Wednesday, May 30, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – २) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..!


छत्रपती शिवराय यांचा इतिहास जर पाहिला तर असे लक्षात येते की,रयतेच्या कल्याणासाठी शिवराय यांनी जे स्वराज्य घडविले तेच स्वराज्य मनुवादी विचारांनी पद्धतशिरपणे संपविले होते.शिवरायांनी मानवकल्याणकारी धर्माच्या पलीकडे कोणतेही कार्य केली नाही.त्यांना दोन पुत्र होती एक सईबाई यांचे पुत्र म्हणजे युवराज शंभूराजे आणि दुसरे सोयराबाई यांचे पुत्र राजारामराजे होते.छत्रपती शिवराय यांनी मनुस्मृती नुसार लादलेली सप्तबंदी मोडीत काढली होती.युवराज संभाजीराजे यांच्या सांगण्यावरून वैदिक धर्म पद्धतीत केलेला पहिला राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत करण्यात आलेला होता.त्यामुळे स्वराज्यातील रयत आनंदात होती त्यांनी छत्रपती शिवराय व शंभूराजे जिवापार प्रेम करीत होते.वैदिक धर्म पंडितांच्या हे सर्व लक्षात आल्यावर त्यांनी युवराज शंभूराजे यांना रयतेमध्ये बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू केले.सोयराबाई यांच्या मनामध्ये पुत्रप्रेम जागृत करून शिवराय आणि शंभूराजे यांच्या विरोधात एक षड्यंत्र उभे केले.छत्रपती शिवराय यांना विषप्रयोग करून शंभूराजे यांचे नाव रयतेमध्ये बदनाम करण्याचे षड्यंत्र त्यांनी केले.एकदिवस शंभूराजे रायगडावर नसताना पुत्र मोहात अडकलेल्या सोयराबाई यांना हाताशी धरून याच वैदिक धर्म पंडितांनी शिवराय यांचेवर विषप्रयोग करून त्यांची हत्या करून लहान असलेल्या राजारामला गादीवर बसविण्यात आले.छत्रपती शिवराय यांच्या मृत्यूची बातमी दोन महिने गुप्त ठेवण्यात आली.दोन महिन्यानंतर पन्हाळ गडावर असलेल्या शंभूराजे यांना ही बातमी कळाली.शंभूराजे यांनी या वैदिक धर्म पंडितांना चार वर्ष सुनावणी चालवून मृत्यूदंडाची शिक्षा दिली.नंतर याच वैदिक धर्म पंडितांच्या वारसाने छत्रपती शिवराय यांचे जावई महातजी निंबाळकर आणि गणोजी शिर्के यांच्या मनामध्ये स्वार्थ निर्माण करून औरंगाजेबाच्या माध्यामतून मनुस्मृती प्रमाणे तुळापुर येथे हत्या करून एक सातारा आणि दुसरी कोल्हापूर अशा स्वराज्याच्या दोन गाद्या निर्माण केल्या.स्वराज्याच्या सरदाराना वेगवेगळे उभारून त्यांना संस्थानिक करून स्वराज्याचे वेगवेगळे तुकडे करून त्यांच्या सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचे एक मनुवादी षड्यंत्र या बामणी व्यवस्थेने केले.अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या प्रशासन व्यावस्थेला जातीच्या वर्गामध्ये आणण्याचे कार्य या मनुवादी व्यवस्थेने उभारून पेशवाईच्या माध्यमातून ही जातीय व्यवस्था बळकट करून पुन्हा एकदा मनुस्मृती लादण्यात आली.या जातीय व्यवस्थेमुळे आणि मनुस्मृतीच्या अमलबजावणीमुळे रयत शिवराय आणि शंभूराजे यांना विसरून गेली होती.(क्रमश😊

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – १) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणानंतर चळवळीत सुरु झाले मनुवादी षड्यंत्र....!


१ जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले..तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर
घडले..!
२ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यावर समाजाने अन्याय केला...! समाज मनुवादी
षड्यंत्राचा शिकार....!

३ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूच्या अहवाल मागणीसाठीचे आंदोलन २० वर्ष चालविले
गेले...!
४ भगवा विरुध्द निळा एक मनुवादी षड्यंत्र.......!

५ छत्रपती संभाजी महाराज आणि यशवंत उर्फ भैयासाहेब यांचे विरोधात एकच मनुवादी खेळी....!

६ सुशिक्षित लोकांनीच फुले शाहू आंबेडकर चळवळीची दिशा बदलली

७ समाज प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी का उभा रहात नाही......!

विषय असा आहे की,शहाजीराजे आणि माता जिजाऊ यांनी गौतम बुध्दापासून ते सम्राट अशोक यांचे पासून ते वारकरी सांप्रदाय पर्यंत जो भगवा ध्वज चालत आलेला आहे.तोच भगवा ध्वज स्वराज्याचे प्रतिक म्हणून शिवरायांच्या हातामध्ये दिलेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.शिवरायांनी उभे केलेले समतेचे राज्य पुढे छत्रपती संभाजी महाराज यांनी चालविले आणि स्वकीयांचा विश्वासघात होऊन त्यांची औरंगाजेब याच्या माध्यमातून हत्या करण्यात आली.या सर्व बाबींना मनुवादी षड्यंत्र कारणीभूत आहे हे आता सर्वांच्या समोर आलेली आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये म्हणजे बाप लेका मध्ये विदुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करून संभाजीराजे यांची बदनामी करून त्यांना शिवरायापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथल्या मनुवादी षड्यंत्राने केला आहे.आणि याचाच फायदा घेऊन शिवरायांची विषप्रयोग करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे.एवढा मोठा चाणाक्ष राजा स्वकीयाच्या स्वार्थपणा मुळे आपल्या पत्नीच्या विश्वासघातामुळे मृत्यू झाला ही स्वराज्यावर अतिशय गंभीर जखम देणारी घटना घडली आहे.असेच मनुवादी षड्यंत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे बरोबर घडले आहे.स्वकीयांच्या स्वार्थामुळे स्वत:च्या मेव्हाण्यानी विश्वासघात करून संभाजीराजे यांची ३८ दिवस धिंड काढून हत्या करण्यात आली आहे.आणि आज तेच मनुवादी षड्यंत्र संभाजी महाराज यांना स्वत:च्या फायद्यासाठी धर्मवीर बनवीत आहे आणि त्याला स्वकीयेच मोठ्या प्रमाणात सपोर्ट करीत असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात दिसत आहे.पुढे तोच भगवा ध्वज महात्मा फुले यांनी घेऊन समाज सुधारकाची चळवळ उभी केली.साल १८९० मध्ये महात्मा फुले यांचे महापरीनिर्वाण झाले आणि त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १८९१ मध्ये जन्म झाला.म्हणजे एक महापुरुष गेला आणि दुसऱ्या महापुरुषाने जन्म घेतला.दोघेही महापुरुष समतेचा लढा लढत होते या महापुरुषांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचे उत्तर यांनी कधीही प्रतिहल्ला करून दिलेले नाही.कारण मनुवादी षडयंत्राने वर्ण व्यवस्थेचे रुपांतर आता जातीय व्यवस्थेमध्ये केले होते त्यामुळे उच्च आणि नीच अशी जाती व्यवस्था निर्माण करून शुद्रातून अति शुद्र म्हणजे अस्पृश्य अशी व्यवस्था प्रस्थपित केली होती.त्यामुळे इतर समाज मनुवादी षडयंत्राला बळी पडला होता.त्यामुळे हल्ला करणारे आपलेच होते त्यामुळे त्यांचेवर प्रतिहल्ला करून “समता” प्रस्थापित होणार नव्हती याची जाण त्याकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना होती.त्यामुळे हल्ल्याचे उत्तर त्यांनी कधीच प्रतिहल्ला करून दिलेले नाही.हल्ला करणारे यांच्या हातामध्ये कधीच भगवा ध्वज नव्हता हे आपण याठिकाणी समजून घेतले पाहिजे.मग असे असताना भगव्याला विरोध का......? (क्रमश