प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या भाषणाची सुरुवात जागतिक मानवकल्याणावर
झाली...आणि संपूर्ण भारत या जागतिक मानवकल्याण अभियानात कसा सहभागी झाला हे त्यानी
ठासून सांगत असताना त्यांनी देशातील गोरगरीब जनतेचे कसे हाल झाले आणि त्यानी हे
हाल मानवकल्याण संदर्भात प्रामाणिकपणे कसे सोसले हे देखील आवर्जून सांगितलेले आहे.परंतु
हे सांगत असताना त्यांनी जुमलेबाजी सोडली असल्याचे चित्र मात्र कोठे दिसले नाही हे
मी आवर्जून सांगेन...त्याचे कारण असे आहे की देशातील जीडीपी शुन्यावरून खाली आलेला
आहे....असे असताना नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला आत्मनिर्भर भारत अभियान योजना
दिलेली आहे....आत्मनिर्भरता काय हे तुम्हाला सर्वांना माहित आहे असे मी
मानतो.एखाद्या व्यक्तीला कोणेही मदत करत नाही तेव्हा तो आपल्या स्वत:ची कामे स्वत:
करतो त्याला आत्मनिर्भरता म्हटले जाते.मग मला असा प्रश्न पडला आहे भारत देशाला जागतिक
पातळीवर इतर देशांनी नाकरलेले आहे काय...? इतर देश भारताला सहकार्य करणार नाही
काय...? म्हणून आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे काय...? असे बरेच प्रश्न तुम्हालाही
उपस्थित होत असतील असे मला वाटते.
भारताचा जीडीपी आज शून्याच्या
खाली येऊन पोहचला आहे...अशा परीस्थित भारताला कोणीही कर्ज देऊ शकत नाही...भारताचे
बजट हे साडेतेरा लाख कोटी आहे याची कल्पना आपल्या सर्वांना आहे असे असताना
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारत अभियान योजनेसाठी वीस लाख कोटीचे पॅकेज
कशाच्या आधारवर जाहीर करतात असा प्रश्न माझ्यासह अनेकाना पडलेला आहे.मग नरेंद्र
मोदी वीस लाख कोटी रुपये आणणार कोठून...? हे त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे असे
माझे म्हणणे आहे...आणि जनतेने असा प्रश्न केलाच पाहिजे....नाही तरी देशतील बऱ्याच
सरकारी कंपन्या मोदी यांनी विकल्याच आहे हे तर सर्वांना माहित आहे....मग हे वीस
लाख कोटी रुपयासाठी काय विकले....? आणि कोणाला विकले...? असा प्रश्न मला उपस्थित
होत आहे.कारण त्या शिवाय तुम्हाल वीस लाख कोटी रुपये कोणी देणार नाहीये.मला तर कधी
कधी असा प्रश्न पडतो की, मोदी यांनी देशातील सोन्याची खाण तर कोणाला विकलेली तर
नाही नां...आता हा विचार जनतेने करायला हवा.अशा परिस्थितीत देशातील विरोधी पक्ष
कॉंग्रेस शांत कसा काय बसला आहे...? सोनिया गांधी आणि राहुल गांधी प्रश्न
विचारताना का दिसत नाही....? देशाचे वाटोळे होत असताना हे दोघे मायलेक आपला चेहरा
कोठे दडवून बसले आहेत...? आता असा प्रश्न लोक विचारू लागलेले आहेत.
भारतीय जनता पार्टीकडे यशवंत सिन्हा सारखा आर्थिक तज्ञ असणारा चेहरा होता
त्याचा उपयोग मोदी सरकारने करवून घेतला नसल्याचे चित्र घसरलेल्या जीडीपीमुळे दिसत
आहे.तसेच कॉंग्रेसमध्ये मनमोहनसिंग व पी चिंदबरम सारखे आर्थिक तज्ञ असताना या वीस
लाख कोटी रुपये संदर्भात प्रश्न उपस्थित करताना दिसत नाही.मग कॉंग्रेसने देशाला
वाऱ्यावर सोडले आहे काय...? असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment