शरद पवार कॉंग्रेसमध्ये आले..... बांधकाम व्यवसाय उभा राहिला....!
शेकाफेच्या मतदारावर शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले आणि राज्यमंत्री सुध्दा झाले.....!
रिपब्लिकन पक्षाचे दादासाहेब गायकवाड यांना झाला पश्चाताप....आणि १९७१ मध्ये झाला त्यांचा मृत्यू....!
सन १९५७ साली झालेल्यां लोकसभा निवडणुकीत शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचे आठ खासदार निवडूण आले होते.यामध्ये दादासाहेब गायकवाड सुध्दा शेकाफे कडून खासदार झाले होते.त्यामुळे या सर्वांचा कार्यकाळ शेकाफे म्हणून पुढील पंचवार्षिक निवडणूक होईपर्यंत होता.म्हणजेच १९५७ ते १९६२ पर्यंत होता..त्यामुळे सन १९६२ पर्यंत शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्ष अस्तित्वात असल्याचे दिसत आहे. परंतु महाराष्ट्र राज्याची १ मे १९६० साली नवनिर्मिती झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे राजकारण लक्षात घेता....शरद पवार यांनी सन १९६१ मध्ये वयाच्या एकवीस वर्षात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यामध्ये विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्यात शरद पवार यांनी चांगले भाषण करून यशवंतराव चव्हाण यांना प्रभावित केले होते.प्रभावित झालेल्या यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांना आपले शिष्य करून महाराष्ट्रातील स्वत:ची संपूर्ण ताकद शरद पवार यांच्या पाठीशी उभी केली होती.त्यामुळे पुढील घडामोडी करणे शरद पवार यांना शक्य झाले होते.सन १९६२ मध्ये रिपब्लिकन चळवळ उदयास आली होती....याच काळात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट निर्माण झाले होते.सन १९६७ ची विधानसभा निवडणूक लक्षात घेता शरद पवार यांच्या बारामतीचा खासदार शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा होऊन गेल्यामुळे आपल्याला निवडणूक लढविणे सोपे राहणार याची जाणीव शरद पवार यांना झालेली होती.त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची युती ही कॉंग्रेस बरोबर झाल्यास आपल्याला आमदार होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.परंतु युतीची बोलणी करणे आणि युती घडवून आणणे यासाठी महाराष्ट्र राज्यातील कॉंग्रेस पक्षाचे मोठे पद असणे गरजेचे होते.म्हणून सन १९६४ मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शरद पवार यांनी महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पद नसताना ते पद तयार करून घेऊन कॉंग्रेसचे पहिले युवक अध्यक्ष पद घेतले....त्या अगोदर कॉंग्रेसमध्ये युवक अध्यक्ष पद नव्हते.यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाल्यामुळे तशी कॉंग्रेसची कमांड ही यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होती......त्यामुळे युवक कॉंग्रेस स्थापन करणे सोपे झाले होते.....महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते...... त्यामुळे नाईक हे यशवंतराव चव्हाण यांच्या पुढे नव्हते.महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यामुळे आणि राज्यातील यशवंतराव चव्हाण यांच्या ताकदीचे बळ पाठीशी असल्यामुळे रिपब्लिकन पक्षा बरोबर युतीची बोलणी करणे शरद पवार यांना सोपे झालेले होते.त्यानंतर पुण्यातील सोमवार पेठ येथील गाडगे महाराज मठामध्ये रिपब्लिकन आणि कॉंग्रेस अशी युती झाल्याचे दादासाहेब गायकवाड यांनी जाहीर केले.त्यामुळे रिपब्लिकन-कॉंग्रेस युतीचे जनक दादासाहेब गायकवाड आणि शरद पवार आहेत.
सन १९६६ मध्ये इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री झाल्या....! आणि याच दरम्यान बांधकाम व्यवसाय उभा राहिला....!
१९६१ च्या शेत जमीन कमाल धारणा कायदा देशात लागू झाला होता.....तो कायदा महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांनी अमल केला नाही.त्यातच सन १९६२ मध्ये भारत-चीन युध्द सुरु झाले आणि चव्हाण यांना देशाचे संरक्षणमंत्री केले गेले..त्यानंतर पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा सन १९६४ मध्ये मृत्यू झाला आणि गुलजारीलाल नंदा काळजीवाहू प्रधानमंत्री झाले होते....त्यांच्या नंतर सन १९६५ साली लालबहादूर शास्त्री प्रधानमंत्री झाले होते....आणि याच काळात म्हणजे सन १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युध्द झाले होते.....हे युध्द भारताने जिंकले होते...या युध्दात पाकिस्तानकडून भारताने ९७ टॅकर जिंकले होते. लालबहादूर शास्त्री यांचा रहस्यमय मृत्यू झालेनंतर पुन्हा गुलजारीलाल नंदा काळजीवाहू प्रधानमंत्री झाले.त्यांच्या नंतर २४ जानेवारी १९६६ मध्ये इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री झाल्या......याच दरम्यान वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ .कायदा लागू करण्यात करण्यात आला होता.याच दरम्यान मंजुरी विकास योजना नुसार, एमआरटीपी अॅक्ट, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९६६ तयार झाला होता......आणि बांधकाम व्यावसायिक उभा राहिला......आणि गावठाण लगतच्या जमिनी घेण्यास बांधकाम व्यवसायिक पुढे आला......यावेळी शरद पवार महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांचे वय वर्षे २६ होते.
शेकाफेच्या मतदारावर शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले आणि राज्यमंत्री सुध्दा झाले.....! वतन जमिनी झाल्या आकारी पड...उभा राहिला भूमिहीन सत्याग्रह...!
