विषय असा आहे की,संपूर्ण देशात आज लॉक डाऊनचा सत्तेचाळीसावा दिवस आहे.मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे याची २८ मे ला मुदत संपत आहे.त्यामुळे घटनेप्रमाणे मुख्यमंत्री पदावर
त्यांना राहण्यासाठी आमदार होणे गरजेचे आहे.परंतु लॉक डाऊन असल्यामुळे जनतेमधून
त्यांना निवडणूक लढविता आलेली नाही म्हणून राज्यपाल नियुक्त जागेसाठी मंत्री
मंडळाकडून ठराव करण्यात येऊन उद्धव ठाकरे यांची आमदार म्हणून नियुक्ती करावी अशी
विनंती राज्यपाल महोदय यांना करण्यात आलेली होती.परंतु राज्यपाल महोदयांनी त्यांची
निवड न करण्याचा निर्णय घेऊन निवडणूक लढवून येण्यास सांगितलेले होते.त्यामुळे
उद्धव ठाकरे आणि अमित शहा व नरेंद्र मोदी यांचे बरोबर चर्चा करून मार्ग काढण्यात
आल्याच्या चर्चांना उधाण आले आणि नऊ विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम
निवडणूक आयोगाने लॉक डाऊनच्या काळात जाहीर केला आहे.मग या नऊ जागासाठी महाविकास
आघाडीचे....तर नऊ जागासाठी भाजपाचे उमदेवार जाहीर झालेले नाहीत.जर भाजपाने संपूर्ण
नऊ जागेसाठी उमेदवार दिले आणि महाविकास आघाडीने संपूर्ण नऊ जागेसाठी उमेदवार दिले
तर ही निवडणूक संविधानास अनसरून लोकशाही पद्धतीत होईल अन्यथा भाजप व कॉंग्रेस
एकत्र येऊन देश चालवीत आहेत असे दिसून येईल.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेला
निवडणूक कार्यक्रम लॉक डाऊनमुळे माझ्या पर्यंत येऊन पोहचला नाही.कारण मलाही विधान
परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरायचा होता.परंतु संचारबंदी लागू असल्यामुळे मी
उमेदवारीचा अर्ज दाखल करू शकत नाही.म्हणून मी म्हणतो शरद पवार साहेब मलाही विधान
परिषदेसाठी अर्ज करायचा होता....पण काय करू संचारबंदी असल्यामुळे मी घराच्या बाहेर
पडू शकत नाही....!
No comments:
Post a Comment