Sunday, May 24, 2020

प्रकाश आंबेडकर म्हणतात नरेंद्र मोदी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा...मग खुनाची परवानगी का द्यावी...? राजेश खडके सकल मराठी समाज


विषय असा आहे की, आदरणीय प्रकाश आंबेडकर म्हणतात नरेंद्र मोदी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा...आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की, कोविड १९ चा पहिला रुग्ण उपचार घेऊन घरी गेला आहे...त्यामुळे आता पर्यंत जवळ जवळ पंधरा हजार रुग्ण उपचार घेऊन घरी गेलेले आहेत.असे असताना मिडीया आणि विरोधी पक्षातील लोक हे आजच्या कोविड १९ नोंद रूग्णाच्या संख्येत घरी गेलेल्या रुग्णाचा आकडा बेरीज करून वाढीव दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.आणि काही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ म्हणतात मुळातच कोविड १९ टेस्ट कीट ही बोगस आहे.त्यामुळे सदरचा व्यक्ती कोरोना रुग्ण ठरविणे चुकीचे आहे.त्यामुळे चांगले व्यक्ती असताना त्याला कोरनटाईन होऊन नाहक त्रास सहन करावा लागत आहे.इतर आजाराने व्याधीत असणारे रुग्णांना उपचार घेण्यासाठी त्रास होऊन तो दगावीत असल्याची परिस्थिती मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आहे.त्याला देण्यात येणारी उपचार पद्धत्ती चुकीची असल्यामुळे मरणार नसणारा रुग्ण इतर आजारामुळे मरत असताना दिसत आहे.त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री यांना नम्रतेची विनंती आहे की,ज्याला गरज आहे त्याचीच चांगली व विश्वासू कोविड १९ रुग्ण तपासणी यंत्रणा उभी करावी अन्यथा चुकीचा उपचार होऊन तसेच ज्याला इतर आजारा संदर्भात उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू होईल आणि त्याला जीवास मुकावे लागेल.त्यामुळे हा मृत्यू एक प्रकारची हत्याच असेल असे जाणकार यांचे मत आहे.देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर कोविड १९ मुळे दागाविलेल्या रुग्णांच्या नातेवाईकानी भा.द.वि. कलम ३०२ चा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल करावा असा सल्ला आदरणीय प्रकाश आंबेडकर दिलेला आहे.त्यामुळे आता भारतातील नागरिकांचे म्हणणे असे आहे की,बोगस कोविड १९ टेस्ट कीट नुसार स्वॅब टेस्टची परवानगी देणे म्हणजे स्वत:च्या खुनाची परवानगी द्यायची का...? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.

No comments:

Post a Comment