Friday, March 15, 2019

मी नाराज नाही...आणि नाराज होणारही नाही..! कारण मी वंचित घटक आहे आणि प्रकाश आंबेडकर वंचित घटकांसाठीच लढत आहे….! राजेश खडके सकल मराठी समाज


एकंदरीत सध्याची लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची आणि रोमांचकारी आहे.कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपा-शिवसेना यांच्या “वापर योजने” विरुध्द प्रकाश आंबेडकर यांनी लढा उभा केलेला आहे.गेल्या ७० वर्षात फक्त मतदार म्हणून अलुतेदार आणि बलुतेदार यांचेकडे राजकीय समीकरणातून पाहण्याचा जो दृष्टीकोन होता तो दृष्टीकोन प्रकाश आंबेडकर यांनी बदलेला आहे.त्यामुळे इथली राजकीय व्यवस्था आणि पत्रकारिता ज्यांच्या हातात आहे ते पिसाळलेल्या प्राण्याप्रमाणे वागताना दिसत आहे.त्याचे कारण तसेच आहे शरद पवार यांच्या नातवाला म्हणजे पार्थ पवारला तिकीट मिळणार आहे की नाही किंवा त्याला तिकीट मिळाले ह्या बातम्यांना जास्त जोर देण्यात आलेला आहे.परंतु प्रकाश आंबेडकर यांनी इथल्या राजकीय व्यवस्थेने नाकारलेल्या अलुतेदार आणि बलुतेदार या वंचित घटकांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी त्यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली गेली याचे काही महत्व वाटत नाही.परंतु आम्ही वंचित घटक आहोत त्यामुळे प्रस्थापित विरुध्द आम्हाला उभे करून आमचा मनसन्मानच प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे त्यात दुमत असायचे कारण नाही.परंतु आमच्या सकल मराठी समाजाने जो प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे सादर केला आहे त्या प्रस्तवा संदर्भात काय निर्णय घेतला हे कळविलेले नाही.स्वाभिमान हा आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकविलेला आहे.त्यामुळे आमचे एवढेच म्हणणे होते की,आमचा प्रस्ताव स्वीकारला अगर नाकारला याबाबत आम्हाला कळविणे गरजेचे होते व आहे.ठीक आहे आमचा प्रस्ताव संदर्भात आम्हाला काही उत्तर जरी दिले नाही तरी चालेल परंतु जाहीर झालेल्या उमेदवारांचा प्रचार करणे संदर्भात अधिकृत आदेश वंचित बहुजन आघाडीने द्यावे अशी आमची आजही विनंती आहे.परंतु त्या संदर्भातही अद्याप आम्हाला कोणताही सांगावा नाही म्हणून पुढे काय करावे असा आमच्या सकल मराठी समाजापुढे पेच निर्माण झालेलां आहे.वंचित बहुजन आघाडी बरोबर २६० संघटना आहेत त्यात २६१ वी म्हणून आम्हाला सहभागी करून घ्यावे अशी विनंती आम्ही करीत आहोत.परंतु जर काहीच उत्तर प्राप्त झाले नाहीतर विना आदेश वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारचा प्रचार करणे अतिशोक्ती होईल असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.आणि हा आगावपण करण्याचे धाडस आमची सकल मराठी समाज करू शकत नाही.कारण आम्ही आंबेडकर घराणे मानतो आणि आमच्यासाठी त्यांचा आदेश हा महत्वाचा आहे,लोकशाही उत्सव सुरु झाला आहे आम्हाला त्या उत्सवात सहभागी व्हायचे आहे.शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांची आम्ही कार्यकर्ते आहोत.या लोकशाही उत्सवातून आम्ही बाहेर राहू शकत नाही किंवा घरातही बसू शकत नाही.त्यामुळे मी नाराज नाही...आणि नाराज होणारही नाही..! कारण मी वंचित घटक आहे आणि प्रकाश आंबेडकर वंचित घटकांसाठीच लढत आहे….!

No comments:

Post a Comment