विषय असा आहे की,सध्या सोशल मिडीयावर देशस्थ
ऋग्वेदी ब्राह्मणांचे समर्थक मोठ मोठ्याने हल्ला कल्लोळ माजविताना दिसत आहे.आणि
त्यात मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचा समर्थक वर्ग तर
मोठ्या प्रमाणात देश भक्तीचे गीत गाताना आम्हाला सर्रास पाहिला मिळत आहे.तो असे म्हणतो
भिडे आम्हाला भारत देश प्रेम शिकवत असतात.मात्र अशा समर्थक असणाऱ्या लोकांना
इंग्रजांनी या भारत देशावर किती काळ राज्य केले हे निट सांगता येत नाही.काही
लोकांच्या मते भारत देशावर इंग्रजांनी १५० वर्ष राज्य केले....तर त्यांच्या
आकड्याचा आपण जर गणिती आभ्यास केला तर असे लक्षात येईल की,नेमके कोणत्या साली हा भारत देश इंग्रजांच्या राजवटीखाली आला त्याचे आकलन
होईल.भारत देश हा १९४७ साली स्वतंत्र झाला आहे त्यामध्ये जात आपण १५० वर्ष वजा
केली तर आपल्याला १७९२ हे साल आपल्या समोर होते.काही लोकांच्या मते २०० वर्ष राज्य
केले असे म्हटले जात त्यामुळे १९४७ मधून २०० वर्ष वजा केले तर १७४७ हे साल आपल्या
समोर येते.मग नेमके किती वर्ष राज्य केले हा प्रशन अधांतरीत राहतो.कारण पेशवाई
भीमा कोरेगावच्या युध्दात १८१८ साली स्वराज्याने संपविली असा दाखला स्पष्टपणे
आपल्या समोर आलेला आहे.आणि आपण जर १९४७ मधून १८१८ जर वजा केले तर आपल्याला इंग्रजी
राजवट १२९ वर्ष दिसून येते.आणि कांही लोक असे म्हणतात शेवटचे इंग्रजी राजवटीचे
युध्द जे झाले ते हिंदुस्थानचा बादशहा जफर याच्या नेतृत्वात १८५७ मध्ये झाले याचा
अर्थ असा हे की,अजून तरी इंग्रजी राजवट संपूर्ण भारतावर लागू
झाली नव्हती.काही लोकांच्या मते हा स्वातंत्र्याचा उठाव होता असे जर मानले असते तर
नेमके स्वातंत्र कोणाकडे स्वाधीन झाले असा साधा मला प्रश्न उपस्थित झालेला आहे.कारण
भारत १८५७ मध्ये जरी स्वतंत्र झाला असता तरी कोणाच्या ताब्यात गेला असता यांचे
उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला तर माझ्या समोर प्रामुख्याने दोन गोष्टी पुढ्या
आल्या आणि त्या म्हणजे हा उठाव देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी व्यवस्थेचे एक षड्यंत्र
होते.कारण इंग्रजी राजवटी मध्ये महार बटालियन मोठ्या प्रमणात कार्यरत होती.आणि ही
महार बटालियन जर ब्रिटीश सैन्यात जर मजबूत झाली तर उद्याच्या स्वतंत्र भारताच्या
राजकारणात मोठे अस्तित्व निर्माण करेन.आणि पुन्हा एकदा १८१८ चे युध्द सारखी
परिस्थिती निर्माण जर झाली तर भारत देश सोडून पळून जाण्याची परिस्थिती निर्माण
होईल.म्हणून हा १८५७ चा स्वतंत्र उठाव मला महत्वाचा वाटतो.जर १८५७ हे साल जर आपण
धरले तर असे लक्षात येते की,आणि १९४७ मधून जर
१८५७ आपण वजा केले तर लक्षात येईल की,इंग्रजी राजवट ही
फक्त ९० वर्षाची दिसून येईल.मग १८५७ हा फक्त ब्रिटीश राजवटीच्या प्रशासकीय
कारभारात आपला शिरकाव कसा करता येईल आणि महार बटालियन कशी बंद करता येईल याचे एक
राजकारण होते आणि १८५७ चा उठाव झाला म्हणून इंग्रजी राजवटी कडून ब्रिटीश सैन्यात
महार बटालियन बंद करून महार योध्यांची भरती बंद करण्यात आली.त्यानंतर ब्रिटीश प्रशासनाच्या
प्रशाकीय व्यवस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता निर्माण
