Sunday, September 12, 2021

स्वराज्यातील पाचवा बलुतेदार कुंभार होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


 

         आर्य ब भारतात आले तेव्हा या देशात सिंधू संस्कृती नांदत होती.या सिंधू संस्कृतीवर ताबा मिळविण्यासाठी आर्यांनी सनातन धर्म व्यवस्था उभी केली आणि श्रेष्ठ व कनिष्ट असा भेदभाव निर्माण केला.सिंधू संस्कृती मधील विद्वान लोकांना संपविण्याचा प्रयत्न केला त्यांचे मानवतावादी विचार बुडविण्यासाठीचे काम त्यांचा संघटीतपणा उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या सनातनी धर्म व्यवस्थे विरुध्द गौतमी पुत्र सिध्दार्थ याने भगवे वस्त्र स्वीकारून समतेचा भगवा बौध्द विचाराच्या माध्यमातून याठिकणी रुजविलेला आहे.सिंधू संस्कृती मधील विद्वान यांना शरण जाऊन “बुद्धम शरणं गच्छामी” असे म्हटले आहे.याच सिंधू संस्कृती मधील विद्वानांचे विचाराला शरण जाऊन “धम्म शरणं गच्छामी” म्हटले आह आणि सिंधू संस्कृती मधील संघटीतपणाला म्हणजे तेथील संघाला शरण जाऊन सिंधू संस्कृती मधील मानवतावाद जगाला दिलेला आहे.गौतम बुध्दानंतर जग जिकून सम्राट झालेल्या सम्राट अशीकाने हा बौध्द धम्म स्वीकारून समतेच्या भगव्या निशाणाखाली संपूर्ण भारत बौद्धमय केला होता.बुद्धंचे विचार अनंत काळापासून टिकून राहावेत यासाठी सम्राट अशोक पुत्रांनी संपूर्ण भारतात बुध्द लेण्या,बौध्द स्तूप,बौध्द विहार निर्माण केली आहेत.त्यातील पंढरपूर येथे उभे असलेले विठ्ठल मंदिर हे बौध्द विहार आहे आणि विठ्ठल हे बौध्द आहेत.नंतरच्या काळात वर्णाश्रम धर्माने डोके वर काढले होते.या धर्म व्यवस्थेच्या विरोधात संत नामदेव महराज यांनी गावगाड्यातील बलुतेदार व अलुतेदार यांना बरोबर घेऊन समतेचे भगवे निशाण स्वीकारून पंढरपूर येथील गौतम बुध्दाला केंद्रस्थानी ठेऊन वारकरी पंथ स्थापन केला.त्या बलुतेदार पैकी एक बलुतेदार म्हणजे “कुभार” होय.गावगाड्यातील पाचवा बलुतेदार म्हणजे “कुंभार” होय.आणि त्यातील एक संत “गोरा कुंभार” होय याने समतेचे भगवे निशाण खांद्यावर घेऊन मानवतावादी विचार गावगाड्यात पोहचविण्याचे कार्य केले.

      त्यामुळे आज आपण गावगाड्यातील पाचवा बलुतेदार म्हणजे “कुभार” याचे योगदान समजून घेणार आहोत.जंगलातील एकत्र आल्याने लोकांनी पांढरीवर वस्ती बसविली आणि काळीमध्ये “बी” पेरून गाव बसविले आणि ते गावगाडा चालविण्यासाठी तेथील कामे एक एकाने आपल्या हातात घेऊन गावगाडा उभा केला.आपण पहिला बुतेदार “महार” समजून घेतला.आपण दुसरा बलुतेदार “सुतार” समजून घेतला.आपण तिसरा बलुतेदार “लोहार” समजून घेतला.आपण चौथा बलुतेदार “चांभार” समजून घेतला आणि आता आपण पाचवा बलुतेदार “कुंभार” समजून घेत आहोत.गावगाड्यातील लोकांना लागणारी मातीची भांडी बनवून गावगाड्यातील लोकांचा संसार उभा केला.जसे घरासाठी लागणारी कौले बनविण्याचे काम त्याने केले.संसारासाठी लागणाऱ्या चुली निर्माण केल्या.पणत्या बनवून गावात रोशनाई निर्माण केली.परंतु शंभर लोकांचे असणारे कुटुंब एका व्यवसायावर चालणार म्हणून कुंभार समाजातील काही लोक काळी मध्ये “बी” पेरून तो पुढे “कुणबी” झालेला आहे.अशा प्रकारे “कुणबी” उभा राहिलेला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्यात या “कुंभार” समाजाने शस्त्रे हातात घेतून स्वराज्य स्थापनेत मोठे योगदान दिलेले आहे.त्यामुळे पुढे त्याची ओळख छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून झालेली आहे....आणि या मावळ्यांची ओळख नंतर “मराठा” म्हणून झालेली आहे.

