डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचे महापरिनिर्वाण झाले नंतर जे रिपब्लिकन नावाने पक्ष उभे राहिले त्या
नेत्यांचे स्वार्थ राजकारण आत्ता जनते समोर आले आहे. रिपब्लिकन नावाला भावनिक होऊन
जनता साथ देत होती.पण आत्ता जनतेच्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या आहेत.मग सामाजिक
संघटना म्हणून “दलित पॅथर” असोत
कोणतेही नेत्यांना आता जनता भिक घालीत नाही.जो तो उठतो ज्याला सामाजिक आणि राजकीय
प्रश्न कळत नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी उभी केलेली “समता” कळत नाही.बौध्द धम्मातील २२ प्रतिज्ञा म्हणजे काय हे समजत
नाही.ज्याला स्वराज्य म्हणजेच संविधान हे कळत नाही.आणि महत्वाचे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निस्वार्थ भावनेचा सन्मान
कसा करावा हे कळत नाही.जो उठतो तो रिपब्लिकन नावाने किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचे नावाने संघटन उभारतो आणि लेटरपॅड तयार करून आपले उदारनिर्वाह करतो.रिपब्लिकन
नाव आणि निळा ध्वज हे काही उदारनिर्वाहाचे साधन नाही ते त्यागाचे आणि संघर्षाचे
प्रतिक आहे.आता जनता समजली आहे त्यामुळे अशा उदारनिर्वाह करण्याऱ्याचे संघटन
चालविणाऱ्या लोकांना दाद देत नाही हे समोर आलेले आहे.अशा भांडवली संघटना पक्ष बंद
झाले पाहिजे.काही लोक प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात काम करतात मात्र नेहमी
समाजामध्ये इतर लोकाप्रमाणे बदनामी करीत फिरत असतात.स्वत:ला जेष्ठ म्हणवून
गटातटाचे राजकारण उभे करीत फिरत असतात.रमणा घेऊन कार्य करीत असतात हे लोक कोठून
आले माहित नाही मात्र मला चळवळ संपूर्ण कळते असे आव आणीत असतात.मात्र त्यांना
काहीच कळत नाही असे माझे ठाम मत आहे तसे असते तर नवनवीन संघटना उभ्या राहताना
त्यांना पाठबळ दिले नसते.उलट अशा कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांना समजून सांगून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचे घराणे मजबूत करण्याचे कार्य करून चळवळीचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्याचा
जाहीर करून प्रामाणिकपणेची जाण करून दिली असती.एकंदरीत या सर्व बाबींचा विचार
केल्यानंतर माझे मन अस्वस्थ झाले आहे यामध्ये सर्वात मोठा दोष हा शिकलेल्या
वर्गाचा आहे त्यांनी कधी पाठीमागे राहिलेल्या वर्गाचा विचार केला नाही.त्यांनी असा
विचार का केला नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही ठिकाणी केला असता असे लक्षात
येते की,शिकलेला वर्ग
नेमका आपला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो....परंतु त्यातील ८०% वर्ग आपला नसल्याचे जाणवते.त्याचे कारण असे
आहे की,आजही वस्ती
वाड्या पर्यंत शिक्षण कसे करावे कोणाला कळत नाही तसे त्या वर्गाने प्रचार आणि
प्रसार केल्याचे कुठेही दिसत तो अप्पलपोटी वर्ग असल्याची बरेच जिवंत उदाहरणे देता
येतील.आताशी कुठे समाजाच्या खऱ्या वर्गा पर्यंत सरकारी सेवेत कसे दाखल व्हायचे ते
कळाले आणि मनुवादी सरकारने स्पर्धा परीक्षा बंद करून प्रायव्हेट सेक्टर मधून
सरकारी सेवा भरती करायचे ठरविले आहे.त्यामुळे १९५७ पासून ते आत्ता पर्यंत समाजाचे
नुकसानच होत आलेले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आज भारिप बहुजन महासंघ या
पक्षाच्या माध्यामतून समाजाला न्याय देण्याचे काम करीत आहेत.परंतु यांच्या कर्यात
मनुवादी रमणाधारी गुलाम अडथळा निर्माण करीत आहे.त्यांची बदनामी कशी होईल याची
तजवीज करीत आहे आजही समाजापासून त्यांना दूर ठेवण्याचे काम करीत आहेत.नुकताच माता
रमाबाई यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती
श्रीमान कोविंद यांचे हस्ते करण्यात आले.परंतु या कार्यक्रमात डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांच्या घराण्याला बोलविण्यात आलेले नाही त्यांचे घराण्याला दूरच ठेवण्याचे
काम करण्यात आले आहे.जर आज समाजाचे एकसंघ नेतृत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे
घराण्याकडे ठेवले असते तर समाजाला न्याय हा मिळालाच असता असे माझे मत आहे.(क्रमश😊
Sunday, June 17, 2018
Saturday, June 16, 2018
( भाग – ४६ ) “हिंदुत्ववादी” मुद्द्याचा प्रचार करण्यासाठीच शिवसेना या संघटनेचा वापर करून....भारतीय जनता पार्टीची स्थापना....हिंदुत्ववाद प्रचाराच्या माध्यमातून “अॅक्ट्रोसिटी अॅक्ट” कायदा मंजूर.....! यासाठीच मराठवाडा नामांतर संघर्ष लढा १७ वर्ष चालविला.....!
विषय असा आहे की,जनसंघाच्या माध्यामतून पुन्हा एकदा
मनुवादी व्यवस्थेने वेगवेगळ्या प्रकारे समता विस्थापित करण्यासाठी चळवळीतील
स्वार्थी नेत्यांना कॉंग्रेसच्या माध्यमातून हाताशी धरून एका चौकटीत आणण्याचे
कार्य केले.मात्र मराठवाडा नामांतर चळवळीच्या माध्यमातून नवनवीन नेते उभे रहात
होते.यातच भगवा विरुध्द निळा संघर्ष जेवढा जोर धरेन तेवढी समता विस्थापित होईल असे
मनुवादी षड्यंत्र होते.१९७६ पासून नामांतराचे आंदोलन जोर धरू लागले होते याचाच
फायदा घेण्यासाठी शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात भगवा ध्वज घेऊन काँग्रेसी पिलावळ
यांनी दलितांवर हल्ले करण्याचा जोर मोठ्या प्रमाणात सरू केला होता.जो समतेचा भगवा
ध्वज बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला होता त्या ध्वजाला बदनाम करण्यासाठी आणि
छत्रपती शिवाजी महाराज कसे कट्टरपंथीय हिंदुत्ववादी आहेत हे दाखविण्यासाठी त्यांच्या
नावाच्या घोषणा देत दलितांवर हल्ले करण्यात आले.हल्ल्याचे प्रमाण इतके वाढले की,माता भगिनीची आबरू लुटण्याचे
प्रकार झाले,दलित
तरुणांच्या हत्येचे प्रमाण वाढले,दलित वस्त्यावर हल्ले करून त्या जाळण्याचे प्रमाणात वाढ
झाली.हे छत्रपती शिवाराय आणि भगवा ध्वज बदनाम करण्याचे षड्यंत्र होते हे कोणाला
समजलेच नाही कारण आपण भावनिक झालो होतो.आपल्याला काहीच समजत नव्हते कारण आपण अजून अडाणी
होतो आपल्याला फक्त बाबसाहेब आंबेडकर यांचे नाव त्या विद्यापीठाला कसे लागेल एवढेच
समजत होते.परंतु भगव्या ध्वजा विरुध्द निळा ध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराज
विरुध्द डॉ.बाबासाहेब आंबेडकर हाच एक लढा निर्माण करून जो
अलुतेदार व बलुतेदार यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी जोडला होता तो तोडण्यासाठीचे
हे एक षड्यंत्र होते.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थपित केलेली जी समता होती ती
विस्थापित करण्याचे एक षड्यंत्र होते.आणि यातून एक मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववाद
उभा करायचा हे एक षड्यंत्र होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उभा केलेला समतावादी समाज मोडीत काढून पुन्हा तो
समता प्रस्थापित करू शकणार नाही याची ही व्यवस्था होती.याचा फायदा घेण्यासाठी “दलित
पॅथर” या संघटनेला संपवून “शिवसेना” मोठे करण्यासाठीचे षड्यंत्र होते. “दलित पॅथर”
या तरुणांच्या संघटनेच्या माध्यामतून जास्तीत जास्त हल्ले हिंदुत्वाच्या विरोधात
अलुतेदार व बलुतेदार यांचेवर करून त्याच्या पासून तोडण्याचे एक षड्यंत्र होते.आणि
या षडयंत्राचा फायदा घेऊन आपले राजकीय अस्तित्व उभारण्यासाठी साल १९८० मध्ये
भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली.हिंदुत्वाचा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रात
व्हावा यासाठी शिवसेनेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता.यासाठीच हा लढा
जास्तीत जास्त कसा चालेल याचीच काळजी मनुवादी व्यवस्थेकडून घेतली जात होती.जशी
भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तसतसे दलितांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत होते तसतसे
“दलित पॅथर” संघटनेच्या तरुणाकडून प्रतिहल्ले होत होते.यामुळे जो अलुतेदार व
बलुतेदार दलीतापासून दूर जात राहिला आणि आंबेडकरी चळवळ एक संघ न रहाता जाती जातीत
वाटू लागली.बौध्द झालेल्या अस्पृश्य महार याचेवरच अन्यायचे प्रमाण जास्त वाढू
लागले होते.या दहशती मुळे दलितांच्या बाजूने कोणी यायला तयार नव्हते.इतके भयानक
अत्याचार वाढले होते की,आता दलितांच्या संरक्षणाचा
मुद्दा ऐरणीवर येऊ लागला याचे लोन संपूर्ण देशात पसरले देशातील अस्पृश्य व्यक्तीचे
जीवन धोक्यात आल्याचे दिसून आले त्या अस्पृश्यांच्या जमिनी लाटण्याचे कटकारस्थान मोठ्या
प्रमाणात वाढ झाली जो लपून छपून दलितांच्या जमिनी लाटायचा तो आत्ता उघडपणे जमिनी
लाटू लागला.आणि दलितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे करून “दलित अन्याय अत्याचार प्रतिबंध
कायदा” म्हणजेच “अॅक्ट्रोसिटी अॅक्ट” हा कायदा १९८९ रोजी केंद्रसरकारने पास करून
देशातील दलितांचे संरक्षण केले.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक
नागरिकाच्या सुरक्षतेसाठी १९५० ला नागरी हक्क संरक्षण कायदा दिलेला आहे हे आपण
लक्षात ठेवले पाहिजे.(क्रमश😊
( भाग – ४५ ) १९८३ च्या रिपब्लिकन पक्ष बांधणीत अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना जयदेव गायकवाड आणि निलमताई गोरे यांची साथ...! अॅड.प्रकाश आंबेडकरांना यांना रोखण्यासाठी आणि सतत बदनामीच्या छायेत ठेवण्यासाठी आर्य सनातनी मनुवादी व्यवस्थेचे रमणाधारी यांची घूसपैठ.....!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब
आंबेडकर यांचे १९७७ मध्ये निधन झाले त्यांचे नंतर त्यांचे पुत्र प्रकाश तथा
बाळासाहेब आंबेडकर यांना राजकारणात सक्रीय व्हा असे सांगण्यात येत होते.परंतु
सक्रीय राजकारणापासून काही स्वार्थी लोकांनी यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांना
बाहेर ठेवले होते.त्यामुळे ते सक्रीय राजकारणात येण्याविषयी शंका निर्माण केली
होती परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी
निस्वार्थपणे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले होते.तेव्हा जी
जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्यावर सोपविली ती पार पाडली पाहिजे असा निर्णय घेऊन ते