पुण्यामध्ये एमकॉम पर्यंतचे शिक्षण शरद पवार यांचे पूर्ण झाले होते...आणि ते महाराष्ट्र कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष सुध्दा झाले होते.....त्यातच कॉंग्रेस या पक्षाची रिपब्लिकन पक्षा बरोबर युती देखील झालेली होती. त्यामुळे बारामती मधील शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाच्या मतदारांची भिती आता शरद पवार यांना राहिलेली नव्हती. आणि वय वर्ष २५ पूर्ण होणार असल्यामुळे निवडूक नियमांची अडचण देखील राहणार नव्हती.त्यामुळे शरद पवार यांनी बारामती मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सन १९६४ पासून सुरु केली होती.त्यामुळे सन १९६७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडूकी पर्यंत बारामती मतदार संघाची बांधणी करण्यास कोणतीही अडचण आता राहिलेली नव्हती.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार हे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून बारामती मतदार संघातून विजयी झाले होते.यशवंतराव चव्हाण यांची राज्यातील ताकद पाठीशी असल्यामुळे त्यांना वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री केले गेले होते.आमच्या माहिती प्रमाणे त्यांचेकडे कृषी खात्याचे राज्यमंत्रीपद होते.शरद पवार हे वयाच्या २७ व्या वर्षात कृषी राज्यमंत्री झाले होते...आणि याच काळात वतन जमिनी आकारी पड कायदा १९६७ लागू करण्यात आला.त्यामुळे वतन जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर आकारी पड म्हणून नोंदी झाल्या होत्या...जमिनी आकारी पड झाल्याची माहिती शेतकऱ्यांना समजली नाही.त्यामुळे आकारी पड रक्कम शेतकऱ्याला भरता न आल्यामुळे त्या जमिनी सरकार नोंद झाल्या.त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे दादासाहेब गायकवाड यांनी भूमिहीनासाठी सत्याग्रह सुरु केला होता....याच काळात महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ लागू करण्यात आला.सहकारी गृहरचना संस्था अधिनियम १९७० मंजूर करण्यात येऊन....त्यानंतर कामगार संघटनेस मान्यता देण्यात आली आणि कामगार अनुचित प्रथा प्रतिबंध अधिनियम १९७१ लागू करण्यात आला.बांधकाम व्यावसायिकाला चालना देण्यात आली....शरद पवार हे सन १९७२ पर्यंत राज्यमंत्री म्हणून राहिले.
रिपब्लिकन पक्षाचे दादा साहेब गायकवाड यांना झाला पश्चाताप....आणि १९७१ मध्ये झाले निधन.....!
दादासाहेब गायकवाड हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर सहकारी राहिले होते. दादासाहेब हे बाबासाहेबांचे अतिशय निकटवर्तीय असल्यामुळे ते म्हणेल ते सत्य मानले जायचे. दादासाहेबांनी डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची बांधणी अतिशय जवळून पाहिलेली होती.त्यामुळे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षात एस,एसटी,एनटी,व्हीजेएनटी,ओबीसी आणि अल्पसख्यंक हे प्रवर्ग जोडलेले दादासाहेब गायकवाड यांनी पाहिलेले होते....आणि सन १९४८ मध्ये बाबासाहेबानी प्रथम “ओबीसी” शब्दाचा प्रयोग केला होता....आणि भारताचे ओबीसी कोण...? हे त्याकाळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना समजले नव्हते...आणि २६ फेब्रुवारी १९४८ रोजी या संदर्भात पंडीत जवाहरलाल नेहरू यांना बाबासाहेबानी पत्र लिहिल्याचे देखील दादासाहेब गायकवाड त्यामुळे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा एस,एसटी,एनटी,व्हीजेएनटी,ओबीसी आणि अल्पसख्यंक हे प्रवर्गासाठीचा पक्ष होता हे देखील दादासाहेबांना माहित होते.सन १९६७ नंतरच्या शरद पवार यांच्या घडामोडी दादासाहेब गायकवाड यांच्या लक्षात आलेल्या होत्या.त्यामुळे यावेळी त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शब्द आठविला होता...आणि तो म्हणजे “कॉंग्रेस हे जळत घर आहे” म्हणून आणि आपण एस,एसटी,एनटी,व्हीजेएनटी,ओबीसी आणि अल्पसख्यंक हे प्रवर्ग कॉंग्रेसच्या जळत्या घरात आणून सोडले आहे....त्यामुळे दादासाहेब गायकवाड यांना पश्चाताप झालेला होता.परंतु वेळ निघून गेली होती...हाय त्या ताकदीवर दादासाहेब गायकवाड संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करीत होते.परंतु रिपब्लिकन पक्षाची गट तट उभी राहिल्यामुळे त्यांना यश मिळत नाही असे लक्षात आले होते.याचा पश्चातापात त्यांना झाल्यामुळे त्यांची तब्येत खालावित गेली होती.यातच प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात ३ डिसेंबर १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध सुरु झाले होते.मुख्यमंत्री वसंतराव नाईक असताना राज्यमंत्री म्हणून शरद पवार असताना...रिपब्लिकन पक्षाचे दादासाहेब गायकवाड यांनी भूमिहीनासाठी सत्याग्रह सुरु केला होता...यातच दादासाहेब गायकवाड यांचा २९ डिसेंबर १९७१ मध्ये निधन झाले.... सहा महिन्यानंतर दलित पॅथर या संघटनेची ९ जुलै १९७२ रोजी स्थापना झाली होती.(क्रमशJ
No comments:
Post a Comment