छत्रपती शिवाजी महाराज यांनी इथला अलुतेदार आणि बलुतेदार यांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापित केले. राज्याभिषेक करून साऱ्या जगामध्ये असा संदेश दिला की,हे रयतेचे राज्य आहे.आणि या राज्यात महिलेच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली आहे.शेतकऱ्याच्या देठाला त्याच्या परवानगी शिवाय हात लावता येणार नाही.म्हणून रयतेच्या राज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे संविधान निर्माण केले त्यामुळे पहिले संविधान देण्याची भूमिका शिवरायांनी राबविलेली आहे.त्यामुळे वैदिक धर्म पंडितांना त्यांची मनुस्मृती राबविता येत नव्हती त्यातच छत्रपती शिवाजी महराज यांचा अकस्मात मृत्यू झाला.नंतरच्या काळात त्यांची विषप्रयोग करून हत्या केल्याचे पुढे आल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांनी वैदिक पंडित यांचेवर केस दाखल करून सुनावणी घेऊन दोष सिद्ध झाल्यावर त्यांना हत्तीच्या पायी दिले आहे.स्वराज्यमध्ये हिंदू-मुस्लीम असा भेद कधीच नव्हता तो लढा मोगलशाही विरुध्द होता.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी होते असा जो संदेश वैदिक धर्म पंडीत यांच्याकडून १९९५ नंतर देण्यात आलेला आहे.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या झालेल्या हत्येनंतर पेशवाईचा उगम झाला आणि त्यानी सर्वात पहिले स्वराज्यातील स्त्रीचे संरक्षण धोक्यात आणले होते.इथला शेतकरी देशोधडीला लावण्याचे काम पेशवाईच्याच काळात सरू झाले.स्वराज्य स्थापनेतील अलुतेदार आणि बलुतेदार यांना देव नावच्या संकल्पनेत उतरून त्यांचेवर एक दहशत बसविण्याचे कार्य सुरु झाले.देव संकल्पनेवर इथला माणूस माणसापासून वेगळा करण्यात आला.काहीना शुद्र तर काहीना अतिशूद्र म्हणून अस्पृश्यता निर्माण करण्यात आली.स्वराज्यातील गुप्तचर यंत्रणा संपवून स्वत:ची गुप्तचर यंत्रणा उभारण्यात आली.छत्रपती शिवरायांनी वैदिक धर्म पद्धतीत केलेला पहिला राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथानुसार २४ सप्टेंबर १६७४ मध्ये केलेला होता.याच दिनाचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.या दोन्ही दिवसाचे औचित्य साधून डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दलाची स्थापना केली होती.छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या “बुध्दभूषण” ग्रंथाचे वाचन डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी केले होते.छत्रपती संभाजी महराज यांची राजमुद्रा पिंपळाच्या पानावर कोरलेली होती.त्यामुळे डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी “बुध्दभूषण” नावाची प्रिंटींग प्रेस सुरु केली होती.आजही भारतरत्न हा पुरस्कार पिंपळाच्या पानावर दिला जातो.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे कट्टरवादी नसताना त्यांना “धर्मवीर” बनविण्यात आले.अशा स्वराज्याच्या संविधानाचा आभ्यास डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचा झालेला होता.त्यामुळेच समता सैनिक दल संपविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आलेली होती.आज हीच संघटना देशाचे संविधान बदलत चालली आहे.देशात समांतर प्रशासन व्यवस्था चालवीत असून आता त्यांनी दहशतवादी कॅम्प उभारले आहेत असे पनवेलच्या भाषणात बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे.त्यामुळे खरेच जर ही व्यावस्था बदलायची असेल तर इथली कुटुंबशाही बदलायला हवी या प्रकाश आंबेडकर यांच्या मताशी आमची सकल मराठी समाज सहमत आहे.त्यामुळे एकंदरीत देशाची परिस्थिती जर पाहिली तर खरेच डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी उभारलेली लोकशाही संपविण्याच्या मार्गावर आहे हे आरएसएस भाजापा मोदीच्या चाललेल्या राजकारणा वरून वाटत आहे.त्यामुळे आमच्या सकल मराठी समाजचे असे मत आहे की,शिवरायांचे स्वराज्य संपविले…..आणि आता डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी उभारलेली लोकशाही संपविण्याच्या मार्गावर आहे.
No comments:
Post a Comment