करण्यासाठी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी मोठी मोहीम उघडली.त्यानी या महार योध्यांची
उपासमार कशी होईल याची तजवीज सुरु केली होती.ब्रिटीश सैन्यातील पहिली महार योध्यांची
भरती बंद करण्यात येऊन त्यांच्या हजारो एकर जमिनी ब्रिटीश सरकार माध्यमातून काढून
घेण्याचा प्रयत्न यांनी ब्रिटीश प्रशासनात दाखल होऊन ते कार्य जोरात सुरु केले
कारण महार योध्यानी स्वराज्यात मोठ्या प्रमाणात योगदान दिले होते.छत्रपती संभाजी
महाराज यांच्या शाक्त धर्माच्या प्रचारात मोठे योगदान दिलेले होते आणि समतावादी
स्वराज्यात मोठा वाटा निर्माण केला होता.जो पर्यंत महार योध्दा संपविला जात नाही
तो पर्यंत आपल्याला संपूर्ण भारत आपल्या प्रशासकीय व्यावस्थेच्या अमलाखाली आंत येत
नाही याची पूर्ण जाणीव या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी व्यवस्थेला झाली होती.त्यामुळे
त्यानी ब्रिटीश सरकार यांच्या बरोबर राहून महार योद्ध्यांच्या जमिनी १००% काढून
घेण्याचा कायदा १८७४ मध्ये पारित करण्यात येऊन तो लागू करण्यात आला.त्यामुळे
खंडावर जगणारा महार योद्धा यांना खंड बंद झाला आणि त्याच्यावर उपासमारीची वेळ
निर्माण झाली.ह्याची जान महात्मा ज्योतिबा फुले यांना झाली होती कारण याच देशस्थ ऋग्वेदी
ब्राह्मणी व्यावस्थेने लपविलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आणि विचार
त्यानी १८६९ मध्ये शोधून काढले होते.ते विचार पुन्हा स्वराज्याच्या रयतेमध्ये
पोहोचावे यासाठी त्यांची जयंती उत्सव १८६९ मध्ये सुरु केला होता तेव्हा त्यांच्या
लक्षात आले की,स्वराज्यात महार योद्ध्यांचे मोठे योगदान
आहे.आणि स्वराज्यातील त्याचे योगदान संपविण्यासाठीच त्यांना अस्पृश्य घोषित
करण्यात आले आहे.कारण पुर्विआपासून देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी व्यवस्था या देशात
वर्णाश्रम धर्माच्या माध्यमातून ब्राह्मण क्षत्रिय आणि इतर शुद्र म्हणून त्यांची
ही वर्ण व्यवस्था निर्माण केली होती.हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी व्यवस्था छत्रपती
शिवराय यांना शुद्र म्हणीत असत त्यामुळे शुद्रातून अति शुद्र म्हणून या महार योद्ध्यांना
अस्पृश्य घोषित करून त्यांना सार्वजनिक जीवन व्यवस्थेतून बाहेर करण्यात आलेले
होते.जसे सार्वजनिक ठिकाणी त्यानी जमायचे नाही सार्वजनिक पानवट्यावर पाणी भरायचे
नाही.असे प्रकारे मनुस्मृतीचे कायदे अमल करण्यात त्यानी सुरुवात केली.स्वराज्यात
महत्वाचे योगदान असलेला महार योद्धा आज शुद्रातून अति शुद्र म्हणजे अस्पृश्य झाला
होता.तेव्हा महार योध्याचे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील महत्वाचे योगदान
विचारात घेता त्यानी १८७३ मध्ये सत्यशोधक चळवळीची स्थापना करून स्वराज्याचा भगवा
ध्वज हातामध्ये घेतला.या चळवळीच्या विरोधात देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी व्यवस्थेने
१९७५ साली आर्य सनातनी हिंदू धर्माची स्थापना केली होती.१८८० मध्ये आपल्या वाड्यातील
विहीर ह्या अस्पृश्य महार योद्ध्यांच्या वंशजासाठी महात्मा फुले यांनी खुली केली
होती.आणि ब्रिटीश सरकारने या महार योध्यांची देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी
व्यवस्थेच्या सांगण्यावरून काढून घेतलेली जमीन परत करावी अशी मागणी लावून धरली
होती.तेव्हा महात्मा फुले यांच्या कार्याला यश आले आणि १८८४ ला वतन कायदा पास करून
त्याचा साडेबारा टक्के परतावा म्हणून जमिनी परत देण्यात आल्या.परंतु इथल्या महसुली
प्रशासनात देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी व्यावस्थेचा शिरकाव असल्यामुळे इथले कुळकर्णी
यांनी बेकायदा असा फेरफार तयार केला की,नोकर वतन म्हणून
ही जमीन महार योद्ध्यांना देण्यात आली आहे.अशा प्रकारे इथला भूमीपुत्र स्वराज्याचा
महार योद्धा अस्पृश्य होऊन गावचा नोकर झाला.बाळकृष्ण गंगाधर टिळकांचा साल १८५६
मध्ये जन्म झाला होता ते १८८४ मध्ये २८ वर्षाचे होते हे आपण याठिकाणी लक्षात घेतले
पाहिजे.त्यांनी गोखले - आगरकर यांना बरोबर घेऊन पहिली हिंदू महासभा १८८४ मध्ये आयोजित
केली होती.मात्र महात्मा फुले जो पर्यंत जिवंत होते तो पर्यंत त्यांना त्यांच्या
मनसुब्यात यश मिळत नव्हते.१९९० मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला.आणि
हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचा वेग जोरात सुरु झाला.देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी
व्यावस्थेने कायस्थ प्रभू ब्राह्मणावर आणि इथल्या महार योध्यावर मोठ्या प्रमाणात
अन्याय अत्याचार करण्यासाठी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणी व्यावस्थेच्या बैठकामध्ये
मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली.१९९१ मध्ये जन्म झालेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
शिक्षणाचा प्रवास सुरु होता.स्वराज्यातील अठरा अलुतेदार व बारा बलुतेदार यांना
एकत्र करण्यासाठी शिवलिंग मंदिरावर ताबा मारून कायस्थ प्रभू आणि अस्पृश्य महार
यांना दूर करण्यात आले.या शिवलिंग मंदिरावर ब्रह्मा विष्णू महेश यांची निर्मिती
करून त्यांचा ताबा बसविण्यात आला.शिवलिंग मंदिरे संपूर्णपणे आपल्या ताब्यात
घेण्यासाठी गणपती गौरी यांची निर्मिती करून शिवलिंग अधिधाता महेश तयार करून
त्याच्या पोटी गणपती जन्माला घालण्यात येऊन त्याला सर्व देव देवतांचा अधिष्टता
करण्यासाठी हिंदू सभेने बाळकृष्ण गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वात सार्वजनिक गणपती
उत्सवाचे आयोजन १९९५ मध्ये करण्यात आले.आणि याचा प्रचार आणि प्रसार जोरात व्हावा
यासाठी १९७५ साली स्थापन झालेल्या आर्य सनातनी हिंदू धर्माचा कट्टर विरोधक म्हणून
मुस्लीम समाजाला टार्गेट करून गणपती उत्सवामध्ये पहिली हिंदू मुस्लीम दंगल
घडविण्यात आली.हिंदू – मुस्लीम या जातीय दंगलींना मोठ्या प्रमाणात वाव देण्यात
आला.आणि गणपती अस्पृश्य महार सोडला तर प्रत्येकाच्या घरा घरात पोहचविण्यात
आला.गणपती उत्सवाच्या माध्यमातून आणि शिवलिंग मंदिरे ताब्यात घेऊन इथला अठरा पगड
आणि बारा बलुतेदार एकत्रित करण्यात आणि त्यांचा वापर अस्पृश्य महार यांना एकटे
पाडण्याचे कटकारस्थान रचले गेले.आज छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील महार योद्धा
त्याच्या प्रामाणिकपणेचे शिक्षा भोगत होता.(क्रमश😊
राजेश खडके
सकल मराठी समाज
No comments:
Post a Comment