       नंतरच्या काळात गावगाड्यात हा “कुंभार” समाज ओल्या मातीपासून सूरई,माठ,खुजे,

रांजण,कुंड्या,घट,गाडगी,मडकी,झाकण्या,विटा,कुंड्या इत्यादी वस्तू तयार करून त्या भाजून बनविणारा कारागीर झालेला आहे.आज हां “कुंभार” समाज इतर मागासवर्गीय जातीतील म्हणजे ओबीसी प्रवर्गातील अनुक्रमांक ८२ वर असून तो ओबीसी मध्ये आरक्षित आहे.आज गावगाड्यातून तो विस्थापित झालेला आहे......त्याची लोकसंख्या आज तुरळक असल्यामुळे राजकीय पटलावर त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही.

स्वराज्यातील चौथा बलुतेदार चांभार होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज

 

आपण आतापर्यंत तीन भाग वाचले असतील आणि बारा बलुतेदार पैकी तीन बुलुतेदार समजून घेतले असतील.या तीन बलुतेदार यांची गावगाड्यातील कामे आणि स्वराज्यातील योगदान आपण समजून घेतले.आता आपण चौथा बलुतेदार म्हणजे “चांभार” समजून घेणार आहोत.ज्या वेळेस जंगलातील लोकांनी काळी आणि पांढरीवर गाव उभे केले तेव्हा हे लोक एकाच गणातील लोक होते.म्हणजे एकाच कुटुंबातील लोक होते हे लक्षात येते.परंतु एकाच कुटुंबातील लोकांनी एकत्र येऊन जेव्हा गावगाडा उभा केला तेव्हा गावातील कामे त्या कुटुंबातील भावांनी वाटून घेतली होती.त्या कामामुळे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार उभी राहिली आणि या अलुतेदार आणि बलुतेदार पैकी ज्या व्यक्तीने काळीमध्ये “बी” पेरले तो “कुणबी” म्हणून उभा राहिला आहे.त्यामुळे “कुणबी” दुसरा तिसरा कोणी नसून याच बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदारापैकी आहे हे आपण समजून घेतले आहे.ज्या वेळेस गावगाडा उभा राहिला त्यावेळेस गावातील “कुणबी” समाजाकडे गाय बैल ही जनावरे होती ते जेव्हा मृत व्हायची तेव्हा त्या मृत जनावरांचे “चामंड” कडे गावातील लोकांचे लक्ष गेले....आणि त्या चामड्याचा उपयोग काय करायचा असा प्रश्न जेव्हा पुढे आला तेव्हा त्यातून चामड्याचे चपला ,पादत्राणे बनविण्यासाठीचे काम करणारा आणि शेतकऱ्याला बैल हाकण्यासाठी लागणारा चाबूक बनविणारा म्हणून “चांभार” पुढे आला.परंतु त्याचे असणारे कुटुंबातील शंभर लोकांचे पोट या एकाच व्यवसायावर चालणार नाही म्हणून त्यातील काही लोक पुढे आले आणि त्यांनी काळीमध्ये “बी” पेरले पुढे हेच चांभार “कुणबी” झाले आहेत.त्यामुळे गावगाडा उभारणीत महत्वाचे योगदान या चांभार समाजाचे आहे.

