Tuesday, January 8, 2019
साहेब कॉंग्रेस धोका देणार....पण वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि मतदार आपल्या शब्दाबाहेर नाही....! राजेश खडके सकल मराठी समाज
भीमा कोरेगाव हल्ल्यानंतर वंचित घटकासाठी आता एकच विश्वास म्हणजे आदरणीय बाळसाहेब आंबेडकर असे समीकरण झाले आहे.यातच आता तिसरा पर्याय म्हणून देशातील जनता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी संघटना यावर विश्वास ठेवताना दिसत आहे.त्यामुळे इतर राजकीय पक्ष आता पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत आहेत.त्यामुळे इथली बामणी व्यावस्था मोठ्या प्रमाणात कामाला लागलेली दिसत आहे.सुरुवातीपासून कॉंग्रेसने नेहमी वंचित घटकांना गुलाम केल्याची परिस्थिती संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे.आरक्षित जागेतून समाजाचा प्रतिनिधी निवडणून येत नाही तर गुलाम निवडून येतो असे सुतोवाच आपण केले आहे.यातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेस हे जळते आहे असे म्हणाले होते.त्यामुळे नेहमीच सत्तेपासून आंबेडकरी पक्ष दूर ठेवण्याचे कटकारस्थान कॉंग्रेस पक्षाने केले आहे.यातच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कॉंग्रेसने निवडणुकीत पराभव करून आपल्याही विरोधात षड्यंत्र करून आपल्यालाही पराभूत केले आहे.त्यामुळे यंदाची निवडणूक ही आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याच्या विश्वासहर्तेची निवडणूक असुन काँग्रेसी राजकारण हा विश्वास कसा संपेल याचे षड्यंत्र आखीत आहे.त्यामुळे इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते यांना संसदीय निवडणुकीच्या राजकारणात उतरून पक्ष बांधणी करावी असे जाणकारांचे मत आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडी बरोबर जुळणारा घटक नेहमी जोडता ठेवल्यास महाराष्ट्र राज्यातील सत्ता समीकरणे बदलून त्याची चावी आंबेडकरी जनतेच्या हातामध्ये येईल असे जाणकारांचे मत आहे.कॉंग्रेस हा धोका देणारा पक्ष असल्याचे मत आता आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचे झालेले आहे.त्यामुळे तो धोकाच देणार.....! असो शेवटी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहात आणि गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण करीत आहात.सकल मराठी समाजाचे एवढेच म्हणणे आहे की,तयार झालेला मतदार हा वंचित असून त्याचा हिरमुस होऊ नये हीच अपेक्षा....!
धन्यवाद
Monday, January 7, 2019
लाखोंच्या गर्दीचा फायदा आंबेडकर यांनी मतात परिवर्तीत करून आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा.....! राजेश खडके सकल मराठी समाज
एकंदरीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभांना होणारी लाखोची गर्दी पहाता ते करीत असलेल्या कष्टाचे अवलोकन आपणा सर्वांना झालेच असेल यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.बाळसाहेब आंबेडकर यांनी भीम कोरेगाव विजयस्तंभाबाबत घेतलेली भूमिका सकल मराठी समाजाने उभारलेले शंभूराजे सन्मान अभियान यशस्वी झाल्याची नोंद संपूर्ण जगात झाली असल्याचे आता समोर आले असल्याचे जाणकार यांचे मत आहे.या शंभूराजे सन्मान अभियानात आदरणीय अंजलीताई आंबेडकर सहभागी झाल्या होत्या.मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मा.प्रवीणदादा गायकवाड आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक मा.शांताराम कुंजीर यांनी त्यांचा सहभाग दर्शविला होता.संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक तसेच छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याचे पहिले सरनोबत वीर बाजी पासलकर यांचे विचार वंशज मा.विकास पासलकर आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मा.संतोष शिंदे यांचा सहभाग होता.कोल्हापूर गादीचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले या शंभूराजे अभियानात प्रत्यक्ष सहभाग देऊन सामील झाले होते.डा बाबसाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट देऊन असे उदगार काढले होते की,"जो इतिहास वाचणार नाही,तो इतिहास घडविणार नाही" या त्यांच्या भूमिकेला येत्या १ जानेवारी रोजी वढू येथील शंभूराजे यांच्या समाधीस्थळी जमलेल्या लाखोच्या जनसमुदायामुळे सन्मान प्राप्त झाला आहे असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.इतिहासातील महार योध्यांची कर्तबगारी आता जवळ जवळ संपूर्ण देशाने मान्य केले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.