Thursday, January 17, 2019

पासलकर साहेब अब्दाली निघून गेला...म्हणून औरंगाजेबाचे समर्थन होऊ शकत नाही..तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे होऊच शकत नाही…..! राजेश खडके सकल मराठी समाज



             त्यावेळचा पेशवा म्हणून नानासाहेब पेशवा होता आणि नानासाहेबांचा इतिहास हा सगळ्यांनाच माहित आहे त्यामुळे येथे सांगणे मला गरजेचे वाटत नाही.पानिपतचे युध्द अठरा पगड जातीचे मराठे कधीही विसरू शकत नाही कारण हे युध्द शिवनीती विरुध्द होते म्हणूनच या युध्द्दात एक लाख अठरा पगड जातीचे मराठे मारले गेले आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे हा शहीददिन आहे विजयदिन म्हणून साजरा करणे म्हणजे शिवनीतीच्या विरोधात समर्थन करणे होय.वास्तविक पहाता मराठ्यांचे हे युध्द खरेच दिल्ली जिंकण्यासाठी होते का असा प्रश्न आपण इतिहासाला विचारला पाहिजे कारण इतिहास नक्कीच तुम्हाला त्याचे उत्तर देईन...! अब्दाली हा अफगाणिस्तान मधून दिल्ली जिकण्यासाठी जवळ जवळ पावणेदोन लाखाचे सैन्य घेऊन आलेला होता...आणि दिल्लीवर आपल्यालाही ताबा मारायचा होता.कारण पेशवाई मध्ये हे युध्द जिंकणे म्हणजे शिवनिती कशी चुकीची होती हे दाखविण्याचा प्रयत्न नानासाहेब पेशव्यांनी केला होता.त्यामुळे सदाभाऊ पेशवे आणि विश्वासराव यांचे नेतृत्वात लढण्यासाठी जवळ जवळ सव्वालाखाचा लवाजमा पाठवून नानासाहेब पेशवे पुण्यातच थांबले होते आणि तो काळ होता १७६१ चा यापूर्वी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा कोणताही सण साजरा केला जात नव्हता हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे अठरा पगड जातीच्या मराठ्यांचे अब्दाली बरोबर पानिपत येथे सामना झाला होता.मराठ्यांना शिवानिती माहित होती परंतु हे युद्ध शिवनीती नुसार नव्हते...कारण पेशव्यांना त्यांची नीती येथे राबवायची होती.परंतु पेशव्यांची नीती अब्दाली याला माहित झाली होती कारण तो एक योध्दा होता.त्याने लागलीच मराठ्यांची रसद तोडली हे मराठ्यांच्या लक्षात यायला वेळ लागला युध्द सुरु झाले होते.मराठे अब्दालीच्या सैन्यावर तुटून पडले रसद तुटल्यामुळे मराठे सैन्य कमजोर पडले परंतु वीर योध्दा असल्यामुळे त्यांनी अब्दालीला हैराण करून सोडले हाहाहा म्हणता युध्दाचे स्वरूप भयानक होत चालले होते.इकडे नानासाहेब पेशवा नगरमध्ये एका बारा वर्षाच्या मुली बरोबर विवाह करीत होता आणि तिकडे वीर मराठे धारतीर्थ पडत चालले होते.त्यावेळेस एक लाख अठरा पगड जातीचा मराठा युध्दात शौर्य दाखवीत शहीद झाला होता.त्यामुळे शिवनिती विरुध्द झालेल्या या युध्दांमुळे स्वराज्यात १ लाख महिला विधवा झाल्या होत्या एक लाख कुटुंबात शोककळा पसरली होती.स्वराज्यावर एकप्रकारची संक्रात आली होती.या युध्दामुळे अब्दाली विजय झाला असे म्हणता येणार नाही पण हे युध्द झाल्यावर त्यालाही मोठ्या प्रमाणात हानी झाली होती काही मराठ्यांना त्यांनी बंदी बनवून तो तेथेच चार महिने राहिला.या युध्दामुळे झालेला नरसंहार पाहून त्या युध्दाचा त्यालाही पश्चाताप झाला आणि पुन्हा तो आफगानिस्तानकडे जायला निघाला जाताना त्यांने बंदी केलेले मराठे सरदार तो बरोबर घेऊन गेला आणि जाता जाता त्यांना तो बलुचीस्थान मध्ये सोडून गेला आजही त्या मराठ्यांच्या वारसांना स्वराज्याची आठवण होत आहे.त्यामुळे या पानिपतच्या युध्दाला विजयदिन म्हणणे म्हणजे शिवानितीचा अपमान करणे होय.आपण जर या पानिपतच्या युध्दास विजयदिन म्हणू लागलो तर आपल्याला औरंगाजेबाचेही समर्थन करावे लागेल कारण येथे जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांची त्याने हत्या केली म्हणून त्याला स्वराज्य काही मिळाले नाही.त्याला शंभूराजे यांच्या हत्येनंतर पश्चाताप झालेला होता.कारण एखाद्या राजाला जर दुसऱ्या राजाने जेरबंद केले तर तो अशाप्रकारे दुसऱ्या राजाची हत्या करीत नाही.छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या औरंगाजेबाने केली म्हणून तो काही विजयी झाला नाही कारण येथेही त्याला काही मिळाले नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे पानिपतच्या युद्धातून आपल्याला काही मिळाले नाही आणि अब्दालीलाही काही मिळाले नाही.येथे फक्त शौर्य दिसले म्हणून आपण छत्रपती संभाजी महाराज यांना शौर्यवीर म्हणतो त्याच प्रमाणे पानिपतचे युध्द हे शौर्यदिन आहे.यानंतर पेशवाईने या युध्दाची सल स्वराज्यातील रयतेच्या मनातून काढण्यासाठी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि पानिपतला जे झाले ते विसरून जा असे म्हणत हा सण उत्सव म्हणून इथल्या रयतेच्या मनात बिंबविला आहे.त्यामुळे पासलकर साहेब पानिपतचे युद्ध हा विजयदिन नसून शौर्यदिन म्हणजेच शहीददिन आहे त्यामुळे पानिपतच्या युध्दाचे समर्थन करणे म्हणजे अन्यायकारी पेशवाईचे आणि औरंगाजेबाचे समर्थन करण्यासारखे होईल.

