Monday, January 25, 2021

शरद पवार पहिल्यांदा खासदार.....आणि प्रकाश आंबेडकर यांचा भारतीय रिपब्लिकन पक्ष...! वतन बचाओ आंदोलन


 

      यशवंतराव चव्हाण हे कॉंग्रेस पक्षाला प्रामणिक होते...शरद पवार यांच्या १९७८ च्या बंडामुळे चव्हाण हे शरद पवार यांचेवर नाराज होते.महाराष्ट्र कॉंग्रेसचे यशवंतराव चव्हाण दिल्लीत नेतृत्व करीत होते.त्यामुळे शरद पवार यांना दिल्लीत जाता येत नव्हते......याच काळात प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची ३१ आक्टोंबर १९८४ मध्ये हत्या झाली होती....यावेळी देशाचे गृहमंत्री पी व्ही नरसिंहराव होते.इंदिरां गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली होती.एकंदरीत शरद पवार यांनी केलेला विश्वासघात यामुळे यशवंतराव चव्हाण यापूर्वीच खचले होते.त्यामुळे इंदिरा गांधी यांची झालेली हत्या त्यांना सहन झाली नाही...आणि  पंचवीस दिवसातच म्हणजे २५ नोव्हेंबर १९८४ मध्ये यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले.

      शरद पवार यांची पकड महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेली होती....आता दिल्लीच्या राजकारणात त्यांना त्यांची पकड मजबूत करायची होती.यशवंतराव चव्हाण यांच्या जाण्यामुळे शरद पवार यांना दिल्लीत जाण्याची संधी मिळाली होती.यातच इंदिरा गांधी यांचे हत्येमुळे देशातील जनता भाऊक झालेली होती.अशा वेळेस कॉंगेस विरोधी लढणे एवढे सोपे नाही असा समज लोकांचा झालेला होता.परंतु रिपब्लिकन पक्षाच्या मिळालेल्या मतामुळे आणि कॉम्रेड च्या मिळालेल्या ताकदीच्या सोबत उभे केलेला भांडवलदार यांच्यामुळे राजकीय त्रिसुत्रता शरद पवार यांच्यात निर्माण झालेली होती.त्यामुळे विरोधक कितीही बलाढ्य असला तरी त्याला चीतपट करण्याची क्षमता शरद पवार यांच्यात निर्माण झालेली होती.त्यामुळे सन १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचेवर इंदिरा गांधीच्या हत्येचा परिणाम झाला नाही.....आणि ते बारामती मतदार संघातून स्वत: निर्माण केलेल्या ताकदीवर खासदार म्हणून निवडून आले होते.भारतीय जनता पक्ष नवीन असल्यामुळे त्यांचे दोनच खासदार निवडून आले होते.एक खासदार अटलबिहारी वाजपेयी होते....तर दुसरे लालकृष्ण आडवाणी होते.

 

प्रकाश आंबेडकर यांचा भारतीय रिपब्लिकन पक्ष.....!  

       डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सन १९५६ मध्ये महापरिनिर्वाण झाले...आणि लगेच सन १९५७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या होत्या.या लोकसभा निवडणुकीत बाबासाहेबांचे वारसदार निवडणूकीपासून दूर ठेवण्यात आलेले होते.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाची उमेदवारी त्यांच्या वारसास देण्यात आलेली नव्हती.त्यामुळे चौतीस वर्षापासून दूर असलेले बाबासाहेबांचे वारसदार सन १९८० च्या दरम्यान म्हणजे नामांतर लढयापासून रिपब्लिकन पक्ष नेतृत्वात काम करीत होते.एकंदरीत शरद पवार यांचे राजकारण लक्षात आलेवर प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची सुरवात करून राजकीय डाव मांडणीला सुरुवात सन १९८४ मध्ये केली होती.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख म्हणून काम केले.

 

नामांतराचा लढा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे बेताल वक्तव्य.....!

        शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे १९७३ पासून चांगले संबध निर्माण झालेले होते.त्यामुळे शरद पवार यांच्या सांगण्यावरून बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला पाठींबा देखील दिलेला होता.आणि दोघांनी मिळून सन १९७७ मध्ये वाढदिवस देखील साजरा केला होता.सन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत मध्ये कॉंग्रेसला शिवसेनेचा पाठींबा देखील दिलेला होता.त्यामुळे सन १९७८ चा उभा राहिलेला नामांतर लढा आणि या नामांतर लढया संदर्भातील बाळासाहेब ठाकरे यांचे बेताल वक्तव्य या दोघांच्या घनिष्ट मैत्रीची  साक्ष देते.कारण जे वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते त्या बेताल वक्तव्याचा शरद पवार यांनी पुरोगामी म्हणून समाचर घेतला नाही.ते वक्तव्य आंबेडकरी अनुयायी यांचा स्वाभिमान दुखविणारे वक्तव्य होते....त्याकाळी ठाकरे असे म्हणाले होते की “घरात नाही पीठ कशाला हवय विद्यापीठ” त्यामुळे नामांतर लढा आणखीनच जोर धरू लागला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आंबेडकर अनुयायी दुखवू लागले होते.हिंदुत्वादी प्रखर भूमिका तयार होऊन ती बहुजन समाजात निर्माण करण्याचा हेतू ठाकरे यांचा होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेली समता विस्थापित करण्याची भूमिका होती.माता जिजाऊ आणि शिव विचारावर उभी राहिलेली शिवसेना आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे समतावादी विचार मोडीत काढायचे होते.पुढे तसेच झाले छत्रपती शिवराय आणि भगव्या ध्वजा विरुद्ध निळा असे समीकरण तयार झाले.परंतु त्याकाळी रिपब्लिकन पक्षाच्या गटतटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात उभे राहिले होते.अशा मध्ये समाजाने कोणाचे ऐकायचे असा प्रश्न निर्माण झालेला होता.याचाच फयदा मनुवादी व्यवस्थेतील लोकांनी घेतला होता.आणि दलित वस्तीवर हल्ला करून छत्रपती शिवाजी महाराज यांना आणि स्वराज्याच्या ध्वजाला हा दलित वर्ग विरोध करीत असल्याचा कांगावा करीत इतर बहुजन समजापासून दलित समाजाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न याकाळी मोठ्या प्रमाणात झालेला होता.याचाच फायदा इथल्या कॉम्रेडी विचारांच्या लोकांनी घेतल्याचे त्याकाळी दिसून येते.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दलित समाजावर मोठ मोठे हल्ले होऊ लागले होते.असे वातावरण निर्माण केले गेले की डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एकाच वर्गाचे नेते होते....आणि त्यांनी एकाच वर्गासाठी काम केले होते.त्यामुळे दलित समाजाच्या संरक्षणासाठीचा मुद्दा उपस्थित झाला.

अॅक्ट्रोसिटी अॅक्ट कायदा लागू....!

      संसदेत कायदे कसे पास होतात हे आपण तीन कृषी कायद्याच्या माध्यमातून समजून घेतलेले आहे.सन १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधीच्या हत्येचा कोणताही परिणाम न होता.कॉंग्रेस विरोधी उमेदवार म्हणून शरद पवार निवडून आलेले होते....आणि दिल्लीत आपला जोम बसवीत होते.असे असताना नामांतर लढ्याच्या माध्यमातून दलितांवर शिवसेना आणि कॉंग्रेसच्या लोकांच्या माध्यमातून घरे जाळून,दलित वस्त्या पेटवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराज विरोधी ठरवून भगव्या ध्वजाचा विरोधक ठरविण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे दिसून आले आहे.आणि हे सत्यच आहे हे भासविण्यासाठी एनटी,व्हीजेएनटी आणि ओबीसी हा समाज तोडण्याचा मनसुभा तयार झालेला होता.आणि तो मनसुभा एनटी,व्हीजेएनटी आणि ओबीसी या तीन प्रवर्गातील समाजाला सवर्ण ठरवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न म्हणून दलित अन्याय अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ म्हणजेच अॅक्ट्रोसिटी अॅक्ट कायदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्याचे भासविण्यात आले.

      वास्तविक पहाता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिक यांच्यासाठी नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ तयार करून त्यासाठी विशेष पोलीस पथक तयार केले होते.हा कायदा एका विशिष्ठ समाजासाठी नव्हता तर भारतातील जो कोणी दुर्बल घटकातील व्यक्ती आहे आणि ज्यावर कोणीही अन्याय अत्याचार करेन त्याच्या विरुध्द हा तयार केलेला कायदा होता.परंतु एससी आणि एसटी या प्रवर्गाला एनटी,व्हीजेएनटी आणि ओबीसी पासून दूर ठेवण्यासाठी नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ हा अपुरा पडत असल्याचा ठपका ठेवून अॅक्ट्रोसिटी अॅक्ट कायदा मंजूर करण्यात आलेला कायदा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.या कायद्यामुळे ज्या गावगाड्यातील लोकांना शुद्र ठरविले होते त्यांना न्याय देण्याची भूमिका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची होती...अशा लोकांना सवर्ण ठरविले गेले होते.त्यामुळे इथला इतर वर्ग वेगळा होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली गावगाड्यातील वंचित समूहाला न्याय देण्याच्या भूमिकेला कुठेतरी बाधा निर्माण झाल्याचे दिसत आहे.त्यामुळे या कायद्याचा जर आभ्यास केला तर निश्चितपणे लक्षात येईल की ही बहुजन समाजाला आपल्यापासून दूर ठेवण्याची कॉम्रेडी खेळी आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.(क्रमशJ

 

Saturday, January 23, 2021

शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री...आणि नामांतर लढा उभा राहिला...! प्रकाश आंबेडकर राजकरणात...! वतन बचाओ आंदोलन


 

सन १९७२ पासून खासगीकरणाला सुरुवात....आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना...!

शरद पवार विरोधी पक्षनेता असताना...मराठा आरक्षणासाठी झाले पहिले आत्मबलिदान...!

       महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे शरद पवार अतिशय लाडके असे शिष्य बनले होते.त्यामुळे दिल्लीत गेल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी त्याकाळी शरद पवार यांच्यासाठी खास युवकपद निर्माण करून त्यांना महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सन १९६४ मध्ये वयाच्या चौवासाव्या वर्षी अध्यक्ष केली होते...त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांची महाराष्ट्रातील संपूर्ण ताकद शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहिली होती.याचाच लाभ घेऊन शरद पवार यांनी सन १९६४ मध्ये दादासाहेब गायकवाड यांच्या बरोबर युतीची बोलणी करून रिपब्लिकन-कॉंग्रेस युती घडविली होती.त्यामुळे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाच्या मतदारांची मते मिळून सन १९६७ मध्ये वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी शरद पवार आमदार म्हणून निवडून आले होते.आणि वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री झाले.यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबर वसंतदादा पाटील हे सुध्दा शरद पवार यांना मार्गदर्शन करायचे परंतु वसंतदादा पाटील यांनी सन १९७७ मध्ये महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.यातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि शरद पवार यांचे संबध १९७३ पासून आलेले होते.त्यामुळे त्यांनी सन १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला जाहीर समर्थन दिले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी सन १९७७  मध्ये शरद पवार यांच्या समवेत वाढदिवस देखील साजरा केला होता.त्यानंतर सन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिलेला होता.त्यामुळे जसा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा रिपब्लिकन पक्ष म्हणून शरद पवार यांनी सन १९६४ मध्ये युती घडविली होती.त्याप्रमाणे शरद पवार यांनी शिवसेनेचा पाठींबा कॉंग्रेसला मिळविला होता.त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला चांगली उभारी मिळाली होती आणि शरद पवार यांचे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात चांगले वजन देखील निर्माण झाले होते.हे सर्व करीत असताना शरद पवार यांना त्याकाळी कॉम्रेडची ताकद मोठ्या प्रमाणात मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.त्यामुळेच कॉम्रेड बरोबर असल्यामुळे शरद पवार यांनी कॉंग्रेस पक्षां बरोबर बंडखोरी करून कॉंग्रेस मधील बारा आमदार फोडून वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून टाकले होते....त्यावेळी वसंतदादा पाटील यांनी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीत खंजीर खुपसाल्याची शरद  पवार यांच्यावर विरोधात भावनिक प्रतिक्रिया दिली होती.आणि शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे सहावे मुख्यमंत्री म्हणून १८ जुलै १९७८ रोजी शपथ घेतली होती.महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस सरकार सत्तेत आलं. यात पवारांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. या बिगर-काँग्रेस आघाडीचं नाव होतं पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद. पण हे सरकार फार काळ टिकलं नव्हतं.यावेळी शरद पवार यांचे वय वर्ष अडोतीस होते.विधानसभेच्या तिसऱ्या टर्म मध्ये आणि कमी वयामध्ये मुख्यमंत्री पद मिळविणारा देशात पहिलाच व्यक्ती म्हणून त्यांनी नावलौकिक वाढविला.जे बारा आमदार फोडून शरद पवार यांनी सत्तेची गणिती सुरु केली....ती गणित म्हणजे घराणेशाहीला प्रोत्साहन देण्याची सुरुवात शरद पवार यांनी १९७८ मध्ये केल्याचे दिसून येते....परंतु त्याची पायेमुळे पूर्वीच रोवल्याचे दिसत आहे.

 

शरद पवार मुख्यमंत्री झाले....आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर विषय उभा राहिला....!

        शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला....आणि पुन्हा एकदा भावनिक लढा सुरु झाला...याच वेळी आंतरराज्य स्थलांतरीत कामगार (रोजगारांचे नियमन आणि सेवा शर्ती) अधिनियम १९७९ मंजूर करण्यात आला.परंतु सन १९८० मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत बसल्या आणि त्यांनी देशातील विरोधी पक्षाचे सरकार बरखास्त केली त्यात शरद पवार यांचे सरकार २७ फेब्रुवारी १९८० मध्ये बरखास्त झाले...आणि त्या नंतर इंदिरा कॉंग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे सातवे मुख्यमंत्री म्हणून ए आर अंतुले यांनी शपथ घेतली.परंतु कॉम्रेड बरोबर असल्यामुळे त्याचा शरद पवार यांना फारसा फरक पडला नाही....परंतु शरद पवार असे वागतील याची तिळमात्र शंका यशवंतराव चव्हाण यांना नव्हती...त्यामुळे यशवंतरावांना त्याचा धक्का बसला होता.त्यानंतर शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या समोर कधी उभी ठाकले नाही.त्यानंतर कॉम्रेडच्या बळावर शरद पवार हे विरोधी पक्ष नेते झाले....यावेळी शरद पवार यांचे वय वर्षे चाळीस होते.कॉम्रेड बरोबर असल्यामुळे शरद पवार यांना भांडवलदार यांची मोठ बांधण्यास सोप्पे झालेले होती.परंतु तो पर्यंत कॉंग्रेसचा मूळ चेहरा बदलण्यात आणि देशात कॉंग्रेस कमजोर करण्यात इंदिरा गांधी यशस्वी झालेल्या होत्या...कारण याच दरम्यान नामांतर लढा जोर धरत होता.....या दरम्यानच जनसंघ पक्षाचे भारतीय जनता पार्टी म्हणून नामकरण होऊन हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष उभा राहिलेला होता.