          एकणदरीत काय तर एका कुटुंबातून उभा राहिलेला एकतीस कुटुंबाचा गावगाडा होय म्हणजे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार तसेच कुणबी असे मिळून एकतीस लोकांनी उभा केलेला गावगाडा होय.तुम्ही कोणत्याही कुणब्याचे मूळ शोधायला जाल तर ते तुम्हाला या बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्यामध्येच सापडेल....ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी या गावगाड्यातील लोकांना आपले समजून स्वराज्य स्थापनेत सामावून घेतले त्यावेळेस ह्या “चांभार” समजाने सुध्दा शस्त्रे हातात घेऊन स्वराज्य स्थापनेत सहभागी झालास्वराज्यातील सैनिकासाठी लागणारे चिलखत या चांभार समाजाने बनविले होते.घोड्याची चामडी लगाम तसेच घोड्यावरील खोगीर या चांभार समाजाने बनविले होते.त्याच प्रमाणे चामड्याचे पखाल बनवून ते सैनिका पर्यंत पिण्याचे पाणी पोहचविण्याचे काम करायचे. म्हणजेच तो स्वराज्याचा मावळा झाला होता.ज्या ज्या बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार तसेच कुणबी समाजाने शस्त्रे हातात धरली तो तो स्वराज्याचा मावळा झाला आणि त्याने मराठेशाही उभी केली आहे.त्या स्वराज्याच्या मावळ्यालाच आज “मराठा” म्हटले जाते.आज मराठा म्हणून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या असलेला समाज म्हणून पुढे आलेला आहे....आज तो मराठा समाज म्हणून आरक्षण मागणीत पुढे आलेला आहे.त्या समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे परंतु इथल्या राजकीय लोकांना त्यांना आरक्षण द्यायचे नसून त्यांच्या आरक्षणाचे राजकारण करायचे आहे.त्यामुळे गावगाड्यात सिंधू संस्कृती नांदत होती कोणताही हिंदू नावाचा धर्म असल्याची कुठेही नोंद दिसून येत नाही.परंतु सिधू संस्कृतीमधुन उभा राहिलेला बौध्द धम्म त्याचे विचार आणि आचार गावगाड्यात दिसून येतात.म्हणूनच या मानवतावादी गावगाड्यातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केलेले स्वराज्य आजही टिकून उभे असल्यामुळे महात्मा ज्योतीबा फुले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार इथे रुजविता आले.....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.

    गावगाडा उभा केलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे बरोबर स्वराज्य स्थापनेत असलेला बलुतेदार क्रमांक १ “महार” जसा आज अस्पृश्य झाला त्याच प्रमाणे “चांभार” सुध्दा  अस्पृश्य झालेला आहे.गावगाड्यातील बलुतेदार क्रमांक १ वर असणारा “महार” हा अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील अनुक्रमांक ३७ वर नोंद झाला आहे तर बलुतेदार क्रमांक ४ वर असणारा “चांभार” हा अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील अनुक्रमांक ११ वर नोंद झालेला असून या प्रवर्गात एकोणसाठ जाती नोंद असून त्यांचे आरक्षण हे १३ टक्के आहे.