हीच भूमिका मान्य करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकासाठी वंचित बहुजन आघाडी निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील अलुतेदार आणि बलुतेदार यांना न्याय देण्याच्या भूमिकेचे स्वागत झाले असल्यामुळे संपूर्ण वंचित घटक त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.परंतु जर आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी या संधीचा जर फायदा वंचित बहुजन आघाडीसाठी करून घेतला नाही तर अशी संधी त्यांना पुन्हा प्राप्त होईल असे वाटत नाही.बाळासाहेबांनी राजकीय कोंडीत पकडण्यासाठीचे प्रयत्न होताना दिसत आहेत.....ते कोंडीत सापडू शकत नाही परंतु यासाठी जमत असलेला लाखोचा जनसमुदाय मतात कसा परिवर्तीत होईल यासाठी मोठी शर्त त्यांना करावी लागेल.एकंदरीत त्यांची राजकीय खेळी पहाता आता पर्यंत ते यशस्वी झाले असल्याचे दिसून येते......परंतु समाजात फिरत असणारा विरोधाचा संदेश वेळीच रोखला पाहिजे आणि तळ्यात मळ्यात न रहाता आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली पाहिजे.लाखोच्या सभा ह्या लोकसभेसाठीच्या ४८ जगासाठी आणि विधानसभेसाठीच्या २८८ मतदार संघासाठी कशा फायदेशीर ठरतील याचा विचार होणे गरजेचे आहे.असो सकल मराठी समाजाने सादर केलेला प्रस्ताव स्वीकारून त्यांचा सन्मान व्हावा हिच अपेक्षा....!
Sunday, January 6, 2019
बाळासाहेबांची राजकीय रणनीती ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना बुचकळ्यात पाडणारी आहे....? राजेश खडके सकल मराठी सामाज
संपूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे.त्यातच २०१९ मध्ये १६ सभेंचे आयोजन करून त्यांनी इथला वंचित मतदार याचा विश्वास मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि तो जवळ जवळ यशस्वी होईल असे जाणकारांचे मत आहे.परंतु एक गोष्ट मात्र इथला सामाजिक कार्यकर्ता आणि वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता तयारीला लागला असताना विधानसभेच्या २८८ पैकी फक्त ५० जागा लढविणार असे मध्यंतरी बाळासाहेबांनी घोषित केल्यामुळे इथला मतदार आणि कार्यकर्ता भ्रमित झाला होता.त्याच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडीत होता की,बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला लाखो लोकांची गर्दी होत आहे आणि वंचित बहुजन आघाडी फक्त ५० जागाच लढविणार यावर त्याचे मत असे होते की,मग उरलेल्या २३८ जागासाठी काय करायचे....? याची चर्चा बहुतेक बाळासाहेब यांचेपर्यंत जाऊन पोहचल्याने त्यांनी २८८ जागा लढविणार असल्याचे संकेत दिले आहे असे जाणकार यांचे मत आहे.परंतु जाणकार असेही म्हणतात जर असे झाले तर निशिच्तच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वंचित बहुजन आघाडीच
ठरवेल.लोकसभेसाठी ४८ जागा आहेत त्यापैकी २४ जागी कॉंग्रेस तर २४ जागी राष्ट्रवादी कॉंग्रेस लढविणार आहेत मग आघाडीकडे मागणी केलेल्या १२ जागा वंचित बहुजन आघाडीला मिळणार नाहीत असे दिसते त्यामुळे बाळासाहेबांनी लोकसभेच्या ४८ जागा लढविण्याचे संकेत देत असताना आघाडीची दरवाजे खुली ठेवली आहे हे मात्र निश्चित आहे.परंतु लोकसभेसाठीच्या दोन जागा बाळसाहेब आंबेडकर यांनी जाहीर करून कोणाला काय संदेश दिले आहेत याचा काही थांगपत्ता लागत नाहीये.परंतु एकंदरीत सभा पहाता एमआयएमचे प्रमुख ओविसी काही सभांना हजेरी लावताना दिसत नाही त्यामुळे मतदारात आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचे जाळे पसरत चालले आहे.यातच बाळासाहेबांनी पश्चिम महाराष्ट्रात मुस्लीम समाजासाठी एक जागा घोषित करणार असल्याचे संकेत दिले आहे.त्यामुळे बुलढाणा माळी समाजासाठी तर नांदेड धनगर समाजासाठी जाहीर केले आहे.आता पश्चिम महाराष्ट्रातून मुस्लीम समाजासाठी कोणता जिल्हा निवडतील याची आता वंचित घटक वाट बघून आहे.परंतु हे सर्व करीत असताना इथला एमआयएम पक्षाचा विचार होतोय किंवा नाही याचीही वाट इथला मतदार पहात आहे.एकंदरीत बाळासाहेबांची रणनीतीचा आढावा अजून तरी कोणाला लागत नाहीये.परंतु प्रचार सभेंचे नियोजन पहाता प्रत्येक ठिकाणी लोकसभेसाठीचा उमेदवार तयार करीत असताना बाळासाहेब दिसत आहे.यातच त्यांनी २८८ विधानसभेसाठीचे उमेदवार लोकसभेच्या निवड प्रक्रियेत जाहीर करणार असल्याचे संकेत दिले आहेत.असोत बाळासाहेबांची रणनीती ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना बुचकळ्यात पाडणारी दिसत आहे या खेळीचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होणार का....? हा विषय फक्त येथे महत्वाचा आहे.
