Sunday, January 6, 2019
बाळासाहेबांची राजकीय रणनीती ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना बुचकळ्यात पाडणारी आहे....? राजेश खडके सकल मराठी सामाज
संपूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे.त्यातच २०१९ मध्ये १६ सभेंचे आयोजन करून त्यांनी इथला वंचित मतदार याचा विश्वास मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि तो जवळ जवळ यशस्वी होईल असे जाणकारांचे मत आहे.परंतु एक गोष्ट मात्र इथला सामाजिक कार्यकर्ता आणि वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता तयारीला लागला असताना विधानसभेच्या २८८ पैकी फक्त ५० जागा लढविणार असे मध्यंतरी बाळासाहेबांनी घोषित केल्यामुळे इथला मतदार आणि कार्यकर्ता भ्रमित झाला होता.त्याच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडीत होता की,बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला लाखो लोकांची गर्दी होत आहे आणि वंचित बहुजन आघाडी फक्त ५० जागाच लढविणार यावर त्याचे मत असे होते की,मग उरलेल्या २३८ जागासाठी काय करायचे....? याची चर्चा बहुतेक बाळासाहेब यांचेपर्यंत जाऊन पोहचल्याने त्यांनी २८८ जागा लढविणार असल्याचे संकेत दिले आहे असे जाणकार यांचे मत आहे.परंतु जाणकार असेही म्हणतात जर असे झाले तर निशिच्तच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वंचित बहुजन आघाडीच
ठरवेल.लोकसभेसाठी ४८ जागा आहेत त्यापैकी २४ जागी कॉंग्रेस तर २४ जागी राष्ट्रवादी कॉंग्रेस लढविणार आहेत मग आघाडीकडे मागणी केलेल्या १२ जागा वंचित बहुजन आघाडीला मिळणार नाहीत असे दिसते त्यामुळे बाळासाहेबांनी लोकसभेच्या ४८ जागा लढविण्याचे संकेत देत असताना आघाडीची दरवाजे खुली ठेवली आहे हे मात्र निश्चित आहे.परंतु लोकसभेसाठीच्या दोन जागा बाळसाहेब आंबेडकर यांनी जाहीर करून कोणाला काय संदेश दिले आहेत याचा काही थांगपत्ता लागत नाहीये.परंतु एकंदरीत सभा पहाता एमआयएमचे प्रमुख ओविसी काही सभांना हजेरी लावताना दिसत नाही त्यामुळे मतदारात आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचे जाळे पसरत चालले आहे.यातच बाळासाहेबांनी पश्चिम महाराष्ट्रात मुस्लीम समाजासाठी एक जागा घोषित करणार असल्याचे संकेत दिले आहे.त्यामुळे बुलढाणा माळी समाजासाठी तर नांदेड धनगर समाजासाठी जाहीर केले आहे.आता पश्चिम महाराष्ट्रातून मुस्लीम समाजासाठी कोणता जिल्हा निवडतील याची आता वंचित घटक वाट बघून आहे.परंतु हे सर्व करीत असताना इथला एमआयएम पक्षाचा विचार होतोय किंवा नाही याचीही वाट इथला मतदार पहात आहे.एकंदरीत बाळासाहेबांची रणनीतीचा आढावा अजून तरी कोणाला लागत नाहीये.परंतु प्रचार सभेंचे नियोजन पहाता प्रत्येक ठिकाणी लोकसभेसाठीचा उमेदवार तयार करीत असताना बाळासाहेब दिसत आहे.यातच त्यांनी २८८ विधानसभेसाठीचे उमेदवार लोकसभेच्या निवड प्रक्रियेत जाहीर करणार असल्याचे संकेत दिले आहेत.असोत बाळासाहेबांची रणनीती ही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना बुचकळ्यात पाडणारी दिसत आहे या खेळीचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होणार का....? हा विषय फक्त येथे महत्वाचा आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
