Saturday, June 16, 2018

( भाग – ४६ ) “हिंदुत्ववादी” मुद्द्याचा प्रचार करण्यासाठीच शिवसेना या संघटनेचा वापर करून....भारतीय जनता पार्टीची स्थापना....हिंदुत्ववाद प्रचाराच्या माध्यमातून “अॅक्ट्रोसिटी अॅक्ट” कायदा मंजूर.....! यासाठीच मराठवाडा नामांतर संघर्ष लढा १७ वर्ष चालविला.....!


विषय असा आहे की,जनसंघाच्या माध्यामतून पुन्हा एकदा मनुवादी व्यवस्थेने वेगवेगळ्या प्रकारे समता विस्थापित करण्यासाठी चळवळीतील स्वार्थी नेत्यांना कॉंग्रेसच्या माध्यमातून हाताशी धरून एका चौकटीत आणण्याचे कार्य केले.मात्र मराठवाडा नामांतर चळवळीच्या माध्यमातून नवनवीन नेते उभे रहात होते.यातच भगवा विरुध्द निळा संघर्ष जेवढा जोर धरेन तेवढी समता विस्थापित होईल असे मनुवादी षड्यंत्र होते.१९७६ पासून नामांतराचे आंदोलन जोर धरू लागले होते याचाच फायदा घेण्यासाठी शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात भगवा ध्वज घेऊन काँग्रेसी पिलावळ यांनी दलितांवर हल्ले करण्याचा जोर मोठ्या प्रमाणात सरू केला होता.जो समतेचा भगवा ध्वज बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला होता त्या ध्वजाला बदनाम करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज कसे कट्टरपंथीय हिंदुत्ववादी आहेत हे दाखविण्यासाठी त्यांच्या नावाच्या घोषणा देत दलितांवर हल्ले करण्यात आले.हल्ल्याचे प्रमाण इतके वाढले की,माता भगिनीची आबरू लुटण्याचे प्रकार झाले,दलित तरुणांच्या हत्येचे प्रमाण वाढले,दलित वस्त्यावर हल्ले करून त्या जाळण्याचे प्रमाणात वाढ झाली.हे छत्रपती शिवाराय आणि भगवा ध्वज बदनाम करण्याचे षड्यंत्र होते हे कोणाला समजलेच नाही कारण आपण भावनिक झालो होतो.आपल्याला काहीच समजत नव्हते कारण आपण अजून अडाणी होतो आपल्याला फक्त बाबसाहेब आंबेडकर यांचे नाव त्या विद्यापीठाला कसे लागेल एवढेच समजत होते.परंतु भगव्या ध्वजा विरुध्द निळा ध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराज विरुध्द डॉ.बाबासाहेब आंबेडकर हाच एक लढा निर्माण करून जो अलुतेदार व बलुतेदार यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी जोडला होता तो तोडण्यासाठीचे हे एक षड्यंत्र होते.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थपित केलेली जी समता होती ती विस्थापित करण्याचे एक षड्यंत्र होते.आणि यातून एक मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववाद उभा करायचा हे एक षड्यंत्र होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उभा केलेला समतावादी समाज मोडीत काढून पुन्हा तो समता प्रस्थापित करू शकणार नाही याची ही व्यवस्था होती.याचा फायदा घेण्यासाठी “दलित पॅथर” या संघटनेला संपवून “शिवसेना” मोठे करण्यासाठीचे षड्यंत्र होते. “दलित पॅथर” या तरुणांच्या संघटनेच्या माध्यामतून जास्तीत जास्त हल्ले हिंदुत्वाच्या विरोधात अलुतेदार व बलुतेदार यांचेवर करून त्याच्या पासून तोडण्याचे एक षड्यंत्र होते.आणि या षडयंत्राचा फायदा घेऊन आपले राजकीय अस्तित्व उभारण्यासाठी साल १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली.हिंदुत्वाचा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रात व्हावा यासाठी शिवसेनेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता.यासाठीच हा लढा जास्तीत जास्त कसा चालेल याचीच काळजी मनुवादी व्यवस्थेकडून घेतली जात होती.जशी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तसतसे दलितांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत होते तसतसे “दलित पॅथर” संघटनेच्या तरुणाकडून प्रतिहल्ले होत होते.यामुळे जो अलुतेदार व बलुतेदार दलीतापासून दूर जात राहिला आणि आंबेडकरी चळवळ एक संघ न रहाता जाती जातीत वाटू लागली.बौध्द झालेल्या अस्पृश्य महार याचेवरच अन्यायचे प्रमाण जास्त वाढू लागले होते.या दहशती मुळे दलितांच्या बाजूने कोणी यायला तयार नव्हते.इतके भयानक अत्याचार वाढले होते की,आता दलितांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर येऊ लागला याचे लोन संपूर्ण देशात पसरले देशातील अस्पृश्य व्यक्तीचे जीवन धोक्यात आल्याचे दिसून आले त्या अस्पृश्यांच्या जमिनी लाटण्याचे कटकारस्थान मोठ्या प्रमाणात वाढ झाली जो लपून छपून दलितांच्या जमिनी लाटायचा तो आत्ता उघडपणे जमिनी लाटू लागला.आणि दलितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे करून “दलित अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदा” म्हणजेच “अॅक्ट्रोसिटी अॅक्ट” हा कायदा १९८९ रोजी केंद्रसरकारने पास करून देशातील दलितांचे संरक्षण केले.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षतेसाठी १९५० ला नागरी हक्क संरक्षण कायदा दिलेला आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.(क्रमश😊



No comments:

Post a Comment