Thursday, January 17, 2019
पासलकर साहेब अब्दाली निघून गेला...म्हणून औरंगाजेबाचे समर्थन होऊ शकत नाही..तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे होऊच शकत नाही…..! राजेश खडके सकल मराठी समाज
त्यावेळचा पेशवा म्हणून नानासाहेब पेशवा होता आणि नानासाहेबांचा इतिहास हा सगळ्यांनाच माहित आहे त्यामुळे येथे सांगणे मला गरजेचे वाटत नाही.पानिपतचे युध्द अठरा पगड जातीचे मराठे कधीही विसरू शकत नाही कारण हे युध्द शिवनीती विरुध्द होते म्हणूनच या युध्द्दात एक लाख अठरा पगड जातीचे मराठे मारले गेले आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे हा शहीददिन आहे विजयदिन म्हणून साजरा करणे म्हणजे शिवनीतीच्या विरोधात समर्थन करणे होय.वास्तविक पहाता मराठ्यांचे हे युध्द खरेच दिल्ली जिंकण्यासाठी होते का असा प्रश्न आपण इतिहासाला विचारला पाहिजे कारण इतिहास नक्कीच तुम्हाला त्याचे उत्तर देईन...! अब्दाली हा अफगाणिस्तान मधून दिल्ली जिकण्यासाठी जवळ जवळ पावणेदोन लाखाचे सैन्य घेऊन आलेला होता...आणि दिल्लीवर आपल्यालाही ताबा मारायचा होता.कारण पेशवाई मध्ये हे युध्द जिंकणे म्हणजे शिवनिती कशी चुकीची होती हे दाखविण्याचा प्रयत्न नानासाहेब पेशव्यांनी केला होता.त्यामुळे सदाभाऊ पेशवे आणि विश्वासराव यांचे नेतृत्वात लढण्यासाठी जवळ जवळ सव्वालाखाचा लवाजमा पाठवून नानासाहेब पेशवे पुण्यातच थांबले होते आणि तो काळ होता १७६१ चा यापूर्वी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा कोणताही सण साजरा केला जात नव्हता हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे अठरा पगड जातीच्या मराठ्यांचे अब्दाली बरोबर पानिपत येथे सामना झाला होता.मराठ्यांना शिवानिती माहित होती परंतु हे युद्ध शिवनीती नुसार नव्हते...कारण पेशव्यांना त्यांची नीती येथे राबवायची होती.परंतु पेशव्यांची नीती अब्दाली याला माहित झाली होती कारण तो एक योध्दा होता.त्याने लागलीच मराठ्यांची रसद तोडली हे मराठ्यांच्या लक्षात यायला वेळ लागला युध्द सुरु झाले होते.मराठे अब्दालीच्या सैन्यावर तुटून पडले रसद तुटल्यामुळे मराठे सैन्य कमजोर पडले परंतु वीर योध्दा असल्यामुळे त्यांनी अब्दालीला हैराण करून सोडले हाहाहा म्हणता युध्दाचे स्वरूप भयानक होत चालले होते.इकडे नानासाहेब पेशवा नगरमध्ये एका बारा वर्षाच्या मुली बरोबर विवाह करीत होता आणि तिकडे वीर मराठे धारतीर्थ पडत चालले होते.त्यावेळेस एक लाख अठरा पगड जातीचा मराठा युध्दात शौर्य दाखवीत शहीद झाला होता.त्यामुळे शिवनिती विरुध्द झालेल्या या युध्दांमुळे स्वराज्यात १ लाख महिला विधवा झाल्या होत्या एक लाख कुटुंबात शोककळा पसरली होती.स्वराज्यावर एकप्रकारची संक्रात आली होती.या युध्दामुळे अब्दाली विजय झाला असे म्हणता येणार नाही पण हे युध्द झाल्यावर त्यालाही मोठ्या प्रमाणात हानी झाली होती काही मराठ्यांना त्यांनी बंदी बनवून तो तेथेच चार महिने राहिला.या युध्दामुळे झालेला नरसंहार पाहून त्या युध्दाचा त्यालाही पश्चाताप झाला आणि पुन्हा तो आफगानिस्तानकडे जायला निघाला जाताना त्यांने बंदी केलेले मराठे सरदार तो बरोबर घेऊन गेला आणि जाता जाता त्यांना तो बलुचीस्थान मध्ये सोडून गेला आजही त्या मराठ्यांच्या वारसांना स्वराज्याची आठवण होत आहे.त्यामुळे या पानिपतच्या युध्दाला विजयदिन म्हणणे म्हणजे शिवानितीचा अपमान करणे होय.आपण जर या पानिपतच्या युध्दास विजयदिन म्हणू लागलो तर आपल्याला औरंगाजेबाचेही समर्थन करावे लागेल कारण येथे जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांची त्याने हत्या केली म्हणून त्याला स्वराज्य काही मिळाले नाही.त्याला शंभूराजे यांच्या हत्येनंतर पश्चाताप झालेला होता.कारण एखाद्या राजाला जर दुसऱ्या राजाने जेरबंद केले तर तो अशाप्रकारे दुसऱ्या राजाची हत्या करीत नाही.छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या औरंगाजेबाने केली म्हणून तो काही विजयी झाला नाही कारण येथेही त्याला काही मिळाले नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे पानिपतच्या युद्धातून आपल्याला काही मिळाले नाही आणि अब्दालीलाही काही मिळाले नाही.येथे फक्त शौर्य दिसले म्हणून आपण छत्रपती संभाजी महाराज यांना शौर्यवीर म्हणतो त्याच प्रमाणे पानिपतचे युध्द हे शौर्यदिन आहे.यानंतर पेशवाईने या युध्दाची सल स्वराज्यातील रयतेच्या मनातून काढण्यासाठी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि पानिपतला जे झाले ते विसरून जा असे म्हणत हा सण उत्सव म्हणून इथल्या रयतेच्या मनात बिंबविला आहे.त्यामुळे पासलकर साहेब पानिपतचे युद्ध हा विजयदिन नसून शौर्यदिन म्हणजेच शहीददिन आहे त्यामुळे पानिपतच्या युध्दाचे समर्थन करणे म्हणजे अन्यायकारी पेशवाईचे आणि औरंगाजेबाचे समर्थन करण्यासारखे होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment