Sunday, March 31, 2019
पुणे लोकसभा मतदार संघात होणार गिरीश बापट आणि प्रवीण गायकवाड यांची घोर फसवणूक….? राजेश खडके सकल मराठी समाज
“पुणे तेथे काय उणे जिकडे तिकडे सोनेच सोने” अशा प्रकारचा हा पुणे लोकसभा मतदार संघ आहे. वैचारिक, ऐतिहासिक,मौलविक,आद्योगिक आणि व्यावसायिक असलेला मतदार संघ आहे कोणालही या मतदार संघाचा मोह सुटलेला नाही.म्हणून देशाच्या संसदेत या मतदार संघाला अन्यन्य असे महत्व प्राप्त आहे.याच मतदार संघातून आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रवीण गायकवाड यांनी आपली सामाजिक प्रतिष्टा पणाला लावत कॉंग्रेसमध्ये आपल्या समर्थकासह प्रवेश केलेला आहे.तसेच पूर्वीपासून कॉंग्रेसमध्ये असणारे अरविंद शिंदे हे आपल्या शेवटच्या राजकारणाचा जुगार खेळत आहे.मोहन जोशी आपले राजकारण स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहे तर या पुणे शहराचा मान आपल्याला मिळावा आणि आपले शेवटचे आयुष्य चांगले जावे असे गिरीश बापट यांना वाटत आहे.वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर होऊनही म्हणावा तसा प्रचार अद्याप तरी सुरु झालेला नाही. उमेदवार आमच्या पर्यंत पोहचत नाही अशा तक्रारी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करताना दिसत आहे. प्रचाराला चांगला जोर धरावा म्हणून लक्ष्मण माने प्रयत्न करीत आहेत.परंतु कार्यकर्ते या उमेदवाराला अपेक्षाने बघत आहेत.काही जुनी राजकीय कार्यकर्ते आपली चमकोगिरी करण्याच्या नादात असताना दिसत आहे.असो परंतु या मतदार संघावर शरद पवार यांची पकड आहे त्यांच्या मनातील थांगपत्ता लावताना गिरीश बापट आणि प्रवीण गायकवाड तसेच अरविंद शिंदे कमी पडताना दिसत आहेत.वयाच्या अनुमानाने पाहिले तर प्रधानमंत्री होण्यासाठी शरद पवार यांना शेवटची संधी असल्याचे जाणकार यांचे म्हणणे आहे.शरद पवार यांचे राजकारण पाहता महाराष्ट्रातील संपूर्ण कॉंग्रेस त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेली परिस्थिती आहे.म्हणून येणाऱ्या दोन दिवसात शरद पवार हे आपल्या राजकारणाची चुणूक पुणे लोकसभा मतदार संघात दाखवतील यात मात्र कोणतीही शंका बाळगायचे कारण नाही म्हणूनच पुणे लोकसभा मतदार संघ देशाच्या राजकारणात चर्चेत शरद पवार यांनीच आणला आहे असे आमच्य सकल मराठी समाजाचे ठाम मत आहे.म्हणून आम्ही म्हणतो.पुणे लोकसभा मतदार संघात होणार गिरीश बापट आणि प्रवीण गायकवाड यांची घोर फसवणूक….