Saturday, December 22, 2018
वंचित बहुजन आघाडीत सामील होण्याचा सकल मराठी समाजाचा वाचा प्रस्ताव
१ मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे
शंभूराजे यांनी वयाच्या १५ व्या वर्षी "बुधभूषण" नावाचा ग्रंथ लिहून प्रकांड पंडित अशी स्वत:ची ओळख निर्माण केली.त्यानंतर त्यांनी "नायिकाभेद" "नखशिकांत" आणि "सातसतक" असे एकूण चार ग्रंथ लिहिले आहेत.छत्रपती संभाजी महाराज यांना चौदा भाषेचे अवगत होत्या.स्वराज्याला मुंबई जोडण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी मुंबईचा ब्रिटीश गव्हर्नर केजविन याच्याकडून मुंबई खरेदीचा करार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.परंतु सुरतच्या ब्रिटिशानी तो करार होऊ दिला नाही.त्यामुळे मुंबई स्वराज्याला जोडण्याचे स्वप्न अधांतरीत राहिले.जर मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिल्यास ते स्वप्न पूर्णत्वास आल्यासारखे होईल.आणि आजच्या तरुणांना छत्रपती संभाजी महाराज यांचा सत्य इतिहास समजला जाईल.असे झाल्यास शंभूराजे यांचा सन्मान होईल.
२ दादरचे नामांतर "चैत्यभूमी" असे करावे-:
जागतिक विद्वत्ता म्हणून ज्यांचेकडे पाहिले जाते अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा यासाठी संविधान लिहिले.संविधानातील प्रत्येक भारतीय नागरीक मानवी मुल्ये समजून घेऊन तो मानवी धर्म जतन करेल.यासाठी आंबेडकरांनी बौध्द विचारांच्या २२ प्रतिज्ञाच्या माध्यमातून "सभ्यता" दिली आहे.अशा महामानवाचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले.वास्तविक पहाता त्यांची समाधी दिल्ली येथे झाली पाहिजे होती.परंतु त्यांचे पार्थिव देह दिल्ली येथून मुंबई येथे आणण्यात आले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जो संघर्ष करावा लागला.त्या संघर्षाचा इतिहास जागरूक रहावा यासाठी दादरचे नाव "चैत्यभूमी" असे करावे.त्यामुळे त्यागाचे प्रतिक म्हणून या संघर्षाकडे पाहिले जाईल.
३ देशातील शिक्षण क्षेत्रात भारतीय संविधान हा एक "विषय" म्हणून बालवाडीपासून शिकविणे
सक्तीचा करण्यात यावा -:
स्वातंत्र भारताला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करून २६ नोव्हेंबर
१९४९ साली प्रदान केले.या संविधानाच्या कायद्यानुसार संपूर्ण भारत देश चालत आहे.या संविधानामुळे भारतीय नागरिक आपले हक्क व अधिकार प्राप्त करून घेत आहे.भारतीय संविधानाने दिलेल्या हक्क व अधिकारा बरोबर प्रत्येक नागरिकाला जबाबदारी दिलेली आहे.जर प्रत्येक नागरिकाला बालवाडीपासून संविधानाची ओळख निर्माण झाली तर त्याच्या शिक्षणामुळे त्याच्या पालकांनाही साविधानाची पूर्ण माहिती अवलोकन होईल.त्यामुळे हा समाज व भारत देश सदृढ होण्यास मोठे योगदान प्राप्त होईल.
४ भारतातील संपूर्ण नद्या एकमेकाला जोडून नदीजोड प्रकल्प राबविण्यात यावा -:
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी "रुपयाची समस्य" हा प्रबंधक लिहून ब्रिटीश प्रशासनाला जागरूक केले होते.भारताची प्रगती ही रुपयावर आधारित असल्याचे स्पष्टपणे त्यात त्यांनी म्हटले आहे.आणि हा रुपया जर सदृढ क्रतायचा असेल तर इथली कृषी म्हणजे शेतीचा विकास करणे गरजेचे आहे.आणि यासाठी भारतातील पाण्याची समस्या दूर केली पाहिजे.देशातील भौगोलिक परिस्थितीमुळे पाण्याचा संचय हा काही भागात केंद्रित आहे.तर काही भाग कायमस्वरूपी दुष्काळी आहे.नदीजोड प्रकल्पामुळे पाण्याचे विकेंद्रीकरण होऊन दुष्काळी भागालाही समृध्द होण्याची संधी मिळेल.तेसेच शहरावरचा वाढता बोजा विकेंद्रित होऊन भारताच्या अर्थव्यावस्थेला चालना मिळेल.
५ शेतमालाची साठवणूक करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावरती गोदाम (गोडाऊन) उभारण्यात यावेत -:
शेतकरी यांच्या मालाला हमी भाव मिळावा म्हणू तो नेहमी प्रयत्नात रहातो.शेतातील त्याचा माल तो जेव्हा बाजारात आणतो त्यावेळेस बाजारात भाव नेहमी वर खाली होत असतो.ज्या वेळेस तो बाजारात त्याचा माल घेऊन आल्यावर त्याला रास्त भाव मिळेल असे नाही.परंतु खर्चिक प्रवासाने आणलेला माल त्याला पुन्हा प्रवास खर्चाने घेऊन जाणे परवडत त्यांनी त्याला तो माल हमी भाव मिळेपर्यंत साठवणूक करून ठेवण्याची व्यावस्था नसते त्यामुळे त्याला तो माल पडेल त्या किमतीत विकावा लागतो.त्यामुळे त्याचे नुकसान होते.जर त्याला हमी भाव मिळेपर्यंत त्याचा माल साठवणूक करून ठेवण्याची व्यावस्था गोदामच्या माध्यमातून झाली तर तो त्याचा माल बाजारात रास्त किमतीत विकू शकतो.
६ नाशवंत शेत मालाला हमी भाव मिळण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर "शीतगृह" (कोल्ड स्टोअरेज) उभारण्यात यावीत.
शेतकरी जेव्हा नाशवंत शेतमाल बाजारात आणतो तेव्हा जर त्याला हमी भाव मिळाला नाही तर तो माल त्याला पडेल त्या किमतीत विकावा लागतो किंवा तो रस्त्यावर फेकून द्यावा लागतो.त्यामुळे तो कर्जबाजारी होऊन त्याला आत्महत्या करावी लागते.परंतु जर तालुका स्तरावर शीतगृह उभारली गेली तर त्याचा माल त्याला हमी भावात विकता येईल.कारण हमी भाव मिळेपर्यंत त्याचा माल त्याला शीतगृहात ठेवता येईल
७ शासकीय क्षेत्रातील कामकाजात आऊट सोर्सिंग पद्धत बंद करण्यात यावीत -:
शासनाने आपले कामकाज करण्यासठी शासकीय कार्यालये उभारलेली आहेत.त्यामध्ये सेवा करण्यासाठी नोकर भरती केली आहे.शासन सेवा खर्च आणि सेवकांचा पगार हा जनतेच्या करातून केला जातो.असे असताना त्यांची कामे आऊट सोर्सिंगाला दिली जातात.त्यामुळे जनतेवर आणखी भार पडतो.जर कामकाज वाढले असेल तर शासनाने नोकर भरती करावी आणि आऊट सोर्सिंग पद्धत बंद करावी.
८ प्रत्येक तालुका स्तरावर एमआयडीसी झोन निर्माण करून स्थानिक पुत्रांना रोजगार उपलब्ध कराव -:
एकंदरीत पहाता तालुका स्तरावर एमआयडीसी झोन निर्माण केल्यास नव नवीन उद्योग तालुका स्तरावर उभारली जातील.त्यामुळे तालुक्या बरोबर त्याच्या आजूबाजूच्या गावांची परिस्थिती सुधारेल.आणि त्या आजूबाजूंच्या गावांना प्राधन्य मिळून त्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होईल.सदरच्या उपलब्ध रोजगाराची प्रथम संधी स्थानिक भूमी पुत्रांना देण्यात यावी.