Tuesday, January 15, 2019

शाक्त पंथीय राज्यभिषेक निमित्त आपण सर्वानी छत्रपती संभाजी महराज यांना मानाचा जोहार करावा...! राजेश खडके सकल मराठी समाज


                    युवराज शंभूराजे यांचा विवाह श्रुंगारपूर येथील शाक्त पंथीय पिलाजीराव शिर्के यांची कन्या येसूबाई यांचे बरोबर झाला होता.त्यानंतर शंभूराजे यांनी शाक्त पंथ स्विकारून त्याचे आचरण सुरु केले होते.तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणारी शाक्तदेवी म्हणजे सिंधू संस्कृतीची आदी गणमाता नेऋती यांचे पूजन करीत असे त्यामुळे वैदिक धर्म पद्धतीत झालेला ६ जूनचा राज्याभिषेक नाकरून २४ सप्टेंबरला शाक्त पंथीय राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराज यांनी करून घेतला होता.त्यामुळे शाक्त पंथानुसार झालेला राज्याभिषेक हा समतावादी राज्यभिषेक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापरिनिर्वाण नंतर युवराज शंभूराजे यांनी स्वत:चा राज्यभिषेक हा शाक्त पंथानुसार करून घेऊन त्यांची राजमुद्रा ही बोधीसत्व वृक्ष म्हणजे पिंपळाचे पानावर कोरून घेतली आहे.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे समतावादी राजे होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे आपल्या सर्वांचे कर्त्यव्य आहे की,आजच्या शाक्त पंथीय राज्यभिषेक निमित्त आपण सर्वानी छत्रपती संभाजी महराज यांना मानाचा जोहार करावा...!

Monday, January 14, 2019

तुमच्याविरुद्ध खोटी FIR दाखल झाली तर काय कराल? समजून घ्या…



आपसातील भांडणातून खोटे एफआयआर दिल्या जाण्याच्या घटना अनेकदा कानावर येत असतात. कायदा आपल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आहे, परंतु याचा गैरवापर टाळणे देखील तितकेच आवश्यक आहे.
जरी त्या व्यक्तीने कायद्यांतर्गत आपले निर्दोषत्व सिद्ध केले तरी समाजात त्याच्याकडे गुन्हेगाराच्या नजरेने पाहिले जाते. 
तो आधीसारखा आदर मिळवू शकत नाही. आपल्याला खोटा एफआयआर टाळण्यासाठी कायद्याची काय तरतूद आहे, एफआयआर दाखल करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कोणती कारवाई केली जाऊ शकते आणि कसे करावे याची माहिती सदर लेखातून दिली आहे.

एफआयआर काय आहे?

एफआयआर हे फर्स्ट इन्फोर्मेशन रिपोर्टचे लघुरूप आहे. जेव्हा एखादा गुन्हा घडतो, तेव्हा ज्यांच्यासोबत गुन्हा घडला आहे तो पोलिसांना कळवतो याला एफआयआर म्हणतात.
जेव्हा घटनेची तोंडी सांगितलेली पहिली माहिती लिखित स्वरुपात बदलली जाते तेव्हा ती एफआयआर असते.
फौजदारी दंड प्रक्रिया कायद्याच्या कलम १५४ अंतर्गत पोलिसांना दखलपात्र गुन्हा असलेल्या प्रकरणात एफआयआर दाखल करावा लागतो.

एखाद्याने खोटा एफआयआर दाखल केल्यास काय करावे?

अनेक प्रकरणात असे दिसून आले आहे की, काही लोक वादविवाद झाल्यास परस्परांविरुद्ध खोटे किंवा बनावट एफआयआर दाखल करतात. ज्यांच्याविरुद्ध खोटा एफआयआर दाखल केला जातो, त्याला पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या कायदेशीर प्रक्रियांमध्ये अडकवले जाते.
त्यामुळे त्या व्यक्तीचा वेळ, पैसा इत्यादी विनाकारण खर्च होत असतात.
परंतु खोटे एफआयआर दाखल होण्याविरूद्ध काही मार्ग आहेत होणारा त्रास टाळला जाऊ शकतो. फौजदारी दंड प्रक्रिया कायद्याच्या कलम ४८२ असा कायदा आहे ज्याचा उपयोग अशा हेतुपरस्पर घटनांपासून दूर राहण्यासाठी केला जाऊ शकतो.

फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ काय आहे?

या कलमाच्या अंतर्गत वकीलाद्वारे उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाऊ शकतो. यांत ज्याच्यावर एफआयआर दाखल झाला आहे ती व्यक्ती त्याच्या निर्दोषपणाचा पुरावा देऊ शकते.
म्हणजे, फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२अन्वये, ती व्यक्ती दाखल झालेल्या एफआयआरला आव्हान देऊ शकते आणि उच्च न्यायालयात न्यायाची मागणी करू शकते.
त्यासाठी, वकीलच्या मदतीने यासंबंधीचा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला जातो आणि खोट्या एफआयआरच्या विरोधात प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते.
फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी व्यक्ती उच्च न्यायालयात खालील आधार घेऊन अर्ज दाखल शकते आणि खोटे एफआयआर रद्द करू शकते,
– जर खोटा एफआयआर दाखल केला गेला असेल तर.
– जो गुन्हाच झालेला नाही त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला गेला असेल तर.
– एफआयआरमध्ये आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी निराधार आरोप असतील तर.

फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ काय आहे?

या कलमाच्या अंतर्गत वकीलाद्वारे उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाऊ शकतो. यांत ज्याच्यावर एफआयआर दाखल झाला आहे ती व्यक्ती त्याच्या निर्दोषपणाचा पुरावा देऊ शकते.
म्हणजे, फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२अन्वये, ती व्यक्ती दाखल झालेल्या एफआयआरला आव्हान देऊ शकते आणि उच्च न्यायालयात न्यायाची मागणी करू शकते.
त्यासाठी, वकीलच्या मदतीने यासंबंधीचा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला जातो आणि खोट्या एफआयआरच्या विरोधात प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते.
फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी व्यक्ती उच्च न्यायालयात खालील आधार घेऊन अर्ज दाखल शकते आणि खोटे एफआयआर रद्द करू शकते,
– जर खोटा एफआयआर दाखल केला गेला असेल तर.
– जो गुन्हाच झालेला नाही त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला गेला असेल तर.
– एफआयआरमध्ये आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी निराधार आरोप असतील तर.
इथे हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे की,दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा यांच्यात काय फरक आहे.
जर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असेल तर तो दखलपात्र गुन्हा असतो आणि किरकोळ स्वरूपाचा गुन्हा अदखलपात्र समजला जातो. या दोन्ही प्रकारचे गुन्हे नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र नोंदवही असणे कायद्याने बंधनकारक आहे.
जर गुन्हा दखलपात्र असेल तर पोलीस त्याला लेखी स्वरूप देऊन, तक्रार देणाऱ्याला ते वाचून दाखवले पाहिजे. तसेच त्यावर तक्रारकर्त्याची सही घेऊन त्याची प्रत मोफत देण्याचे बंधन कायद्याने पोलिसांवर आहे.
अशी तक्रार नोंदवून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असतील तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते आणि अधिकाऱ्याला त्याची नोंद घेत तपास सुरु करावा लागतो.
अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेणे पोलिसांना बंधनकारक असले तरी न्यायालयाचा आदेश आल्यावरच ते या गुन्ह्यात तपास सुरु करू शकतात. तेव्हा हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, पोलिसांकडे कुठलीही तक्रार दाखल झाली की लगेच तपास सुरु होतो.
अर्थात कुठला गुन्हा दखलपात्र आहे किंवा अदखलपात्र आहे हे  ठरवत असतांना पोलिसांची भूमिका देखील महत्वपूर्ण असते.
१. जर कोणी खोटा एफआयआर दाखल केला असेल तर आपण आधी अटकपूर्व जामीन घेऊ शकतो ज्यामुळे अटक टळू शकते आणि जर ते शक्य नसेल तर अटक झाल्यानंतर नियमित प्रक्रियेतून जामीन मिळवता येतो.
एखाद्या व्यक्तीविरूद्ध एफआयआर दाखल झाला असेल तर त्याच्याकडे आपण गुन्हा केलेला नाही याबाबत जर काही पुरावा असेल तर उच्च न्यायालयात अर्जासोबत पुरावा म्हणून, ऑडिओ,व्हिडिओ, फोटोग्राफी किंवा व्हिडिओ अशा कोणत्याही स्वरूपात देता येतो.
जसे कोणी आपल्याविरुद्ध चोरी करण्यासाठी आपल्याविरुद्ध खोटे एफआयआर करते तसे आपण त्या वेळी तेथे नसल्याचे पुरावे म्हणून देऊ शकता आणि स्थान कोठे आहे ते पुरावे दिले जाऊ शकतात. वकीलच्या मदतीने पुरावे योग्य रीतीने मांडू शकतात.
आपल्या बाजूने कोणताही साक्षीदार असल्यास, त्याचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल करतांना नक्की उल्लेख करा.
जेव्हा उच्च न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अंतर्गत अर्ज दिला जातो तेव्हा त्यासंदर्भात सुनावणी घेतली जाते आणि न्यायालयासमोर आपण सबळ पुराव्यांच्या आधारे आपले निर्दोषत्व सिद्ध केले तर न्यायालय एफआयआर रद्द करण्याचा आदेश देऊ शकतो.
परंतु जर आपण न्यायालयात आवश्यक पुरावा देऊ शकत नाही ज्याने तुमची निर्दोषता सिद्ध केली असेल तर न्यायालय हा अर्ज नाकारते. त्यानंतर एफआयआर दाखल झालेल्या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले जातात आणि न्यायालयात सुनावणी सुरु होते.
उच्च न्यायालयात अर्ज नाकारल्यानंतर आपण  सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागू शकतो. येथे एक महत्वपूर्ण मुद्दा देखील आहे की जर कोणी आपल्या विरूद्ध खोटा एफआयआर करतो.
आपण त्याच्या विरुद्ध न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ अन्वये एक अर्ज द्याल, तेव्हा न्यायालय निर्णय देईपर्यंत पोलिस आपल्या विरुद्ध कारवाई करू शकत नाही आणि आपल्याला अटक करू शकत नाही.
चौकशीसाठी तपासणी अधिकाऱ्याला न्यायालय आवश्यक ते निर्देश देखील देऊ शकतात. जर न्यायालयाने यांत आपले निर्दोषत्व मान्य केले तर आपण वरील खोटे एफआयआर,आपली बदनामी या प्रकरणात त्या व्यक्तीच्या विरोधात होते मानहानीचा गुन्हा दाखल करू शकतात.
(फौजदारी प्रक्रिया संहिता २५०) यांत  ज्यांनी खोटा एफआयआर दाखल केला आहे त्यांना सुद्धा शिक्षा मिळू शकते.
अजून एक पर्याय म्हणजे भारतीय दंड विधानाच्या कलम २११ नुसार आपण त्याविरुद्ध एक केस दाखल करू शकता, ज्यामध्ये खोटा एफआयआर देणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षांची शिक्षा तसेच दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा दोन्ही या स्वरूपात शिक्षा हो शकते.
तसेच, भारतीय दंड विधानाच्या कलम १८२ नुसार, ज्या पोलिस अधिकाऱ्याने खोटे एफआयआर दाखल केला आहे,त्याच्यावर देखील कारवाई होते आणि तो अधिकारी शिक्षेस पात्रअसतो. २. संविधानाच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत आपण उच्च न्यायालयात खोट्या एफआयआरच्या विरूद्ध अर्ज करू शकता:
संविधानाच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत रिट याचिकाः
जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीविरूद्ध खोट्या एफआयआर दाखल केला असेल तर अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीने संविधानच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत एक रिट याचिका दाखल करू शकतो ज्याद्वारे खोटा एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज देऊ शकता.
उच्च न्यायालयाने पुरावे तपासल्यानंतर, असे सिद्ध झाले की ज्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे तो निर्दोष आहे, मग तो खोटा एफआयआर रद्द होतो.
अशा पद्धतीने कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन आपण खोट्या एफआयआर विरुद्ध लढा देऊ शकतो.

आंबेडकर यांची अकोल्याची उमेदवारी कॉंग्रेसची खेळी का आंबेडकर यांची युती…? वं.ब.आ. च्या कार्यकर्त्याला व मतदाराला पडलेला प्रश्न -: राजेश खडके सकल मराठी समाज




                 कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभेचा प्रचार सुरु केला आहे.एमआयएम बरोबर वंचित बहुजन आघाडी तयार केल्यानंतर या दोन्ही पक्षाला मोठा झटका बसलेला या संपूर्ण महाराष्ट्र राज्याने पाहिला आहे.त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीसाठी १२ जागांचा प्रस्ताव सादर करून महाराष्ट्र राज्यात दिवस रात्र फिरून कष्ट करून सभांचा धडाका सुरु केला आहे.वंचित बहुजन आघाडीची राज्यात एवढी मोठी चर्चा झाली की,सभेला लाखोंची संख्या वाढली आहे असे असताना या लाखोच्या गर्दीच्या सभेमधून ओवीसी गायब झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.त्यातच बाळासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांची भेट घेतली आहे.याचाच फायदा कॉंग्रेसने घेऊन वंचित बहुजन आघाडीचा १२ जागांचा प्रस्ताव फेटाळला असल्याचे जाणकार यांचे मत आहे.कारण छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे असल्यामुळे बाळासाहेबांनी महाआघाडीत जाण्यासाठीचे रस्ते खुली केली आहेत …? असा प्रश्न जाणकारांनी दावा होता आणि हा दावा कॉंग्रसने जाहीर केलेल्या उमेदवारी वरून तरी निश्चित झाल्याचे दिसत आहे.परंतु आंबेडकर जाणकारांचे असे मत आहे की,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन आंबेडकर यांनी कॉग्रेसला येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणा बरोबर असेल असा डाव टाकल्यामुळे ही उमेदवारी कॉंग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांना भ्रमित करण्यासाठी जाहीर केली आहे.तसेच जाणकार असे म्हणतात की,प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातूनच उमेदवारी लढत असतात त्यामुळे त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवारीमुळे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता भ्रमित होणार नाही.कारण सोलापूर येथील कार्यकर्त्यांचे मत असे आहे आंबेडकर यांनी आमच्याकडून निवडणूक लढवावी.पण आमच्या सकल मराठी समजाचे असे मत आहे की,एमआयएम प्रमुख ओवीसी यांचा नाराजीचा सूर आहे आता कॉंग्रसच्या खेळी मुळे ते नाराज आहेत की भेट अस्त्रामुळे नाराज आहे परंतु आमच्या म्हणण्या प्रमाणे ओवीसी हे आंबेडकर यांनी घेत्लेलेया भूमिकेमुळे नाराज आहे.कारण एमआयएम हा वंचित बहुजन आघाडीतील महत्वाचा घटक आहे त्याला विश्वासात घेऊनच आंबेडकर यांनी बीड नाशिक आणि म्हाडा येथील उमदेवारी जाहीर करणे गरजेचे होते त्यातच पश्चिम महाराष्ट्र मधून त्यांचेशिवाय मुस्लीम उमेदवार जाहीर करणार असे त्यांनी बोल्यामुळे ओवीसीची सभांना गैरहजेरी लागत आहे.एकंदरीत राजकीय जाणकारांचे असे म्हणणे आहे की,आबेडकर यांच्या जाहीर सभांचा आढावा घेतला असता आणि त्या सभांच्या भाषणाचे अवलोकन केले असता स्पष्टपणे असे दिसून येते की,प्रकाश आंबेडकर यांची कॉंग्रेस बरोबर झालेली युती असल्यामुळे अकोल्यातून प्रकाश आंबेडकर असतील असे जाहीर केलेल्या उमेदवार यादीतून दिसून येते.