Saturday, March 30, 2019
कॉंग्रेसकडून प्रवीण गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यास….वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दाखल होईल काय…? राजेश खडके सकल मराठी समाज
विषय असा आहे की,गेल्या नऊ महिन्यापासून प्रवीण गायकवाड हे कॉंग्रेस श्रेष्टीच्या पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नात आहेत.आणि उमेदवारी मिळाल्यास प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या उमेदवारीस पाठींबा द्यावा अशी त्यांची आणि बहुजन मराठा वर्गाची आग्रही विंनती आहे.त्यांच्या या विनंतीला प्रकाश आंबेडकर मान देतील काय…? हा त्या वेळेचा प्रश्न आहे.परंतु उमेदवारीच्या रिंगणातून गुरुवार २८ मार्च रोजी प्रवीण गायकवाड यांनी माघार घेतली आणि शनिवारी ३० मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दाखल होणार आणि ही उमदेवारी दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यानी महात्मा फुले वाडा येथे जमावे अशा सूचना शुक्रवारी २९ मार्च रोजी देण्यात आलेल्या होत्या.परंतु प्रवीण गायकवाड यांनी २९ मार्च रोजी सांयकाळी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असे जाहीर केले.आणि त्यानंतर ३० मार्च रोजी दाखल होणारी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी काही तांत्रिक अडचणीमुळे थांबली गेली आहे.आता येथे प्रश्न असा निर्माण झालेला आहे की,३० मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी तर दाखल झाली नाही परंतु ३० मार्च रोजी प्रवीण गायकवाड यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश झालेलां आहे.प्रवीण गायकवाड यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास खरेच वंचित बहुजन आघाडी पाठींबा देणार आहे काय....? असो कोणत्या पक्षांनी कोणाला पाठींबा द्यावा हा ज्या त्या पक्षाचा विषय आहे.परंतु सामजिक स्तरावर प्रवीण गायकवाड यांची मान्यता चांगली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना पाठींबा मिळणार आहे.परंतु त्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांना शांत करावे लागणार आहे.
Wednesday, March 20, 2019
प्रकाश आंबेडकरामुळे धोक्यात आलेल्या बामणी व्यवस्थेला वाचविण्यासाठी कॉंग्रेस आणि मराठा पुढे सरसावले…! चर्मकार समाजाला मिळाली आहे एक संधी…! राजेश खडके सकल मराठी समाज
एकंदरीत संपूर्ण देशाचे राजकारण पहाता हा देशच बदल्यासाठीचा कार्यक्रम आरएसएसने मोदी-शहाच्या माध्यमातून सुरु केलेला आहे.देशातील सामान्य नागरिकाचे भवितव्य किती भयंकर असणार आहे याची त्याला जाण नाही.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी ही धोक्याची घंटा ओळखलेली असल्यामुळे आरएसएस प्रणीत भाजप आणि कॉंग्रेस यांना सपोर्टर असणारा ओबीसी समाज जागृत करून त्यांचा कार्यक्रम थांबविण्याचे मोठे कार्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती अंताची लढाई जरी उभी केली आहे.त्यामध्ये इथल्या मागास जातींचे सर्वेक्षण करून त्यांना शेड्युल्ड ठरवून देऊन ते म्हणाले होते की ज्या वेळेस इथला मागासवर्ग जातीयनिहाय समाज जागरूक होईल तेव्हा तो त्याचे अस्तित्व शोधू लागेल आणि त्याला ज्या दिवशी आपल्या अस्तित्वाचा शोध लागेल त्यादिवशी इथली बामणी व्यवस्था कोलमडून पडेल.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी जातीयनिहाय उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात उभे करून त्या जाती जागरूक केल्या आहेत.त्या संपूर्ण जाती जागरूक झाल्यामुळे खरेच बामणी व्यावस्था आज धोक्यात आलेली आहे.त्यामुळे या बामणी व्यवस्थेला वाचविण्यासाठी इथली कॉंग्रेस आणि मराठा पुढे सरसाविलेला आहे.
कॉंग्रेसची निर्मिती बाळकृष्ण गंगाधर टिळक यांनी १८८४ मध्ये हिंदू महासभेतून केलेली आहे.ह्या कॉंग्रेसचे एकच देह होते आणि ते म्हणजे इथल्या ब्रिटीश प्रशासनात बामणी व्यावस्था उभे करून ती मजबूत करून इथल्या भारतावर आपले एकाधिकार प्रशासन व्यावस्था निर्माण करायची आणि ही प्रशासन व्यवस्था मजबूत करण्यासाठी आयबी ही गुप्तचर यंत्रणा १८८७ मध्ये त्यांनी उभी केलेली आहे.परंतु स्वतंत्र भारतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या आयबीला संविधानात्म्क दर्जा दिलेला नाही परंतु आजही ही यंत्रांना सुरु असून या यंत्रणेला नागपूरच्या संघ कार्यालयातून चालविले जात आहे.