सारांश
सदरचा प्रस्ताव देशकल्याण आणि जनकल्याण स्तरावर आहे त्याचे कारण असे की,सदरच्या प्रस्त्वातील मागण्या जर शासन स्तरावर मान्य झाल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.त्यामुळे देशातील ७० ते ७५ टक्के बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे.आपल्या रुपयाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वाढणार आहे.इथला बळीराजा आंडीत होणार आहे.पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.कृषी प्रदान संस्कृतीकडे देशाची पुन्हा एकदा वाटचाल सुरु होणार आहे.औद्योगिक क्षेत्रात वाढ होणार आहे.सदरच्या प्रास्ताविक मागण्या खर्चिक आहे.त्याची तजवीज शासनाने इंटरनेट सेवेतून सक्तीने केल्यास या प्रास्ताविक मागण्या पूर्ण होऊ शकतात.यासाठी इच्छाशक्ती व संसदीय राजकारण महत्वाचे आहे.असे सकल मराठी समाजाचे स्पष्ट मत आहे.त्यामुळे संसदीय राजकीय तडजोडी शिवाय हा आमचा प्रस्ताव मान्य करता येणार नाही आणि या प्रास्तविक मागण्यासाठी सकल मराठी समाज बांधील आहे.
सकल मराठी समाजाची संसदीय मागणी पुढील प्रमाणे -:
सदरच्या प्रास्ताविक मागण्या मान्य करून सदरच्या प्रस्तावाला मान्यता देऊन सकल मराठी समाजाला संसदीय राजकारणात सामवून घ्यावे यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुणेशहर विधानसभा मतदार संघातील पाच मतदार संघ राखीव ठेवावेत.सदरचे मतदार संघ पुढील प्रमाणे -:
१ खडकवासला मतदार संघ
२ वडगावशेरी मतदार संघ
३ भोर -वेल्हा-मुळशी मतदार संघ
४ कसबा मतदार संघ
५ हडपसर मतदार संघ
प्रस्ताव सादरकर्ते सकल मराठी समाज समन्वयक
राजेश नारयण खडके प्रफुल्ल गुजर अविराज मराठे अंकुश गायकवाड
Tuesday, December 18, 2018
महार योध्याचे योगदान आधुनिक भारत घडविण्यासाठीच……!
वर्षाचा
डिसेंबर हा अखेरचा महिना असतो आणि वर्षाभरात काय चांगले किंवा काय वाईट
घडले याची शहानिशा राजकीय आणि सामजिक स्तरावर केली जाते.या वर्षाचा आम्ही
सकल मराठी समाजाला काय मिळाले किंवा काय देण्याचा प्रयत्न केला याचा आढावा
घेतला आहे.हा आढावा घेत असता काही जुने मित्र तुटली तर काही नवीन मित्र
जुडली आहेत.सकल मराठी समाजाचे समन्वय करणे खूप अवघड बाब आहे परंतु हि बाब
पूर्ण करण्याचे धाडस महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
पूर्ण केल्याचे आता जवळ जवळ सर्वच मानीत आहे.त्यामुळे बामणी व्यवस्थेने
सोशल मिडीया वार रूम तयार करून या दोन महापुरुषांना सोशल मिडीयावर बनावट
आयडीच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रामाणात सुरु केला
आहे.याच बरोबर यांनी प्रत्येक समाजात आणि प्रत्येक चळवळीत दलाल निर्माण
केल्याचे आता सकल मराठी समाजा समोर गेल्या वर्षभरात आलेले आहे.......मग त्यातून
आंबेडकरी चळवळ पण सुटलेली नाही.परंतु या द्लालांचा काय फायदा झाला किंवा
भविष्यात काय फायदा होणार आहे याचे काहीच कारण दिसून आलेले नाही.परंतु काही
कारणांची मीमांसा केली तर काही गोष्टी समोर आल्या आहेत आणि त्यातील प्रमुख
बाब म्हणजे या दलालांच्या माध्यमातून मग तो दलाल मराठा समाजातील का असा
ना याचे मूळ जर शोधले तर इथला “महार” संपविणे एवढेच धोरण असल्याचे मोठ्या
प्रमाणात समोर आले आहे.हे कोणी मान्य करणार नाही परंतु याचा जर त्या
व्यक्तीने खोलात जाऊन आभ्यास केला तर ही बाब त्याच्या पुढे आल्या शिवाय
राहणार नाही.काही इतिहास आभ्यासकरांचे म्हणणे असे आहे की,भारताचे मूळ हे
“महार” शब्दात अडकले आहे.कारण भारतातील प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व हे
