Monday, January 7, 2019

लाखोंच्या गर्दीचा फायदा आंबेडकर यांनी मतात परिवर्तीत करून आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा.....! राजेश खडके सकल मराठी समाज

              एकंदरीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभांना होणारी लाखोची गर्दी पहाता ते करीत असलेल्या कष्टाचे अवलोकन आपणा सर्वांना झालेच असेल यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.बाळसाहेब आंबेडकर यांनी भीम कोरेगाव विजयस्तंभाबाबत घेतलेली भूमिका सकल मराठी समाजाने उभारलेले शंभूराजे सन्मान अभियान यशस्वी झाल्याची नोंद संपूर्ण जगात झाली असल्याचे आता समोर आले असल्याचे जाणकार यांचे मत आहे.या शंभूराजे सन्मान अभियानात आदरणीय अंजलीताई आंबेडकर सहभागी झाल्या होत्या.मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मा.प्रवीणदादा गायकवाड आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक मा.शांताराम कुंजीर यांनी त्यांचा सहभाग दर्शविला होता.संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक तसेच छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याचे पहिले सरनोबत वीर बाजी पासलकर यांचे विचार वंशज मा.विकास पासलकर आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मा.संतोष शिंदे यांचा सहभाग होता.कोल्हापूर गादीचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले या शंभूराजे अभियानात प्रत्यक्ष सहभाग देऊन सामील झाले होते.डा बाबसाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट देऊन असे उदगार काढले होते की,"जो इतिहास वाचणार नाही,तो इतिहास घडविणार नाही" या त्यांच्या भूमिकेला येत्या १ जानेवारी रोजी वढू येथील शंभूराजे यांच्या समाधीस्थळी जमलेल्या लाखोच्या जनसमुदायामुळे सन्मान प्राप्त झाला आहे असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.इतिहासातील महार योध्यांची कर्तबगारी आता जवळ जवळ संपूर्ण देशाने मान्य केले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.हीच भूमिका मान्य करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकासाठी वंचित बहुजन आघाडी निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील अलुतेदार आणि बलुतेदार यांना न्याय देण्याच्या भूमिकेचे स्वागत झाले असल्यामुळे संपूर्ण वंचित घटक त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.परंतु जर आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी या संधीचा जर फायदा वंचित बहुजन आघाडीसाठी करून घेतला नाही तर अशी संधी त्यांना पुन्हा प्राप्त होईल असे वाटत नाही.बाळासाहेबांनी राजकीय कोंडीत पकडण्यासाठीचे प्रयत्न होताना दिसत आहेत.....ते कोंडीत सापडू शकत नाही परंतु यासाठी जमत असलेला लाखोचा जनसमुदाय मतात कसा परिवर्तीत होईल यासाठी मोठी शर्त त्यांना करावी लागेल.एकंदरीत त्यांची राजकीय खेळी पहाता आता पर्यंत ते यशस्वी झाले असल्याचे दिसून येते......परंतु समाजात फिरत असणारा विरोधाचा संदेश वेळीच रोखला पाहिजे आणि तळ्यात मळ्यात न रहाता आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली पाहिजे.लाखोच्या सभा ह्या लोकसभेसाठीच्या ४८ जगासाठी आणि विधानसभेसाठीच्या २८८ मतदार संघासाठी कशा फायदेशीर ठरतील याचा विचार होणे गरजेचे आहे.असो सकल मराठी समाजाने सादर केलेला प्रस्ताव स्वीकारून त्यांचा सन्मान व्हावा हिच अपेक्षा....!

2 comments:

  1. मला जायचे होते एक जानेवारीला कोरेगाव भीमा येथे पाह्यला कि इंग्रज लोकांनी मराठ्यांचा पराभव करवून संपूर्ण भारत देश गुलामीत ढकलला ते शेवटचे युद्धाची निशाणी, पृथिराज चव्हाण बरोबरच्या युद्धात मोहमद घोरीला फितूर झालेला राजा जयचंद, औरंजेबाला फितूर होऊन रायगडाचे दरवाजे उघडून देणारा सूर्याजी पिसाळ, राणा प्रतापशी फितूर झालेला अकबराला मिळालेला राजा मानसिंग,सिराजउदौला यांचेशी फितूर झालेलाव इंग्रजांना मिळालेला मीर जाफर ,भगतसिंग सुखदेव व राजगुरु यांचेशी फितूर झालेला इंग्रजांना मिळालेला फणींद्रनाथ घोष , संभाजी राजे यांच्याशी फितूर झालेला ,गणोजी शिर्के यांचे कोण कोण वैचारिक भाऊबंद गद्दार लोक मराठ्यांचे राज्य बुडवायला इंग्रजांना सामील झाले होते आणि त्यांनी मोठा पराक्रम केला आहे म्हणे आणि इंग्रजनी या गद्दरांचा स्मृतिप्रीत्यर्थ एक स्तंभ उभा केला आहे म्हणे आणि आपल्या पूर्वजांनी केलेला हा देशद्रोह गड्डरी यांची लाज वाटण्याऐवजी अभिमान बाळगणारे लोकसुद्धा या भारतात आहेत आणि हजरो नव्हे तर लाखोंच्या संख्येने यांचे वंशज आणित्यांचे जातवाले लोक येतात काय आणि आपल्या गुलामीच्या स्मारकाला अभिवादन करतात काय ?अशा लोकांना भेटण्याची इचछा मला होती संपूर्ण जगात लोक असण्याची शक्यता कमी आहे त्यामुळेच असे लोक पाहण्याची इचछा होती ठीक आहे पुढील वर्षी पाहूया

    ReplyDelete
  2. Ganeshan तुम्ही जे काही comment ते भाडंकाऊ आहे आणि तुम्हला जर इतिहास इतका समजतो तर इंग्रज या भारतात का आले त्याची कारणे काय त्यांना राज्य करण्यास कोणी कोणी मदत केली आणि 200 वर्षा पूर्वी परिस्तिथी काय होती त्याला जवाबदार कोण होता हे पहिले शोधून काढा मग तो विजय स्तंभ चूक की बरोबर हे ठरव

    ReplyDelete