इथला ओबीसी याला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांचेनंतर याच बामणी व्यवस्थेने घराणेशाही निर्माण करून त्या घराणेशाहीचा दबदबा गावपातळी निर्माण करून त्या घराणेशाहीवर बामणी व्यवस्थेने ताबा निर्माण केलेला आहे.पेशवाई काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या लढवय्या वर्गाला “मराठा” जात नावाचे लेबल लावण्यात येऊन त्याला अज्ञातवासात ठेवण्यात आले. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्य कर्तुत्वामुळे इथला मागासवर्ग जागरूक झाला आणि तो समतेच्या लढाईत सहभागी झाला.
इथल्या टिळक कॉंग्रेसने ब्रिटीश प्रशासनावर दबाव टाकून इथल्या प्रशासन व्यावस्था बामणी व्यवस्थेच्या ताब्यात घेण्याचे कार्य सुरु झाले.त्यामुळे इथाल्या घराणेशाहीला आपल्या ताब्यात घेऊन धार्मिक खेळ उभा करून संपूर्ण देशात मनुस्मृतीची अमलबजावणी सुरु केली.परंतु टिळकांच्या मृत्यूनंतर इथली कॉंग्रेस मोहन करमचंद गांधी यांच्या ताब्यात आली.आणि इथला ओबीसी त्यांनी जागरूक करून संपूर्ण देशात घरोघरी ती कॉंग्रेस पोचविण्यात आली.त्यामुळे जागरूक झालेल्या इतर समाजामुळे हिंदू संकप्लना धोक्यात येणार असे ज्यावेळेस टिळक समर्थकांना वाटले.आणि ज्या वेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन करून त्यांचे पुढील कार्य सुरु केले तेव्हा इथल्या बामणी व्यवस्थेच्या लक्षात आले की,इथला अस्पृश्य व्यक्ती जागरूक झाला तर पुन्हा आपण संकटात येऊ म्हणून त्या समता सैनिक दलाला प्रतिरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएस या संघटनेची स्थापना कॉंग्रेस मधून बाहेर पडून केशव बळीराम हेगडेवार यांनी केली.पुढे जागरूक झालेला ओबीसी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जागरूक केलेला अस्पृश्य यांच्यासाठीचा संघर्ष उभा राहिला.आणि याच आरएसएस वाल्यांनी व्दिराष्ट्र धर्म संकल्पनेतून महात्मा गांधी यांची हत्या केली.त्यामुळे इथे दोन विचारांचा ओबीसी उभा राहिला एक गांधीवादी आणि दुसरा संघवादी..!
इथला गांधीवादी ओबीसी हा संघवाद्याला महात्मा गांधी यांचा हत्यारा समजत असल्यामुळे तो त्याचेकडे कधी आकर्षित होत नाही.परंतु त्या गांधीवादी ओबीसी वाल्याला हे माहित नव्हते की,गांधी हत्यानंतर इथली कॉंग्रेस ही आरएसएस वाल्यांनी ताब्यात घेतली आहे.परंतु त्या गांधीवादी ओबीसीला जागरूक करण्याचे काम प्रकाश आंबेडकर यांनी केल्यामुळे तो या कॉंग्रेस मधून आणि भाजपा मधून बाहेर पडून तो प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात उतरलेला आहे.त्यामुळे इथला मागास,इतर मागास,दलित,मुस्लीम एकत्र करून प्रकाश आंबेडकर यांनी इथली बामणी व्यवस्था धोक्यात आणलेली आहे.आणि ही बामणी व्यावस्था खरोखरच धोक्यात आल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा ही सत्ता हातात मिळविण्यासाठी आपले स्वीपरसेल बाहेर काढले आहेत.त्यामुळेच कॉंग्रेस संपूर्ण देशात भाजपला फायदा कसा होईल असे काम त्यांनी सुरु केले आहे.परंतु प्रकाश आंबेडकर यांनी हा काँग्रेसी खेळ हाणून पाडल्यामुळे इथल्या कॉंग्रेसने आणि सावरकर समर्थक शरद पवार यांनी या महाराष्ट्रात असे वातावरण निर्माण केले आहे की,घराणेशाहीला राजकीयदृष्ट्या नाराज करून त्यांना भाजपाकडे जाण्यास कळत न कळत भाग पाडले आहे.
एकंदरीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात दिलेले उमेदवार हे कमजोर उमेदवार देऊन त्याची सरशी केलेली आहे.सध्या पोटाला भागेल एवढेच खायचे असे धोरण कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांनी सुरु केलेले आहे.त्यामुळे स्वघरातील व्यक्तींना प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात टीका करून प्रकाश आंबेडकर यांनी जागरूक केलेला समाज भटकाविण्याचे काम सुरु झालेले आहे.छत्रपती शिवराय यांना मानणारा मराठा वंचित बहुजन आघाडी पासून दूर सारण्यासाठी बी जी कोळसे-पाटील यांचा वापर शरद पवार यांनी केला आहे.
बहन मायावती यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात बीएसपी पक्षाचे उमेदवार उभे करायला लावून शरद पवार यांनी इथल्या चर्मकार यांच्या मतांचा प्रश्न मार्गी लावलेला आहे.हा चर्मकार समाज कधीही फुले-शाहू-आंबेडकर विचाराला प्रामणिक न रहाता स्वत:च्या फायद्यापुरता आंबेडकर समर्थक राहिलेला आहे.आज या समाजाला खरेच प्रामणिक रहाण्याची संधी प्राप्त झालेली आहे.त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.आज जर चर्मकार समाज प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभा राहिला नाही.तर भविष्यात त्याला ही संधी कधीही प्राप्त होणार नाही,त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी उभा केलेला बामणी व्यवस्थेचा लढा हा निर्णायक वळणावर असल्यामुळे सर्वानी त्यांना साथ दिली पाहिजे. त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे की,प्रकाश आंबेडकरामुळे धोक्यात आलेल्या बामणी व्यवस्थेला वाचविण्यासाठी कॉंग्रेस आणि मराठा पुढे सरसावले…! चर्मकार समाजाला मिळाली आहे एक संधी…!
Sunday, March 17, 2019
कोळसे-पाटलांना आंधळ्या प्रेमामुळे शरद पवारांनी फसविले आणि संपविले….वंचित बहुजन आघाडीचा खरा शत्रू आरएसएस….! राजेश खडके सकल मराठी समाज
प्रश्न असा आहे की,वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार पहाता प्रस्थापित मराठा संपूर्ण महाराष्ट्रात एकटा पडलेला दिसत आहे.प्रकाश आंबेडकर यांनी प्रथमच अलुतेदार आणि बलुतेदार यांना बरोबर घेऊन १५९ घराणेशाहीला दणका दिलेला आहे.कारण हीच घराणेशाही इथल्या आरएसएस वाल्यांना संरक्षण देण्याचे काम करत आहे…..याला उदाहरण द्यायचे झाले तर जयंत पाटलांचे आपल्याला देता येईल कारण याच घरामध्ये संभाजी भिडे पडून असतो.मिरजच्या झालेल्या दंगलीमध्ये भिडेला कोणी वाचविले हे कोणाला सांगायची गरज नाही असे आमच्या सकल मराठी समजाला वाटत आहे.शरद पवार हे पुर्व्रीपासून सावरकर समर्थक राहिलेले आहेत.महाराष्ट्राचा विकास करीत असताना त्यांनी इथली संस्कृती शिल्लक ठेवली नाही.पाश्चत्य संस्कृतीचे दर्शन यांनी याच आरएसएसवादी यांच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला दिले आहे असो इथे हा विषय नाही.इथे विषय आहे तो कोळसे-पाटील यांचा आता कोळसे पाटील का फसले तर त्यांना लोकसभेत जायचे आहे.आणि लोकसभेत गेल्यावर प्रधानमंत्री म्हणून शरद पवार यांना सपोर्ट करायचा आहे.त्यामुळे कोळसे-पाटील यांना वाटले आपण वंचित बहुजन आघाडी बरोबर राहिल्यास त्यांना महाआघाडीत सामील करून घेऊ आणि असे झाल्यास आपण निवडून जरी आलो नाही तरी आपली वर्णी राज्यासभेवर पवार साहेब लावतील असा शब्द पवार साहेब यांनी कोळसे-पाटील यांना दिलेला आहे.