“महार” गणात अडकलेले आहे आणि महार गण हा शाख्य कुलीन गण असल्याचे
बाबासाहेबांच्या समोर आलेले होते.या गणात स्त्री ला खूप महत्व दिले गेलेले
आहे.त्यामुळेच सिंधू संस्कृती ही या देशातील मूळ संस्कृती असल्याचे इथल्या
इतिहास आभ्यासकरांचेही म्हणणे आहे.कारण सिंधू संस्कृती ही आधुनिक संस्कृती
होती.तांत्रिक संस्कृती होती म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाणे परिपूर्ण अशी संस्कृती
होती.इथे मानवी विकास महत्वाचा मानला जात होता. त्यामुळे मानवाच्या खऱ्या
विकासाला याच सिंधू संस्कृतीत म्हणजे स्त्री शक्तीला ज्ञानाची संस्कृती
म्हटले जाते.म्हणून छत्रपती संभाजी महाराज याच तांत्रिक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान
प्राप्त असलेल्या स्त्री शक्तीचे पूजक होते.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज
यांनी पहिला वैदिक धर्म पद्धतीतील राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक
विज्ञानवादी राज्याभिषेक करून आधुनिक स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न
केला.बामणी व्यावस्थेचा मूळ शत्रू हा "ज्ञान" आणि "विज्ञान आहे.त्यामुळे आता
हे स्वराज्य संपविणे महत्वाचे होते.त्यामुळे ज्यांनी ज्यांनी विज्ञानवादी
आधुनिक भारत उभारण्याचा प्रयत्न केला त्यांना या बामणी व्यवस्थेने
संपविण्याचे कटकारस्थान इतिहासात केल्याचे आता जवळ जवळ स्पष्ट झाले
आहे.त्यामुळे गौतम बुध्द,वारकरी सांप्रदाय निर्माण करणारे संत
संपविलेले आहेत.यातून छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज देखील सुटले
नाहीत.अशा विज्ञानवादी स्वराज्याच्या उभारणीला बामणी व्यावस्थेने छेद देऊन
इथला मूळ आधुनिक संघर्षवादी जमात म्हणजे महार संपविण्यासाठी शुद्रातून
अतिशूद्र म्हणजे अस्पृश्य म्हणून महार समाजा बद्दलची भावना प्रस्थापित
करण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु अशा बामणी व्यवस्थेला मोडीत काढण्यासाठी
महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून
त्यांनी उभारलेले आधुनिक स्वराज्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.आणि
त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी पहिली शिवजयंती साजरा करून इथला
संघर्षवादी “महार" समाजाच्या इतिहासाला गती देऊन सत्यशोधक समाजाची स्थापना
करून नव्याने आधुनिक भारताची निर्मिती केली.परंतु बामणी व्यावस्था गप्प
बसली नाही त्यांनी पुन्हा एकदा आधुनिक भारताच्या विकासाला बाधा निर्माण
करण्यासाठी शिवजयंती उत्सव बंद करण्यासाठी व्दिराष्ट्राची संकल्पना निर्माण
करून आर्य सनातनी हिंदू धर्माची स्थापना करून शाख्यकुलीन गणप्रमुखाची
मोदकरुपी गणपती निर्माण करून त्याचा उत्सव सुरु करून आधुनिक भारताच्या
निर्मितीला पुन्हा एकदा छेद दिला.परंतु या व्यवस्थेला तडा देण्यासाठी
भीमराव रामजी आंबेडकर यांनी आधुनिक भारताचे स्वराज्य संस्थापक छत्रपती
शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा इतिहास दाखविणारे महात्मा ज्योतिबा फुले
यांना गुरु मानून पुन्हा एकदा भारताची वाटचाल आधुनिक भारताकडे सुरु
केली.इथली बामणी व्यावस्था निर्माण करण्यासाठी जो “महार” समाज संपविण्याचे
कटकारस्थान झाले होते त्याला पुन्हा एकदा छेद देत महार समाजापुढे लावलेला
“अस्पृश्य” शब्द उखडून फेकण्याचे महान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
इथला कायस्थ प्रभू (जंगम स्वामी) याला बरोबर घेऊन केले आहे.आधुनिक भारताच्या
