Wednesday, May 13, 2020

कॉंग्रेस कार्यकर्ते आणि मतदार यांनी आता मतदान करायचे कोणाला...? राजेश खडके सकल मराठी समाज


             २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकी नंतर कॉंग्रेस देशातून संपली असल्याची परिस्थिती जवळ जवळ स्पष्टपणे पुढे येताना दिसत आहे.त्याची कारणेही तसेच आहेत देशाचे माजी प्रधानमंत्री आज भाजपाच्या गोठ्यातून खासदार झालेले आहेत.आर्थिक तज्ञ कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पी चिंदबरम यांना भाजपाने झेलची हवा दाखवून सोनिया-राहुल गांधी यांना बऱ्याच प्रकरणामध्ये अडचणीत आणले आहे.कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी अपयशी झाल्यामुळे त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राजकीय सन्यास घेतल्या सारखी परिस्थिती दिसत आहे.देश संकटात असताना दोघे माय-लेक देश सोडून गेल्या सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.यातच गांधी नंतर कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारे जोतीरादित्य सिंदिया भाजपवासी झालेले आहेत.जेवढे आरएसएस विचाराचे लोक कॉंग्रेसमध्ये होते ते आता भाजपात प्रवेश करीत आहेत.राहिले साहिलेले आता लॉक डाऊन उठल्यानंतर भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे जाणकार याचे असे म्हणणे आहे की, आता आरएसएस कॉंग्रेस संपलेली आहे.परंतु पुरोगामी विचारला मानणारी कॉंग्रेस आणि त्याचा कार्यकर्ता तसेच मतदार शिल्लक राहिलेला दिसत आहे.परंतु कॉंग्रेस पक्ष चालविणारे देशात नेतृत्व आपल्याला दिसत नाही....ज्या पक्षाला देशात नेतृत्व राहिले नाही त्या पक्षाचे राज्यस्तरावर नेतृत्व थंड झाल्याची परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष श्री वडटीवार यांच्या शांत असलेल्या कार्य पद्धतीमुळे दिसत आहे.त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस ही नेतृत्वहीन झालेली कॉंग्रेस दिसत त्यामुळे इथला कार्यकर्ता भ्रमित झालेला असून आता कॉंग्रेसच्या मतदाराला प्रश्न पडला की, इथून पुढे मतदान करायचे कोणाला...?

No comments:

Post a Comment