साहेब आमच्या सकल मराठी समाजाचे कार्य आपणास माहित आहे.सिंधू संस्कृतीपासून ते भीमा कोरेगाव पर्यंत सत्य इतिहास आमच्या सकल मराठी समाजाने जनतेसमोर आणला आहे.त्यामध्ये वारकरी सांप्रदाय समतावादी विचारावर कार्य करणारे होते म्हणून संत परंपरेतून आलेले संत कबीर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानले होते.बुध्द-धम्म-संघ विचारांचे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी स्थापित केले होते.रयतेला हे स्वराज्य आपले वाटावे यासाठी छत्रपती शिवरायांनी संविधान तयार केले होते.म्हणून संविधान सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्याचा उच्चार केला होता.वयाच्या १४ व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज यांनी “बुधभूषण” नावाचा ग्रंथ लिहून बुध म्हणजे विद्वान आणि भूषण म्हणजे गौरव करण्यासारखा असे विश्लेषण आपल्या पर्यंत पोहचून बोधिसत्व वृक्षाचे महत्व समजून घेऊन छत्रपती संभाजी महराज यांनी त्यांची राजमुद्रा पिंपळाच्या पानावर म्हणजेच बोधीसत्व वृक्षाच्या पानावर कोरलेली आहे.म्हणजेच पहिला बुध्द छत्रपती संभाजी महाराज यांना कळाले म्हणून ते शाक्त पंथीय होते.म्हणून त्यांना समतावादी स्वराज्यरक्षक संभाजी महाराज असे म्हणतात.अशा शंभूराजे यांची वैदिक धर्म पंडितांनी औरंगाजेबाच्या माध्यमातून मनुस्मृती प्रमाणे हत्या केली असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कळाले होते.असे बुध्द-धम्म-संघ विचारांचे स्वराज्य आणि समतावादी राजा महात्मा ज्योतिबा फुले यांनी जगासमोर आणल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांनाही गुरु मानले होते.छत्रपती संभाजी महाराज यांचा “बुधभूषण” ग्रंथ लक्षात ठेऊन त्यांनी “बुध्दभूषण” नावाची प्रिंटींग प्रेस उभारली होती.तीच प्रिंटींग प्रेस रत्नाकर गायकवाड याने जमीनदोस्त याच मनुवादी सरकारच्या काळात केली होती आणि अशा मनुवादी रत्नाकर गायकवाड याला अमित भुईगळ या प्रकाश आंबेडकर समर्थकाने चांगला चोप दिला होता.अशा समतावादी बुध्द-धम्म-संघ विचारांचा राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला ज्या वीर योध्यांनी भीमा कोरेगाव येथे घेतला त्या वीरांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवंदना देऊन तीच मनुस्मृती स्वराज्याची राजधानी रायगडच्या परिसरात दहन केली होती.अशा ऐतिहासिक पुणे शहरात आम्ही अलुतेदार आणि बलुतेदार यांचे एकत्रीकरण करून सकल मराठी समाजाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम गेल्या पाच वर्षापासून करीत आहोत.अशा मनुला गाढण्यासाठी आणि छत्रपती शिवराय यांचे संविधान वाचविण्यासाठी या वैदिक धर्म पंडितांच्या विरोधात जो लढा प्रकाश आंबेडकर यांनी उभा केलेला आहे.तो म्हणजे स्वराज्याच्या अलुतेदार आणि बलुतेदार यांना वंचित ठेवण्याचे कार्य इथली आरएसएसने केले आहे.अशा दहशवादी आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा जो विडा उचलेला आहे त्यामध्ये आमच्या सकल मराठी समाजचे योगदान असावे.संविधान वाचविणे हे या देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य आहे.असे मानून आमच्या सकल मराठी समाजाच्या वतीने संसदीय राजकारण सुरु केले आहे.यासाठीचा लोकहित,जनहित तसेच इतिहास जतन करणारा प्रस्ताव आपल्या वंचित बहुजन आघाडीकडे आम्ही सादर केलेला आहे.अद्याप तो मंजूर करण्यात आलेला नसून त्याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही.त्यामुळे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचेकडे आम्ही विंनती करतो की आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे आदेश करावेत.कोणतेही कार्य स्वाभिमानाने करावे असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितले आहे.म्हणून आमचा स्वाभिमान अबाधित रहावा ही विंनती.संसदीय राजकारण हा लोकशाहीचा गाभा असल्यामुळे आम्हाला संसदीय राजकारण म्हणून कोणती तरी भूमिकी स्पष्ट करावी लागेल.म्हणून साहेब आमचा प्रस्ताव मान्य करा…..नाहीतर आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे काम करण्याचे आदेश द्या….!
No comments:
Post a Comment