 

सन १९७२ पासून खासगीकरणाला सुरुवात....आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना...!

      सन १९७२ पासून खासगी कंपनी पासून खासगीकरणाला सुरुवात झाली असल्याचे दिसून येते...यासाठी आपल्याला भोसरी आणि लोणी काळभोर येथील फिलीफ्स कंपनीचा इतिहास समजून घ्यावा लागेल...या काळात या दोन्ही कंपन्यांची युनियन तोडण्याचे काम झाले...तेथून पुढे फिलिप्स कंपनीला अधोगती सुरु झाल्यामुळे त्याकाळी साडेबारा हजर कामगार उध्वस्त झाले...आणि देशातील भांडवलदारास उभे राहिण्याची संधी प्राप्त झाली.त्यामुळे एकंदरीत कॉम्रेडचा इतिहास पाहिला तर आपल्याला इथला कामगार संपविण्याचा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कामगार कायदा कमजोर करण्याचा राहिला असल्याचे दिसून येते.शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यानी सावरकर यांची स्तुतिसुमने गायली असल्याचे आपल्या सर्वांनाच माहित आहे.शरद पवार यांचे सरकार १७ फेब्रुवारी १९८० मध्ये बरखास्त झाल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झालेली होती.कॉंग्रेसचा चेहरा बदलून इंदिरा कॉंग्रेस म्हणून  चेहरा बाहेर आलेला  होता.त्यामुळेच राष्ट्रपती राजवटीच्या काळात जनसंघाने ६ एप्रिल १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना केली होती.त्यानंतर राष्ट्रपती राजवट उठवून इंदिरा कॉंग्रेस मधील ए आर अंतुले यांनी महाराष्ट्र राज्याचे सातवे मुख्यमंत्री म्हणून ९ जून १९८० मध्ये शपथ घेतली होती.या सरकारच्या काळात शरद पवार यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून राज्याचे काम पहिले.याचा काळात या सरकारने सन १९८० मध्ये खासगीकरणाला खरी सुरवात केली.त्यानी प्रथम खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ लागू केला.याच काळात महाराष्ट्र झोपडपट्टीदादा अधिनियम १९८१ लागू करण्यात आला....आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची राजकीय जीवनाला सुरुवात झाली.

शरद पवार विरोधी पक्ष नेते असताना...मराठा आरक्षणाची मागणी...आणि  आरक्षणासाठी पहिले आत्मबलिदान झाले....!

 

     सन १९७८ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा ठराव शरद पवार यांच्या सरकारच्या काळात मंजूर झालेला होता..आणि हा ठराव कसा आला...आणि हा लढा कसा उभा राहिला याची माहिती आपल्या सर्वाना आहे.याच काळात प्रकाश आंबेडकर यांची राजकारणात सुरुवात झाली होती...याकाळात आंबेडकर अनुयायी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचे आंनदाने स्वागत करीत होता.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर प्रदीर्घ काळानंतर त्यांचे वारस राजकारणात आले होते.रिपब्लिकन पक्ष नेर्तुत्वात त्यानी कार्याला सुरुवात केलेली होती.

         याकाळात अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना माथाडी कामगार नेते आण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती....ए आर अंतुले मुस्लीम समाजतील पहिले मुख्यमंत्री होते. १२ जानेवारी १९८२ रोजी ए आर अंतुले यांना पायउतार व्हावे लागले.त्यांचा कार्यकाळ अठरा महिने राहिला...त्यानंतर २१ जानेवारी १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांनी आठवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली....मराठा आरक्षण मागणीला यश मिळत नाही असे लक्षात आल्यावर २२ मार्च १९८२ साली आण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाचा मुंबई मध्ये मोठा मोर्चा काढला...एवढा मोठा मोर्चा निघूनही आपल्याला यश मिळाले नाही....अशी भावना आण्णासाहेब पाटील यांची झाली होती....आणि त्यानी २३ मार्च १९८२ मध्ये रहात्या घरी स्वत:ला गोळी मारून घेऊन आत्महत्या केली.....त्यामुळे बाबासाहेब भोसले यांना १२ फेब्रुवारी १९८३ रोजी पाय उतार झाले....त्यांचा कार्यकाळ तेरा महिने राहिला... त्यानंतर २  फेबृवारी १९८३ मध्ये वसंतराव पाटील यांनी नववे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली...त्यानी त्यांच्या कार्य काळात सार्वजनिक प्रयोजनासाठी आणि कंपन्यांसाठी भूमी संपादन संबधीचा म्हणजे भूमीसंपादन (विशोधन) अधिनियम १९८४ चा कायदा मंजूर केला होता....यावेळी शरद पवार हे चव्वेचाळीस वर्षाचे होते.(क्रमशJ

