Friday, January 8, 2021

साहेब मी कापूस उत्पादक शेतकरी मला वाचवा....मी उध्वस्त होतोय....माझ्या सुत गिरण्या कारखान्यावर भांडवलदार कंपनीचा कब्जा होतोय....!

  

         विषय असा आहे की मोदी सरकारचे तीन कृषी कायदे हे इथल्या शेतकरी वर्गाला   जेवढे घातक आहेत तेवढे इथली भारतीय संस्कृती उध्वस्त होण्यास कारणीभूत सुध्दा आहेत हे प्रत्येक भारतीयांनी विचारात घेतले पाहिजे.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो जर उध्वस्त झाला तर सामन्य माणूस उध्वस्त होणार आहे.इतिहास साक्षीला आहे की भांडवलशाही ही माणसाच्या जीवन प्रवासाला घातक अशी व्यवस्था आहे.त्यामुळे देशाच्या महापुरुषांनी कधीही अशा व्यावस्थेला स्थान दिलेले नाही.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळ वळीने सहकार क्षेत्राचा नेहमी पुरस्कार केलेला आहे.संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही खासगीकरणाला मान्यता न देता लोकशाही प्रणालीला प्रथम प्राधान्य दिलेले आहे.परंतु जर हीच लोकशाही या तीन कृषी कायद्यामुळे उध्वस्त होताना आपण मागच्या तीन भागात पाहिले आहे.केंद्रीय निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिताभ कांत यांनी स्वराज्य नियत कालिकेच्या कार्यक्रमात लोकशाहीला विरोध करून ब भांडवलशाहीचा पुरस्कार केला आहे.ही बाब सर्वानी इथे समजून घेतली पाहिजे.

        गेल्या तीन अंकात आपण मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यामुळे “गाव संस्कृती” उध्वस्त होताना पाहिलेली आहे.गावातील ऊस उत्पादक शेतकरी आणि त्याचा साखर कारखाना उध्वस्त होऊन भांडवलदार कंपनीचा कसा कब्जा होतोय हे समजून घेतले आहे.पशुपालक शेतकरी उध्वस्त होताना पाहिलेला आहे.त्याची सहकारी दुध संस्था उध्वस्त होऊन त्यावर भांडवलदार कंपनीचा कब्जा होताना पाहिला आहे.जनावरांचे दवाखाने बंद होताना पाहिले आहे.कृषी विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालये बंद होताना पाहिलेली आहे.साखर आयुक्त कार्यालय बंद होताना पहिले आहे.सहकार खाते बंद होताना पहिले आहे.सरकारी नोकरी संपताना पहिली आहे.सरकारी नोकरी संपल्यामुळे आरक्षण संपलेले पाहिले आहे.कृषी विद्यार्थी उध्वस्त होताना पाहिले आहे.आता या लेखात आपण कापूस उत्पादक शेतकरी कसा उध्वस्त होतोय ते समजून घेऊयात.

       भारत देशाचे कापूस हे मोठे उत्पादन मानले जाते.शेतकरी जो कापूस उत्पादन करतो त्या कापसातून ताग निर्मिती होते.सुतगिरण्या या उत्पादनातून उभ्या राहिलेल्या आहेत.त्यामुळे कापूस उत्पादनावर शेतकरी,शेतमजूर,सुतगिरणी कामगार,सुतगिरणी मालक उभा राहिलेला आहे.त्याचप्रमाणे कापसाच्या बाजारपेठा उभ्या राहिलेल्या आहेत.या बाजारपेठा उभ्या राहिल्यामुळे त्या बाजारात कामगार वर्ग उभा राहिलेला आहे.त्याचप्रमाणे कापसापासून गादी बनविणारे गादी कारखाने उभी राहिलेली आहेत.त्या गादी कारखान्यावर गादी बनविणारा कामगार उभा राहिलेला आहे.सुतगिरणी मधून जो धागा तयार होतो तो धाग्यावर यंत्रमाग व हातमाग उद्योग उभा राहिलेला आहे.आणि याच या उद्योगातून खादी ग्रामद्योग उभा रहिला आहे.त्याच प्रमाणे कॉटन कापडाचा उद्योग उभा राहिलेला आहे.या उद्योगामुळे विणकर आणि बुणकार समाज उभा राहिलेला आहे.

      मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक,पशुपालक शेतकरी आणि दुध उत्पादक शेतकरी आणि त्याचे सहकार कारखाने आणि सहकारी दुध संस्था ज्या प्रमाणे संपुष्टात आल्या आहेत.त्याच प्रमाणे मोदी सरकारच्या या तीन कृषी कायद्यामुळे कापूस उत्पादकावर भांडवलदार कंपनीचा कब्जा होणार आहे.हा कब्जा झाल्यास शेतकरी आणि शेतमजूर उध्वस्त होणार आहे.कापूस बाजारपेठ बंद होवून तिथला कामगार आणि छोटे मोटे दुकानदार उध्वस्त होणार आहे.सुतगिरण्यावर भांडवलदार कंपनीचा कब्जा झाल्यास यंत्रमाग व हातमाग व्यवसाय बंद होणार आहे.त्यामुळे उभा राहिलेला खादी ग्रामद्योग बंद होवून मोठा हाहाकार माजणार आहे.कापूस उद्योगावर उभा राहिलेला विणकर आणि बुणकर समाज उध्वस्त होणार आहे.कॉटन कापडाचा उद्योग समुहावर भांडवलदार कंपनीचा कब्जा होऊन तो उद्योजक देशोधडीला लागणार आहे.

     विषय असा आहे की आमच्या वतन बचाओ आंदोलन संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसर असे दिसून येते की,महाराष्ट्रातील पश्चिम भाग घ्या किंवा विदर्भ घ्या इथला सामान्य शेतकरी असोत वा इथला ऊस उत्पादक शेतकरी असोत वा इथला दुध उत्पादक शेतकरी असोत वा कापूस उत्पादक शेतकरी असोत तो घाबरलेल्या आवस्थेत आहे.इथल्या कृषी खात्यातील कर्मचारी/अधिकारी वर्ग असोत,पणन खात्यातील कर्मचारी/अधिकारी वर्ग असोत,पशुसंवर्धन खात्यातील कर्मचारी/अधिकारी वर्ग असोत अगर साखर आयुक्त कार्यालयातील कर्मचारी/अधिकारी वर्ग असोत किंवा सहकार खात्यातील कर्मचारी/अधिकारी वर्ग असोत हे देखील घाबरलेल्या अवस्थेत आहेत.कारण खाजगी करणात नोकऱ्या टिकणार नाहीत मुला बाळांचे भवितव्य अंधराकामय होणार आहे.शेती राहणार नसल्यामुळे कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय बंद होणार आहे.त्यामुळे इथला शिक्षक वर्ग,संशोधक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग संपुष्टात येणार आहे.कृषी विद्यार्थांचे भवितव्य शिल्लक राहणार नाही.लाखो नोकऱ्या संपुष्टात येणार आहे.त्यामुळे लोकशाही संपुष्टात येवून भांडवलशाही उभी राहणार आहे.म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर म्हणतात की सध्या लोकशाही वाचविण्यासाठीची क्रांती उभी राहिलेली आहे.या क्रांतीमध्ये आपण सर्व आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत उभे राहुयात.(क्रमशJ

No comments:

Post a Comment