गेल्या ४० वर्षापासून जी धडपड प्रकाश आंबेडकर करीत आहे त्याला २०१९ ला आंबेडकरी समर्थकांनी प्रामणिकपणा दाखविल्यास.....पुरोगामी महाराष्ट्राचे उद्याचे मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर असतील यात काही कोणाचे दुमत असायचे कारण नाही.१९५६ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या असत्या तर नक्कीच राजगृहाशिवाय देशात पर्याय राहिला नसता आमच्य या म्हणण्याला कोणी नाकारेल असे आम्हाला वाटत नाही.परंतु काही नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करून आंबेडकर घराणे राजकारणापासून दूर ठेवले होते.परंतु १९८४ ला प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणात प्रवेश करून इथल्या वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत होते.परंतु इथे असणारी अन्नोजी दत्तोच्या टीम नेहमी त्यांना बदनामीच्या छायेत ठेवण्याचा प्रयत्न करीत होती व करीत आहे.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहासाकडे बघा या संदेशाकडे कधीही कोणी पाहिले नाही मात्र २०१८ ला प्रकाश आंबेडकर यांनी इतिहासाकडे पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की,स्वराज्यातील अलुतेदार आणि बलुतेदार हा महत्वाचा घटक असून इथल्या मनुवादी व्यवस्थेने त्यांना विकासापासून दूर ठेवले आहे.आणि काही मोजक्या घराणेशाहीच्या हातात इथली सत्ता दिलेली आहे.त्यामुळे इथली घराणेशाही मोडीत काढल्याशिवाय इथल्या वंचित घटकांना न्याय मिळणार नाही.तेव्हा भगव्याचा विरोध कितपत यीग्य आहे याचा शोध घेतला पाहिजे.जेव्हा प्रकाश आंबेडकर यांना भगव्याचा शोध लागला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की,मनुवादी व्यावस्था आणि भगव्या ध्वजाचा काहीही संबध नाही.जो इतिहासाचा जाणकार आहे त्याला भगव्या ध्वाजाचा इतिहास माहित आहे.ज्याला तो इतिहास माहित नाही त्याने त्याचा अभ्यास केला पाहिजे.त्याने आभ्यास केल्यास नक्कीच त्याला इथली सिंधू संस्कृती आणि २२ प्रतिज्ञा यात कोणताही फरक जाणविणार नाही.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केल्यानंतर हेगडेवार यांनी १९२५ मध्ये आरएसएस स्थापन करून त्या संस्थेला भगवा ध्वज न घेता स्वस्तिक असलेली काळा ध्वज घेतला होता.पुरोगामी विचारांची संघटना म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांनी १९६६ ला शिवसेना स्थापन करून त्या संघटनेला भगवा ध्वज स्विकारला होता.परंतु प्रबोधनकार ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्या भगव्या ध्वजाला हिंदुत्ववादी विचारसरणीची जोड दिली.जनसंघाचे रुपांतर भारतीय जनता पार्टीत झाले तेव्हा त्यांनी १९८० मध्ये हिंदुत्ववादी भगवा ध्वज स्वीकारून तो समतेपासून कधी दूर नेला हे आपल्याला कळलेच नाही.म्हणून आज त्या समतावादी भगव्या ध्वजाला आपण हिंदुत्ववादी ध्वज म्हणून पाहतोय.असो हा इतिहास खूप मोठा आहे पुढे हळू हळू याचे विश्लेषण देईल,परंतु इतिहासाची ओळख किती महत्वाची असती हे आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलेले आहे.म्हणून आरएसएसचे खरे रूप जगासमोर मांडण्याचा आभ्यास प्रकाश आंबेडकर यांचा झाला आहे.त्यामुळे आर]एसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचे कार्य सुरु करून प्रकाश आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने इथल्या वंचित घटकांना न्याय देण्याचे कार्य सुरु केले आहे.परंतु या आरएसएसचे पालन पोषण इथली कॉंग्रेस करीत असल्यामुळे त्यांना आरएसएसला रोखायचे नाही म्हणूनच ते संविधानाच्या चौकटीत बसविणे संदर्भात कोणतीही पावले उचलत नाही.त्यांची ही भूमिका इथल्या अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेऊन मोठ्या संखेने वंचित बहुजन आघाडीत सहभागी झाले आहेत.परंतु स्वत:ला आंबेडकर चळवळी कार्यकर्ता म्हणविणारा मोठ्या प्रमाणात प्रकाश आंबेडकर यांना आणि त्यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचे काम करीत आहे.एकतर त्याला इतिहासाचा आभ्यास नसेल किंवा स्वार्थ भावनेपोटी तो विरोध करीत असेल परंतु जर खरा आंबेडकर समर्थक प्रामणिकपणे प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभा राहिला तर...आंबेडकर घराण्यातील वारस उद्याचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.
आदरणीय खडकेसर,मी आपले विचार वाचले असून ते खोलवरच्या इतिहासाच्या अभ्यासातून व्यक्त केल्याचे जाणवत असून,आपण बाळासाहेबा विषयी मुखमंत्री होण्याबाबतचे विचार योग्यच असून ते आपलया समुदायाच्या सहकार्या शक्य नसल्याचे मला वाटते.
ReplyDeleteधन्यवाद