विषय असा आहे
की,काही दिवसापूर्वी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचे वृत्तपत्रात
स्टेटमेंट आले होते की,कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या भविष्यातील
आरोग्याचा दृष्टीकोन ठेऊन झोपडपट्टी पुर्नविकास कार्यक्रम राज्य सरकारच्या
परवानगीने सुरु केलेला आहे.पुणे शहरात एकूण ५३८ झोपडपट्ट्या आहेत दाट वस्त्या
असल्या कारणामुळे तेथे कोविड १९ चा प्रार्दुभाव रोखण्यास खूप मोठी कसरत प्रशासनास
करावी लागत आहे.आणि त्यातील सार्वजनिक परिस्थीतीचा आढावा घेतल्यास सार्वजनिक
शौचालयास येणाऱ्या नागरिक यांच्यामुळे कोविड १९ चा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात
होताना दिसत आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य भवितव्याचा विचार केल्यास
झोपडपट्ट्या ह्या विकसित कराव्या लागणार आहेत.त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत
त्यांनी ५३८ मधील एकूण २२ झोपडपट्ट्या पुर्नविकास योजनेखाली आणलेल्या आहेत.आणि या
२२ झोपडपट्ट्या विकसित करण्यासाठी साधारणत: शंभर ते सव्वाशे कोटी रुपये खर्च
अपेक्षित आहे.सदरचा खर्च हा बांधकाम व्यावसायिकास मोबदला देऊन विकसित करण्याचा
मानस असून त्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे असे त्यानी सांगितलेली आहे.एकंदरीत
पहाता फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या पक्षाला मतदान करणाऱ्या मतदार यांची
संख्या झोपडपट्ट्यामध्ये नगण्य आहे.परंतु कॉंग्रेसला मानणारा मतदार मोठ्या
प्रमाणात आहे.आणि त्यानंतर आपल्याला भाजपाचा मतदार या झोपडपट्ट्यामध्ये आपल्याला
दिसत असतो.भाजप कसेही वागले तरी इथला मतदार हा धर्माच्या नावाखाली भाजपालच मतदान
करीत असतो.
झोपडपट्टी पुर्नविकास कार्यक्रमामुळे
झोपडपट्ट्यातील कॉंग्रेसचा कार्यकर्ता आणि मतदार अस्थाव्यास्था अवस्थेत बाहेर
पडणार आहे. झोपडपट्टी लाभधारक म्हणून त्याला लाभ मिळणार नाही. झोपडपट्टी
पुर्नविकास कार्यक्रमामुळे कॉंग्रेसचा मतदार संघाचे तुकडे तुकडे होऊन कॉंग्रेसचे
तेथील राजकीय अस्तित्व संपणार आहे.असे असताना कॉंग्रेस कोणतेही स्टेटमेंट याबाबत
करावयास तयार नाही.याचा अर्थ आता जसे केंद्रातील कॉंग्रेसचेनेते जेवढे गंभीर दिसत
नाही तेवढ्याच प्रमाणात स्थानिक कार्यकर्ते गंभीर दिसत नसल्याची परिस्थिती
आपल्याला दिसत आहे.कोविड १९ चा प्रार्दुभाव संपूर्ण शहरात असताना केवळ कन्टेनमेंट
झोनच्या माध्यमातून मुस्लीम-अनुसूचित वर्ग आणि ओबीसी वर्ग कोविड १९ चा प्रार्दुभाव
म्हणून टार्गेट करण्यात आलेला आहे काय...?
असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.एकंदरीत झोपडपट्ट्या वरील प्रमाणेचा वर्ग हा
रोजंदारीवर आपला उर्द्निर्वाह करीत असतो गेल्या अडीच महिन्यापासून त्याला रोजगार
नसल्यामुळे त्याच्या अन्नधान्याची सोय काही बांधकाम व्यावसायिक यांनी केल्याचे
काही लोक सांगत आहेत.
झोपडपट्टी पुर्नविकास कार्यक्रमामुळे कॉंग्रेस
उध्वस्त होणार यात काही शंका नाही....आणि त्याठिकाणी भाजप प्रभावी ठरणार आहे यातही
काही शंका नाही.मग असे असताना तेथील कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा कार्यकर्ता शांत
कसा...? असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रश्न असा आहे की काही तथाकथित आंबेडकर
चळवळीचे लोक कॉंग्रेसचे समर्थन करीत तिला वाचविण्यासाठी आणि नव्याने उभारी
घेण्यासाठी झटताना दिसत आहे.परंतु त्यांच्या या कष्टाला फळ काँग्रेसी नेत्यांना
द्यायचे नाही कारण आता आरएसएसची कॉंग्रेस नरेंद्र मोदी यांनी मुक्त केली असल्याची
घोषणा सुध्दा झालेली आहे.त्यामुळे कॉंग्रेसच्या माध्यमातून पुरोगामी विचारांना
मानणारा कॉंग्रेसचा कार्यकर्ता आणि मतदार आता झोपडपट्ट्यातून मुक्त करायचा आहे.