्टोंबर  १७९५ मध्ये निधन झाले.आणि ५ डिसेंबर १७९६ मध्ये श्रीमंत पेशवे बाजीराव रघुनाथ हे दुसरा बाजीराव पेशवेपदी विराजमान झाला.६ जानेवारी १९९७ मध्ये बाजीराव यांच्या व्दितीय पत्नी सरस्वतीबाई यांचे निधन झाले.३१ डिसेंबर १७९७ मध्ये नाना फडवणीस याला शिंदे यांचे फ्रेंच सेनापती मेजर फिलोज याने अटक करून अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये तुरुंगात डांबून ठेवले.बाजीराव पेशव्यानी नाना फडवणीस यांची ८ जून १७९८ मध्ये सन्मानपूर्वक सुटका करून घेतली.२३ एप्रिल १८०० मध्ये बाजीराव यांनी अमृतरावांची “दिवाण” म्हणून नेमणूक केली.परंतु बाजीराव यांचे बरोबर त्यांचे जमले नसल्याने २० जुलै १८०० मध्ये अमृतराव कारभार सोडून जुन्नरला निघून गेले.१६ एप्रिल १८०१ मध्ये बाजीराव यांनी शनिवार वाड्यामध्ये विठोजी होळकर यांना २०० छड्या मारून हत्तीच्या पायी देऊन त्यांची हत्या केली.याची खबर यशवंतराव होळकर यांना मिळाली त्याचा त्यांना खूप राग आला आणि त्यानी बाजीराव पेशाव्यावर हल्ला चढविला आणि २५ आक्टोंबर १८०२ मध्ये हडपसरच्या मैदानात पेशवे – होळकर असे युध्द झाले.बाजीराव हे युध्द हरला आणि बाजीराव पेशवा पुण्यातून पळून गेला.बाजीराव पेशव्याच्या लक्षात आले की,आता आपले राज्य संपले तेव्हा तो ८ डिसेंबर १८०२ मध्ये वसईला आला तेथून तो मुंबईकडे रवाना झाला आणि १० डिसेंबर १८०२ मध्ये मुंबई मध्ये गव्हर्नर डंकन याला भेटला आणि स्वराज्य त्याच्या स्वाधीन केले.डंकन याने पुण्याचा रेसिडेंट लेफ्टनंट कर्नल बॅरी क्लोज याला बोलावून बाजीराव याचे बरोबर वाटाघाटी करण्यास सांगितले.३१ डिसेंबर १८०२ मध्ये वसई येथे बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्या मध्ये तह झाला. मार्च १८०३ मध्ये यशवंत होळकर पुणे सोडून उत्तरेकडे रवाना झाले.१३ मे १८०३ मध्ये सर आर्थर वेलस्ली याने बाजीराव पेशव्यांना “हिज हायनेस बाजीराव पंडित प्रधान बहादर” अशी उपाधी देऊन पुन्हा पेशवाईच्या मनसदीवर बसविले....आणि आपले मांडलिक केले.त्यामुळे १० डिसेंबर १८०२ साली भारतावर इंग्रजी राजवट सुरु झाली आणि रयत गुलामीत गेली.त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी पेशव्यांना दिलेल्या राज्यकारभाराचा गैरवापर करून दुसरा बाजीराव याने रयतेचे हक्क व अधिकार १८०२ मध्ये इंग्रजी राजवटीला देऊन टाकले.अशा इंग्रजांच्या मांडलिक असणारा दुसरा बाजीराव याचा अंत करण्यासाठी आणि शंभूराजे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सातारा गादीचे आदेश शाक्त धर्मीय महार योद्धा सरदार सिद्धानक महार याला मिळाले होते.वढू येथील शंभूराजे यांच्या समाधीचे दर्शन घेत भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ मध्ये पेशवाईचा अंत केला त्यांचे बरोबर उमाजी नाईक यांचे रामोशी योद्धा आणि स्वराज्याचे अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार होते.१८२२ मध्ये उमाजी नाईक यांनी समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन शाक्त धर्म पद्धतीत राज्याभिषेक करून ते राजे झाले होते.११ एप्रिल १८२७ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला होता.