परंतु प्रामणिक असे प्रकाश आंबेडकर यांनी कोळसे-पाटील यांना वंचित बहुजन आघाडीची औरंगाबादची उमेदवारी दिली परंतु त्यांना ही उमेदवारी जनता दल (एस) कडून हवी होती.त्यांच्या या हट्टाला बाळासाहेबानी समर्थन दिले आणि वंचित बहुजन आघाडीचा त्यांच्या उमेदवारीला पाठींबा जाहीर केला.असे असताना त्यांचा हा हट्ट होता की, लाचारी करून कॉंग्रेस बरोबर आघाडी करा..परंतु प्रकाश आंबेडकर त्यांना सांगत होते की जो पर्यंत कॉंग्रेस आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा प्रस्ताव देत नाही तो पर्यंत त्यांच्या बरोबर आघाडी करता येणार नाही.कॉंग्रेसने कोणताही प्रस्ताव तसा वंचित बहुजन आघाडीला दिला नाही त्यामुळे ही आघाडी होऊ शकली नाही.परंतु कोळसे-पाटील यांची गोची ही झाली की,पुण्यात शिवमहोत्सव कार्यक्रमावेळी एकच मंचकावर शरद पवार आणि कोळसे-पाटील उपस्थित होते.उपस्थित भाषणांत कोळसे-पाटील यांनी पवार साहेबांना प्रधानमंत्री पदासाठी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबाच जाहीर केला.आता असे चालेल काय…? कारण ओवीसी आणि २६० संघटनानी प्रकाश आंबेडकर यांना वंचित आघाडीचा प्रमुख केला आहे.तरीही प्रकाश आंबेडकर हे कोळसे-पाटील यांना काही बोलले नाही राजकारण म्हणून विषय कानामागे टाकला.परंतु कोळसे-पाटील यांची खरी गोची केव्हा झाली जेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी बारामती मधून सुप्रिया सुळे-पवार यांचे विरुध्द नवनाथ पडळकर (धनगर) आणि मावळ मधून पार्थ पवार विरुध्द राजाराम पाटील (आगरी कोळी) यांची उमेदवारी जाहीर केले तेव्हा..कारण ह्या दोन्ही उमेदवारी अडचणीत आली त्यामुळे पवार साहेब कोळसे-पाटील यांना म्हणाले तुम्ही तर मला प्रधानमंत्री करायला निघाले आहेत परंतु माझ्या घरातील दोन उमेदवार धोक्यात आले त्याचे काय…? आता पवार साहेबांना शब्द दिला होता तो तर कोळसे-पाटील यांना पाळायचा होता कारण तो शब्द जर पाळला नाही तर आपल्याला राज्यसभेवर जाता येणार नाही.प्रकाश आंबेडकर यांचेवर बोट उचलण्याची कोणाची हीमत नाही परंतु कोळसे-पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे चांगले मित्र असल्यामुळे ते त्यांना बोलू शकत होते.परंतु इतक्या वर्षे प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर राहून देखील कोळसे-पाटील हे त्यांना ओळखू शकले नाही.बारामती आणि मावळ लोकसभा मतदार संघात उमेदवार देऊ नका असा हट्ट कोळसे-पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचेकडे धरला होता.परंतु समाजाला बांधील असणारे प्रकाश आंबेडकर आपल्या आजोबांच्या विचरा विरोधात जाऊ शकत नाही.परंतु पवार साहेबांना शब्द दिलाय तो तर पूर्ण करायचा आहे.मग दुसरे हत्यार पवार साहेबांच्या आंधळ्या प्रेमापोटी कोळसे-पाटील यांनी बाहेर काढले आणि ते म्हणजे बदनामी…! एवढा चांगला प्रामाणिक मराठा माणूस आंधळ्या प्रेमात पडला आणि त्या प्रेमापोटी आयुष्यभर कमाविलेले धुळीत घालून बसला.ज्या आरोपाला काही अर्थ नाही असे आरोप करून ते फसले आणि संपले…! म्हणून आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे की,कोळसे-पाटलांना आंधळ्या प्रेमामुळे शरद पवारांनी फसविले आणि संपविले….वंचित आघाडीचा खरा शत्रू आरएसएस….!
