Sunday, April 8, 2018
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण गायकवाड यांना सकल मराठी समाजाचे आवाहन....! वढू आणि तुळापुर येथील ब्राह्मणी व्यवस्थेने दहशतीच्या बळावर शंभूराजे यांच्या पाठीशी जो धर्मवीर शब्द लावलेला आहे तो शब्द काढून समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असा शब्द लावण्यात यावा....!
मराठा
सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रवीण गायकवाड
यांची निवड झाली.हे ऐकूण
बऱ्याच कार्यकर्त्यामध्ये एक नवीन जोश निर्माण झाल्याचे पाहिला मिळाले.भीमा
कोरेगाव याठिकाणी जो अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार यांचेवर जो हल्ला मनोहर भिडे
आणि मिलिंद एकबोटे यांनी केला होता,या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष संभाजी ब्रिगेड
ह्यांनी जी ठोस भूमिका घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी घेतली नाही.खेडेकर साहेब
आणि गायकवाड साहेब यांच्यामध्ये एक प्रकारचा दुरावा निर्माण झालेला
आहे.तो दुरावा दूर व्हावा यासाठी बऱ्याच कार्यकर्त्यानी आणि मराठा सेवा संघाच्या अधिकारी
यांनी केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले नाही.छत्रपती संभाजी महाराज यांना
ब्राह्मणी व्यवस्थेने धर्मवीर बनवून मिलिंद एकबोटे यांनी वढू येथील समाधी १५
वर्षापूर्वी ताब्यात घेतली होती आणि तुळापुर येथील शंभूराजे यांच्या समाधीवर
धर्मवीर असे लिहिले आहे.परंतु बहुजन विचारांनी काम करणारी संभाजी ब्रिगेड यांनी
कधीही या विषयावर कोणतीही चर्चा घडवून आणली नाही.छत्रपती संभाजी महाराज यांच्या
समतावादी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबर महार योध्याचे
योगदान आहे याची पूसटची कल्पना देखील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना नाही ही
अत्यंत दुख:द घटना आहे.छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३८ दिवसांच्या अटकेचा प्रवासामध्ये
जसे मालोजी घोरपडे वीरगतीला प्राप्त झाले तसे महार योध्द वीरगतीला प्राप्त झाले
होते परंतु याबाबत कोणीही बोलताना गेल्या बावीस वर्षाच्या संभाजी ब्रिगेडच्या कालखंडात
आढळले नाही.समतावादी शंभूराजे तुळापुर आणि वढू च्या समाधीच्या माध्यामातून धर्मवीर
म्हणून रयते समोर जात आहे.याबाबत कोणीही ब्र शब्द काढल्याचे आठवत
नाही.शिवरायांच्या स्वराज्यात महार योध्दा प्रमुख घटक असताना त्याचे योगदान शुल्लक
पद्धतीत रयतेसमोर मांडले जात असताना कोणीही साधे वाक्य त्या महार योद्ध्यांच्या
वतीने काढलेले नाही.इतिहासातील महार योध्दा अस्पृश्य कसा झाला याबाबत कोणीही
बोलायला तयार नाही.इतिहासापासून अज्ञानी महार समाजाला जागृत करण्याचा कोणीही
प्रयत्न केला नाही.भीमा कोरेगाव आणि वढू येथील संभाजी महाराज यांची समाधी यांचा
संबध आहे आणि होता असे आजपर्यंत कोणीही बोलेले नाही.गेल्या ४० ते ५० वर्षापासून आंबेडकरी
चळवळीचे कार्यकर्ते ५०० विरुध्द २८००० हजार असा महार योध्यांचा इतिहास सांगत होते
याबाबत कोणीही काही बोलले नाही.या युद्धाचे नेतृत्व सिद्धनाक महार याने केले आहे
हे सर्वजन गेल्या ४० वर्षापासून सांगतात परंतु हा सिद्धनाक महार कोण होता तो भीमा
कोरेगावला कसा आला त्याचे गाव कोणते हे कोणीही सांगत नाही.परंतु सकल मराठी समाज
यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील महार योद्ध्यांच्या इतिहासातील
महार समाजाचे योगदान २०१४ पासून स्वराज्याचे हिरे या उपक्रमातून शोधण्याचा प्रयत्न
केला तेव्हा इतिहासाने आपल्यात लपलेल्या बऱ्याच घटना आमच्या समोर मांडल्या आहेत
आणि त्या घटना वेळोवेळी सकल मराठी समाज यांनी सोशल मिडिया,वृत्तपत्र,पोस्टर्स,हॅडविल
आणि आम्ही आहोत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील महार योद्धा या कार्यक्रमाच्या
माध्यमातून रयते समोर मांडल्या आहेत.आज महार योध्दा मोठ्या प्रमाणात जागरुक होताना
दिसत आहे परंतु एक खंत अजून आम्हाला आहे की,आजपर्यंत संभाजी ब्रिगेड या संघटनेने छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसून ते समतावादी
आहेत आणि त्त्यांचा जीव वाचविण्यासाठी अर्जुना महार आणि रायप्पा महार हे वीरगतीला
प्राप्त झाले आहेत असे सांगितल्याचे कोठेही दिसून येत नाही.तरी सकल मराठी समाजाचे मराठा
सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेला आवाहन आहे की,त्यांनी वढू आणि
तुळापुर येथील ब्राह्मणी व्यवस्थेने दहशतीच्या बळावर शंभूराजे यांच्या पाठीशी जो धर्मवीर
शब्द लावलेला आहे तो शब्द काढून घेण्यासाठी सकल मराठी समाज यांच्या भूमिकेस
पाठींबा द्यावा असे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण गायकवाड यांना आवाहन आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment