विषय असा आहे की, नेमका कोरोना वायरस आहे काय...? याचा प्रचार आणि प्रबोधन
जनमाणसात करण्यात आलेले नाही....याउलट मिडीयाच्या माध्यमातून जनतेमध्ये दहशत निर्माण
करून जन सामन्य माणसाची अधोगती केली असल्याचे कालच्या नरेंद्र मोदी यांच्या
भाषणावरून दिसून आले आहे.काल ते असे म्हणाले की आता कोरोनाची चर्चा सोडून द्या आणि
स्वत:ला उभे करण्यासाठी लढा असे त्यानी बोलून दाखविलेले आहे.परंतु जेव्हा रिजर्व्ह
बँकेचे माजी गव्हर्नर श्री रघुरामराजन आणि नारायणमूर्ती म्हणाले की, कोरोना
माणसाला नेहमी होणाऱ्या आजारा सारखा आहे त्यामुळे त्याला भयभीत होण्यासारखे काही
कारण नाही.परंतु त्यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊन करणे हे देशाच्या हिताचे नसून...देश
डबघाईला जाईल आणि जितके लोक कोरोनाने मरणार नाहीत त्याचे काही पटीने लोक भूकबळीमुळे
मरतील आणि ही भूकबळी रोकता येणार नाही.परंतु ऐकतील ते कसले मोदी त्यांनी ऐकले नाहे
उलट लॉक डाऊन वाढवित गेले.काही दिवसापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
म्हणाले की कोरोना या विषाणू वर कोणतीही लस तयार होणार नाही....आणि आमच्या देशातील
कोरोना स्वत:हून संपुष्टात येणार आहे.त्यामुळे कोरोना विरोधात संघर्ष करायची
आम्हाला गरज नाही असे त्यांनी म्हटले होते.त्यातच आपल्या आयुष मंत्रालयाने
सांगितले होते की,कोरोना विरोधात लढण्यासाठी आपल्याला निसर्गाने दिलेली साधन संपत्ती
पैकी आपण तुळसी-काळी मिर्च-सुंठ-दालचिनी यांचा काढा करून पिल्यास कोरोन बरा होतो
म्हणून त्यानी या काढ्याला “आयुष काढा” असे नाव दिलेले आहे.असे असताना एवढ्या
मोठ्या प्रमाणात लॉक डाऊन का राबविण्यात आला आहे असा प्रश्न आता इथले लोक करू
लागले आहेत.
No comments:
Post a Comment