Friday, January 22, 2021

दलित पॅथरची स्थापना.....आणि अडीच वर्षातच पॅथरची झंझावात मावळला....! शिवसेनेने घेतली उभारी....! वतन बचाओ आंदोलन


 

      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एस,एसटी,एनटी,व्हीजेएनटी,ओबीसी आणि अल्पसख्यंक या प्रवर्गाला सोबत घेऊन सन १९४२ मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केली होती.....आणि हा पक्ष बरखास्त झाला नसताना तो बरखास्त झाल्याचे समजण्यात येऊन सन १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर सन १९६२ मध्ये रिपब्लिकन पक्षाची बांधणी करण्यात आलेली होती.गेल्या लेखात या संदर्भात आपण वाचले आहे....आणि रिपब्लिकन-कॉंग्रेस युती देखील आपण समजून घेतली आहे.युतीचा पश्चाताप होऊन दादासाहेब गायकवाड यांचे निधन झाल्याचेही आपण समजून घेतले आहे.दादासाहेब गायकवाड यांच्या निधना नंतर रिपब्लिकन पक्षाची धुरा ही दादासाहेब गवई यांच्याकडे आली होती.त्यामुळे रिपब्लिकन-कॉंग्रेस युतीवर सन १९७२ मध्ये पुन्हा शरद पवार हे कॉंग्रेस पक्षाचे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले होते.

           विषय असा आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्ष बरखास्त झाल्याचे समजण्यात येऊन “रिपब्लिकन पक्ष” हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील होता...तर “दलित पॅथर” स्थापन करण्याची गरज काय होती असा प्रश्न त्याकाळी बऱ्याच लोकांना पडलां होता.परंतु रिपब्लिकन-कॉंग्रेस युती ज्यांनी ज्यांनी समजून घेतली आहे...त्यालाच या बाबतची उकल होईल अन्यथा होणार नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.सन १९७१ मध्ये दादासाहेब गायकवाड यांचे निधन झाले...आणि सहा महिन्यानंतर नामदेवराव ढसाळ यांच्या नेर्तुत्वात ९ जुलै १९७२ मध्ये दलित पॅथरची स्थापना झाली...आता ही स्थापना कुठे झाली...आणि या स्थापने दरम्यान कोण कोण उपस्थित होते याची माहिती ही चळवळीच्या कार्यकर्त्यांना माहित आहे.त्यामुळे याठिकणी त्या बाबतचे विश्लेषण मी येथे देत नाही.

     एकंदरीत काय तर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचा मतदार रिपब्लिकन पक्ष आणि कॉंग्रेस युतीमुळे बऱ्याच प्रमाणात कॉंग्रेसचा मतदार म्हणून तयार झालेला होता.परंतु एक मतदार वर्ग असा होता की तो कॉंग्रेसचा कधीच मतदार झालेला नाही.परंतु या काळात प्रबोधनकार ठाकरे यांची शिवसेना लोकामध्ये सामाजिक संघटना म्हणून शिव विचार पेरण्याचे कार्य करीत होती.त्यामुळे प्रबोधनकार ठाकरे हे समतावादी विचार लोकामध्ये पेरण्याचे काम करीत होते.याचा परिणाम त्याकाळी आरएसएसवादी कॉंग्रेस आणि जनसंघ यांचेवर होत होता.त्यामुळे जनसंघ हा बामणी व्यवस्थेचा पक्ष होता आणि मनुवादी विचारांचा पेरक होता.आणि यातच प्रबोधनकार यांचे २० नोव्हेंबर १९७३ मध्ये निधन झाले होते.त्यामुळे आता शिवसेनेची सूत्र बाळासाहेब ठाकरे यांचेकडे आलेली होती.यावेळी समतावादी विचारावर उभी राहिलेली शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी विचारावर पुर्नस्थापित केली गेली.यातच दलित पॅथरने दलित अन्याय अत्याचाराच्या विरोधातील आक्रमक लढा उभा केला होता.गावोगावी जाऊन दलित पॅथर आक्रमक आंदोलन करीत होती.त्यामुळे नव्या जोशाची गरम रक्ताची पोर दलित पॅथरच्या आक्रमक भूमिकेकडे वळू लागली होती.हजारोंच्या संख्येने आक्रमक आंदोलनासाठी तरुण गावोगावी जमत होती.त्यामुळे कमी काळात दलित पॅथर संघटनेची दहशत गावोगावी झाली होती.आक्रमक भूमिकेमुळे तरुणावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होऊ लागले होते.गुन्हे दाखल झाल्यामुळे पोलीस प्रशासनाचा ससेमिरा या तरुणाच्या पाठीमागे लागला होता.त्यामुळे दलित पॅथरच्या कार्यकर्त्यांना भूमिगत होण्यास भाग पडत होते.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली समतेची कास दलित पॅथर संघटनेच्या माध्यमातून सुटत चाललेली होती.बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत कधीही आक्रमक आंदोलानात्मक हल्ला केला नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी केलेले चवदार तळ्याचे आंदोलन समजून घ्यावे लागेल.परंतु दलित पॅथरचे संस्थापक नेते नामदेवराव ढसाळ यांनी मी मार्क्सवादी विचारांचा समर्थक असल्याचे जाहीर केले.त्यामुळे दलित पॅथर ही आंबेडकर विचारावर उभी रहीलेली संघटना नसल्याचे तरुणांच्या लक्षात आले आणि ते त्या सघटनेमधून बाहेर पडू लागले....आणि उभा राहिलेला दलित पॅथर झंझावात मावळला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने घेतली उभारी...!

