Wednesday, January 9, 2019

बहनजी वंचित आघाडीत सामील झाल्यास भाऊ मुख्यमंत्री होतील...! राजेश खडके सकल मराठी समाज


           आदरणीय काशीराम साहेबानी संपूर्ण देशामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करून बहुजन समाज पार्टी स्थापन केली पुढे बहन मायवती यांनी याच विचारावर काशीराम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संसदीय राजकारण मोठ्या प्रमाणात केले आहे.तुम्हा सर्वांना सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही परंतु सदरच्या लेखाचा जर अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्याचा उच्चार याठिकाणी होणे गरजेचे आहे असे मला वाटत आहे.बहुजन समाज पार्टीचा एकंदरीत महाराष्ट्र राज्याचा आढावा घेतला तर असे दिसून येते की,राज्यातील ७० ते ८० मतदार संघात बहनजी यांचा प्रभाव आहे आणि हा पक्ष आंबेडकरी विचारांचा आहे यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही.एकंदरीत आजची परिस्थती पहाता बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यातील बऱ्याच विधानसभेच्या मतदार संघावर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यामतून प्रभाव निर्माण केला आहे.उत्तर प्रदेश मध्ये बहन मायावती यांनी अखिलेश यादव आणि अजित जोगी यांना बरोबर घेऊन कॉंग्रेसला बाजूला सारून आघाडी तयार केलेली आहे.त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यात बहन मायावती वंचित बहुजन आघाडीत सामील झाल्यास राज्यातील १७० ते १८० जागांवर प्रभाव पडु शकतो अशी परिस्थिती आहे.असे जर झाले तर वंचित बहुजन आघाडीला राज्यातील महाआघाडीची गरज पडणार नाही असे स्पष्ट चित्र आहे.छगन भुजबळ यांचे काही राज्यात ओबीसी मतावर प्राबल्य आहे यात काही दुमत नाही परंतु त्यांचेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पगडा आहे.बाळासाहेब सध्या ओबीसी कार्ड खेळत आहेत त्यानी हे राजकीय समीकरण नक्की आखावे पण हे आखीत असताना आंबेडकरी विचारांचा बहनजीकडे असणारा मतदार आपल्याकडे कसा येईल याचीही रणनीती आखली पाहिजे.एकंदरीत आघाडीचे राजकारण पहाता कॉंग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात काही पाडेल असे चित्र दिसत नाही त्यामुळे मागणी केलेल्या १२ जागांचा प्रस्ताव त्यांना मान्य करायचा आहे असे दिसत नाही.परंतु हे करीत असताना आकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर निवडून येतील असेही ते म्हणत आहेत जर अशा वाक्याचा अर्थ जर काढायचा असेल तर स्पष्टपणे असे दिसते की,त्यानी पुन्हा एकदा बाळासाहेब जर आघाडीत आले नाही तर ते त्यांच्या विरोधी षड्यंत्र केल्याशिवाय गप्प बसणार नाही.छगन भुजबळ यांची जरी बाळासाहेबानी भेट घेऊन एक दबावतंत्र निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला असेल तरी ते काही वंचित बहुजन आघाडीच्च्या गळाला लागेल असे वाटत नाही.परंतु बहन मायावती यांना जर वंचित बहुजन आघाडी बरोबर जोडण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी केला तर निश्चितच बाळसाहेब आंबेडकर यांनी उभी केलेली वंचित बहुजन आघाडी १४० जागा निवडून येतील आणि मुख्यमत्री पदावरील वंचित बहुजन आघाडीचा दावा हा मजबुतीने बसेल आणि महाराष्ट्र राज्याचा भावी मुख्यमंत्री हे डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचे नातू असतील यात काही कोणाचे दुमत असायचे कारण नाही.परंतु जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचे असतील तर बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही बहन मायावती यांचेवार दबाव गट निर्माण केला पाहिजे.आमच्या तर सकल मराठी समाजाचे असे मत आहे की,यासाठीचा प्रयत्न आपण सर्वानी केला पाहिजे जर बहन मायावती वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झाल्यास भाऊ प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील आणि हि संधी पुन्हा येईल असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत नाही.त्यामुळे अशा संधीचा फायदा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घ्यावा यासाठी सकल मराठी समाजाचा दाखल प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने मान्य जरी केला नाही तरी चालेल....त्यामुळे बहनजी वंचित आघाडीत सामील झाल्यास भाऊ मुख्यमंत्री होतील ही काळ्या दगडा वरील पांढरी रेष आहे...!

2 comments:

  1. एकदम मस्त आहे जय शिवराय जय भीम जय भारत सर्वाना मित्रानो only Avd बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जय भीम जय भारत सर्वाना मित्रानो

    ReplyDelete
  2. पण मायावतींनी आर्थिक निकषावर आधारीत आरक्षणाला पाठींबा द्यायला नको होता.

    ReplyDelete