Saturday, January 12, 2019

प्रकाश आंबेडकर यांचे भेट अस्त्र कोणासाठी..! बहनजी याची भेट झाल्यास समीकरण बदलेल....! राजेश खडके सकल मराठी समाज


                             विषय असा आहे की,संसदीय राजकारण करीत असताना इतर राजकीय मित्रांची सांगड घालून नवी समीकरणे उभी करावी लागतात यात काही दुमत नाही.परंतु हि समीकरणे अमलात आणीत असताना त्याचा आपल्यावर दुष्परिणाम तर होणार नाही ना याची काळजी फार घ्यावी लागते हे कोणाला सांगावे असे मला वाटत नाही.परंतु राजकीय आढावा घेतला तर सध्या वरच्या स्थरावरचे राजकारण वंचित बहुजन आघाडीला कोंडीत पकडण्यासाठीचे सुरु आहे हे मात्र निश्चितपणे संसदीय राजकारण समजणारा कार्यकर्ता नक्कीच समजून जाईल हे कांही सांगायचे कारण आहे असे मला वाटत नाही.प्रकाश आंबेडकरांचा १२ जागांचा प्रस्ताव जवळ जवळ कॉंग्रेसने नाक्र्ल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.कारण काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार आणि कॉंग्रेसचे राहुल गांधी यांची बैठक झाली आणि या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेसाठीच्या ४८ जागांचे आपसात वाटप झाले आहे त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला २३ जागा तर कॉंग्रेसला २५ जागा मिळाल्या आहेत.याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीच्या १२ जागांचा प्रस्ताव नाकारण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत.त्यामध्ये आता कॉंग्रेस पक्ष त्यांच्या मित्र पक्षाला काय देणार आणि स्वत:कडे काय ठेवाणार आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे नवीन अस्त्र म्हणजे नवीन मित्रांची जुळवणी अस्त्र बाहेर काढले आहे आणि ते म्हणजे "भेट अस्त्र" यामध्ये त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जुळवणी करीत आहेत काय...? अशा चर्चेला उधाण आले आणि तशा प्रकारच्या सोशल मिडीयावर बातम्याही प्रसिध्द झाल्या आहेत.यातच सकल मराठा समाजाच्या महाराष्ट्र क्रांती सेनेच्या पक्ष नेतृत्वाने आंबेडकर यांची भेट घेऊन युतीचा प्रस्ताव सादर केल्याची बातमीही एका वेब चॅनलला प्रसारित झाली आहे.नव्यानेच शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांची भेट घेऊन प्रकाश आंबेडकर मराठा-ओबीसी समीकरण आखीत आहेत असे दिसते.परंतु सामन्य कार्यकर्ता आणि मतदार यांना असा प्रश्न पडला आहे की या भेट अस्त्राचा परिणाम प्रकाश आंबेडकर कोणासाठी वापर करीत आहे.आणि या अस्त्राचा खरच परिणाम होणार आहे काय...? हा ही विचार होणे गरजेचे आहे असे सकल मराठी समाजाला वाटत आहे.जर खरेच भेटीचे अस्त्र जर प्रकाश आंबेडकर यांना मजबूत कराचे असेल तर त्यांनी मायावती बहन यांची भेट घेतली पाहिजे याचा परिणाम नक्कीच होईल यात काही दुमत नाही.कारण आता वेळ राहिलेली नाही कॉंग्रस आणि राष्ट्रवादी कॉंग्रस यांनी आपला प्रचार सुरु केला आहे.

No comments:

Post a Comment