विकासाला बाधा असणारी “मनुस्मृती" याच कायस्थ प्रभू (जंगम स्वामी) याला बरोबर
घेऊन दहन केली आहे.१८७५ ला स्थापन झालेला आर्य सनातनी हिंदू धर्म
रुजविण्यासाठी राम व कृष्ण यांना काल्पनिक ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांची
उपाधी देऊन आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारा राम नावाचा धनुष्यधारी गणप्रमुख
याचेवर ताबा मारला आहे.सिंधू संस्कृती मधील आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त
असणारी स्त्री “नेऋती” हिला विष्णू पत्नी लक्ष्मीचे नाव देऊन सिंधू
संस्कृतीवर ताबा मारला आहे.परंतु या सर्व गोष्टींचा आभ्यास करून बाबासाहेब
आंबेडकर यांनी सिंधू संस्कृतीला उजाळा देण्यासाठी गौतमी पुत्र सिद्धार्थ
यांनी प्रस्थापित केलेला आधुनिक विचार म्हणजे बौध्द धम्म याचा आभ्यास करून
आधुनिक भारत घडविण्यासाठी ज्या जाती जमाती यांनी कार्य केला अशा जाती जमाती
बामणी व्यावस्थेने अविकसित ठेवल्या अशा लोकांना “आरक्षण” विषय निर्माण
करून पुन्हा एकदा आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांना स्वतंत्र भारतात
संरक्षण देऊन हक्क व अधिकार दिले.मानव कल्याणकारी विज्ञानवादी असणारा विचार
म्हणजे बौध्द धम्म स्वीकारून पुन्हा एकदा भारत देशाची वाटचाल आधुनिक
भारताकडे केली.हा धम्म संपूर्ण भारतात पोहचविण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर
यांना पुरासा वेळ मिळाला नाही आणि ६ डिसेंबर १९५६ साली त्यांचे
महापरिनिर्वाण झाले.त्यांनी निर्माण केलेले साहित्य नष्ट करून काही
साहित्यात बदल करण्याचे कटकारस्थान काही शिक्षित वर्गाला बरोबर घेऊन या
बामणी व्यावस्थेने केले आहे.बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा घेत
असतांना इथला संघर्षवादी महार समाजाचे अस्तित्व अबाधित राहण्यासाठी “महार
रेजिमेंट" पुन्हा स्थापित करून भारतीय सेनेत जिवंत ठेवली आहे.परंतु आधुनिक
विचार म्हणजे बौध्द धम्म संपविण्यासाठी इथली व्यावस्था कार्यरत झालेली
होती.या बौध्द धम्म व्यवस्थेत काही त्यांचे दलाल निर्माण करून “महार
अस्तित्व” संपविण्यासाठी हा बौध्द धम्म बदनाम करण्याचे कटकारस्थान झाल्याचे
आता समोर आलेले आहे.बाबासाहेबांनी भारताच्या प्रत्येक नागरिकांना न्याय
मिळण्यासाठी नागरी हक्क संरक्षण कायदा निर्माण केला होता परंतु केवळ
“महार” अस्तित्व संपविण्यासाठी “महार” शब्दाचा उच्चार जातीयवादी व्देष असा
करून साल १९८९ ला अक्ट्रोसिटी कायद्याची निर्मिती केली आहे.त्यामुळे आज
आम्ही बौध्द जरी असलो तरी आमचे ऐतिहासिक अस्तित्व हे “महार” आहे जो या
देशाच्या प्रशासन व्यावस्थेचा मुख्य घटक आहे.आणि तेच अस्तित्व अबाधित
राहावे म्हणून दरवर्षी आपण १ जानेवारीला भीमा कोरेगावला महार योद्ध्यांना
मानवंदना द्यायला जात असतो.
मित्रहो हाच खरा इतिहास आहे आणि जो आभ्यास करेल,इतिहासाचे संशोधन करेल त्याच्या समोर हा इतिहास येईल.त्यामुळे ज्याला विरोध करायचा असेल त्याने पहिला ह्या सर्व बाबी तपासल्या पाहिजे आणि जेव्हा तो तपसेल तेव्हा तो या इतिहासाचे समर्थन करेल आणि आधुनिक भारताच्या वाटचालीमध्ये आपले योगदान निश्चित करेल…..!
धन्यवाद
राजेश खडके
समन्वयक सकल मराठी समाज
मित्रहो हाच खरा इतिहास आहे आणि जो आभ्यास करेल,इतिहासाचे संशोधन करेल त्याच्या समोर हा इतिहास येईल.त्यामुळे ज्याला विरोध करायचा असेल त्याने पहिला ह्या सर्व बाबी तपासल्या पाहिजे आणि जेव्हा तो तपसेल तेव्हा तो या इतिहासाचे समर्थन करेल आणि आधुनिक भारताच्या वाटचालीमध्ये आपले योगदान निश्चित करेल…..!