स्वराज्यातील तिसरा बलुतेदार लोहार होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


       पहिल्या व दुसऱ्या भागात आपण गावगाडा कसा उभा राहिला हे समजून घेऊन त्यातील पहिला बलुतेदार महार आणि दुसरा बलुतेदार सुतार समजून घेऊन त्याचे गावगाड्यातील आणि स्वराज्यातील योगदान समजून घेतले आहे.आता तिसरा बलुतेदार म्हणजे “लोहार” आपण समजून घेणार आहोत.सिंधू संस्कृतीमधून उभ्या राहिलेल्या गावगाड्यात ग्रामदेवत दिसतात.....आणि या गावगाड्यात पूर्वीपासून सनातन धर्म व्यवस्थेच्या विरोधात बौध्द धम्म दिसतो.म्हणजेच काय तर गावगाडा हा बौध्द धम्म विचारावर चालणारा गावगाडा होता हे कोणीही नाकरू शकत नाही.गावगाड्यात लोखंडाच्या लागणाऱ्या वस्तू बनविण्यासाठीचे काम जंगलतील काही लोकांनी हातात घेतले.त्यामुळे लोखंडापासून वस्तू बनविणाऱ्याना पुढे लोहार म्हटले जाऊ लागले आणि तो एक समाज त्या गावगाड्यात निर्माण झाला.त्याने गावगाड्यातील शेतीसाठी लागणारे अवजारे निर्माण केली.लोहार हा तप्त लोखंडाला ऐरणीवर ठोकून ठोकून लोहार वस्तूस आकार देतात.शेतीसाठी लागणारे जसे नांगराचा फाळ,विळा.खुरपी,कुदळ,टिकाव,पहारी,घमेली,पाण्याच्या मोटी,प्राण्यांच्या खुराना ठोकायच्या नाळ,बैलगाड्यांच्या चाकांना लागणारे लोखंडी धाव इत्यादी वस्तू बनविण्याचे काम त्यांनी केले आहे.गावगाड्यातील घरे,इमले,वाडे उभारण्यासाठी लागणाऱ्या वस्तू त्यांनी बनविल्या आहेत.जसे दरवाजांना लागणारे कोयंडे,खिडकीचे गज,सळ्या वगैरे बनविण्याचे काम त्यानी केले आहे.गावगाड्याच्या संरक्षण करण्याची जबाबदारी ही महार समाजाकडे होती म्हणजे सैन्याचे फळी त्यांच्याकडे होती.त्यामुळे सैन्यांना लागणारी शस्त्रे बनविण्याचे देखील काम लोहाराकडे होते.जसे ढाल,तलवारी,भाले,बिचवे इत्यादी वस्तू बनविण्याचे काम त्यानी केले आहे.एकंदरीत काय तर गावगाडा उभारणीत महत्वाचे स्थान हे लोहाराचे होते हे आपण समजून घेतले पाहिजे.लोहार नसता तर गावगाड्यातील घरे,इमले,वाडे उभी राहिली नसती आणि शेतीतील अवजारे उभी राहिली नसती.तसेच गावगाड्याच्या संरक्षणासाठी उभ्या राहिलेल्या सेनेकडे शस्त्रसाठा निर्माण झाला नसता.

