प्रथम आपणा सर्वांना बुध्द पौर्णिमेच्या हाद्रिक हार्दिक शुभेच्छा.....! आज
आपल्यासाठी सिंधूसंस्कृती पासून ते आजचा भारतातील विद्वानांचा विशेष सन्मान
करण्यासाठीचा दिवस आहे असे मी मानतो.त्या सर्वांचा सन्मान करून पुढे मी माझे मत
व्यक्त करीत आहे आणि ते म्हणजे भारताचे संविधान आणि लोकशाही ही आरएसएस काँग्रेसी
लोकांनी धोक्यात आणली आहे असे आता जवळ जवळ भारत सोडून गेलेल्या सोनिया-राहुल गांधी
यांचेवरून स्पष्ट दिसत आहे.त्याला तसे कारणही आहे आपण जर कॉंग्रेसचा इतिहास तपासला
तर ते आपल्याला संदर्भांसहित उदाहरणासह दिसत आहे.पण आज विचार केला तर आता आरएसएसची
कॉंग्रेस अस्तित्वात राहिली आहे काय...? तर मी म्हणेन बिलकुल नाही.कारण आरएसएसची
कॉंग्रेस आता संपूर्ण भाजपात विलीन झालेली आहे असे मी मानतो.मग आता देशात कॉंग्रेस
शिल्लक आहे काय..? तर मी म्हणेन आहे परंतु ती पुरोगामी विचारांच्या
कार्यकर्त्यांची कॉंग्रेस शिल्लक आहे जिथे कार्यकर्ता आहे आणि जिथे मतदार आहे
परंतु देशात त्याचे नेतृत्व शिल्लक नाही अशी आजच्या कॉंग्रेसची परिस्थिती आहे.देशातील
कॉंग्रेसचे सोनिया-राहुल गांधी यांचे नंतर नेतृत्व करण्याची क्षमता कोणाची होती
काय..? असा जर प्रश्न कोणी मला विचारला तर मी म्हणेन हो होती आणि ती क्षमता जोतीरादित्य
सिंदिया यांचेमध्ये होती मग तुम्ही म्हणाल मग ते भाजपात का गेले तर याचे एकच उत्तर
वरील प्रमाणे आहे आणि ते म्हणजे आंरएसएसची कॉंग्रेस भाजपात विलीन झालेली आहे.ज्यांना
ज्यांना कॉंग्रेसचा इतिहास माहित आहे आणि ज्यांना ज्यांना जोतीरादित्य सिंदियाचा
इतिहास माहिती आहे.त्यांना मी व्यक्त केलेले मत मान्य होईल अन्यथा तुम्हाला
कॉंग्रेस समजलीच नाही असे मी म्हणेन.एकंदरीत देशाची परिस्थिती पहाता भाजपाने जे जे
निर्णय २०१४ पासून ते आज पर्यंत घेतले आहे ते सर्व निर्णय कॉंग्रेसने पूर्वीच
कागदावर उतरविलेले होते.आता जे निर्णय झालेत आणि आपल्याला ते दिसत आहेत.असे निर्णय
संविधान विरोधी आणि लोकशाही संपुष्टात आणणारे विषय आहे.त्यामुळे देशात आता प्रबळ
असा विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही.आणि मोदी-शहा यांच्या माध्यमातून प्रत्येक
पक्ष नेतृत्वावर हल्ला करून प्रादेशिक पक्ष देखील पराभवखाली आणून ठेवलेले आहेत.दलित
मुस्लीम बहुजनांचे पक्ष आरएसएस कॉंग्रेसने २०१४ च्या लोकसभा-विधानसभा आणि २०१९
च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत संपविलेले आहेत यातून नव्याने उभा राहिलेला वंचित
बहुजन आघाडी हा पक्ष देखील आरएसएस कॉंग्रेसने उभा राहू दिलेला नाही.दोष आरएसएस-भाजपच्या
मोदी-शहा जोडीला देऊन चालणार नाही कारण हे एक आरएसएस कॉंग्रेसचे मोहरे आहेत.(क्रमश😊
No comments:
Post a Comment