बुलडाणा जिल्हयाच्या नांदुरा तालुक्यातील दहिगाव सह विटाळी, तांदुळवाडी, सातपुडी, औरंगपूर या पाच गावांचीही बाल मजूर मुक्त गावाकडे वाटचाल सुरु असून पुढील महिन्यापर्यंत ही गावे बाल मजूर मुक्त होणार आहेत.
नांदुरा तालुक्यातील २९ गावांमध्ये आंतरराष्ट्रीय संस्था सेव्ह द चिल्ड्रेन च्या वतीने व महात्मा फुले समाज सेवा संस्था करमाळा जिल्हा सोलापूरच्या वतीने परिवर्तनसाठी बाल अधिकार हा प्रकल्प मागील दोन वर्षापासून राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत बालकांना असलेले त्यांचे मुलभूत अधिकार यांची जाणीव बालकांना करुन देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बालहक्कासोबतच शासनाच्या मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा कायद्याबाबत जनजागृती, शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांबाबत जनजागृती, महिलांचे सक्षमीकरण आदी उपक्रम राबविल्या जात आहेत. यामध्ये असलेली २९ गावे डिसेंबर २०१२ पर्यंत बालमजूर मुक्त करण्याच्या दृष्टीने कार्य सुरु असून पहिल्या टप्प्यात सध्या दहिगाव, विटाळी, तांदुळवाडी, सानपुडी, औरंगपूर या गावांची या दिशेने जोरात वाटचाल सुरु आहे. प्रकल्पातील २९ गावांसह या पाच गावामध्ये १५ जुलै पर्यंत बालमजूर मुक्त गाव व शाळा भरती मोहिम सरु आहे.
बालमजूर मुक्त गावाच्या निकषाप्रमाणे ० ते ६ वयोगटातील सर्व बालक अंगणवाडीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुले शाळेत जातात, शाळेत १०० टक्के पटनोंदणी तसेच नियमित व पूर्णवेळ शाळेत, शाळा बाह्य विद्यार्थी गावात नसणे, ६ ते १४ वयोगटातील कोणतेही मुलं कामाला नसणे, पालकांना बालहक्क व बालमजूर कायद्याची जाण असणे, शाळा व्यवस्थापन समित्यांना अधिकार, कर्तव्य व जवाबदारीची जाणीव असणे, बाल संरक्षण समित्यांना कर्तव्य, जवाबदारीची जाण असणे, बाल गटांकडून बालहक्का विषयी जनजागृती,सर्व उपक्रमामध्ये गावातील पालक, बालक, शेतमालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्त्यांचा महिलांचा सहभाग असणे आदी सर्व बाबींवर वरील गावांमध्ये जनजागृती सुरु आहे.
ही गावे या महिन्यात बालमजूर मुक्त होणार यात शंका नाही. मात्र पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत प्रकल्पातील २९ गावे ज्यामध्ये नारखेड, भोटा, निमगाव, अवधा, इसापूर, भोरवंड, पिंपळखुटा, वडी, बेलुरा, नायगाव, मामुलवाडी, पोटडी, लोणवडी, वाडी, तिकोडी, सातपुडी, सिरसोली, कोकलवाडी, माळेगाव, खडगाव, मोमिनाबाद, मेंढळी ही गावे सुध्दा प्रकल्पाच्या माध्यमातून बालमजू
No comments:
Post a Comment