Saturday, March 9, 2019

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनम्र आवाहन….आमच्या सकल मराठी समाजाला समाहून घेण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे गळ घाला…! राजेश खडके सकल मराठी समाज

          गेल्या दोन वर्षापासून भीमा कोरेगाव ते वढू बुद्रुक असा संबध असल्याचे इतिहास सांगत असल्याचे आम्ही सांगत होतो.तशी मांडणीही आंम्ही वेळोवेळी करीत आलो होतो.इतिहासातील महार योध्दा हा प्रामणिक होता आणि शिवराय यांनी उभारलेल्या स्वराज्यात त्याचे मुख्य स्थान होते.अशा महार योध्यांचा इतिहास बाहेर येऊ नये म्हणून शुद्रातून अति शुद्र म्हणून अस्पृश्यता निर्माण करण्यात आलेली होती.ही अस्पृश्यता मजबूत व्हावी आणि इतिहासातील अलुतेदार आणि बलुतेदार यांचा इतिहास भविष्यात कोणाला कळू नये यासाठी मराठा ही जात निर्माण करण्यात आली.छत्रपती संभाजी महाराज बौध्द लेण्याना महत्व देत असत त्यामुळे त्यांची मनुस्मृती प्रमाणे हत्या करून त्या हत्येला धार्मिक रूप देण्यात आले होते.परंतु या संभाजी राजांना वाचविण्यासाठी अर्जुना महार आणि रायप्पा महार यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले हे कोणी सांगणार नाही.याच शंभूराजे यांच्यावर गोविंद महार याने अंत्यसंस्कार केले हे कोणी सांगणार नाही.महार योध्दा प्रामाणिक होता आणि त्या प्रामणिकपणेची साक्ष भीमा कोरेगाव देतो हे कोणी सांगणार नाही.अशा अस्पृश्य केलेल्या महार योध्यांचा सन्मान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगावला जाऊन त्या वीरांना मानवंदना देऊन महार रेजिमेंट सुरु केली हे कोणी सांगणार नाही.परंतु ५०० विरुध्द २८००० हजार असा मनाचा इतिहास कोणीही सांगत आले तर तो इतिहास आम्ही खरा मानून आमच्या बुद्धीचे प्रदर्शन करीत आलेलो आहोत.परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले होते म्हणून वैदिक धर्म पंडित यांनी त्यांच्या हत्या केल्या आहेत याचीही आठवण काढायला कोणी तयार नाही.स्वराज्यात तलवार उचलली जात होती ती विचारांची तलवार असायची...परंतु शिवरायांना माहित होते की,तलवारीच्या जीवावर स्वराज्य उभे करता येते परंतु उभारलेले स्वराज्य हे तलवारीच्या जीवावर चालविता येत नव्हते तर ते लेखणीच्या जीवावर चालवावे लागते.त्यामुळे स्वराज्यात संविधान होते आणि लोकशाही होती याचीही साक्ष स्वत: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या भाषणात दिलेली आहे.त्यामुळे इतिहासातील हे युध्द मुस्लीम विरोधी नव्हते तर लोककल्याण करण्यासाठी आणि लोकशाही उभारण्यासाठी होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे आज पुन्हा एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभी केलेली लोकशाही आणि त्या लोकशाहीला दिलेले संविधान धोक्यात आलेले आहे.हे संविधान वाचविण्यासाठीचा लढा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी सुरु केला असल्यामुळे ऐतिहासिक असणारा अलुतेदार आणि बलुतेदार योध्दा बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर उतरलेला आहे.यासाठी आमच्या सकल मराठी समाजाला असे वाटते की,अशा लढ्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी उभी केलेली वंचित बहुजन आघाडीत सहभागी होऊन आपले योगदान निश्चित करावे.यासाठी आमच्या सकल मराठी समाजानी वंचित बहुजन आघाडीकडे तसा प्रस्ताव सादर केलेला आहे.हा प्रस्ताव सादर करून आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या संपर्कात आहोत.आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे भारिप बहुजन महासंघ अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अशोक सोनाने यांच्या संपर्कात आहोत.गेल्या नऊ महिन्यापासून म्हणजे मे २ पासून बाळासाहेब आंबेडकर यांची दोन मिनिटांची भेट मागित आहोत.त्यांची भेट का होत नाही किंवा त्यांची वेळ का मिळत नाही याचा काही मागसुम लागायला तयार नाही.म्हणून मी राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज आता प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला,समर्थकाला आणि हितचिंतक यांना विनम्र आवाहन करतो की,आमच्या सकल मराठी समाजाला समाहून घेण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे गळ घाला…! आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या लोकशाही उत्सवात आमच्या सकल मराठी समाजाला सहभागी होऊ द्या….!

9 comments:

  1. मराठा समाज हा नेहमीच मोठा भाऊ राहिल. तो फक्त शिवराय व संभाजी राजे यांच्या विचाराचे असावेत. भारिप बहुजन महासंघ इंदापूर पुणे महासचिव प्रा विनोद जगताप सर 9422513314

    ReplyDelete
  2. जय जिजाऊ जय शिवराय जय भिम सर

    ReplyDelete
  3. जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

    ReplyDelete
  4. Maratha samajane vanchit bahujan aghadi la samjun ghyave ,,sarv samajane ektr yave ,,aple swagat ahe
    Jay shivbhim

    ReplyDelete