        मार्क्सवादी विचारांचे समर्थन नामदेवराव ढसाळ यांनी केले आणि दलित पॅथरच्या आक्रमक आंदोलनामुळे गावोगावी दहशत झाल्यामुळे याचा फायदा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनाला मिळाला..आणि गावोगावी जाऊन शिवसेनेने आपली पायेमुळे रोवण्यास सुरुवात केली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्युच्या अहवाल मागणी आंदोलन स्थगित...!

          २१ फेब्रुवारी १९७५ मध्ये शंकरराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री झाले...आणि २५ जून १९७५ मध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती.या नंतर बी सी कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्युच्या अह्वालच्या मागणीचा भावनिक लढा जो सन १९५६ मध्ये सुरु केला होता...तो लढा १९७६ पर्यंत सुरु ठेवला होता...जेव्हा पुण्यातील श्रमिक भवन येथे सुरु असलेल्या बैठकीत उपस्थित झालेल्या प्रश्नाने बी सी कांबळे यांनी हा लढा आटोपण्याचा निश्चय करून तेथेच तो थांबविला गेला.त्याचे कारण असे होते की जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शवविच्छेदनच झाले नसेल...तर मृत्यूचा अहवाल मिळणारच कसा असा प्रश्न त्या बैठकीत त्यांचे  कार्यकर्ते अशोक माने यांनी उपस्थित केला होता.त्यामुळे १९७५-७६ मध्ये हे आंदोलन बंद करण्यात आले.गेल्या वीस वर्षापासून सुरु असलेले आंदोलन हे एका कार्यकर्त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नावर बंद करण्यात आले.....याची चर्चा त्याकाळी बऱ्याच जाणकार यांनी घडविली.याच दरम्यान शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना नागरी जमीन कमाल धारणा कायदा १९७६ लागू करण्यात आलेला होता... यावेळी शरद पवार हे ३६ र्षाचे होते... (क्रमशJ

Tuesday, January 19, 2021

शरद पवारांचे कॉंग्रेसमध्ये पदार्पण....आणि कॉंग्रेस पक्षा बरोबर रिपब्लिकन पक्षाची युती.....! वतन बचाओ आंदोलन


 

शरद पवार कॉंग्रेसमध्ये आले..... बांधकाम व्यवसाय उभा राहिला....!

शेकाफेच्या मतदारावर शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले आणि राज्यमंत्री सुध्दा झाले.....!

रिपब्लिकन पक्षाचे दादासाहेब गायकवाड यांना झाला पश्चाताप....आणि १९७१ मध्ये झाला त्यांचा मृत्यू....!