       गावगाड्या मधून शशस्त्र सेना उभी राहिली होती.ज्या गावगाड्यात बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार एकसंघ उभी राहिल्यामुळे तिथली प्रशासन व्यवस्था मजबूत उभी राहिली होती.मग ज्या गावगाड्याचा कारभार चांगला असायचा तो गावगाडा इतर गावावर आपली प्रशासन व्यवस्था राबविण्यासाठी पुढे यायचा यातूनच पुढे सरंजामशाही उभ्या राहिल्या.....आणि या सरंजामशाहीवर आपला ताबा निर्माण करण्यासाठीचे कार्य आर्य सनातन धर्म व्यवस्था राबविणारे पुढे आले.आणि या लोकांनी गावची व्यवस्था आपल्या हातामध्ये हळू हळू घेण्यास सुरुवात केली.आणि गावगाड्यातील लोकावर अन्याय करण्याचे कार्य सुरु झाले.या सरंजामशाही गावातून कर वसुल्या करायला लागल्या या सरंजामशाही यांच्या माध्यमातून आठव्या शतकात कोकणात आलेल्या आर्यांनी त्यांच्या पाठीमागून आलेले रजपूत यांच्या माध्यमातून उभ्या असलेल्या महाराष्ट्रावर वर्णाश्रम धर्म लादण्याचा प्रयत्न सुरु केला.गावातील “समता” विस्थापित करण्यासाठीचा प्रयत्न त्यांनी सुरु केला.गावगाड्यातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार तसेच कुणबी यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे शुद्र म्हणून लेखू लागले.आणि या शूद्रामध्ये उच्च नीच्च म्हणून विभागणी करू लागले.ह्या विभागणीमुळे एकसंघ असलेला गावगाडा विभागू लागला.या गावगाड्यात समता विस्थापित होऊ नये यासाठी बाराशेमध्ये संत नामदेव यांनी पंढरपुरातील गौतम बुद्धांना केंद्रस्थानी ठेऊन भगव्या पताक्याखाली वारकारी पंथ स्थापन करून तो गावागावात पोहचविला.याच वारकारी पंथातील संत तुकाराम महाराज यांना गुरु मानून या समतेच्या ध्वजाखाली गावगाड्यातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे केले.या स्वराज्याला लागणारा शस्त्रसाठा हा लोहाराने निर्माण केला ढाल,तलवारी,भाले,तोफा बनविण्याचे काम इथल्या लोहाराने केले.आणि शिवरायांनी उभ्या केलेल्या सैन्यामध्ये तो सामील होऊन तो स्वराज्याचा मावळा झाला.

         परंतु गावगाडा उभा केलेला लोहार आणि स्वराज्य स्थापनेत योगदान दिलेला लोहार आज विस्थापित झालेला आहे.गावगाड्यापासून असणाऱ्या लोहाराची लोकसंख्या आज दिसत नाही.लोहारमध्ये अनेक जाती निर्माण करून गावगाड्यातील त्याचे अस्तित्व संपुष्टात आलेले आहे.आज तो भटक्या जमाती मधील एनटी बी प्रवर्गातील अनुक्रमांक ८ मध्ये येतो.आज तो सामाजिक आणि राजकीय मागासलेल्यामध्ये आहे.त्याचे गावगाड्यात अस्तित्व दिसत नाही.

स्वराज्यातील दुसरा बलुतेदार सुतार होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


 

पहिल्या भागात आपण गावगाडा कसा उभा राहिला आणि हा गावगाडा उभारण्यासाठी बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांचे महत्व काय होते हे आपण समजून घेतले आहे.हा मानवतावादी गावगाडा उभा राहण्यास सिंधू संस्कृतीचे मोठे योगदान आहे.कारण सिंधू संस्कृतीने कृषी संस्कृती उभारली आहे म्हणजेच शेतीचा शोध लावला आहे.शेतात लागणारे नवनवीन अवजारे उभी केली आहेत.मग लाकडापासून वाकड्या काठीचा नांगर वा ब्रशासारखे ओढायचे अवजार,वखर,डवरा,तिफन.गोफण,औत किंवा अऊत अशा प्रकरची अवजारे विकसित केली.आणि कृषी संस्कृती स्त्रियांनी उभी करून इथल्या मानवजातीला अन्न देण्याची व्यवस्था केली आहे.त्यामुळे या स्त्रीला “नेॠृती” असे म्हणत असे....म्हणूनच “स्त्रीचा” विद्वानवादी महापुरुष नेहमी सन्मान करतात.या सिंधू संस्कृतीने विद्वानांची संस्कृती म्हटले जाते.मानवतावादी विचार या सिंधू संस्कृतीने संघटीतपणाला महत्व देऊन गणराज्य पद्धत अस्तित्वात आणून येथे संघ कायम केलेला आहे.आणि हा संघ उध्वस्त करण्याचे काम सिंधू संस्कृतीवर आक्रमण करणारे आर्यांनी करून ॠषी संस्कृती उभी करून सनातन धर्म व्यवस्था निर्माण केली आहे.परंतु गौतमी पुत्र सिद्धार्थ याने म्हणजे गौतम बुध्दानी ही संस्कृती पुन्हा जागरूक करून या संस्कृती मधील विद्वानांना शरण जाऊन “बुद्धं शरणं गच्छामि” ला महत्व दिले आहे.या सिंधू संस्कृतीच्या मानवतावादी विचारांना शरण जाऊन “धम्मं शरणं गच्छामि” ला महत्व दिले आहे.सिंधू संस्कृतीच्या स्त्री शक्तीच्या एकत्री येणाऱ्या संघटीत होऊन काम करण्याच्या पद्धतीला शरण जाऊन “संघम शरणं गच्छामि” ला महत्व दिले आहे.