धन्यवाद
राजेश खडके
समन्वयक सकल मराठी समाज
Tuesday, December 4, 2018
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त माझे दोन शब्द....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज
मित्रानो आपणा सर्वांना जय भीम
आज
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आहे.प्रथम डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त कोटी कोटी प्रणा....! यांना
प्रणाम करीत असताना मला छत्रपती शिवराय यांच्या
महापरिनिर्वाण दिनाची आठवण झाली म्हणून मी ती तुम्हाला सांगू इच्छितो.रयत
आणि समाज जसे नेतृत्व चालवत असते तसे ते चालत असते.त्या समजाचे नेतृत्व
किंवा त्या रयतेचा राजा चांगला असेल तेथील प्रजा त्या राजाने किंवा त्या
नेतृत्वाने दाखविलेल्या मार्गावर चालत असते फक्त त्यासाठी सहकारी चांगले
असणे गरजेचे आहे.परंतु छत्रपती शिवराय यांच्या व्दितीय पत्नी महाराणी सोयरा
बाई साहेब यांना स्वार्थ भावनेने पछाडलेले होते त्यांच्या मनात त्या भावना
उत्पन्न करण्याचे कार्य छत्रपती शिवराय यांचे मंत्रीमंडळात असणारे वैदिक
धर्म पंडितांनी केले असल्याचे जवळ जवळ स्पष्ट झाले आहे.त्यामुळे एवढ्या
मोठ्या राजाला अग्नी न मिळता भडाग्नी देण्यात आला होता.अशाच प्रकारे
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचीही हीच अवस्था झाली होती.
छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर त्यांना त्यांचे पुत्र शाहू यांचेकडून
अग्नी मिळाला नाही परंतु महार योध्यानी त्यांचेवर अंत्यसंस्कार केल्याचे
जवळ जवळ आता समोर आले आहे.त्यामुळे हा एक बामणी कावा होता हे सिद्ध झाले
आहे.
रयतेसाठी काम करणाऱ्या महापुरुषांचा नशिबी याच गोष्टी या
बामणी व्यावस्थेने केल्या आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी अहोरात्र कष्ट करून
संविधान दिले.आणि मानवी जीवनाचा उध्दार व्हावा म्हणून इथल्या भारतीयांना
मानवी मुल्ये जपणारा विचार म्हणजे बौध्द धम्माची जान करून दिली.बौध्द धम्म
काय आहे हा सोप्या भाषेत भारतीयांना कळावा म्हणून २२ प्रतिज्ञा त्यांनी
तयार करून त्या मी म्हणून लाखो लोकांच्या समोर त्यांनी घेतल्या आहेत.त्याचे
अनुकरण त्याकाळी त्यांच्या अनुयायांनी केले आहे.या बौध्द धम्माचे आचरण
पद्धत आणि त्याचे अनुकरण कसे करायचे हे सांगायच्या आतच
डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे छत्रपती शिवराय यांचे प्रमाणे महापरिनिर्वाण झाले.त्यांच्या मृत्यूचे
कारण आजही त्यांच्या अनुयायी यांना अधिकृत कळाले नाही.त्याकाळी
त्यांच्या मृत्यूचे कारण कळावे यासाठी मोठा संघर्ष पुढे उभा राहिला.परंतु
डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले असल्यामुळे त्यांची समाधी दिल्ली
येथे होणे गरजेचे होते.कारण ते जागतिक कीर्तीचे नेते होते.परंतु तसे न होता
त्यांना मुंबई येथे घेऊन जावे असे कोणी सांगितले यांचे स्प्ष्टीकरण होत
नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे पार्थिव देह दिल्लीहून मुंबईत कसे आणायचे असा प्रश्न त्यांच्या
कुटुंबियांना सोडवावा लागला आहे.मुंबईत त्यांचे पार्थिव देहावर
अंत्यसंस्कार कुठे कारावे यासाठी संघर्ष करावा लागला आहे.शासनाने राष्टीय
सन्मान करणे अपेक्षित होते पण तो झाला नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या मृत्यूला कारणीभूत इथला बामणी कावा होता हे आता जवळ जवळ सर्वश्रुत
झाले आहे.परंतु त्यांनी दिलेला बौध्द धम्म की धर्म या मध्ये त्यांचे
अनुयायी अडकले गेले आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सोप्या भाषेत दिलेल्या २२ प्रतिज्ञा कोणी समजून
घ्यायला तयार नाही.त्यांनी दिलेली समता प्रस्थापित करण्यासाठी कोणी पुढे
यायला तयार नाही.त्यांनी दिलेले विचार जनमाणसात घेऊन जायला कोणी तयार
नाहीत.जातीवादी शक्तीना आणि संविधान वाचवायला प्रत्यक्षपणे पुढे कोणी यायला
तयार नाही.जो तो या सर्व गोष्टींचे राजकारण करू पहात आहे असे स्पष्टपणे
जाणवत आहे.
असो या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून एक संकल्प करूयात
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यात घेऊयात आणि मानव जातीच्या उद्धारासाठी एकत्र येऊयात...!
Subscribe to:
Posts (Atom)