आपल्या थॉट्स ऑफ पाकिस्तान या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकर लिहितात "हा ग्रंथ हिंदूंच्या मनावर हि गोस्ट ठसविण्याचा प्रयत्न करतो कि ,ज्यांची भारतावरील निष्ठा संशयास्पद आहे ,ते मुसलमान हिंदुस्थानात राहून शत्रुत्व करीत राहण्यापेक्षा हिंदुस्थान baher राहून शत्रुत्व करीत राहिले तरी चालेल .आपसातील यादवी ऊध्ये नाहीशी करण्यासाठी जशी तुर्कस्तान ग्रीस बल्गेरिया या देशातील यच्चयावत विधर्मीय लोकांची जशी अदलाबदल केली ,तशी हिंदुस्थानातून मुसलमानांची व संकल्पित पाकिस्तानातून हिंदूंची अदलाबदल करावी .शांतता प्रस्थापित करण्यासाठी व एकजिनसी राष्ट्र निर्माण होण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे '
ReplyDeleteआंबेडकर पुढे म्हणतात "मुसलमानांच्या मनावर लोकशाहीचा प्रभाव पडत नाही मुसलमानांना जर कशाविषयी प्रबळ आस्था वाटत असेल तर ती धर्माविषयी .त्यांचे राजकारण हे मुख्यतः धर्मनिष्ठ असते .इस्लामचे बंधुत्व हे सर्वव्यापक नाही सार्वत्रिक नाही ते बंधुत्व मुसलमान समाजाच्या अनुयायांपुरतेच मर्यादित असते. मुसलमानेतरांविषई त्यात तिरस्कार आणि शत्रुत्वच असते,मुसलमानांची राज्यनिष्ठा मुसलमान राज्य करीत असलेल्या देशशीस असते .ज्या देशावर मुसलमान राज्य करीत नाही ती त्याची शत्रुभूमी .म्हणून मुसलमानांचा हिंदुस्थान हि मातृभूमी आहे नि हिंदू हा आपला इष्टमित्र आहे असे विचारही त्याचा मनास शिवू देणार नाही ,असे या ग्रंथाचे म्हणणे आहे .आक्रमक वृत्ती हि मुसलमानाला मिळालेली नेसर्गिक देणगी आहे ते हिंदूंच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन झोडगिरीचा अवलंब करतात "(संदर्भ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लेखक धंनजय किर चौथं आवृत्ती सातवे पुनर्मुद्रण पान न ३६९ व ३७०)
आणि आता प्रकाश आंबेडकर MIM या कट्टर मुस्लिम संघटनेबरोबर युती करून (जी संघटना रझाकारांची होती ज्यांनी हिंदूंवर अन्याय व अत्याचार केले होते ज्यात मुख्यतेवकरून दलित बहुसन्ख होते अशा) बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करीत आहेत
ज्या MIM चा अकबरुद्दीन ओवेसी उघडउघड म्हणतो कि १५ मिनिटे पोलीस बाजूला सारा २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना ठार मारतील असा ओवेसींच्या पक्षाबरोबर युती करून बाबासाहेबांबरोबर गड्डरी आणि देशद्रोह करीत आहेत .हा MIM हा पक्ष कासीम रिझवी याने स्थापन केली ज्यांचे म्हणणे होते कि हैदराबाद संस्थान (ज्यात मराठवाडा ,कर्नाटक मधील काही भाग आणि अंधार प्रदेश ) पाकिस्तानात विलीन करा अशी मागणी असलेला हा पक्ष या पक्षाविरुद्ध काँग्रेस पक्ष तर लढलाच पण अगदी क्रांतीसिंह नाना पाटील जी डी बापू लाड यांनी सशस्त्र संघर्ष केला
आणि २०१५ मध्ये बिहारची निवडणूक वेळेस गुजरातेतील भाजप चे आमदार यतीन ओझा यांनी जाहीर पत्रकार परिषेदत सांगितले होते कि अकबरुद्दीन ओवेसी याला अमित शाह याने सांगितले कि कसे भाषण करा आणि कुठेकुठे उमेदवार उभा करा आणि भारतात जी बीजेपीची बी टीम म्हणून ओळखली जाते त्या पक्षाबरोबर युती करणे म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा पराभव करण्यासारखे आहे