Friday, June 1, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ६) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या साप्ताहिक मूकनायक या वृत्तपत्राला प्रभावित होऊन छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आंबेडकर यांचे बरोबर जेवण केले....!


बाळकृष्ण गंगाधर टिळकांनी पहिली हिंदू महासभा १८८४ मध्ये भरविल्या नंतर त्याचे १८८५ मध्ये  भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये रुपांतर केले.नंतर त्यांनी ब्रिटीश सरकारला त्यांचे प्रशासन ताब्यात देण्यासाठी आणि इथल्या धर्मात ढवळाढवळ करू नये यासाठी नेहमी दबाव आणला.तरीही ब्रिटीश सरकार इथल्या मानवाला बाधक असणाऱ्या गोष्टीवर कायदा तयार करून त्या बंद करण्यात येत होत्या.त्यांचे असे म्हणणे होते की,जो शिक्षण घेईल आणि आपल्या अभ्यासात प्रगती करेन त्यालाच इथल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये जागा दिली जाईल.परंतु इतिहास काळापासून ही बामणी व्यवस्था राज्य करणाऱ्यांच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये राहिलेली आहे याला स्वराज्यही अपवाद राहिलेले नव्हते.१८९५ च्या गणपती उत्सवा नंतर हिंदू धर्म मोठ्या प्रमाणात उभा राहू लागला.हिंदू – मुस्लीम तेढ व अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली होती.आता या बामणी व्यवस्थेला अडविणारे कोण राहिले नव्हते.जयसिंगराव घाटगे व राधाबाई घाटगे यांचे पुत्र यशंवत घाटगे यांना १८८४ मध्ये ते १० वर्षाचे असताना कोल्हापूर गादीने दत्तक घेतले होते.दत्तक घेतलेल्या यशवंतरावांचे शाहू असे नामकरण झाले होते.ते २० वर्षाचे झाल्यानंतर कोल्हापूर गादीवर विराजमान करण्यासाठी १८९४ मध्ये त्यांचा राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आलेला होता.राज्याभिषेक करतेवेळी त्यांच्या लक्षात आले की,वैदिक धर्म पद्धतीतील हा राज्याभिषेक असताना हा धर्म पंडित वैदिक धर्माचे मंत्र उचारण न करता पुरानोत्व मंत्राचे उचारण करीत आहे.तेव्हा त्यांनी त्या वैदिक धर्म पंडिताला हटकले.आणि सांगितले की,माझा राज्यभिषेक तू वैदिक धर्म पद्धतीत करीत आहे असे तू म्हणतो आणि मंत्र मात्र पुरानोत्व मंत्राचे उचारण करीत आहे.तेव्हा त्या वैदिक धर्म पंडिताने त्यांना सांगितले की,तुम्ही शुद्र आहात त्यामुळे तुमच्या राज्याभिषेकासाठी मी वैदिक मंत्राचे उचारण करू शकत नाही.शाहू महाराजांनी त्या वैदिक धर्म पंडिताला हाकलून दिले.आणि असे जाहीर केले की,इथून पुढे स्वराज्याच्या खजिन्यातील एक पै रक्कम बामणाला दिली जाणार नाही.त्यांचा इथून पुढे कोणताही सन्मान केला जाणार नाही.असे म्हणून त्यांनी अलुतेदार आणि बलुतेदार यांना ५०% आरक्षण लागू करून आरक्षणाचे जनक झाले.इकडे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे शिक्षण सुरु झाले होते.सातारा गादीचे छत्रपती प्रताप[सिह भोसले यांनी सुरु केलेल्या शाळेमध्ये १ ली ते ४ थी शिक्षण घेतले.नंतर पुढे त्यांचे शिक्षण मोठ्या प्रमाणात सुरु झाले होते.१९२० मध्ये डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी मुंबईतून साप्ताहिक मूकनायक प्रकाशित करून आपल्यातील पत्रकार दाखवून दिला होता.त्यातील लिखाणाला प्रेरित होऊन छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी डॉ बाबसाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांचे बरोबर जेवण केले.डॉ बाबसाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात झालेले जेवण हिंदू धर्म पंडितांना आवडली नाही त्यांनी या जेवणाची चर्चा मोठ्या प्रमाणात घडविली मात्र त्याचा परिणाम छत्रपती शाहू महाराज यांचेवर झाला नाही.बाळकृष्ण गंगाधर टिळकांचा १ ऑगस्ट १९२० मध्ये निधन झाले.छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी माहाराज यांचा पुतळा बसविण्याचे ठरविले होते.परंतु बाळकृष्ण गंगाधर टिळकांचा इथल्या बामणी व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात प्रभाव होता.त्यांचा आणि छत्रपती शिवराय यांचा काहीही संबध नव्हता.त्यामुळे छत्रपती शिवाराय यांचा अश्वरूढ पुतळा त्यांना महार समाजाच्या जागेत उभारावा लागला.आज शिवाजीनगर येथे जो छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारलेला आहे तो पहिला पुतळा असून छत्रपती शाहू महाराज यांनी लंडनच्या युवराज यांच्या हस्ते उभारेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांचे मुंबई येथे १ मे १९२२ मध्ये निधन झाले (म्हणजे त्यांची हत्या झाली).(क्रमश😊

No comments:

Post a Comment