      याच सिंधू संस्कृतीवर आक्रमण करून इथली मानवतावादी व्यवस्था उलथून टाकण्यासाठी आर्यांनी सनातन धर्म व्यावस्था उभी केली या व्यवस्थे विरुध्द लढण्यासाठी पहिला धर्म उभा राहिला तो “जैन धर्म” यां धर्माचे संस्थापक महावीर होते.परंतु हा विचार सनातन धर्म व्यवस्था रोखू शकला नाही.त्यानंतर गौतमी पुत्र सिध्दार्थ याने भगवे वस्त्र परिधान करून “बौध्द धम्म” विकसित केला आहे.भगवे वस्त्र परिधान केल्यामुळे त्यांना “भगवान” म्हटले जाऊ लगले.त्यामुळे भगव्या वस्त्रामध्ये “समता” निर्माण होऊन भगव्या वस्त्रा संदर्भात एक आत्मीयता तयार होऊन गावगाड्यातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांनी वारकरी पंथ स्थापन करून येथे “समता” प्रस्थापित केली आहे.त्यामुळे गावगाड्यातील पहिला बलुतेदार म्हणून आपण गेल्या लेखात “महार” समजून घेतला आहे.स्वराज्य उभारणीत त्याचे योगदान काय होते ते आपण समजून घेतले आहे.स्वराज्य उभारणीतील “महार योध्दा” अस्पृश्य कसा झाला हे पुढे येणाऱ्या लेखात आपण समजून घेणार आहोत.

स्वराज्यातील दुसरा बलुतेदार “सुतार” –:

गावगाडा उभारणीत “सुतार” याला खूप महत्व प्राप्त होते.....कारण सुताराने गावगाड्यातील लोकांना राहण्यासाठी पांढरीवर घरे उभारली,इमले उभारली,वाडे उभारली आहेत.शेतात लागणारी अवजारे उभारली.त्यामुळे शेती विकसित होऊ शकली आणि गावगाड्यातील लोकांची निवासाची सोय झाली...म्हणून सुताराचा गावगाड्यात दुसरा क्रमांक येतो.म्हणजेच काय तर गावगाड्यातील लोकांनी एकत्र येऊन ही व्यवस्था उभी केलेली आहे.गावगाड्यातील शंभर ठोकळगड्या मध्ये याचेही योगदान आहे.कारण गावच्या संरक्षण फळीत शंभर ठोकळगड्यामध्ये साठ टक्के लोक हे महारातील असायचे आणि चाळीस टक्के मध्ये इतर बलुतेदार आणि अलुतेदार मधील असायचे त्यामुळे सुतार या सर्क्ष्ण फळीत असायचा त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या सेनेमध्ये सुतार सुध्दा होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे.ज्या ठिकाणी सुतारचे कुटुंब मोठे असायचे त्यातील ज्या व्यक्तीला काम नसायचे तो व्यक्ती काळीमध्ये “बी” पेरून शेती करायचा....तो शेती करीत असल्यामुळे तो “कुणबी” म्हणून संबोधला जायचा.त्यामुळे कुणबी समाजात सुतार सुध्दा विलीन झालेला आपल्याला दिसतो.हीच गावगाड्यातील पद्धतीचा शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांना अभ्यास झालेला होता...त्यामुळे हाच गावगाडा स्वराज्य उभारणीत पुढे केल्याचे दिसून येते म्हणूनच इतिहासकार आणि इतिहास संशोधक आपल्याला स्वराज्यात बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांचे योगदान होते म्हणजे संपूर्ण गावगाड्याचे योगदान होते हे सांगतात.

