राज्यातील
अनुसूचित जमातीच्या मुलांना व मुलींना विमान सेवेत एअर होस्टेस, कॅबिन
क्रू, हॉटेल व वाहतूक व्यवस्थापन, कस्टमर केअर या कोर्सेसचे प्रशिक्षण
देण्याची योजना 2012-2013 या वर्षापासून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला
आहे.
या कोर्सेसच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या नियमानुसार
तसेच प्रशिक्षणासाठी व त्यानंतर लाभार्थ्यांस वरील सेवा क्षेत्रात रोजगार
प्राप्त होण्यासाठी विहित केलेली शैक्षणिक पात्रता, शारीरिक क्षमता धारण
करणाऱ्या आदिवासी युवक, युवतींमधून प्रशिक्षणार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड
करण्यात येईल. यामध्ये आदिवासी जमातीच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात
येईल.
निवड प्रक्रियेसाठी आदिवासी आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती
स्थापन करण्यात येणार असून या समितीमध्ये अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी
यांचा समावेश करण्यात येईल. या समितीतर्फे उमेदवारांच्या मुलाखती घेऊन
गुणवत्तेनुसार प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली जाईल. या योजनेचे फॉर्म सर्व
प्रकल्प कार्यालयातून विनाशुल्क उपलब्ध होतील.
आदिवासी आयुक्त या योजनेचे नियंत्रक असून संबंधित आदिवासी विकास अपर आयुक्त
यांच्यामार्फत संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी हे या
कार्यक्रमाची अंमलबजावणी करतील.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर
उपलब्ध असून त्यांचा संगणक सांकेतांक क्र. 201209281244552100 असा आहे.
No comments:
Post a Comment