३ फेब्रुवारी १८३४ मध्ये मामलेदार कचेरी पुणे येथे झाडाला लटकावून राजे उमाजी नाईक यांची हत्या करण्यात आली यावेळी महात्मा ज्योतिबा फुले हे अवघे ७ वर्षाचे होते.इंग्रजी राजवटी मध्ये महार बटालियन मोठ्या प्रमणात कार्यरत होती.आणि ही महार बटालियन जर ब्रिटीश सैन्यात मजबूत जर झाली तर उद्याच्या स्वतंत्र भारताच्या राजकारणात मोठे अस्तित्व निर्माण करेन.आणि पुन्हा एकदा १८१८ चे युध्द सारखी परिस्थिती निर्माण जर झाली तर भारत देश सोडून पळून जाण्याची परिस्थिती निर्माण होईल.म्हणून यासाठी कोकणामध्ये रत्नागिरी याठिकाणी ब्राह्मणी व्यवस्थेने इंग्रजा विरुध्द एक उठाव करून इथली महार बटालियन बदनाम करून ती बंद करून महार योध्याचे अस्तित्व धोक्यात आणण्यासाठी १८५७ चा स्वतंत्र उठाव उभा केला गेला.आणि या उठावाचा फायदा घेत ब्रिटीश राजवटीच्या प्रशासकीय कारभारात आपला शिरकाव ब्राह्मणी व्यवस्थेने करून घेतला.....आणि महार बटालियन बंद करण्याचे एक राजकारण केले.१८५७ चा उठाव झाला म्हणून इंग्रजी राजवटी कडून ब्रिटीश सैन्यात महार बटालियन बंद करून महार योध्यांची भरती बंद करण्यात आली.त्यानंतर ब्रिटीश प्रशासन व्यवस्था आपल्या ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता निर्माण करण्यासाठी ब्राह्मणी व्यावस्थेने मोठी मोहीम उघडली.त्यानी या महार योध्यांची उपासमार कशी होईल याची तजवीज सुरु केली.ब्रिटीश सैन्यातील पहिली महार योध्यांची भरती बंद करण्यात येऊन त्यांच्या हजारो एकर जमिनी ब्रिटीश सरकारच्या माध्यमातून काढून घेतल्या.महार योध्यानी स्वराज्यात मोठ्या प्रमाणात योगदान दिले होते.छत्रपती संभाजी महाराज यांच्या शाक्त धर्माच्या प्रचारात मोठे योगदान दिलेले होते आणि समतावादी स्वराज्यात मोठा वाटा निर्माण केला होता.जो पर्यंत इथला महार योध्दा संपविला जात नाही तो पर्यंत आपल्याला संपूर्ण भारत आपल्या प्रशासकीय व्यावस्थेच्या अमलाखाली आणता येणार नाही याची पूर्ण जाणीव ब्राह्मणी व्यवस्थेला झाली होती.त्यामुळे त्यानी ब्रिटीश सरकार यांच्या बरोबर राहून महार योद्ध्यांच्या जमिनी १००% काढून घेण्याचा कायदा १८७४ मध्ये पारित करण्यात आला.त्यामुळे खंडावर जगणारा महार योद्धा यांना खंड बंद झाला आणि त्याच्यावर उपासमारीची वेळ निर्माण झाली.ह्याची जाण महात्मा ज्योतिबा फुले यांना झाली होती कारण याच ब्राह्मणी व्यावस्थेने लपविलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आणि विचार त्यानी १८६९ मध्ये शोधून काढले होते.ते विचार पुन्हा स्वराज्याच्या रयतेमध्ये पोहोचावे यासाठी त्यांची जयंती उत्सव १८६९ मध्ये सुरु केला होता तेव्हा त्यांच्या लक्षात आले की,स्वराज्यात महार योद्ध्यांचे मोठे योगदान आहे.आणि स्वराज्यातील त्याचे योगदान संपविण्यासाठीच त्यांना अस्पृश्य घोषित करण्यात आले आहे.कारण पूर्वीपासून ब्राह्मणी व्यवस्था या देशात वर्णाश्रम धर्माच्या माध्यमातून ब्राह्मण क्षत्रिय आणि इतर शुद्र म्हणून त्यांची ही वर्ण व्यवस्था निर्माण केली होती.ही ब्राह्मणी व्यवस्था छत्रपती शिवराय यांना शुद्र म्हणीत असत त्यामुळे शुद्रातून अति शुद्र म्हणून या महार योद्ध्यांना अस्पृश्य महार घोषित करून त्यांना सार्वजनिक जीवन व्यवस्थेतून बाहेर करण्यात आलेले होते.जसे सार्वजनिक ठिकाणी त्यानी जमायचे नाही सार्वजनिक पाणवट्यावर पाणी भरायचे नाही.असे प्रकारे मनुस्मृतीचे कायदे अमल करण्यात त्यानी सुरुवात केली.स्वराज्यात महत्वाचे योगदान असलेला महार योद्धा आज शुद्रातून अति शुद्र म्हणजे अस्पृश्य झाला होता.तेव्हा महार योध्याचे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील महत्वाचे योगदान विचारात घेता महात्मा फुले यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक चळवळीची स्थापना करून स्वराज्याचा भगवा ध्वज हातामध्ये घेतला.या चळवळीच्या विरोधात ब्राह्मणी व्यवस्थेने १८७५ साली आर्य सनातनी हिंदू धर्माची स्थापना केली होती.१८८० मध्ये आपल्या वाड्यातील विहीर ह्या अस्पृश्य महार योद्ध्यांच्या वंशजासाठी महात्मा फुले यांनी खुली केली होती.आणि ब्रिटीश सरकारने या महार योध्यांची ब्राह्मणी व्यवस्थेच्या सांगण्यावरून काढून घेतलेली जमीन परत करावी अशी मागणी लावून धरली होती.तेव्हा महात्मा फुले यांच्या कार्याला यश आले आणि १८८४ ला वतन कायदा पास करून त्याचा साडेबारा टक्के परतावा म्हणून जमिनी परत देण्यात आल्या.परंतु इथल्या महसुली प्रशासनात ब्राह्मणी व्यावस्थेचा शिरकाव असल्यामुळे इथले कुळकर्णी यांनी बेकायदा असा फेरफार तयार केला की,नोकर वतन म्हणून ही जमीन महार योद्ध्यांना देण्यात आली आहे.अशा प्रकारे इथला भूमीपुत्र स्वराज्याचा महार योद्धा अस्पृश्य होऊन गावचा नोकर झाला.बाळकृष्ण गंगाधर टिळकांचा साल १८५६ मध्ये जन्म झाला होता ते १८८४ मध्ये २८ वर्षाचे होते हे आपण याठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.त्यांनी गोखले - आगरकर यांना बरोबर घेऊन पहिली हिंदू महासभा १८८४ मध्ये आयोजित केली होती.मात्र महात्मा फुले जो पर्यंत जिवंत होते तो पर्यंत त्यांना त्यांच्या मनसुब्यात यश मिळत नव्हते.१९९० मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला.महार योध्यांचा इतिहास जागर करण्यासाठी आणि स्वराज्याच्या रयतेला न्याय मिळण्यासाठी स्त्रीला माता भगिनी म्हणून त्यांची सेवा करणारे स्त्रीला शिक्षणाची दारे उघड करणारे अशा महात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिल २०१८ रोजी जयंती आहे.महार योद्ध्यांच्या वतीने त्यांची जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.तरी आपण स्वराज्यातील रयतेसाठी कार्यरत असणारा अठरा पगड आणि बारा बलुतेदार यांचा वर्ग समूह असून आपण सदर जयंती निमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांना पुप्ष वाहण्यास उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठी समाज यांच्या वतीने आपणास करीत आहोत.



स्थळ -: डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणेस्टेशन              कळावे
वेळ -:  सकाळी ११.०० वाजेपासून ते
       सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत                         राजेश खडके
                                              समन्वयक सकल मराठी समाज

No comments:

Post a Comment