Saturday, March 16, 2019
प्रस्थापित मराठा घराणेशाहीतील पार्थ पवार विरुध्द वंचित घटक आगरी समाजातील राजाराम पाटील असा सामना मावळ मतदार संघात रंगणार…! राजेश खडके सकल मराठी समाज
मावळ लोकसभा मतदार संघ २००८ साली निर्माण करण्यात आला व ह्यामध्ये पुणे व रायगड जिल्ह्यातील प्रत्येक ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्व आहे हे महत्व ओळखूनच महत्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी रायगडाला व रायगडाच्या परिसराला विशेष महत्व दिलेले आहे.त्यामुळे येथे शेतकरी कामगार पक्षाची ताकद असताना येथे त्यांचा उमेदवार सध्या निवडून येऊ शकत नाही.सध्या तो पक्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत आहे.बहुजन समाज पक्षाची २५ हजार मते या मतदार संघात असल्यामुळे शरद पवार हे पार्थ पवार यांची उमेदवारी निवडून आणण्यासाठी बहन मायावती यांना गळ घालीत आहेत.सध्या शिवसेनेचा खासदार म्हणून श्रीरंग बारणे आहेत...त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही सांगता येत नाही.परंतु हा मतदार संघ आरएसएसच्या ताब्यात आहेत रायगडच्या सभेत भाषण करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की,याठिकाणी आरएसएसच्या लोकांकडे बॉम्ब आणि पिस्तुले सापडलेली आहेत.या परिसरात आरएसएसची आतंकवादी अड्डे आहेत.इथल्या खोतांनी कुळाला मारून टाकले आहे.इथल्या कुळासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती आंदोलन केले आहे.स्वराज्यातील आरमाराची शान असलेला आगरी समाज इथल्या मनुवादी व्यावस्थेने भांडवलशाहीच्या माध्यमातून संपविण्याचा घाट घातला आहे.त्यामुळे इथला वंचित घटकांचा अजूनपर्यंत विकास होऊ दिलेला नाही.बरेच असे प्रश्न आहे ती प्रश्न धर्माच्या नावाखाली दाबलेली आहेत.त्यामुळे ज्या प्रकारे बारामती लोकसभा मतदार संघाचे झाले आहे.त्याच प्रमाणे या मतदार संघाचे झाले आहे आणि पुढे होणार आहे.त्यामुळे इथला शिवसेनचा उमेदवारही पडला पाहिजे आणि प्रस्थापित मराठा घराणेशाही देखील उभी राहिली नाही पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणणे आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेऊन आलेला हा आगरी समाजास संसदेत कसे पाठविता येतील याची काळजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी घेतली पाहिजे.कारण हा लढा इथल्या आरएसएस प्रणीत आतंकवादी आणि प्रस्थापित मराठाशाही यांचे बरोबर आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी मोठ्या ताकदीने या आगरी समाजाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.