       सन १९५७ साली झालेल्यां लोकसभा निवडणुकीत शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचे आठ खासदार निवडूण आले होते.यामध्ये दादासाहेब गायकवाड सुध्दा शेकाफे कडून खासदार झाले होते.त्यामुळे या सर्वांचा कार्यकाळ शेकाफे म्हणून पुढील पंचवार्षिक निवडणूक होईपर्यंत होता.म्हणजेच १९५७ ते १९६२ पर्यंत होता..त्यामुळे सन १९६२ पर्यंत शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्ष अस्तित्वात असल्याचे दिसत आहे. परंतु महाराष्ट्र राज्याची १ मे १९६० साली नवनिर्मिती झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे राजकारण लक्षात घेता....शरद पवार यांनी सन १९६१ मध्ये वयाच्या एकवीस वर्षात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यामध्ये विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्यात शरद पवार यांनी चांगले भाषण करून यशवंतराव चव्हाण यांना प्रभावित केले होते.प्रभावित झालेल्या यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांना आपले शिष्य करून महाराष्ट्रातील स्वत:ची संपूर्ण ताकद शरद पवार यांच्या पाठीशी उभी केली होती.त्यामुळे पुढील घडामोडी करणे शरद पवार यांना शक्य झाले होते.सन १९६२ मध्ये रिपब्लिकन चळवळ उदयास आली होती....याच काळात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट निर्माण झाले होते.सन १९६७ ची विधानसभा निवडणूक लक्षात घेता शरद पवार यांच्या बारामतीचा खासदार शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा होऊन गेल्यामुळे आपल्याला निवडणूक लढविणे सोपे राहणार याची जाणीव शरद पवार यांना झालेली होती.त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची युती ही कॉंग्रेस बरोबर झाल्यास आपल्याला आमदार होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.परंतु युतीची बोलणी करणे आणि युती घडवून आणणे यासाठी महाराष्ट्र राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे मोठे पद असणे गरजेचे होते.म्हणून सन १९६४ मध्ये  यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शरद पवार यांनी महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पद नसताना ते पद तयार करून घेऊन कॉंग्रेसचे पहिले युवक अध्यक्ष पद घेतले....त्या अगोदर कॉंग्रेसमध्ये युवक अध्यक्ष पद नव्हते.यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाल्यामुळे तशी कॉंग्रेसची कमांड ही यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होती......त्यामुळे युवक कॉंग्रेस स्थापन करणे सोपे झाले होते.....महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते...... त्यामुळे नाईक हे यशवंतराव चव्हाण यांच्या पुढे नव्हते.महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यामुळे आणि राज्यातील यशवंतराव चव्हाण यांच्या ताकदीचे बळ पाठीशी असल्यामुळे रिपब्लिकन पक्षा बरोबर युतीची बोलणी करणे शरद पवार यांना सोपे झालेले होते.त्यानंतर पुण्यातील सोमवार पेठ येथील गाडगे महाराज मठामध्ये रिपब्लिकन आणि कॉंग्रेस अशी युती झाल्याचे दादासाहेब गायकवाड यांनी जाहीर केले.त्यामुळे रिपब्लिकन-कॉंग्रेस युतीचे जनक दादासाहेब गायकवाड आणि शरद पवार आहेत.

सन १९६६ मध्ये इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री झाल्या....! आणि याच दरम्यान बांधकाम व्यवसाय उभा राहिला....!

    १९६१ च्या शेत जमीन कमाल धारणा कायदा देशात लागू झाला होता.....तो कायदा महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांनी अमल केला नाही.त्यातच सन १९६२ मध्ये भारत-चीन युध्द सुरु झाले आणि चव्हाण यांना देशाचे संरक्षणमंत्री केले गेले..त्यानंतर पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा सन १९६४ मध्ये मृत्यू झाला आणि गुलजारीलाल नंदा काळजीवाहू प्रधानमंत्री झाले होते....त्यांच्या नंतर सन १९६५ साली लालबहादूर शास्त्री प्रधानमंत्री झाले होते....आणि याच काळात म्हणजे सन १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युध्द झाले होते.....हे युध्द भारताने जिंकले होते...या युध्दात पाकिस्तानकडून भारताने ९७ टॅकर जिंकले होते. लालबहादूर शास्त्री यांचा रहस्यमय मृत्यू झालेनंतर पुन्हा गुलजारीलाल नंदा काळजीवाहू प्रधानमंत्री झाले.त्यांच्या नंतर २४ जानेवारी १९६६ मध्ये इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री झाल्या......याच दरम्यान वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ .कायदा लागू करण्यात करण्यात आला होता.याच दरम्यान मंजुरी विकास योजना नुसार, एमआरटीपी अॅक्ट, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९६६ तयार झाला होता......आणि बांधकाम व्यावसायिक उभा राहिला......आणि गावठाण लगतच्या जमिनी घेण्यास बांधकाम व्यवसायिक पुढे आला......यावेळी शरद पवार महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांचे वय वर्षे २६ होते.

 

शेकाफेच्या मतदारावर शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले आणि राज्यमंत्री सुध्दा झाले.....! वतन जमिनी झाल्या आकारी पड...उभा राहिला भूमिहीन सत्याग्रह...!