Saturday, January 12, 2019

प्रकाश आंबेडकर यांचे भेट अस्त्र कोणासाठी..! बहनजी याची भेट झाल्यास समीकरण बदलेल....! राजेश खडके सकल मराठी समाज


                             विषय असा आहे की,संसदीय राजकारण करीत असताना इतर राजकीय मित्रांची सांगड घालून नवी समीकरणे उभी करावी लागतात यात काही दुमत नाही.परंतु हि समीकरणे अमलात आणीत असताना त्याचा आपल्यावर दुष्परिणाम तर होणार नाही ना याची काळजी फार घ्यावी लागते हे कोणाला सांगावे असे मला वाटत नाही.परंतु राजकीय आढावा घेतला तर सध्या वरच्या स्थरावरचे राजकारण वंचित बहुजन आघाडीला कोंडीत पकडण्यासाठीचे सुरु आहे हे मात्र निश्चितपणे संसदीय राजकारण समजणारा कार्यकर्ता नक्कीच समजून जाईल हे कांही सांगायचे कारण आहे असे मला वाटत नाही.प्रकाश आंबेडकरांचा १२ जागांचा प्रस्ताव जवळ जवळ कॉंग्रेसने नाक्र्ल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.कारण काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार आणि कॉंग्रेसचे राहुल गांधी यांची बैठक झाली आणि या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेसाठीच्या ४८ जागांचे आपसात वाटप झाले आहे त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला २३ जागा तर कॉंग्रेसला २५ जागा मिळाल्या आहेत.याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीच्या १२ जागांचा प्रस्ताव नाकारण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत.त्यामध्ये आता कॉंग्रेस पक्ष त्यांच्या मित्र पक्षाला काय देणार आणि स्वत:कडे काय ठेवाणार आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे नवीन अस्त्र म्हणजे नवीन मित्रांची जुळवणी अस्त्र बाहेर काढले आहे आणि ते म्हणजे "भेट अस्त्र" यामध्ये त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जुळवणी करीत आहेत काय...? अशा चर्चेला उधाण आले आणि तशा प्रकारच्या सोशल मिडीयावर बातम्याही प्रसिध्द झाल्या आहेत.यातच सकल मराठा समाजाच्या महाराष्ट्र क्रांती सेनेच्या पक्ष नेतृत्वाने आंबेडकर यांची भेट घेऊन युतीचा प्रस्ताव सादर केल्याची बातमीही एका वेब चॅनलला प्रसारित झाली आहे.नव्यानेच शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांची भेट घेऊन प्रकाश आंबेडकर मराठा-ओबीसी समीकरण आखीत आहेत असे दिसते.परंतु सामन्य कार्यकर्ता आणि मतदार यांना असा प्रश्न पडला आहे की या भेट अस्त्राचा परिणाम प्रकाश आंबेडकर कोणासाठी वापर करीत आहे.आणि या अस्त्राचा खरच परिणाम होणार आहे काय...? हा ही विचार होणे गरजेचे आहे असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.जर खरेच भेटीचे अस्त्र जर प्रकाश आंबेडकर यांना मजबूत कराचे असेल तर त्यांनी मायावती बहन यांची भेट घेतली पाहिजे याचा परिणाम नक्कीच होईल यात काही दुमत नाही.कारण आता वेळ राहिलेली नाही कॉंग्रस आणि राष्ट्रवादी कॉंग्रस यांनी आपला प्रचार सुरु केला आहे.

Friday, January 11, 2019

माता जिजाऊ यांच्या ४२१ व्या जयंती निमित्ती माझे दोन शब्द ....! राजेश खडके सकल मराठी समाज



माता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये सिंध्दखेड येथे लाखोजी जाधव यांच्या घरामध्ये झाला आहे.आज त्यांची ४२१ वी जयंती आहे या जयंती निमित्ती कोटी कोटी प्रणाम....! मित्रहो आपणास माता जिजाऊ कोण होत्या हे सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.परंतु त्यांच्या कार्याला आणि इतिहासाला पुन्हा उजाळा मिळावा म्हणून काय इतिहासातील गोष्टी समोर आणण्यासाठीचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे.माता जिजाऊ यांचे लग्न वेरुळचे भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्या बरोबर झाले.शहाजीराजे यांचे स्वप्न होते की,रयतेचे राज्य निर्माण झाले पाहिजे आणि इथली रयत आणि शेतकरी तसेच स्त्री यांचे संरक्षण झाले पाहिजे ही संकल्पना त्यांनी त्यांची पत्नी माता जिजाऊ यांना बोलून दाखविली.त्यासाठी लागणारी व्यवस्था म्हणून त्यांनी १६१५ मध्ये पुणे येथे लाल महाल बांधला होता आणि नागरवास या गावी हत्तीच्या वजना एवढी तुळा करून गोर गरीब जनतेमध्ये धन धान्य आणि सोने चांदी स्वराज्याची संकल्पना प्रस्थापित केली पुढे त्याच गावचे नाव तुळा केलेवरून तुळापुर असे पडले.आणि १६३० मध्ये मुरार जगदेव याने याच लाल महालावर हल्ला करून पुणे बेचीराग केले.पुढे १९४५ माध्ये माता जिजाऊ आणि शिवराय पुणे येथील पासलकर वाड्या मध्ये आल्यानंतर प्रचंगगडाचा राजा रायनाक परवारी यांनी हा गड शिवरायांच्या हाती स्वाधीन केला आणि याच गडावर शिवरायांनी माता जिजाऊ यांच्या मार्गदर्शानाखाली यल्या मांगाच्या हातून स्वराज्याचे पहिले तोरण चढवून त्याचे पुढे तोरणागड असे नामकरण केले.त्यानंतर याच दिवशी स्त्रीची बेअबदा गुजर पाटलाची हातपाय कलम करून त्याचा चौरंगा करण्याची शिक्षा पासलकर वाड्यामध्ये देऊन पहिला न्याय निवाडा करून स्वराज्य प्रस्थापित केले.नंतर त्याच बाजूला राजगड उभारून २२ वर्ष स्वराज्याचा राज्य कारभार चालविला.बेचीराग झालेले पुणे आणि लाल महाल दुरुस्त करून पुन्हा त्याची उभारणी केली.स्वराज्याला मान्यताप्राप्त आणि सुरक्षित अशी राजधानी असावी म्हणून रायगड उभारून ६ जून १६७४ मध्ये माता जिजाऊ यांचे आदेशावर पहिला राज्याभिषेक करून आता स्वराज्य प्रस्थापित झाले आहे असा संदेश संपूर्ण जगाला दिला.माता जिजाऊ यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांना तयार करून समतावादी स्वराज्य निर्माण केले.

