Saturday, March 2, 2019

पुण्यात झालेल्या बाॅम्ब स्फोटामागे...आणि नरेंद्र दाभोळकर हत्येच्या आरोपीच्या मागे मनुवादी असल्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी त्यांचे संरक्षण करीत होते काय…? राजेश खडके सकल मराठी समाज

बारामती लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने सभा आयोजित केली होती….या सभेला अलोट गर्दीचा जनसागर लोटणार नाही याची तजवीज स्थानिक नेत्याकडून करण्यात आलेली होती यात काय कोणाचे दुमात असायचे कारण नाही.परंतु या सभेला गर्दी होण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.एकंदरीत प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणांची मीमांसा जर केली तर अतिशय मार्मिक आणि गंभीर भाषण करीत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ते त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.परंतु वंचित घटक त्यांच्या पाठीशी प्रामणिकपणे उभा रहातोय का हे पहाणे अत्यंत महत्वाचे आहे.आता लोकसभेच्या निवडणुकांची तारीख केव्हाही घोषित होईल.त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस बरोबर जाणार नसल्याचे चित्र जवळ जवळ स्पष्ट होताना दिसत आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीत स्वार्थ भावनेने सहभागी झालेल्या लोकांच्या मनात काहूल माजू लागल्याचे जाणवत आहे.याचा काहीही परिणाम बाळासाहेब आंबेडकर यांचेवर होणार नाहीये.पाकिस्तान हा भारताचा शांततेचा आणि विकासाचा कट्टर शत्रू आहे त्यामुळे त्याठिकाणी असणारे सर्व दहशतवादी कॅम्प भारताने उध्वस्त केले पाहिजे असे ते म्हणाले.परंतु एकाच ठिकाणी हल्ला करून नरेंद्र मोदी फक्त निवडणुकीचे राजकारण करीत आहेत.सामन्य माणूस सैन्यात देशसेवा करण्यासाठी भरती होतो परंतु त्याच्या मृत्यूचे राजकारण स्वार्थापायी केले जात असल्यामुळे इथले सरकार खरेच देशप्रेमी आहे का…? असा प्रश्न उपस्थित होत आहे.देशातील सरकारी खजाना सरळ पद्धतीने कॉंग्रेस लुटत होती आता नरेंद्र मोदी कंपनीच्या माध्यमांतून म्हणजे त्रयस्त पद्धतीने तो खजिना लुटत आहे.धर्म संकटात आलेला आहे असे जे लोक म्हणतात त्यांचा आणि हिंदू संस्कृतीचा काहीही संबध नाही कारण आमचे कुलदैवत ज्योतिबा-खंडोबा-जगदंबा आहेत...कोणताही आरएसएसवाला खंडोबाच्या जत्रेला येत नाही किंवा छत्रपती संभाजी महाराज हे मानीत असलेल्या मरीआईची पूजा करीत नाही.त्यामुळे कोणताही धर्म संकटात आलेला नाही याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे.कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात पुण्यातील जर्मन बेकरी आणि फर्गुसन कॉलेज येथील झालेले बाॅम्ब स्फोटातील आणि नरेंद्र दाभोळकर यांचे आरोपी का सापडत नाही.कारण कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे मनुवादी व्यवस्थेच्या पाठीशी उभे आहेत आणि इथला मनुवाद जोपासत असल्यामुळे त्यांना आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणायचे नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाआघाडीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.



No comments:

Post a Comment