Friday, January 8, 2021

भाग -: ६ आमच्या शिखर बँकेवर भांडवलशाहीचा कब्जा होतोय....! आमची “नाबार्ड” देखील बंद होतेय....! आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आम्हाला वाचवा....!


 

     महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून “बहुजन हिताय...बहुजन सुखाय” हा उद्देश घेऊन सहकार चळवळ स्थापन झाली.या सहकार क्षेत्राला गावो गावो पोहोचविण्याची मोठी चळवळ आपल्याला स्वराज्यात उभी राहिलेली दिसते.या चळवळीमुळे देशात आपले राज्य मोठ्या प्रमाणात विकसित झालेले दिसते.ब्रिटीश सरकारने ह्या सहकार चळवळीला मजबूत करण्यासाठी सन १९०४ मध्ये पहिल्या सहकारी पतसंस्थेला कायदेशीर मान्यता देऊन तसा कायदाच तयार करण्यात आला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या सहकार क्षेत्राला संविधानिक मान्यता देऊन गावखेड्या पर्यंत सहकार चळवळ मजबूत केलेली आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्यात सहकार चळवळीचा विकास त्रिस्तरीय रचनेमध्ये झालेला आहे.ज्याच्या अग्रभागी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक होय.शिखर बँकेच्या मध्यम स्तरावर जिल्हा बँक उभारलेल्या आहेत त्याची महाराष्ट्र राज्यात साधारणतः एकतीस (३१) संख्या आहे.आणि त्याच्या तळाशी प्राथमिक कृषी पतसंस्था उभारलेल्या आहेत.त्याची महाराष्ट्र राज्यात साधारणतः एकवीस हजार पंचाऐंशी (२१०८५) इतकी संख्या आहे.त्यामुळे देशात शिखर बँक सर्वात मोठी बँक म्हणून पुढे आलेली आहे.

              महाराष्ट्र राज्यात सध्या ३६ जिल्हे आहेत आणि या ३६ जिल्ह्यामध्ये साधारणत: पन्नास हजारच्या आसपास गावे असून या गावातील पत्येक शेतकरी कोणत्या ना कोणत्या पतसंस्थेचा सभासद आहे.आणि कोणत्या ना कोणत्या जिल्हा बँकेचा तो भागीदार सदस्य आहे.मोदी सरकारच्या या तीन कृषी कायद्यामुळे आता तो पतसंस्थेचे सभासद राहणार नाही आणि जिल्हा बँकेचा तो भागीदार सदस्य देखील राहणार नाही.जर शेतकरी सभासद राहिला नाही तर राज्यातील एकवीस हजार पंचाऐंशी पतसंस्था लवकरच बंद होतील अशी परिस्थिती आहे.त्याच प्रमाणे सहकार संस्था आणि सहकारी साखार कारखाने तसेच सहकारी दुध संस्था उध्वस्त होणार असल्यामुळे जिल्हा बँका सुध्दा उध्वस्त होणार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे होणे शक्य आहे काय...? तर आम्ही म्हणेन  नक्कीच हे शक्य होणार आहे.कारण ज्यावेळेस भांडवलशाही उभी राहते त्यावेळेस “एक मेक साह्य करू....अवघे धरू सुपंथ” या म्हणीला बाधा निर्माण होते....आणि एक मेका साह्य करून उभ्या राहणाऱ्या सहकारी संस्था मोडकळीस निघत आहेत.त्यामुळे मोदी सरकार हे लोकांचे हित जपणारे सरकार नाही हे आता आपण सर्वानी समजून घेतले आहे.त्यामुळे इथल्या ३१ जिल्हा बँकेचा कर्मचारी वर्ग बेरोजगार होणार आहे.एकवीस हजार पंचाऐंशी पतसंस्थे मधील कर्मचारी वर्ग बेरोजगार होणार आहे.त्यामुळे जगात नावाजलेली महराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक बंद होणार आहे.त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रतिक्रांती करून जी सत्यशोधक समाज व्यवस्था उभी केलेली होती ती आता उध्वस्त होताना दिसत आहे.आणि याच सत्यशोधक चळवळीने उभी केलेली सहकार चळवळ सुध्दा बंद होताना दिसत आहे.

        त्याप्रमाणे शेतकरी वर्गाचा आणि गावचा विकास करण्यासाठी “नाबार्ड” म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची १२ जुलै १९८२ साली स्थापना करण्यात  आली.”नाबार्ड” च्या माध्यमातून शेतकरी वर्गाच्या लघुउद्योगासाठी आणि ग्रामीण उद्योगासाठी कर्ज देण्याची सोय उ[लब्ध करून देण्यात आली.तसेच ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी तसेच गावचा विकास होण्यासाठी रस्ते तयार करण्यासाठी “नाबार्ड” च्या माध्यमातून मोठ मोठे निधी उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली.त्यामुळे देशातील शेतकरी वर्गाचा आणि ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो.परंतु मोदी सरकारच्या या तीन कृषी कायद्यामुळे इथला शेतकरी संपुष्टात येऊन भांडवलदार कंपन्या उभ्या राहणार आहेत.........त्यामुळे “नाबार्ड” देखील बंद होणार आहे.

         एकंदरीत काय तर छत्रपती शिवाजी महारांजानी ज्या कुणब्याला संरक्षण दिले त्याच्या शेतीला संरक्षण दिले आणि त्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुध्दा संरक्षण दिले.अशी कृषी व्यावस्था आता या तीन कृषी कायद्यामुळे उध्वस्त होताना दिसत आहे.त्यामुळे आता उध्वस्त होणारा शेतकरी असोत की बँकेचा उध्स्व्त होणारा कर्मचारी असोत तो म्हणतोय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आम्हाला वाचवा....आम्ही उध्वस्त होत आहे....आमची शिखर बँक उध्वस्त होत आहे....आमची नाबार्ड सुध्दा बंद होत आहे.

         आमच्या वतन बचाओ आंदोलन संघटनेने मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी,शेतमजूर,बलुतेदार व अलुतेदार,तसेच कृषी विद्यापीठ,कृषी महाविद्यालय, कृषी विद्यार्थी,साखर आयुक्तालय,पणन मंत्रालय.पशुपालन व दुग्ध विकास मंत्रालय,सहकार आयुक्त,कृषी उत्पन्न बाजार समिती,त्यातील माथाडी कामगार,त्यातील कर्मचारी अधिकारी वर्ग कसा उध्वस्त होत आहे आपल्या समोर ठेवले आहे.या परिस्थितीला देशाचे माजी कृषी मंत्री यासेच राज्याचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब जाबाबदार आहेत काय...? या संदर्भात समजून घेणार आहोत.(क्रमशJ

 

No comments:

Post a Comment