      पुण्यामध्ये एमकॉम पर्यंतचे शिक्षण शरद पवार यांचे पूर्ण झाले होते...आणि ते  महाराष्ट्र कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष सुध्दा झाले होते.....त्यातच कॉंग्रेस या पक्षाची रिपब्लिकन पक्षा बरोबर युती देखील झालेली होती. त्यामुळे बारामती मधील शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाच्या मतदारांची भिती आता शरद पवार यांना राहिलेली नव्हती. आणि वय वर्ष २५ पूर्ण होणार असल्यामुळे निवडूक नियमांची अडचण देखील राहणार नव्हती.त्यामुळे शरद पवार यांनी बारामती मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सन १९६४ पासून सुरु केली होती.त्यामुळे सन १९६७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडूकी पर्यंत बारामती मतदार संघाची बांधणी करण्यास कोणतीही अडचण आता राहिलेली नव्हती.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार हे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून बारामती मतदार संघातून विजयी झाले होते.यशवंतराव चव्हाण यांची राज्यातील ताकद पाठीशी असल्यामुळे त्यांना वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री केले गेले होते.आमच्या माहिती प्रमाणे त्यांचेकडे कृषी खात्याचे राज्यमंत्रीपद होते.शरद पवार हे वयाच्या २७ व्या वर्षात कृषी राज्यमंत्री झाले होते...आणि याच काळात वतन जमिनी आकारी पड कायदा १९६७ लागू करण्यात आला.त्यामुळे वतन जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर आकारी पड म्हणून नोंदी झाल्या होत्या...जमिनी आकारी पड झाल्याची माहिती शेतकऱ्यांना समजली नाही.त्यामुळे आकारी पड रक्कम शेतकऱ्याला भरता न आल्यामुळे त्या जमिनी सरकार नोंद झाल्या.त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे दादासाहेब गायकवाड यांनी भूमिहीनासाठी सत्याग्रह सुरु केला होता....याच काळात महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ लागू करण्यात आला.सहकारी गृहरचना संस्था अधिनियम १९७० मंजूर करण्यात येऊन....त्यानंतर कामगार संघटनेस मान्यता देण्यात आली आणि कामगार अनुचित प्रथा प्रतिबंध अधिनियम १९७१ लागू करण्यात आला.बांधकाम व्यावसायिकाला चालना देण्यात आली....शरद पवार हे सन १९७२ पर्यंत राज्यमंत्री म्हणून राहिले.



रिपब्लिकन पक्षाचे दादा साहेब गायकवाड यांना झाला पश्चाताप....आणि १९७१ मध्ये झाले निधन.....!

         दादासाहेब गायकवाड हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर सहकारी राहिले होते. दादासाहेब हे बाबासाहेबांचे अतिशय निकटवर्तीय असल्यामुळे ते म्हणेल ते सत्य मानले जायचे. दादासाहेबांनी डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची बांधणी अतिशय जवळून पाहिलेली होती.त्यामुळे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षात एस,एसटी,एनटी,व्हीजेएनटी,ओबीसी आणि अल्पसख्यंक हे प्रवर्ग जोडलेले दादासाहेब गायकवाड यांनी पाहिलेले होते....आणि सन १९४८ मध्ये बाबासाहेबानी प्रथम “ओबीसी” शब्दाचा प्रयोग केला होता....आणि भारताचे ओबीसी कोण...? हे त्याकाळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना समजले नव्हते...आणि २६ फेब्रुवारी १९४८ रोजी या संदर्भात पंडीत जवाहरलाल नेहरू यांना बाबासाहेबानी पत्र लिहिल्याचे देखील दादासाहेब गायकवाड त्यामुळे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा एस,एसटी,एनटी,व्हीजेएनटी,ओबीसी आणि अल्पसख्यंक हे प्रवर्गासाठीचा पक्ष होता हे देखील दादासाहेबांना माहित होते.सन १९६७ नंतरच्या शरद पवार यांच्या  घडामोडी दादासाहेब गायकवाड यांच्या लक्षात आलेल्या होत्या.त्यामुळे यावेळी त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शब्द आठविला होता...आणि तो म्हणजे “कॉंग्रेस हे जळत घर आहे” म्हणून आणि आपण एस,एसटी,एनटी,व्हीजेएनटी,ओबीसी आणि अल्पसख्यंक हे प्रवर्ग कॉंग्रेसच्या जळत्या घरात आणून सोडले  आहे....त्यामुळे दादासाहेब गायकवाड यांना पश्चाताप झालेला होता.परंतु वेळ निघून गेली होती...हाय त्या ताकदीवर दादासाहेब गायकवाड संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करीत होते.परंतु रिपब्लिकन पक्षाची गट तट उभी राहिल्यामुळे त्यांना यश मिळत नाही असे लक्षात आले होते.याचा पश्चातापात त्यांना झाल्यामुळे त्यांची तब्येत खालावित गेली होती.यातच  प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात ३ डिसेंबर १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध सुरु झाले होते.मुख्यमंत्री वसंतराव नाईक असताना राज्यमंत्री म्हणून शरद पवार असताना...रिपब्लिकन पक्षाचे दादासाहेब गायकवाड यांनी भूमिहीनासाठी सत्याग्रह सुरु केला होता...यातच दादासाहेब गायकवाड यांचा २९ डिसेंबर १९७१ मध्ये निधन झाले.... सहा महिन्यानंतर दलित पॅथर या संघटनेची ९ जुलै १९७२ रोजी स्थापना झाली होती.(क्रमशJ