प्रस्थापित मराठा घराणेशाहीतील सुप्रियाताई सुळे विरुध्द वंचित घटक धनगर समाजातील नवनाथ पडळकर असा सामना बारामती मतदार संघात रंगणार…! राजेश खडके सकल मराठी समाज
बारामती मतदार संघाचा आभ्यास केल्यास इतिहासाकडे गेल्याशिवाय वर्तमानात काय करावे हे कळत नाही.बरेच लोक म्हणतात इतिहासात रमणारे वर्तमानात काम करू शकत नाही त्यामुळे इतिहासात न रमलेले बरे…! पण हे सर्व चूक आहे असे आम्ही मानतो.कारण इतिहास हा सिंधू संस्कृतीचा आहे,इतिहास हा गौतम बुद्धांचा आहे,इतिहास सम्राट अशोकांचा आहे,इतिहास हा वारकरी सांप्रदाय यांचा आहे,छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा आहे, इतिहास हा महार योध्यांचा आहे,इतिहास हा महात्मा ज्योतिबा फुले,शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे.आणि जो पर्यंत यांचा अभ्यास होत नाही तो पर्यंत वर्तमान कळत नाही.जेथे जेथे इतिहास घडलेला आहे तेथे तेथे विकास झालेला नाही आणि जो जो इतिहासात चांगल्या कार्यात सहभागी झालेला आहे त्याला वंचित ठेवण्यासाठीचे कार्य इथल्या मनुवादी व्यवस्थेने केले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.बारामती मतदार संघाचा आभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की,भोर-वेल्हा आणि खडकवासला असा ऐतिहासिक भाग या मतदार संघात येतो.याच मतदार संघात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अलुतेदार आणि बलुतेदार यांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले.स्वराज्याचे पहिले तोरण म्हणून वेल्ह्यातील प्रचंडगड ताब्यात घेऊन स्वराज्याचे पहिले तोरण उभारून त्याचे नामकरण तोरणागड केले आहे.याच मतदार संघात स्त्रीची बेअबदा झाली म्हणून गुजर पाटलाचे हातपाय कलम केले आहे.याच मतदार संघात राजगड उभारून तेथून स्वराज्याचा २२ वर्षे कारभार शिवरायांनी चालविलेला आहे.त्यामुळे आजही या मतदार संघातील स्वराज्य उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशा अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या वंशाजाचा विकास आजपर्यंत झालेला नाही.१९८४ पासून हा मतदार संघ बारामतीचे शरद पवार यांचेकडे आहे.आज त्याच्या कन्या या मतदार संघातील खासदार आहे.धनगर समाजाचा खूप मोठा स्वराज्यात इतिहास आहे.या समाजातील २५ तरुणानी जेरबंद छत्रपती संभाजी महाराज यांची सुटका करण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती दिलेली आहे.हा अजरामर इतिहास असून आजही या ऐतिहासिक स्थळाचा विकास केला जात नाही.इथल्या वंचित घटकांना कोणताही रोजगार उपलब्ध करू दिला जात नाही.इथले तरूण आजही हमाली करीत आहेत.चौकीदार म्हणून मोठ्या प्रमाणात इथला वर्ग बाहेर गावी काम करत असतो.स्वत;च्या विकासाची स्वत: संधी शोधत असतो.या मतदार संघात धरणे असताना इथल्या शेतीला पाणी दिले जात नाही.पावसाळी शेतीवर इथल्या शेतकरी यांना जगावे लागत आहे.इथल्या शेतकरी यांच्या जमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत त्यांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही.इथल्या गोरगरीब लोकांच्या कवडीमोल भावाने जमिनी लाटल्या गेलेल्या आहेत.या मतदार संघात पवार नावाची दहशत असल्यामुळे इथला मतदार दुसऱ्याला मतदान करण्यास घाबरत असतो.परंतु प्रकाश आंबेडकर यांनी याच मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची सभा घेऊन ती दहशत कमी केलेली आहे.याच मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने धनगर समाजाचे नवनाथ पडळकर यांना सुप्रियाताई सुळे-पवार यांचे विरोधात उमेदवारी दिलेली आहे.त्यामुळे इथल्या अलुतेदार आणि बलुतेदार यांना एक बळ मिळालेले आहे.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत न भिता तो वंचित मतदार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पारड्यात भरघोस मते घालून प्रचंड मताने विजयी करणार आहे.त्यामुळे सकल मराठी समाजाचे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की,या धनगर समाजाच्या वंचित घटकातील नवनाथ पडळकर यांची लढाई येथील प्रस्थापित मराठा घराणेशाहीतील सुप्रिया सुळे यांचे बरोबर आहे.त्यामुळे कार्यकर्त्यानी मजबूतपणे नवनाथ पडळकर यांचे कार्य करून त्यांना संसदेत पोहोचवावे.
