प्रश्न असा आहे की खरेच मोदी सरकारचे तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या लाभात आहेत काय....? असा जर प्रश्न आपण गहू,तांदूळ,डाळ आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्याला विचारला तर तो नक्कीच म्हणेन नाही.हाच प्रश्न आपण ऊस उत्पादक,पशुपालक दुध उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला विचारला तर तोही म्हणेन नाही.म्हणजेच काय तर देशातील भाजी उत्पादक शेतकरी सुध्दा म्हणेन की मोदी सरकारचे हे तीन कृषी कायदे आमच्या लाभात नाही.त्यामुळे तो देशात बंड करून उठलेला आहे.हे सर्व शेतकरी....आपण समजून घेतले आहेत.त्याला माहित आहे की आता त्याला वाचविणारे कोण नाही.परंतु त्याचा एक विश्वास आहे की डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब मला वाचवू शकतो.म्हणून तो कोकाळतोय आणि किंचाळतोय साहेब आम्हाला वाचवा..आंम्ही उध्वस्त होत आहे.या सर्वांचा परिणाम देशातील सामांन्य नागरिक यांचेवर होतोय काय...? तर नक्कीच होतोय जसा शेतकरी उध्वस्त होणार आहे.त्याप्रमाणे तो सामान्य नागरिक सुध्दा उध्वस्त होणार आहे.परंतु तो अज्ञानी आहे त्याला असे वाटते की हा फक्त शेतकऱ्याचा प्रश्न आहे म्हणून तो देशातील विरोधी पक्षाच्या विरोधात बोलत नाही.कारण त्याला असे वाटते देशातील विरोधी पक्ष त्याच्या बरोबर आहे.परंतु तो त्याच्या बरोबरही नाही आणि पाठीशी सुध्दा नाही हे सामान्य नागरिकांनी आता समजून घेतले पाहिजे असो.
या लेखात आपण फळ उत्पादक शेतकरी कसा उध्वस्त होणार आहे हे समजून घेऊयात.ज्याला फळांची आवड आहे त्यालाच हा फळबाग शेतकरी समजून येणार आहे.आणि ज्याला दवाखाना समजला आहे त्यालाच फळांची किंमत समजणार आहे.तसेच ज्या व्यक्तीला आरोग्याची जाण आहे त्यालाच फळांची ताकद समजणार आहे.यासाठी आपल्याला आंब्याच्या बागा समजून घ्याव्या लागतील.त्याच बरोबर द्राक्षांची मळे समजून घ्यावी लागतील.चिकूच्या बागा समजून घ्यावी लागतील.संत्री व मोसंबी यांच्या सुध्दां बागा समजून घ्यावी लागतील.केळीची मळे समजून घ्यावी लागतील.फणस,काजू,कोकम याचे उत्पादन समजून घ्यावी लागतील......एकंदरीत काय तर आपल्याला पणन खाते समजून घावे लागेल.जो पर्यंत आपल्याला हे पणन खाते समजणार नाही तो पर्यंत आपल्याला आपल्याल फळ उत्पादक शेतकरी समजणार नाही.परंतु मोदी सरकारचे हे तीन कृषी कायदे फक्त महाराष्ट्रात परिणामकारक आहेत काय....? तर तसे नाही हा कायदा देशातील प्रत्येक राज्यातील शेतकरी याच्यावर परिणाम करणारा कायदा आहे.
देशाच्या इतर राज्यात सफरचंद,बदाम,केशर,अक्रोड,चेरी तसेच चहा उत्पादनाची सुध्दा मळे आहेत.त्यामुळे अशा उत्पादनावर देशातील खूप मोठा वर्ग उभा राहिलेला आहे.त्या वर्गावर या मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्याचा हल्ला झालेला आहे.त्यामुळे ह्या उत्पादनासाठी उभी राहिलेली रसायन केंद्रे उध्वस्त होणार आहे.बागा म्हटल्या की माळी समाज समोर उभा राहतो......तो माळी भांडवलदार यांच्या मळ्यातील गुलाम बनताना दिसत आहे.त्यामुळे मोठमोठ्या भांडवलदार व्यावसायिकाने मोठ मोठी “शीत गोदामे” देशात उभारलेली आहे.त्यामुळे आता या फळबागावर भांडवलशाहीचा कब्जा होताना दिसत आहे.
मोदी सरकारच्या या तीन कृषी कायद्यामुळे देशातील आणि राज्यातील कृषी खाते बंद होणार आहे,त्यामुळे मागासवर्गीय शेतकऱ्यासाठीच्या योजना बंद होणार आहे.रसायन खत प्रयोगशाळा बंद होणार आहे.त्यामुळे या कृषी खात्यातील अधिकारी व कर्मचारी वर्ग बेरोजगार होणार आहे आणि नोकऱ्या मधील आरक्षण संपुष्टात येणार आहे.पणन मंत्रालय बंद होणार आहे,त्यामुळे या खात्याच्या उभ्या राहिलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होणार आहे.त्यामुळे इथला छोठा मोठा व्यापारी उध्वस्त होणार असल्यामुळे इथला माथाडी कामगार उध्वस्त होणार आहे.पणन खात्यातील अधिकारी कर्मचारी वर्ग बेरोजगार होणार आहे.त्यामुळे या खात्यातील नोकऱ्यांचे आरक्षण संपणार आहे.सहकार मत्रालय बंद होणार असल्यामुळे सहकार तत्वावर चालणारे साखर कारखाने,दुध संस्था वगैरे बंद होणार आहे,त्यामुळे या ख्त्यातील कामगार व अधिकारी वर्ग बेरोजगार होणार आहे.त्यामुळे या खात्यातील आरक्षण संपणार आहे.पशु व दुग्ध विकास मंत्रालय बंद होणार असल्यामुळे पशुपालन व्यवसाय बंद होणार आहे,त्यामुळे जनावरांचे बाजार येथून पुढे दिसणार नाही,गावात दुध विकता येणार नाही.त्यामुळे या खात्यातील कर्मचारी अधिकारी वर्ग बेरोजगार होणार आहे.या खात्यातील आरक्षण संपणार आहे.कृषी महाविद्यालय आणि विद्यापीठ देखील बंद होणार आहे.शेतकऱ्याच्या पोरांना आता कृषी शिक्षण सुध्दा घेता येणार नाही.
त्यामुळे आमच्या वतन बचाओ आंदोलन संघटनेच्या माध्यमातून या तीन कृषी कायद्या संदर्भात या लेखांच्या माध्यमातून जनप्रबोधन सुरु आहे.आम्हाला असे वाटते की वाचकांनी गंभीर होऊन याचा विचार केला पाहिजे.कारण काळ वैऱ्याची आहे आपण सर्वानी जागरूक राहिले पाहिजे.आदरणीय प्रकाश आंबेडकर आज शेतकऱ्यांच्या आंदोलना सोबत उभे राहिलेले आहेत.त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रामणिक असा जाहीर पाठींबा दिलेला आहे.त्यामुळे त्यांच्या सोबत आपण उभे राहिले पाहिजे.(क्रमशJ
No comments:
Post a Comment