स्वराज्यातील पहिला बलुतेदार महार होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज

 

        जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येते तेव्हा तेव्हा स्वराज्यातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार पुढे येत असतात.परंतु हे बलुतेदार आणि अलुतेदार नेमके कोण आहेत हे सांगण्याचे धाडस कोणता इतिहास लेखक किंवा इतिहास संशोधक करताना दिसत नाही.त्याचे कारणही तसेच आहे गेल्या साडेतिनशे वर्षात जवळ जवळ साडेसहा हजार जाती निर्माण झालेल्या आहेत.त्यामुळे एखद्या जातीचे नाव घेऊन दुसऱ्या जातीला दुखवायचे नाही अशी भूमिका हे लोक घेताना दिसत असतात.परंतु असे का...? झाले आणि असे का...? होत आहे याचा विचार कोणीही करीत नाही....मी अमुक जातीचा आहे त्यामुळे मला माझ्या जातीचां गर्व आहे असे म्हणणारे आणि फक्त आपल्या जातीसाठीच काम करणारे आपल्याला सध्या राजकारणात दिसत आहे.परंतु त्याच्या जातीचा इतिहास काय आहे....? पूर्वी तो कोण होता...? याचा जो पर्यंत तो शोध घेणार नाही तो पर्यंत तो स्वराज्यातील कोणत्या बलुतेदार किंवा अलुतेदार मधून पुढे आलेला आहे हे त्याला कळणार नाही.कारण स्वराज्यात जे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार छत्रपती शिवाजी महाराज यांनी बरोबर घेतले आहेत.त्याच बलुतेदार व अलुतेदार यांनी गावगाडा उभा केलेला आहे.आता हा गावगाडा कसा उभा राहिला हे पहिले आपण समजून घेऊयात.

        दहा हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृती उदयास आली.या सिंधू संस्कृती तेथील स्त्रियांनी आपल्या हातात घेऊन कृषी संस्कृती उभी केली....म्हणजेच शेतीचा शोध लावून शेतातील बी बियाणे निर्माण केले.शेतीलां लागणारे अवजारे विकसित केली.या स्त्रीला “नेॠृती” असे म्हणत असे.या सिंधू संस्कृतीने गणराज्य पधदत अस्तित्वात आणली होती.साडेसहा हजार वर्ष ही सिंधू संस्कृती चालली आणि त्यानंतर म्हणजे साडेसहा हजार वर्षानंतर म्हणजे साडेतीन हजार वर्षापूर्वी या सिंधू संस्कृतीवर आर्यांचे आक्रमण झाले.सिंधू संस्कृती मानवतावादी संस्कुती होती.आर्यांनी आक्रमण करून ही सिंधू संस्कृती ताब्यात घेण्याचे ठरविले आणि यासाठी त्यांनी “सनातन धर्म व्यवस्था” उभी केली.या आर्यांच्या आक्रमणाला रोखण्यासाठी स्त्रियांच्या हातातील सिंधू संस्कृती पुरुषांच्या हातामध्ये आली आणि तो पहिला पुरुष म्हणजे “बळीराजा” होय.तुम्हाला याठिकाणी कोणतीही जातव्यवस्था दिसणार नाही....त्यामुळे अस्पृश्यता तर नक्कीच दिसणार नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यानंतर हजार वर्षानी म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वी सनातन धर्म व्यवस्थेतून मनूने मनुस्मृती लागू करून सिंधू संस्कृतीवर मनुवादी व्यवस्था निर्माण केली.या व्यावस्थेला मोडीत काढण्यासाठी चौवीस गण व्यवस्था उभी राहिली त्याच चौवीस गणातील एक “गण” म्हणजे “महार” गण होय.नंतरच्या काळात जो काळीमध्ये “बी” पेरायचा आणि शेती करायचा त्याला पुढे “कुणबी” म्हणून संबोधले जाऊ लागले.त्यामुळे जो “बी” पेरतो तो “बळीराजा” चे पूजन करतो म्हणून त्याला “कुणबी” म्हटले जाते.मग “बी” पेरणारा चौवीस गणातील “महार” का....? असेना त्याला “कुणबी” म्हंटले जाते.पूर्वीपासून “महार” गणाने या आर्यव्यावस्थे विरुध्द शस्त्र हातात धरले असल्यामुळे त्याला योध्दाच संबोधले जायचे ते आजपर्यंत जात आहे.आणि गौतम बुद्धांच्या काळात या गणाचे पुरावे सापडतात.