१९८३ मध्ये सक्रीय झाले.त्यामुळे स्वार्थी नेत्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले होते
कारण मनुवादी व्यवस्थेची रमणा घेऊन त्यांचे सुरु असलेले कार्य थंडावणार
होते.मनुवादी व्यवस्था पुन्हा एकदा सावध झाली होती.त्यांनी काही रमणाधारी लोक
त्यांच्या नेतृत्वात घुसडले होते.परंतु याची चालूल आणि याची खबर कानोकान कोणाला
होय दिली गेले नाही.जसे छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्यात मनुवादी व्यवस्थेने
सनातनी प्रवृत्तीचे मराठे घुसविले होते त्याच पद्धतीत काही बौध्द धम्माची दीक्षा
घेऊन आंबेडकरी चळवळीमध्ये घुसडण्याचे काम पद्धतशीरपणे केले गेले होते.अस्पृश्य
महार हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर
होता परंतु अस्पृश्यतेच्या नावाखाली काही लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण नंतर घुसडलेला आहे.त्याला आंबेडकर
घराण्याला विरोध करण्याचे आणि नेहमी बदनामीच्या छायेत ठेऊन समाजापासून तोडण्याचे कार्य
दिले गेलेले आहे.तो ते कार्य पद्धतशीरपणे कोणालाही चाहूल न लागता करीत आहे.आता प्रकाश
तथा बाळासाहेब आंबेडकर उतरले आहेत म्हटल्यावर आपल्या रमणाधारी लोकांना सक्रीय
होण्याचे आदेश मनुवादी व्यवस्थेने दिले.
रिपब्लिकन पक्षाच्या पुर्नबांधणीला
प्रकाश तथा बाळासाहेब
आंबेडकर यांची सुरुवात -:
अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी दि. २७ नोव्हेंबर १९८३ रोजी सिद्धार्थ
विहार वडाळा येथे काही समविचारी लोकांची बैठक
बोलविली. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतील ‘रिपब्लिकन पक्ष' या
विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.
त्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाच्या पुनर्बाधणीच्या कार्याला प्रारंभ केला. त्यासाठी दि. ५ व ६ मे १९८४ रोजी
अहिल्याश्रम नानापेठ, पुणे येथे पुनर्गठित रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन गिताबाई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आले. या
अधिवेशनात भारतीय रिपब्लिकन पक्ष' या नावाने रिपब्लिकन पक्षाचे पुनर्गठन
करून एक स्वतंत्र राजकीय व्यासपीठ निर्माण करण्यात आले.पक्षाची पुनर्बाधणी
करत असताना यावेळी अॅड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला
खराखुरा रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा आपण निर्धार करत आहोत. या देशातील राजकारणावर सरंजामदार व
श्रीमंतांची घट्ट पकड
आहे. येथे दलित श्रमिकांना कोणतेही राजकीय अस्तित्व नाही. या बहुसंख्यांकांची सत्ता प्रस्थापित
करण्यासाठी आपण रिपब्लिकन पक्षाची पुनर्बाधणी करत आहोत. सद्याचे एका जातीचे राजकारण ठोकरून आपण
सर्वसमावेशक वृत्तीने सर्व
तळागाळातील समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल समुहांना बरोबर घेऊन केवळ मी पणाच्या वल्गना न करता विचार
आणि वृत्तीने सर्व जनतेचे राजकारण करून, तुकड्यांचे व लाचारीचे राजकारण न करता
पोलादी वृत्तीने संपूर्ण सत्ताच
ताब्यात घेण्यासाठी लढून, या देशातील सर्व राष्ट्रीय प्रश्नांकडे देशहिताच्या दृष्टिने पाहून, देशाचे नेतृत्व करणारा पक्ष निर्माण करत आहोत. अशी
घोषणा करून रिपब्लिकन पक्षाचे पुनर्गठन केले.
भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या पुनर्बाधणीसाठी अॅड. बाळासाहेब आंबेडकरांना अनेकांचे सहकार्य लाभले त्यात प्रामुख्याने श्री. लंकेश्वर गुरुजी, श्री. बी. आर. सिरसाठ, गुणवंतराव पाटील, दिलीप तायडे, प्राचार्य पटनायक, श्री. सुखदेवराव जाधव, श्री बळीराम खोडके, अॅड. पी. बी. मोरे, वाल्मीक अण्णा दामोदर, किशोर मानवटकर, श्री. चंदन तेलंग, श्री. एस. डी. म्हस्के, श्री. डी. जी. आडे, शिवा इंगोले, अँड. पी. एस. खडसे, अॅड. पी. पी. ताजणे, श्री. श्रावण निंबाळकर, श्री. देवराव वानखडे, नाना श्यामकुळे, श्री. शंकर माणके, एन. यु. सदावर्ते, अॅड. बी. एच. गायकवाड, प्रा. अविनाश डोळस, ज. वि. पवार, प्रा. खांडेकर, के. व्ही. मोरे, राजाभाऊ ढाले, अर्जुन डांगळे, प्रा. माधव मोरे, प्रा. एस. के. जोगदंड, डॉ. अशोक गायकवाड, टी. पी. सावंत, सुरेशदादा गायकवाड, श्री. सिद्धार्थ वानखडे, अॅड. पी. एस. धन्वे, आप्पासाहेब जुमळे, अॅड. जयदेव गायकवाड, निलमताई गोरे, सरला मेश्राम, पुष्पाताई इंगळे, यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने अॅड. बाळासाहेब आंबेडकरांना भारतीय रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोप-यापर्यंत पोहचविता आले.(क्रमश😊
भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या पुनर्बाधणीसाठी अॅड. बाळासाहेब आंबेडकरांना अनेकांचे सहकार्य लाभले त्यात प्रामुख्याने श्री. लंकेश्वर गुरुजी, श्री. बी. आर. सिरसाठ, गुणवंतराव पाटील, दिलीप तायडे, प्राचार्य पटनायक, श्री. सुखदेवराव जाधव, श्री बळीराम खोडके, अॅड. पी. बी. मोरे, वाल्मीक अण्णा दामोदर, किशोर मानवटकर, श्री. चंदन तेलंग, श्री. एस. डी. म्हस्के, श्री. डी. जी. आडे, शिवा इंगोले, अँड. पी. एस. खडसे, अॅड. पी. पी. ताजणे, श्री. श्रावण निंबाळकर, श्री. देवराव वानखडे, नाना श्यामकुळे, श्री. शंकर माणके, एन. यु. सदावर्ते, अॅड. बी. एच. गायकवाड, प्रा. अविनाश डोळस, ज. वि. पवार, प्रा. खांडेकर, के. व्ही. मोरे, राजाभाऊ ढाले, अर्जुन डांगळे, प्रा. माधव मोरे, प्रा. एस. के. जोगदंड, डॉ. अशोक गायकवाड, टी. पी. सावंत, सुरेशदादा गायकवाड, श्री. सिद्धार्थ वानखडे, अॅड. पी. एस. धन्वे, आप्पासाहेब जुमळे, अॅड. जयदेव गायकवाड, निलमताई गोरे, सरला मेश्राम, पुष्पाताई इंगळे, यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने अॅड. बाळासाहेब आंबेडकरांना भारतीय रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोप-यापर्यंत पोहचविता आले.(क्रमश😊
Subscribe to:
Posts (Atom)