Friday, March 15, 2019
मी नाराज नाही...आणि नाराज होणारही नाही..! कारण मी वंचित घटक आहे आणि प्रकाश आंबेडकर वंचित घटकांसाठीच लढत आहे….! राजेश खडके सकल मराठी समाज
एकंदरीत सध्याची लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची आणि रोमांचकारी आहे.कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपा-शिवसेना यांच्या “वापर योजने” विरुध्द प्रकाश आंबेडकर यांनी लढा उभा केलेला आहे.गेल्या ७० वर्षात फक्त मतदार म्हणून अलुतेदार आणि बलुतेदार यांचेकडे राजकीय समीकरणातून पाहण्याचा जो दृष्टीकोन होता तो दृष्टीकोन प्रकाश आंबेडकर यांनी बदलेला आहे.त्यामुळे इथली राजकीय व्यवस्था आणि पत्रकारिता ज्यांच्या हातात आहे ते पिसाळलेल्या प्राण्याप्रमाणे वागताना दिसत आहे.त्याचे कारण तसेच आहे शरद पवार यांच्या नातवाला म्हणजे पार्थ पवारला तिकीट मिळणार आहे की नाही किंवा त्याला तिकीट मिळाले ह्या बातम्यांना जास्त जोर देण्यात आलेला आहे.परंतु प्रकाश आंबेडकर यांनी इथल्या राजकीय व्यवस्थेने नाकारलेल्या अलुतेदार आणि बलुतेदार या वंचित घटकांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी त्यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली गेली याचे काही महत्व वाटत नाही.परंतु आम्ही वंचित घटक आहोत त्यामुळे प्रस्थापित विरुध्द आम्हाला उभे करून आमचा मनसन्मानच प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे त्यात दुमत असायचे कारण नाही.परंतु आमच्या सकल मराठी समाजाने जो प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे सादर केला आहे त्या प्रस्तवा संदर्भात काय निर्णय घेतला हे कळविलेले नाही.स्वाभिमान हा आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकविलेला आहे.त्यामुळे आमचे एवढेच म्हणणे होते की,आमचा प्रस्ताव स्वीकारला अगर नाकारला याबाबत आम्हाला कळविणे गरजेचे होते व आहे.ठीक आहे आमचा प्रस्ताव संदर्भात आम्हाला काही उत्तर जरी दिले नाही तरी चालेल परंतु जाहीर झालेल्या उमेदवारांचा प्रचार करणे संदर्भात अधिकृत आदेश वंचित बहुजन आघाडीने द्यावे अशी आमची आजही विनंती आहे.परंतु त्या संदर्भातही अद्याप आम्हाला कोणताही सांगावा नाही म्हणून पुढे काय करावे असा आमच्या सकल मराठी समाजापुढे पेच निर्माण झालेलां आहे.वंचित बहुजन आघाडी बरोबर २६० संघटना आहेत त्यात २६१ वी म्हणून आम्हाला सहभागी करून घ्यावे अशी विनंती आम्ही करीत आहोत.परंतु जर काहीच उत्तर प्राप्त झाले नाहीतर विना आदेश वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारचा प्रचार करणे अतिशोक्ती होईल असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.आणि हा आगावपण करण्याचे धाडस आमची सकल मराठी समाज करू शकत नाही.कारण आम्ही आंबेडकर घराणे मानतो आणि आमच्यासाठी त्यांचा आदेश हा महत्वाचा आहे,लोकशाही उत्सव सुरु झाला आहे आम्हाला त्या उत्सवात सहभागी व्हायचे आहे.शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांची आम्ही कार्यकर्ते आहोत.या लोकशाही उत्सवातून आम्ही बाहेर राहू शकत नाही किंवा घरातही बसू शकत नाही.त्यामुळे मी नाराज नाही...आणि नाराज होणारही नाही..! कारण मी वंचित घटक आहे आणि प्रकाश आंबेडकर वंचित घटकांसाठीच लढत आहे….!
Subscribe to:
Posts (Atom)