सिंधू संस्कृती मधून उभी राहिली “गावगाडा” व्यावस्था –:

सिंधू संस्कृती मधून उभी राहिलेली कृषी व्यवस्था इथल्या लोकांनी समजून घेतली आणि त्यामुळे जंगलात राहणारे लोकांना काळी आणि पांढरी समजल्यामुळे त्यांनी पांढरीवर घरे उभारली आणि काळीमध्ये “बी” पेरून शेती उभारली....आणि या दोन्ही प्रक्रियेतून “गाव” उभे राहिले आणि हे “गाव” चालविण्यासाठी उभा राहिला “गावगाडा” आणि आणि गावगाड्यामध्ये उभे राहिले “ग्रामदैवत”.....आणि हा “गावगाडा” चालविण्यासाठी पुढे आले बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार....आता हे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार कोण...? हे आपण इथून पुढे समजून घेणार आहोत.त्यातील पहिला बलुतेदार म्हणजे “महार” होय.

         कोणत्याही गोष्टीची सुरुवात मूळ व्यक्तीपासून होते...म्हणजे कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो.त्यामुळे “गावगाडा” उभा करण्याची सुरुवात “महार” या गणांने केली आहे.त्यामुळे त्या गावाची व्यवस्था उभी करण्याचे काम “महार” याने केली आहे.गावातील बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार आणि “कुणबी” यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही “महार” याने घेतली.गावातील बलुतेदार अलुतेदार यांना न्याय देण्याची जबाबदारी “महार” याने घेतली आहे.त्यामुळे गावातील शंभर ठोकळगडी बरोबर घेऊन प्रशासन व्यवस्था उभी केली.त्यामुळे जो कोणी बारा बलुतेदार मधील व्यक्ती काळीमध्ये “बी” पेरायचा तो पुढे “कुणबी” म्हणून संबोधला जायचा....अठरा अलुतेदार मधील जो कोणी व्यक्ती काळीमध्ये “बी” पेरायचा तो पुढे “कुणबी” म्हणून संबोधला जायचा..मग शेताच्या बांधावरून वाद उभा राहिल्यास तो बांध नेमका कोणाचा याचा न्यायनिवडा हा त्या गावचा प्रमुख म्हणून “महार” करायचा....या बदल्यात कुणब्या कडून तो सारा जमा करायचा आणि आपल्या गोदामात ठेवायचा...ज्या वेळेस पाऊस होयचा नाही किंवा जास्त पाऊस झाला की शेतातील पिकांचे नुकसान होई....त्यावेळेस गावचा प्रमुख म्हणून या गोदामातील अन्न हा “महार” त्या गावातील बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार यांना पुरवायचा.....गावातील ग्रामदैवत याची वर्षातील जत्रेचे तो नेतृत्व करायचा अशा प्रकारे गावगाडा चालविण्याची जबाबदारी ही त्याची असायची.त्यामुळे शंभर ठोकळगड्यांचे नेतृत्व त्याचेकडे असल्यामुळे अशा गावातील महारांना एकत्र करून मावळातील दीडशे महार एकत्र करून पंधरा हजाराची सेना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला उभी केली आहे.