Wednesday, January 9, 2019

बहनजी वंचित आघाडीत सामील झाल्यास भाऊ मुख्यमंत्री होतील...! राजेश खडके सकल मराठी समाज


           आदरणीय काशीराम साहेबानी संपूर्ण देशामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करून बहुजन समाज पार्टी स्थापन केली पुढे बहन मायवती यांनी याच विचारावर काशीराम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संसदीय राजकारण मोठ्या प्रमाणात केले आहे.तुम्हा सर्वांना सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही परंतु सदरच्या लेखाचा जर अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्याचा उच्चार याठिकाणी होणे गरजेचे आहे असे मला वाटत आहे.बहुजन समाज पार्टीचा एकंदरीत महाराष्ट्र राज्याचा आढावा घेतला तर असे दिसून येते की,राज्यातील ७० ते ८० मतदार संघात बहनजी यांचा प्रभाव आहे आणि हा पक्ष आंबेडकरी विचारांचा आहे यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही.एकंदरीत आजची परिस्थती पहाता बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यातील बऱ्याच विधानसभेच्या मतदार संघावर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यामतून प्रभाव निर्माण केला आहे.उत्तर प्रदेश मध्ये बहन मायावती यांनी अखिलेश यादव आणि अजित जोगी यांना बरोबर घेऊन कॉंग्रेसला बाजूला सारून आघाडी तयार केलेली आहे.त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यात बहन मायावती वंचित बहुजन आघाडीत सामील झाल्यास राज्यातील १७० ते १८० जागांवर प्रभाव पडु शकतो अशी परिस्थिती आहे.असे जर झाले तर वंचित बहुजन आघाडीला राज्यातील महाआघाडीची गरज पडणार नाही असे स्पष्ट चित्र आहे.छगन भुजबळ यांचे काही राज्यात ओबीसी मतावर प्राबल्य आहे यात काही दुमत नाही परंतु त्यांचेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पगडा आहे.बाळासाहेब सध्या ओबीसी कार्ड खेळत आहेत त्यानी हे राजकीय समीकरण नक्की आखावे पण हे आखीत असताना आंबेडकरी विचारांचा बहनजीकडे असणारा मतदार आपल्याकडे कसा येईल याचीही रणनीती आखली पाहिजे.एकंदरीत आघाडीचे राजकारण पहाता कॉंग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात काही पाडेल असे चित्र दिसत नाही त्यामुळे मागणी केलेल्या १२ जागांचा प्रस्ताव त्यांना मान्य करायचा आहे असे दिसत नाही.परंतु हे करीत असताना आकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर निवडून येतील असेही ते म्हणत आहेत जर अशा वाक्याचा अर्थ जर काढायचा असेल तर स्पष्टपणे असे दिसते की,त्यानी पुन्हा एकदा बाळासाहेब जर आघाडीत आले नाही तर ते त्यांच्या विरोधी षड्यंत्र केल्याशिवाय गप्प बसणार नाही.छगन भुजबळ यांची जरी बाळासाहेबानी भेट घेऊन एक दबावतंत्र निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला असेल तरी ते काही वंचित बहुजन आघाडीच्च्या गळाला लागेल असे वाटत नाही.परंतु बहन मायावती यांना जर वंचित बहुजन आघाडी बरोबर जोडण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी केला तर निश्चितच बाळसाहेब आंबेडकर यांनी उभी केलेली वंचित बहुजन आघाडी १४० जागा निवडून येतील आणि मुख्यमत्री पदावरील वंचित बहुजन आघाडीचा दावा हा मजबुतीने बसेल आणि महाराष्ट्र राज्याचा भावी मुख्यमंत्री हे डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे नातू असतील यात काही कोणाचे दुमत असायचे कारण नाही.परंतु जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचे असतील तर बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही बहन मायावती यांचेवार दबाव गट निर्माण केला पाहिजे.आमच्या तर सकल मराठी समाजाचे असे मत आहे की,यासाठीचा प्रयत्न आपण सर्वानी केला पाहिजे जर बहन मायावती वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाल्यास भाऊ प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील आणि हि संधी पुन्हा येईल असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत नाही.त्यामुळे अशा संधीचा फायदा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घ्यावा यासाठी सकल मराठी समाजाचा दाखल प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने मान्य जरी केला नाही तरी चालेल....त्यामुळे बहनजी वंचित आघाडीत सामील झाल्यास भाऊ मुख्यमंत्री होतील ही काळ्या दगडा वरील पांढरी रेष आहे...!