आम्ही सत्यशोधक चळवळीची माणसं….महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्या विचारावर कार्य करणारे लोक आहोत.त्यामुळे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे “सत्य शोधणे हाच खरा धर्म” हे मानून तेच सत्य शोधण्याचा गेल्या पाच वर्षापासून सकल मराठी समाजाच्या माध्यमातून करीत आहोत.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला खरा इतिहास शोधत आहोत.त्यामुळे तो आम्हाला सापडला आणि तो इतिहास म्हणजे छत्रपती शिवराय यांचे स्वराज्य समतावादी स्वराज्य होते….बुध्द-धम्म-संघ विचारांचे स्वराज्य होते असे समोर आलेले आहे.त्यामुळे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे थोर विचार आम्हाला भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक युध्दातून पुढे आल्यामुळे तो सत्य इतिहास आम्ही अलुतेदार आणि बलुतेदार यांचे समोर मांडण्याचा प्रयत्न केला.त्यातून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी अलुतेदार आणि बलुतेदार यांचा इतिहास नाकरून त्यांना वंचित ठेवण्याचे जे कार्य बामणी व्यावस्थेकडून झाले आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन त्या वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका स्पष्ट केल्यामुळे त्यांच्या आघाडीत सहभागी होऊन कार्य करण्याचा मानस आमच्या सकल मराठी समाजाने करून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची भेट मागितलेली होती.आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समतावादी राज्याभिषेक अभिवादन कार्यक्रम घेण्यात आलेला होता.वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी १ जानेवारी २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीकडे प्रस्ताव सादर केला होता.प्रस्ताव सादर करून तो मान्य होणे संदर्भात पाठपुरावा करीत आहोत.सदरच्या प्रस्तावा संदर्भात आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी नऊ महिन्यापासून आम्ह्यी रांगेत उभे आहोत.प्रास्ताविक मागण्यांचे काय झाले कोणी सांगायला तयार नाही पाठपुरावा केला असता थोड्याच दिवसात भेट होईल असे सांगितले जाते परंतु अद्याप भेट झालेली नाही.सादर प्रस्ताव हा लोकहित आणि जनहित तसेच इतिहास जतन करणारा आहे.आता केव्हाही लोकसभेच्या निवडणुका घोषित होण्याच्या मार्गावर आहे.वंचित बहुजन आघाडीची कोणतीही भूमिका सकल मराठी समाजा संदर्भात स्पष्ट होत नसल्यामुळे आम्ही संभ्रम अवस्थेत आहोत.आम्ही कार्य करणारी माणसं आहोत.संसदीय राजकारण करणे आमचे कर्त्यव्य आहे असे आम्ही मानतो.त्यामुळे जर वंचित बहुजन आघाडीने कोणताही निर्णय घेतला नाही तर आम्हाला आमचे कार्य करणे अवघड होईल.त्यामुळे आमची विनंती आहे आमच्या ऐतिहासिक कार्याचा सन्मान वंचित बहुजन आघाडीने करावा...!
