छत्रपती संभाजी महाराज
यांच्या हत्येचा बदला भीमा कोरेगाव याठिकाणी १८१८ मध्ये ज्या अठरा अलुतेदार आणि
बारा बलुतेदार यांनी घेतला ते लोक आपल्या पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी आले होते.अशा
स्वराज्याच्या रयतेवर मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या वैदिक
धर्म पंडितांच्या वंशजांनी हल्ला करून आम्ही स्वराज्याचे पर्यायाने या भारत देशाचे
विरोधक कसे आहोत हे दाखवून दिले आहे. अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार यांचे
कुलदैवत एकच आहे आणि ते म्हणजे ज्योतिबा खंडोबा आणि जगदंबा होय.वैदिक धर्म पंडित
यांचे कुल वेद असून यांची देवता (पूर्वज) ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी
गणपती आहेत जे जानवे घालतात.आपले देवता म्हणजे पूर्वज जानवे घालीत नाही.आपले कुलदैवत
एकच असल्याने आपणही एकच आहोत. ज्योतिबा खंडोबा आणि जगदंबा आपले कुलदैवत असताना आपला
ज्या व्यक्ती बरोबर संबध नाही असा अयोध्याचा रहिवासी राम जो या आर्य सनातनी हिंदू
यांचा असून त्या राम नावाला आपल्या महाराष्ट्र राज्यात अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार
यांच्या मानसिकतेमध्ये वसविला गेलेला आहे.ज्योतिबा खंडोबा आणि जगदंबा
यांच्यापेक्षा त्या राम नावालाच जास्त महत्व दिले आहे.बऱ्याच सिंधुतील हिंदू लोक
अंत्यसंस्कार करतेवेळी या राम नावाच्या घोषणा देत असतात मला असे वाटते ही बाबा
योग्य नाही.जेथे आपले कुलदैवत ज्योतिबा खंडोबा आणि जगदंबा असताना यांच्या नावाचा
पुकारा होण्या एवजी आपण राम नावाचा पुकारा देऊन आपले दैवत आपले पूर्वज ज्योतिबा
खंडोबा आणि जगदंबा यांचा अपमान करीत आहे असे मला सिंधुतील हिंदू म्हणून वाटत आहे.जे
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण असणारे व मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे व मिलिंद
एकबोटे यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवराय यांचा विश्वासघात करून त्यांचेवर
विषप्रयोग करून त्यांची हत्या केली,शिवरायांचे अंत्यदर्शन रयतेला होऊ दिलेले नाही.....आणि
त्यांचेवर अंत्यसंस्कार न करता त्यांना भडाग्नी देण्यात आला.छत्रपती संभाजीराजे
यांचेवर तीन वेळा विषप्रयोग करण्यात आला त्यातून ते बचावले गेले.शेवटी त्यांचे बरोबरही
विश्वासघात करून त्यांना औरंगाजेबाच्या माध्यमातून मनुस्मृती प्रमाणे त्यांची
हत्या करण्यात आली.शंभूराजे यांनी बांधलेली शिवरायांची समाधी याच मनोहर कुलकर्णी
उर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या पूर्वजांनी लपवून टाकली होती.अशा हे लोक
हिंदू धर्माच्या राम नावाच्या खाली पदोपदी शिवराय व शंभूराजे यांचा अपमान करीत
आहे.जेव्हा भीमा कोरेगाव दंगलीचे हे लोक आरोपी झाले तेव्हा यांना अटक करण्याची वेळ
आली तेव्हा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडवणीस यांनी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी
भिडे यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.अठरा पगड जातीतील जनसमुदाय याला
याच राम नावाच्याखाली एकत्र करून मोर्चा काढण्यासाठी उद्हुक्त केले मात्र
पुण्यातील सिंधुतील हिंदू मराठा समाज बांधव मातंग समाज बांधव आणि भोई समाज बांधव
यांच्या अशा भूलथापांना बळी पडला नाही तो या मोर्चात सहभागी होताना दिसला नाही.कारण
त्याला आता माहित झाले आहे की,आपले दैवत आपले पूर्वज ज्योतिबा
खंडोबा आणि जगदंबा आहेत.
No comments:
Post a Comment