Sunday, June 17, 2018

( भाग – ४७ ) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यावर आजही समाजाकडून होतोय अन्याय....खरच हा समाज आपला आहे काय....? आणि शिकलेला वर्गही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याला विरोध करताना दिसत आहे...खरच हा शिकलेला अधिकारी वर्ग आपला आहे काय...? आता हे शोधण्याची वेळ आलेली आहे......!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले नंतर जे रिपब्लिकन नावाने पक्ष उभे राहिले त्या नेत्यांचे स्वार्थ राजकारण आत्ता जनते समोर आले आहे. रिपब्लिकन नावाला भावनिक होऊन जनता साथ देत होती.पण आत्ता जनतेच्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या आहेत.मग सामाजिक संघटना म्हणून “दलित पॅथर” असोत कोणतेही नेत्यांना आता जनता भिक घालीत नाही.जो तो उठतो ज्याला सामाजिक आणि राजकीय प्रश्न कळत नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभी केलेली “समता” कळत नाही.बौध्द धम्मातील २२ प्रतिज्ञा म्हणजे काय हे समजत नाही.ज्याला स्वराज्य म्हणजेच संविधान हे कळत नाही.आणि महत्वाचे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निस्वार्थ भावनेचा सन्मान कसा करावा हे कळत नाही.जो उठतो तो रिपब्लिकन नावाने किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाने संघटन उभारतो आणि लेटरपॅड तयार करून आपले उदारनिर्वाह करतो.रिपब्लिकन नाव आणि निळा ध्वज हे काही उदारनिर्वाहाचे साधन नाही ते त्यागाचे आणि संघर्षाचे प्रतिक आहे.आता जनता समजली आहे त्यामुळे अशा उदारनिर्वाह करण्याऱ्याचे संघटन चालविणाऱ्या लोकांना दाद देत नाही हे समोर आलेले आहे.अशा भांडवली संघटना पक्ष बंद झाले पाहिजे.काही लोक प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात काम करतात मात्र नेहमी समाजामध्ये इतर लोकाप्रमाणे बदनामी करीत फिरत असतात.स्वत:ला जेष्ठ म्हणवून गटातटाचे राजकारण उभे करीत फिरत असतात.रमणा घेऊन कार्य करीत असतात हे लोक कोठून आले माहित नाही मात्र मला चळवळ संपूर्ण कळते असे आव आणीत असतात.मात्र त्यांना काहीच कळत नाही असे माझे ठाम मत आहे तसे असते तर नवनवीन संघटना उभ्या राहताना त्यांना पाठबळ दिले नसते.उलट अशा कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांना समजून सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घराणे मजबूत करण्याचे कार्य करून चळवळीचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्याचा जाहीर करून प्रामाणिकपणेची जाण करून दिली असती.एकंदरीत या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर माझे मन अस्वस्थ झाले आहे यामध्ये सर्वात मोठा दोष हा शिकलेल्या वर्गाचा आहे त्यांनी कधी पाठीमागे राहिलेल्या वर्गाचा विचार केला नाही.त्यांनी असा विचार का केला नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही ठिकाणी केला असता असे लक्षात येते की,शिकलेला वर्ग नेमका आपला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो....परंतु त्यातील  ८०% वर्ग आपला नसल्याचे जाणवते.त्याचे कारण असे आहे की,आजही वस्ती वाड्या पर्यंत शिक्षण कसे करावे कोणाला कळत नाही तसे त्या वर्गाने प्रचार आणि प्रसार केल्याचे कुठेही दिसत तो अप्पलपोटी वर्ग असल्याची बरेच जिवंत उदाहरणे देता येतील.आताशी कुठे समाजाच्या खऱ्या वर्गा पर्यंत सरकारी सेवेत कसे दाखल व्हायचे ते कळाले आणि मनुवादी सरकारने स्पर्धा परीक्षा बंद करून प्रायव्हेट सेक्टर मधून सरकारी सेवा भरती करायचे ठरविले आहे.त्यामुळे १९५७ पासून ते आत्ता पर्यंत समाजाचे नुकसानच होत आलेले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आज भारिप बहुजन महासंघ या पक्षाच्या माध्यामतून समाजाला न्याय देण्याचे काम करीत आहेत.परंतु यांच्या कर्यात मनुवादी रमणाधारी गुलाम अडथळा निर्माण करीत आहे.त्यांची बदनामी कशी होईल याची तजवीज करीत आहे आजही समाजापासून त्यांना दूर ठेवण्याचे काम करीत आहेत.नुकताच माता रमाबाई यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती श्रीमान कोविंद यांचे हस्ते करण्यात आले.परंतु या कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याला बोलविण्यात आलेले नाही त्यांचे घराण्याला दूरच ठेवण्याचे काम करण्यात आले आहे.जर आज समाजाचे एकसंघ नेतृत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे घराण्याकडे ठेवले असते तर समाजाला न्याय हा मिळालाच असता असे माझे मत आहे.(क्रमश😊

No comments:

Post a Comment