अहो राजेश खडके तुम्ही लिहीत आहेत कि "त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला खरा इतिहास शोधत आहोत.त्यामुळे तो आम्हाला सापडला आणि तो इतिहास म्हणजे छत्रपती शिवराय यांचे स्वराज्य समतावादी स्वराज्य होते…" ज्योतिबा फुले शिवरायांबद्दल काय लिहितात हे तुम्हाला वाचायचे आहे काय ?तर वाचा "म फुले समग्र वैङ्मय पान न ५६९ ३री आवृत्ती पुस्तक अस्पृश्यांची कैफियत
ReplyDelete"आमच्या शूद्र लोकांचे राज्य आल्यावर तरी आमच्या स्तिथीत काही फरक पडला काय ?आमच्या मराठे लोकांचे राज्य स्थापित झाल्यावर अहमस सुख मिळण्याचा व आमच्या अडचणी दूर होण्याचा संभव होता .परन्तु काही झाले नाही .का आमच्या स्तिथीत फरक झाला नाही याचे काही तरी कारण असावे .शिवाजी आपण राजा होण्याचे कारण फक्त" गो-ब्राह्मणांचे रक्षण कारण्याकरिताच " असे उघड सांगत होता व तो आपल्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणी धर्माचे रक्षणही करीत होता .मुसलमान धर्माचे राज्य असल्याकारणाने ब्राह्मणीधर्माचे चांगले संरक्षण होत नाही असे त्याचे मत होते "
फुले पुढे लिहितात
"शूद्र राजा असूनही आसपासची स्तिथी अशी असता व त्याचे मत अशा प्रकारचे असता आमच्या दुःखाचा बोजा व आमच्या अडचणी कमी होतील हे कधीही संभवणार नाही .मुसलमानी राज्यात आमच्या स्तिथीचे जे स्वरूप होते ,त्यापेक्षा भयंकर व दुःसह स्तिती मराठे लोकांच्या राज्यात झाली असे म्हणण्यास बाध येणार नाही "
तुम्ही पुढे लिहीत आहेत कि "त्यामुळे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे थोर विचार आम्हाला भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक युध्दातून पुढे आल्यामुळे तो सत्य इतिहास आम्ही अलुतेदार आणि बलुतेदार यांचे समोर मांडण्याचा प्रयत्न केला" भीमा कोरेगावच्या लढाईबद्दल बाबासाहेब काय म्हणतात ते वाचा
सन १९२७ साल उजाडले आंबेडकरांनी त्या वर्षातील कार्याचा आरंभ कोरेगाव उध्यस्मारकासमोर भरलेल्या सभेने केला त्या सभेत भाषण करताना आंबेडकरांनी कृतघ्न ब्रिटिश सरकारचा जळजळीत शब्दात निषेध केला .ज्या महार जातीच्या शेकडो सैनिकांनी अनेक लादह्यात सरकारला यश मिळवून दिले त्या महार जातीच्या तरुणांना सैन्यात प्रवेश नाकारून सरकारने तिचा विश्वासघात केला आहे असे त्यांनी आपले मत उघडपणे बोलून दाखविले ब्रिटिशांच्या बाजूने महार सैनिकांनी लढावे हि काही विशेष अभिमानाची गोस्ट नाही हे खरे आहे "असेही ते म्हंटले पण ते ब्रिटिशांच्या मदतीस का गेले पोट भरण्याचे काही साधन नसल्यामुळे नाईलाजाने ते ब्रिटिश सरकारच्या फॉऊंजेत भरती झाले आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे असेही ते म्हणाले आपल्या भाषांच्या शेवटी ते म्हणाले कि महारावरची लष्कर प्रवेश बंदी ब्रिटिश सरकारने उठवावी .जर सरकारने हि गोस्ट केली नाही तर सरकारविरुद्ध चळवळ करावी ,अशी त्यांनी मोठ्या आवेशाने त्या समाजास चेतना दिली "(संदर्भ .बाबासाहेब आंबेडकर यांचे धनंजय किर यांनी लिहिलेले चरित्र ४ठी आवृत्ती सातवे पुनर्मुद्रण पान न ७६ )
अहो राजेश खडके तुम्ही लिहीत आहेत कि "वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी १ जानेवारी २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीकडे प्रस्ताव सादर केला होता.प्रस्ताव सादर करून तो मान्य होणे संदर्भात पाठपुरावा करीत आहोत.सदरच्या प्रस्तावा संदर्भात आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी नऊ महिन्यापासून आम्ह्यी रांगेत उभे आहोत.प्रास्ताविक मागण्यांचे काय झाले कोणी सांगायला तयार नाही पाठपुरावा केला असता थोड्याच दिवसात भेट होईल असे सांगितले जाते परंतु अद्याप भेट झालेली नाही.सादर प्रस्ताव हा लोकहित आणि जनहित तसेच इतिहास जतन करणारा आहे.आता केव्हाही लोकसभेच्या निवडणुका घोषित होण्याच्या मार्गावर आहे.वंचित बहुजन आघाडीची कोणतीही भूमिका सकल मराठी समाजा संदर्भात स्पष्ट होत नसल्यामुळे आम्ही संभ्रम अवस्थेत आहोत" पण तुम्हाला माहित आहे काय कि या वंचित बहुजन आघाडीने MIM सोबत आघाडी केली आहे आपल्या थॉट्स ऑफ पाकिस्तान या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकर लिहितात "हा ग्रंथ हिंदूंच्या मनावर हि गोस्ट ठसविण्याचा प्रयत्न करतो कि ,ज्यांची भारतावरील निष्ठा संशयास्पद आहे ,ते मुसलमान हिंदुस्थानात राहून शत्रुत्व करीत राहण्यापेक्षा हिंदुस्थान बाहेर राहून शत्रुत्व करीत राहिले तरी चालेल .आपसातील यादवी ऊध्ये नाहीशी करण्यासाठी जशी तुर्कस्तान ग्रीस बल्गेरिया या देशातील यच्चयावत विधर्मीय लोकांची जशी अदलाबदल केली ,तशी हिंदुस्थानातून मुसलमानांची व संकल्पित पाकिस्तानातून हिंदूंची अदलाबदल करावी .शांतता प्रस्थापित करण्यासाठी व एकजिनसी राष्ट्र निर्माण होण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे "
ReplyDeleteआंबेडकर पुढे म्हणतात "मुसलमानांच्या मनावर लोकशाहीचा प्रभाव पडत नाही मुसलमानांना जर कशाविषयी प्रबळ आस्था वाटत असेल तर ती धर्माविषयी .त्यांचे राजकारण हे मुख्यतः धर्मनिष्ठ असते .इस्लामचे बंधुत्व हे सर्वव्यापक नाही सार्वत्रिक नाही ते बंधुत्व मुसलमान समाजाच्या अनुयायांपुरतेच मर्यादित असते. मुसलमानेतरांविषई त्यात तिरस्कार आणि शत्रुत्वच असते,मुसलमानांची राज्यनिष्ठा मुसलमान राज्य करीत असलेल्या देशशीस असते .ज्या देशावर मुसलमान राज्य करीत नाही ती त्याची शत्रुभूमी .म्हणून मुसलमानांचा हिंदुस्थान हि मातृभूमी आहे नि हिंदू हा आपला इष्टमित्र आहे असे विचारही त्याचा मनास शिवू देणार नाही ,असे या ग्रंथाचे म्हणणे आहे .आक्रमक वृत्ती हि मुसलमानाला मिळालेली नेसर्गिक देणगी आहे ते हिंदूंच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन झोडगिरीचा अवलंब करतात "(संदर्भ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लेखक धंनजय किर चौथं आवृत्ती सातवे पुनर्मुद्रण पान न ३६९ व ३७०)
आणि आता प्रकाश आंबेडकर MIM या कट्टर मुस्लिम संघटनेबरोबर युती करून (जी संघटना रझाकारांची होती ज्यांनी हिंदूंवर अन्याय व अत्याचार केले होते ज्यात मुख्यतेवकरून दलित बहुसन्ख होते अशा) बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करीत आहेत
ज्या MIM चा अकबरुद्दीन ओवेसी उघडउघड म्हणतो कि १५ मिनिटे पोलीस बाजूला सारा २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना ठार मारतील असा ओवेसींच्या पक्षाबरोबर युती करून बाबासाहेबांबरोबर गड्डरी आणि देशद्रोह करीत आहेत .हा MIM हा पक्ष कासीम रिझवी याने स्थापन केली ज्यांचे म्हणणे होते कि हैदराबाद संस्थान (ज्यात मराठवाडा ,कर्नाटक मधील काही भाग आणि अंधार प्रदेश ) पाकिस्तानात विलीन करा अशी मागणी असलेला हा पक्ष या पक्षाविरुद्ध काँग्रेस पक्ष तर लढलाच पण अगदी क्रांतीसिंह नाना पाटील जी डी बापू लाड यांनी सशस्त्र संघर्ष केला MIM या पक्षाबरोबर युती करणे म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा खून करण्यासारखे आहे
त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा खून केला आहे तुम्ही त्यांचेबरोबर जाऊन त्या कृत्यात सामील होऊ नका
साहेब लवकरच निर्णय घेतील या संदर्भात.🙏
ReplyDelete