Monday, January 25, 2021

शरद पवार पहिल्यांदा खासदार.....आणि प्रकाश आंबेडकर यांचा भारतीय रिपब्लिकन पक्ष...! वतन बचाओ आंदोलन


 

      यशवंतराव चव्हाण हे कॉंग्रेस पक्षाला प्रामणिक होते...शरद पवार यांच्या १९७८ च्या बंडामुळे चव्हाण हे शरद पवार यांचेवर नाराज होते.महाराष्ट्र कॉंग्रेसचे यशवंतराव चव्हाण दिल्लीत नेतृत्व करीत होते.त्यामुळे शरद पवार यांना दिल्लीत जाता येत नव्हते......याच काळात प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची ३१ आक्टोंबर १९८४ मध्ये हत्या झाली होती....यावेळी देशाचे गृहमंत्री पी व्ही नरसिंहराव होते.इंदिरां गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली होती.एकंदरीत शरद पवार यांनी केलेला विश्वासघात यामुळे यशवंतराव चव्हाण यापूर्वीच खचले होते.त्यामुळे इंदिरा गांधी यांची झालेली हत्या त्यांना सहन झाली नाही...आणि  पंचवीस दिवसातच म्हणजे २५ नोव्हेंबर १९८४ मध्ये यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले.

      शरद पवार यांची पकड महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेली होती....आता दिल्लीच्या राजकारणात त्यांना त्यांची पकड मजबूत करायची होती.यशवंतराव चव्हाण यांच्या जाण्यामुळे शरद पवार यांना दिल्लीत जाण्याची संधी मिळाली होती.यातच इंदिरा गांधी यांचे हत्येमुळे देशातील जनता भाऊक झालेली होती.अशा वेळेस कॉंगेस विरोधी लढणे एवढे सोपे नाही असा समज लोकांचा झालेला होता.परंतु रिपब्लिकन पक्षाच्या मिळालेल्या मतामुळे आणि कॉम्रेड च्या मिळालेल्या ताकदीच्या सोबत उभे केलेला भांडवलदार यांच्यामुळे राजकीय त्रिसुत्रता शरद पवार यांच्यात निर्माण झालेली होती.त्यामुळे विरोधक कितीही बलाढ्य असला तरी त्याला चीतपट करण्याची क्षमता शरद पवार यांच्यात निर्माण झालेली होती.त्यामुळे सन १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचेवर इंदिरा गांधीच्या हत्येचा परिणाम झाला नाही.....आणि ते बारामती मतदार संघातून स्वत: निर्माण केलेल्या ताकदीवर खासदार म्हणून निवडून आले होते.भारतीय जनता पक्ष नवीन असल्यामुळे त्यांचे दोनच खासदार निवडून आले होते.एक खासदार अटलबिहारी वाजपेयी होते....तर दुसरे लालकृष्ण आडवाणी होते.

 

प्रकाश आंबेडकर यांचा भारतीय रिपब्लिकन पक्ष.....!  

       डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सन १९५६ मध्ये महापरिनिर्वाण झाले...आणि लगेच सन १९५७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या होत्या.या लोकसभा निवडणुकीत बाबासाहेबांचे वारसदार निवडणूकीपासून दूर ठेवण्यात आलेले होते.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाची उमेदवारी त्यांच्या वारसास देण्यात आलेली नव्हती.त्यामुळे चौतीस वर्षापासून दूर असलेले बाबासाहेबांचे वारसदार सन १९८० च्या दरम्यान म्हणजे नामांतर लढयापासून रिपब्लिकन पक्ष नेतृत्वात काम करीत होते.एकंदरीत शरद पवार यांचे राजकारण लक्षात आलेवर प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची सुरवात करून राजकीय डाव मांडणीला सुरुवात सन १९८४ मध्ये केली होती.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख म्हणून काम केले.

 

नामांतराचा लढा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे बेताल वक्तव्य.....!

        शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे १९७३ पासून चांगले संबध निर्माण झालेले होते.त्यामुळे शरद पवार यांच्या सांगण्यावरून बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला पाठींबा देखील दिलेला होता.आणि दोघांनी मिळून सन १९७७ मध्ये वाढदिवस देखील साजरा केला होता.सन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत मध्ये कॉंग्रेसला शिवसेनेचा पाठींबा देखील दिलेला होता.त्यामुळे सन १९७८ चा उभा राहिलेला नामांतर लढा आणि या नामांतर लढया संदर्भातील बाळासाहेब ठाकरे यांचे बेताल वक्तव्य या दोघांच्या घनिष्ट मैत्रीची  साक्ष देते.कारण जे वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते त्या बेताल वक्तव्याचा शरद पवार यांनी पुरोगामी म्हणून समाचर घेतला नाही.ते वक्तव्य आंबेडकरी अनुयायी यांचा स्वाभिमान दुखविणारे वक्तव्य होते....त्याकाळी ठाकरे असे म्हणाले होते की “घरात नाही पीठ कशाला हवय विद्यापीठ” त्यामुळे नामांतर लढा आणखीनच जोर धरू लागला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आंबेडकर अनुयायी दुखवू लागले होते.हिंदुत्वादी प्रखर भूमिका तयार होऊन ती बहुजन समाजात निर्माण करण्याचा हेतू ठाकरे यांचा होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेली समता विस्थापित करण्याची भूमिका होती.माता जिजाऊ आणि शिव विचारावर उभी राहिलेली शिवसेना आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे समतावादी विचार मोडीत काढायचे होते.पुढे तसेच झाले छत्रपती शिवराय आणि भगव्या ध्वजा विरुद्ध निळा असे समीकरण तयार झाले.परंतु त्याकाळी रिपब्लिकन पक्षाच्या गटतटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात उभे राहिले होते.अशा मध्ये समाजाने कोणाचे ऐकायचे असा प्रश्न निर्माण झालेला होता.याचाच फयदा मनुवादी व्यवस्थेतील लोकांनी घेतला होता.आणि दलित वस्तीवर हल्ला करून छत्रपती शिवाजी महाराज यांना आणि स्वराज्याच्या ध्वजाला हा दलित वर्ग विरोध करीत असल्याचा कांगावा करीत इतर बहुजन समजापासून दलित समाजाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न याकाळी मोठ्या प्रमाणात झालेला होता.याचाच फायदा इथल्या कॉम्रेडी विचारांच्या लोकांनी घेतल्याचे त्याकाळी दिसून येते.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दलित समाजावर मोठ मोठे हल्ले होऊ लागले होते.असे वातावरण निर्माण केले गेले की डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एकाच वर्गाचे नेते होते....आणि त्यांनी एकाच वर्गासाठी काम केले होते.त्यामुळे दलित समाजाच्या संरक्षणासाठीचा मुद्दा उपस्थित झाला.

अॅक्ट्रोसिटी अॅक्ट कायदा लागू....!

      संसदेत कायदे कसे पास होतात हे आपण तीन कृषी कायद्याच्या माध्यमातून समजून घेतलेले आहे.सन १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधीच्या हत्येचा कोणताही परिणाम न होता.कॉंग्रेस विरोधी उमेदवार म्हणून शरद पवार निवडून आलेले होते....आणि दिल्लीत आपला जोम बसवीत होते.असे असताना नामांतर लढ्याच्या माध्यमातून दलितांवर शिवसेना आणि कॉंग्रेसच्या लोकांच्या माध्यमातून घरे जाळून,दलित वस्त्या पेटवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराज विरोधी ठरवून भगव्या ध्वजाचा विरोधक ठरविण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे दिसून आले आहे.आणि हे सत्यच आहे हे भासविण्यासाठी एनटी,व्हीजेएनटी आणि ओबीसी हा समाज तोडण्याचा मनसुभा तयार झालेला होता.आणि तो मनसुभा एनटी,व्हीजेएनटी आणि ओबीसी या तीन प्रवर्गातील समाजाला सवर्ण ठरवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न म्हणून दलित अन्याय अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ म्हणजेच अॅक्ट्रोसिटी अॅक्ट कायदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्याचे भासविण्यात आले.

      वास्तविक पहाता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिक यांच्यासाठी नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ तयार करून त्यासाठी विशेष पोलीस पथक तयार केले होते.हा कायदा एका विशिष्ठ समाजासाठी नव्हता तर भारतातील जो कोणी दुर्बल घटकातील व्यक्ती आहे आणि ज्यावर कोणीही अन्याय अत्याचार करेन त्याच्या विरुध्द हा तयार केलेला कायदा होता.परंतु एससी आणि एसटी या प्रवर्गाला एनटी,व्हीजेएनटी आणि ओबीसी पासून दूर ठेवण्यासाठी नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ हा अपुरा पडत असल्याचा ठपका ठेवून अॅक्ट्रोसिटी अॅक्ट कायदा मंजूर करण्यात आलेला कायदा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.या कायद्यामुळे ज्या गावगाड्यातील लोकांना शुद्र ठरविले होते त्यांना न्याय देण्याची भूमिका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची होती...अशा लोकांना सवर्ण ठरविले गेले होते.त्यामुळे इथला इतर वर्ग वेगळा होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली गावगाड्यातील वंचित समूहाला न्याय देण्याच्या भूमिकेला कुठेतरी बाधा निर्माण झाल्याचे दिसत आहे.त्यामुळे या कायद्याचा जर आभ्यास केला तर निश्चितपणे लक्षात येईल की ही बहुजन समाजाला आपल्यापासून दूर ठेवण्याची कॉम्रेडी खेळी आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.(क्रमशJ

 

No comments:

Post a Comment